बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
29 Jun 2011 - 9:06 pm

मित्र हो,
आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे.

(संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य)
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.

रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात होते माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे.
१. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?

उत्तर - त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात......
.....नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते.

नाडीकेंद्र चालक श्री. ईश्वरनजींचे स्पष्टीकरण -
याठिकाणी बी. प्रेमानंद अभावितपणे नाडीपट्यात व्यक्तीचे नाव लिहिलेले असते असे मान्य करतात. रिसबुडांना तेच मुलतः अमान्य आहे म्हणून ते प्रेमानंदांशी वाद उकरून काढत होते.
आता तर अनेक लोकांच्या नाडीपट्यातील नावाची शहानिशा तमिळ तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ताडपट्टीतील भाषा तमिल नसते त्यात काहीही भविष्य कथन नसते आदी आक्षेप फुसके ठरले आहेत.ताडपट्टीत व्यक्तीच्या जन्मदिनांकाची व ग्रहस्थितीची नोंद असणे शक्य नाही म्हणणाऱ्यांनी त्या नोंदी पहाव्यात व मग आपले मत ठरवावे.

८. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्याच अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा धड बोलणारी माणसे मिळत नाहीत. मग नाडी केंद्रात भविष्य पहायला आलेल्या लोकांना त्यांच्या भाषेत बोलते करून त्यांच्या कडून नकळत माहिती मिळवायला लागणारे भाषापटुत्व व संभाषण कुशलता फार दूरची गोष्ट. उलट भविष्य कथन त्या त्या भाषेत टेप करून देताना भाषांतरकाराच्या रुपांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. शिवाय आमच्यासारख्या रंगाने, पोशाखाने व बोलण्याच्या धाटणीने तात्काळ ओळखू येणाऱ्या लोकांनी जमलेल्या ग्राहकांशी सलगीकरून माहिती जमा करणे कसे शक्य आहे? हे विरोधकांनी प्रयोग करून आम्हला दाखवावे.
९. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर ताडपत्राच्या नव्या पानांवर लेखन करायला आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील.
१०. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यांच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात.
११. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही.
भाग ६ समाप्त. पुढे चालू.....

धोरणमांडणीप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

30 Jun 2011 - 5:38 am | नरेशकुमार

समाप्त.

हुश्श्श्श्श्श.................

पुढे चालू.....

आता का परत ?

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

माझा पराभव अजुन झालेला नाही.

बायदवे लेख खुप मोठ्ठा आहे. वाचुन वाचुन कंटाळा आला. काहीतरि थोडंस लिहा मग जमेल वाचायला.
कधि वेळ मिळालाच तर वाचेन मगच देईन सविस्तर प्रतिक्रिया.

एक सजेशन : तुम्ही ते काळं, ब्ल्यू, रेड मध्ये का लिहिता हो ! डॉल्यांना तरास होतो.

मित्रा,

कधि वेळ मिळालाच तर वाचेन मगच देईन सविस्तर प्रतिक्रिया.

घाई नाही. दमाने द्या. पण तर्काने नको. प्रत्यक्ष कृतीशील होऊन.....

शिल्पा ब's picture

30 Jun 2011 - 1:31 pm | शिल्पा ब

<<माझा पराभव अजुन झालेला नाही.
तुम्ही स्वतःला बुद्धीवादी समजता यातच तुमचा पराभव आहे हे तुम्हाला कधी समजणार?

किसन शिंदे's picture

30 Jun 2011 - 9:29 am | किसन शिंदे

एक सजेशन : तुम्ही ते काळं, ब्ल्यू, रेड मध्ये का लिहिता हो ! डॉल्यांना तरास होतो.

ओक साहेब,
नकुंशी सहमत आहे, ते लाल निळं वाचताना डोळ्यांना खुप त्रास होतो.

आत्मशून्य's picture

30 Jun 2011 - 4:34 pm | आत्मशून्य

तुम्ही ते काळं, ब्ल्यू, रेड मध्ये का लिहिता हो

तरूण पणी डिस्कोचा नाद लागला तर त्याचं प्रतीबींब धाग्यामधे असं पडण्याची माझ्या बाबत शक्यता आहे, पण ओक साहेबांच्या खूलाशाच्या प्रतिक्षेत.(जो कधीही संपूर्णपणे दिला जात नाही हे माहीत आहे तरी)

स्व's picture

30 Jun 2011 - 9:55 am | स्व

माझा साहेब झापताना नेहमी म्हणतो "you talk a lot, but say nothing!!"

बुद्धिवाद्यांचा पराभव वगैरे ठिक आहे हो, ह्याच विषयाबद्दल इथे अनेकांनी भरपूर प्रश्न विचारलेत जुन्या धाग्यांवर.
त्यापैकी कशाचही उत्तर न देता नवीन धागा सुरु करत सुटताय आपण.

प्यारे१'s picture

30 Jun 2011 - 10:19 am | प्यारे१

>>>>माझा साहेब झापताना नेहमी म्हणतो "you talk a lot, but say nothing!!"

साहेब हुशार आहे.

शशिकांत ओक's picture

30 Jun 2011 - 4:31 pm | शशिकांत ओक

आता
गगनविहारी यांनी Thu, 30/06/2011 - 12:57 ला प्रकाशित केले.

तुम्ही सविस्तर आणि मुद्द्याचे उत्तर देत नाही ही तक्रार आता मी मागे घेत आहे.

धन्यवाद.

आत्मशून्य's picture

30 Jun 2011 - 4:46 pm | आत्मशून्य

अरे वा आपण फक्त गविंच्याच प्रश्नाला उत्तरे देता/दिलीत, हे छाति ब्डवत सांगयचे काही विशेष प्रयोजन ? नाही आमच्या प्रश्नाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या म्हणून हा सात्विक संताप व्यक्त करावासा वाटालाय.

मलाही प्रथमच दिलंय रे..

सर्वांच्या नाडीपट्ट्या नसतात. ज्यांच्या नशिबात / भाग्यात ती पट्टी जाणून घेणं आहे तेवढ्यांच्याच पट्ट्या बनल्या आहेत आणि तेवढेच लोक काहीही होऊन त्या पहायला जातीलच. असे एक्स्प्लेनेशन कळले.

पूर्ण पटले असे म्हणत नाही पण मान्य करुन एक उरलेला प्रश्न विचारतो.

वेगवेगळ्या केंद्रांमधे (पुणे, चेन्नई, सोलापुर --उदाहरणार्थ) नाडीपट्ट्या पहायची सोय आहे असे आपल्या लिखाणातून कळले. म्हणजेच चेन्नईत सेंट्रल रिपॉझिटरी आणि पुण्यातून ती अ‍ॅक्सेस होतेय असे दिसत नाही. सर्व नाड्या सर्व केंद्रात ठेवल्या असतील तर याचाच अर्थ की प्रत्येकाची डुप्लिकेट/ट्रिप्लिकेट (पट्टी गुणिले क्ष, क्ष=केंद्रांची संख्या) बनलेली आहे.. हे तरी मान्य करावेच लागेल.

माझा प्रश्न असा, की प्रत्येक केंद्रात एकेक अशा कॉपीजही मूळ लेखक ऋषींनी लिहून ठेवल्या आहेत काय आणि अशी किती केंद्रे कुठेकुठे बनतील ते गृहीत धरून तेवढ्या पट्ट्या तयार करुन ठेवल्या आहेत काय?

किंवा मग प्रत्येकाची एकच युनिक पट्टी आहे तर..

माझी पट्टी जर चेन्नईत असेल तर ती पुणे केंद्रातही मिळेल का? की कुठेकुठे केंद्रे निघतील आणि मी त्यातल्या कोणत्या केंद्रात नाडी शोधायला जाईन हेही हजारो वर्षांपूर्वी ठरले आहे?

शशिकांत ओक's picture

30 Jun 2011 - 12:21 pm | शशिकांत ओक

मित्र हो,

गगनविहारींच्या मनातील प्रश्न अनेकांच्या मनात असतील...

जर सर्व नाड्या सर्व केंद्रात ठेवल्या असतील तर ...प्रत्येकाची डुप्लिकेट/ट्रिप्लिकेट (पट्टी गुणिले क्ष, क्ष=केंद्रांची संख्या) बनलेली आहे..

जर-तर हे तर्क आहेत.
अनुभवाची सत्यता अशी आहे कि आपण मानता तशा डुप्लिकेट पट्टया बनवलेल्या नाहीत.

प्रश्न असा, की प्रत्येक केंद्रात एकेक अशा कॉपीजही मूळ लेखक ऋषींनी लिहून ठेवल्या आहेत काय आणि अशी किती केंद्रे कुठेकुठे बनतील ते गृहीत धरून तेवढ्या पट्ट्या तयार करुन ठेवल्या आहेत काय?

अनुभवाने याचे उत्तर होय असे येते.

माझी पट्टी जर चेन्नईत असेल तर तेथे व ती पुणे केंद्रातही मिळेल का?

अनुभवाने असे लक्षात येते कि आपली एक पट्टी चेन्नईतही मिळू शकेल व नंतर त्याच महर्षींची पुण्यातही. मात्र जी पट्टी चेन्नईत होती तीच पट्टी पुण्यातील केंद्रात नसते. ती वेगळीच असते. असे मुद्दाम शोध करून मिळवलेल्या प्रत्येक वहीतील श्लोकांची छाननी करून घेऊन अनुभवले - पाहिले गेले आहे.

अनेक लोकांनी एकच महर्षीं लिखित आपली कथने विविध नाडीकेंद्रातून मधे काही काळ गेल्यावर पुन्हा पाहिली आहेत. त्यातील श्लोकाची रचना व मधल्या काळातील घटनांचा बदललेला उल्लेख त्यात आढळतो.उदा. किती तरी जण लग्नाआधी व नंतर आपली पट्टी शोधतात. त्यात नंतरच्या पट्टीत आपल्याजोडीदाराचे नाव कोरलेले आढळते. जे आधीच्या पट्टीत नसते.अशा दोन्ही पट्या कधी एकाच महर्षींच्या असल्यातरी त्याच किंवा वेगवेगळ्या केंद्रातून निघतात.

एकाच केंद्रात, एकाच व्यक्तीच्या विविध महर्षींनी लिहिलेल्या पट्टया - बसल्या बैठकीला - लागोपाठ निघतात. असे अनुभवले जाते.
आपल्याला तमिळ कळले नाही तरी पट्टीच्या पॅकेटचा आकार, पट्टीची रुंदी- लांबी, कधी खराब झालेला भाग, तुटका, भोके पडलेला आदि वरून तमिल भाषा न येणाऱ्याला ही प्रत्येक पट्टी वेगळी आहे किंवा नाही हे सहज अनुभवता येते.
असो.
या अनुभवाच्या गोष्टी आहेत.

इथल्या मित्रांना अनेक गोष्टींचे विवरण इथे व आत्ता अशा तातडीने हवे असते ते तसे देणे शक्य नसते किंवा योग्य नसते.
नाडीग्रंथ चेष्टा- मस्करीचा विषय न राहता नाडीग्रंथांचा अभ्यास जे खरोखरच्या तळमळीने करू इच्छितात त्यांना प्रवृत्त करणे हा इथे लिखाणाचा उद्देश आहे.
इतर अनेक लोकांना नाडी ग्रंथाची सामान्य माहिती असावी म्हणून विविध तऱ्हेने लेखन केले जाते.

रंगसंगती विषयी - या लेखमालिकेच्या सुरवातीपासून जे रंग टाकले गेले ते सातत्य म्हणून राखले गेले.

गवि's picture

30 Jun 2011 - 12:57 pm | गवि

तुम्ही सविस्तर आणि मुद्द्याचे उत्तर देत नाही ही तक्रार आता मी मागे घेत आहे.

धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

30 Jun 2011 - 6:53 pm | श्रावण मोडक

आजपर्यंत ठीक आहे, काही तरी लिहितात, लोक वाचतात, चर्चा करतात, वाद घालतात असं म्हणून मी हे लेखन सोडून देत होतो. आज मात्र हतबुद्ध झालो.

आपली एक पट्टी चेन्नईतही मिळू शकेल व नंतर त्याच महर्षींची पुण्यातही. मात्र जी पट्टी चेन्नईत होती तीच पट्टी पुण्यातील केंद्रात नसते. ती वेगळीच असते. असे मुद्दाम शोध करून मिळवलेल्या प्रत्येक वहीतील श्लोकांची छाननी करून घेऊन अनुभवले - पाहिले गेले आहे.
अनेक लोकांनी एकच महर्षीं लिखित आपली कथने विविध नाडीकेंद्रातून मधे काही काळ गेल्यावर पुन्हा पाहिली आहेत. त्यातील श्लोकाची रचना व मधल्या काळातील घटनांचा बदललेला उल्लेख त्यात आढळतो.उदा. किती तरी जण लग्नाआधी व नंतर आपली पट्टी शोधतात. त्यात नंतरच्या पट्टीत आपल्याजोडीदाराचे नाव कोरलेले आढळते. जे आधीच्या पट्टीत नसते.अशा दोन्ही पट्या कधी एकाच महर्षींच्या असल्यातरी त्याच किंवा वेगवेगळ्या केंद्रातून निघतात.

आणि असे असूनही ती माझीच पट्टी म्हणायची. अशक्य आहे.
माझ्या नाडीपट्टीत (म्हणजे कोणाच्या हा प्रश्न आहेच) बहुदा ही हतबुद्धता आज लिहिली असावी. असो.

शशिकांत ओक's picture

30 Jun 2011 - 7:12 pm | शशिकांत ओक

मित्रा,

ती माझीच पट्टी म्हणायची. अशक्य आहे.

एक दिवस मलाही असेच वाटले होते.

मात्र विविध प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर ती सत्यता आहे असे मान्य करावे लागते.
असे नसेल असा आपला अनुभव असेल तर तो अनुभव सादर करावा.

श्रावण मोडक's picture

30 Jun 2011 - 8:19 pm | श्रावण मोडक

म्हणजे मग माझ्या पट्ट्या किती असतात?
वयाच्या सोळाव्या वर्षी मी एका चित्रपटात काम केले. त्यावेळी माझ्याविषयी असे म्हटले जायचे की, मी त्या क्षेत्रात नाव कमावणार. माझी त्यावेळची एक पट्टी.
अठराव्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा बंगळूरमध्ये एका क्रिकेट सामन्याचे समालोचन केले तेव्हा माझ्या क्रिकेटविषयीच्या ज्ञानाने तिथले व्यावसायीक समालोचकही प्रभावित झाले. त्याच काळात मी करायचो ते लेखन मात्र खरोखर (आज मागे वळून पाहताना मलाही तसे वाटते) भिक्कार होते. माझी त्यावेळची नाडीपट्टी वेगळी.
या दोन्हीच्या आधी माझे भविष्य असे सांगायचे की मी डॉक्टर होणार. माझा व्यवसाय पाण्याशी संबंधित असणार. पत्रिका आणि भविष्य सांगणाऱ्यांचा भंपकपणा तेव्हाच समजला. तेव्हाची माझी नाडीपट्टी वेगळी असणार.
पंचविशीत मी नोकरी सोडली. धंदा करायचा म्हणून. तेव्हाची नाडीपट्टी वेगळी. धंदा झालाच नाही. मी परत नोकरीत गेलो. नाडीपट्टी बदलली असणारच. कारण यावेळची नोकरी लेखनाशी संबंधित नव्हतीच. ती तांत्रीक होती.
मी लग्न केले तेव्हाची नाडीपट्टी वेगळी असणार. मला आता नाडीपट्टी पहावीच लागेल. त्यात माझा घटस्फोट कसा लिहिला असेल ते पहायचे आहे.
ही प्रत्येक घटना, घडामोड माझ्या जगण्याला वेगळं वळण लावणारी असल्याने त्या-त्या वेळच्या नाडीपट्ट्या वेगळ्या असल्या पाहिजेत. एकाच पट्टीत हे सारं सापडलं तर मात्र नाडीमहर्षी जगापुढचे अनेक प्रश्न लीलया सोडवू शकतात, असे मी जाहीर करेन (माझ्या मताला किंमत नसेल हा भाग वेगळा), आणि, मी हे जाहीर करेन, हे त्या नाडीमहर्षींच्या नाडीपट्टीत लिहिलेले असेल. मला ती महर्षींचीच पट्टी वाचायला मिळेल का?

शशिकांत ओक's picture

30 Jun 2011 - 9:37 pm | शशिकांत ओक

का नाही जरूर. प्रयत्न करून पहा.

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 9:53 am | श्रावण मोडक

प्रयत्न करा, म्हणजे काय? अशी नाडीपट्टी देतात का, त्या महर्षींच्या अशा किती नाडीपट्ट्या आहेत, त्यापैकी कोणती आता पाहता येईल, महर्षींच्या संदर्भातील जीवनक्रमातील कलाटणीच्या घटनांतील मागच्या नाडीपट्ट्या मिळतील का? अशा इतरांच्या नाडीपट्ट्या देत असतील तर त्याच्या अटी काय? त्या अटींत मी बसत असेन तर प्रयत्न करण्यात अर्थ आहे. एरवी दगडावर डोकं आपटण्यात अर्थ नाही. कारण, त्यात कष्ट, वेळ वायाच जाणार. तेव्हा, अशी माहिती द्या, ज्याद्वारे पडताळून पाहता येईल. एरवी तुमचे हे लेखन काही तरी भंपकपणा प्रसारित करण्यासाठीचे आहे, इतकाच निष्कर्ष कायम होईल.

नगरीनिरंजन's picture

1 Jul 2011 - 8:20 am | नगरीनिरंजन

उदा. किती तरी जण लग्नाआधी व नंतर आपली पट्टी शोधतात. त्यात नंतरच्या पट्टीत आपल्याजोडीदाराचे नाव कोरलेले आढळते. जे आधीच्या पट्टीत नसते.अशा दोन्ही पट्या कधी एकाच महर्षींच्या असल्यातरी त्याच किंवा वेगवेगळ्या केंद्रातून निघतात.

याचा अर्थ, पट्टी पाहणारा त्याची 'ती' पट्टी कधी आणि कुठे पाहणार आहे हे महर्षींना आधीच ज्ञात होते तर. मग नाडीग्रंथाचा अभ्यास कोण, कधी आणि कशाला करणार हे ही त्यांना ज्ञात असणारच. जर हे आधीच सगळं ठरलेलं आहे तर आपण वृथा लोकांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यात आपला वेळ आणि शक्ती खर्च करीत आहात असे वाटते. अर्थात तुम्ही असं करणार असंच तुमच्या नाडीत लिहीले असणार यात शंका नाही.

स्पा's picture

30 Jun 2011 - 10:36 am | स्पा

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

खरय , म्हणून हे अस वाचायची वेळ आलीये हल्ली

कठीण आहे (मिपाच)

सहज's picture

30 Jun 2011 - 11:03 am | सहज

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

अभिनंदन हो विजयी मंडळींचे (म्हणजेच निर्बुद्ध संस्थेच्या अविचारी सदस्यांचे का?) बादवे कोणत्या कट्टर सदस्याच्या नाडीपट्टी मधे हे कोरलेले होते म्हणे महर्षींनी!! पुराव्याचा फटू द्यालच ना पुढच्या भागात!

कोणाच्या १ बीएचकेवर प्यार्टी आहे मग ह्या विजयाची!!

श्रावण मोडक's picture

30 Jun 2011 - 12:20 pm | श्रावण मोडक

अभिनंदनाच्या मजकुराशी पूर्ण सहमत.

मी तर म्हणतो हा विजयोत्सव सर्वांनी आपापल्या नाड्या मोकळ्या करून साजरा करावा! (नाड्या कमी पडत असतील तर ओकांकडून उधारीवर मिळतीलच याची पुणेरी लोकांनी नोंद घेणे).

कूठं गेली माझी नाडी!

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jun 2011 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार

त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही.

+१ शब्दाशब्दाशी सहमत आहे.
ओक साहेब, तुम्ही लिहित रहा आणि अज्ञजनांना मार्गदर्शन करत रहा.

विरोध करणारे करोत बापडे, त्यांच्याविषयी राग नाही. पण तुम्ही त्यांच्या अज्ञानाकडे आणि स्वल्पबुद्धीकडे दुर्लक्ष करुन लिहित रहा. आम्ही आहोत वाचायला.

शशिकांत ओक's picture

30 Jun 2011 - 12:57 pm | शशिकांत ओक

मित्रा,

आम्ही आहोत वाचायला.

धन्यवाद.

शशिकान्त'जी, आज आपल्या समाजात खूप जण असे आहेत... की ज्यांना नाडी-पट्टी पाहाण्याची तीव्र इच्छा आहे...ज्यांचा नाडी भविष्यावर पूर्ण विश्वास आहे... केवळ मुम्बई, पुणेच नाही तर अगदी खेडेगावातल्या लोकांना देखील नाडी भविष्याचे महत्त्व पटलेले आहे.. आणि मला नक्की विश्वास वाटतो, की त्यांचा भोळा भाव ओळखून महर्षि त्यांच्या पट्ट्या सापडवायला नक्की मदत करतील... आणि पट्टीतील भविष्य ऐकून त्या सर्वांचा नाडी ज्योतिषावरील विश्वास अजून दृढ होईल.

____________________

ज्या लोकांना त्यांच्या पट्ट्या मिळत नाही.. किन्वा महर्षि इच्छेनुसार त्या पट्ट्या पाहायचा योग आलेला नाही... अश्या लोकांच्या त्वरित शन्का निरसनासाठी...आपण पुढील लेखात अत्रि-जीव-नाडी वर प्रकाश टाकला, तर कदाचित गरजू लोकांना त्याचा उचित फायदा होईल... असे वाटते...

_____________________

बाकी तथाकथित बुद्धीवादी संस्थांचा, विचारांचा पराभव कधीच झालेला असूनही त्यांपैकी काही जण बाहेरच्या जगात स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा क्षीण प्रयत्न करताना दिसतात... हे पाहून त्यांची कीव आल्याशिवाय राहत नाही!!!
:)

आत्मशून्य's picture

30 Jun 2011 - 5:17 pm | आत्मशून्य

आज आपल्या समाजात असे बरेच आहेत ज्यांना ओकसाहेबांचे लिखाण वाचून नाडी बघायची खूमखूमी आली आणी त्याप्रमाण ते वागले आणी ते अजिबात खरं ठरलं नाहीये अजून , आणी मी त्यातलाच एक :(, मनात भिती आणी कूशंकांच घरट मात्र वेगानं वाढतय :( कारण उत्तर द्यायला कोणच समोर येत नाहीये. नूसतं हीकडं जा ह्यांव करा आनं त्याव करा असेच सल्ले भेटत आहेत

मृगनयनी जी,

आणी ते (कथन)अजिबात खरं ठरलं नाहीये अजून , आणी मी त्यातलाच एक

उत्तर द्यायला कोणच समोर येत नाहीये.

इति आत्मशून्य...

आत्मशून्य आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या गरजांना उद्देशून....

आपण त्यांना विचारू शकता....

नाडी ग्रंथ पाहिले कुणी ...... पृच्छकाने....
उत्तरे दिली कुणी....... नाडी महर्षींनी.....
त्याने समाधान झाले नाही कुणाचे.....पृच्छकाचे....
मग त्याचे समाधान करणारे कोण असावेत......ओक....
कारण त्यांनी आपला नाडी ग्रंथांचा अनुभव लेखातून सादर केला म्हणून मी तिथे गेलो........

मनात भिती आणी कूशंकांच घरट मात्र वेगानं वाढतय

मित्रांनो,
मृगनयनींनी म्हटल्याप्रमाणे नाडीमहर्षींच्यापाशी जावे व आपली भीती वा शंका निरसन कराव्यात...

सहज's picture

30 Jun 2011 - 7:35 pm | सहज

नाडी ग्रंथ पाहिले कुणी ...... पृच्छकाने....
उत्तरे दिली कुणी....... नाडी महर्षींनी.....
त्याने समाधान झाले नाही कुणाचे.....पृच्छकाचे....
मग त्याचे समाधान करयची पावर आमाला नाय......
आमी पैसे भविष्याचे घेत नाही, माहीतीची गॅरंटी देत नाही. आमची फक्त नाडीपट्टी शोधायची सेवा फी आहे. खरे खोटे आमाला माहीत नाही. अजुन काही विचारायचे असल्यास अजुन पैशे टाकावे लागतील..

क्लास!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2011 - 9:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पृच्छक नाडी ग्रंथ पहाणार। नाडी महर्षि उत्तर देणार।
नाडी वाचक सेवा फी घेणार। बेसुमार धागे निश्चित॥

-- इति शशिओकं सहजवाक्यम

चला नाड्या लिहू या ... अर्रर्र, नाडी शब्द जुना झालाय, साडी, माडी, ताडी, खाडी, खोडी, रोडी(ज), इ.इ. बरेच शब्द बाकी आहेत. सहजमामा, पुढची टपरी कसली टाकायची?

==========================
भीती ही धर्माचा मूलाधार आहे. -- बर्ट्रांड रसल. (सायन्स अँड रिलीजन)

आत्मशून्य's picture

1 Jul 2011 - 7:02 am | आत्मशून्य

+++++++++१

@ ओक साहेब

मग त्याचे समाधान करणारे कोण असावेत......ओक....
नाडी ग्रंथ पाहिले कुणी ...... पृच्छकाने....
उत्तरे दिली कुणी....... नाडी महर्षींनी.....
त्याने समाधान झाले नाही कुणाचे.....पृच्छकाचे....
मग त्याचे समाधान करणारे कोण असावेत......ओक....
कारण त्यांनी आपला नाडी ग्रंथांचा अनुभव लेखातून सादर केला म्हणून मी तिथे गेलो........


आपण केवळ आपल्याच न्हवे तर लोकांना आलेल्या अनूभवा बद्दलही लिखाण केले आहे तेव्हां तूम्ही केवळ तूमचाच व्यक्तीगत अनूभव लिहता असा गोंडस गैरसमज खरोखर मिरवू नये. इतकच बोलेन की ही अफवा पसरवू नका व कोणी पसरवली तर बळी पडू देऊ नका.

अवांतर :- उर्मटपणाची पातळी गाठलीय असं भासणारं मार्केटींगचे तंत्र आजच्या काळात कोण का सहन करेल

शशिकांत ओक's picture

30 Jun 2011 - 10:22 pm | शशिकांत ओक

विक्षिप्त ताईंना,

रंगी-बेरंगी वापराने

इ.इ. बरेच शब्द बाकी आहेत

. मजा आली.

दैत्य's picture

30 Jun 2011 - 11:34 pm | दैत्य

चला नाड्या लिहू या ... अर्रर्र, नाडी शब्द जुना झालाय, साडी, माडी, ताडी, खाडी, खोडी, रोडी(ज), इ.इ. बरेच शब्द बाकी आहेत. सहजमामा, पुढची टपरी कसली टाकायची?

नाडीवरून आठवलं, लेंग्यांचा व्यवसाय जास्त चांगला आहे!! नाडीची माहिती पट्टीवर लिहिण्यापेक्षा लेंग्यावर लिहायला जास्त जागा मिळेल आणि कापड असल्यानं स्टोरेजही व्यवस्थित होईल..
;)

पिवळा डांबिस's picture

1 Jul 2011 - 10:09 am | पिवळा डांबिस

तुमची मतं मला पटोत न पटोत.....
तुमच्या चिकाटीचं मात्र मला अतिशय कौतुक वाटलं.....
म्हणून मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येतो आहे...
तेंव्हा तुम्ही जर व्यनि करून मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवलांत तर मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे....
माझा या नाडीपरिक्षेवर काडीचाही विश्वास नाही..
पण जर तुम्ही सहकार्य देण्यास तयार असाल तर मी काहीही असत्य बोलणार/ लिहिणार नाही याची ग्वाही मी देतो....
माझं भूत जर सत्य ठरलं तर इथे मिपावर तुमचा मी एक पाठीराखा असेन याची खात्री असावी....
बोला करतांय का व्यनि?

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 10:37 am | श्रावण मोडक

ओकांच्या चिकाटीबाबत सहमत.
तुमची हरकत नसेल तर मीही नाडीपरीक्षेसाठी तुमच्याबरोबर येईन म्हणतो. :)

पिडा व श्रामो ह्या दोघांचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.

अभि़ज्ञ.

विनायक प्रभू's picture

1 Jul 2011 - 12:14 pm | विनायक प्रभू

@पिडा आणि श्रामो
तुमचा शोध पुरा झाल्यावर श्रमपरिहारासाठी होणार्‍या कट्ट्याला मला जरुर बोलवा.
ज्याना अनुभव जाणुन घ्यायची इच्छा असेल त्यांनी नावे जरुर नोंदवावीत.
मी पि.डां ना पेशल माल आणायची विनंती करणार आहे.
ते नाही म्हणणार नाहीत.
@ओक साहेब,
तुमच्या लेखाने ही सोय झाल्याबद्दल धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 1:02 pm | श्रावण मोडक

मास्तर, हेच आमंत्रण समजा. पिडांकाका नाही म्हणणार नाहीतच. नावनोंदणीचे अपडेट्सही द्या. :)

मित्रानो,
ओकांची फजिती करायची आहे असा आपला होरा दिसतोय.
'तुमच्या' म्हणजे 'ओकांच्या नाडी परिक्षेला अर्थात ओकांना कसेही करून खोटे ठरवायला करायची कारवाई' असे मनात असेल तर मला त्यात इंटरेस्ट नाही. कारण नाडी ग्रंथ मी लिहिलेले नाहीत.
आपणांस महर्षींच्या नाडी ग्रंथांचे अवलोकन करायचे असेल तर आपल्या घराच्या जवळच्या नाडीकेंद्रात जावे. आपली पट्टी सापडेपर्यंत त्याचा मागोवा घेण्याची चिकाटी असावी
एका नाडीकेंद्रात पट्टी सापडली नाही तर केंद्रवाले आम्हाला घाबरले व पळवाट म्हणून पट्टी सापडत नाही अशी बतावणी केली असे तुणतुणे वाजवायला मिळावे असा काहींचा पवित्रा असतो. तसा नसावा. एका केंद्रात पट्टी नाही मिळाली तर दुसऱ्या केंद्रात शोधायची चिकाटी हवी. नाडीकेंद्रवाल्यांना आधी सांगून आम्हाला त्या ताडपट्टीतील मजकूर वहीत लिहून मिळायला पाहिजे व त्या विवक्षित ताडपट्टीचा फोटो काढायची परवानगी त्यांनी आधीच दिली असली पाहिजे. त्यानंतर ज्यापट्टीत आपल्यासंबंधीचे त्यातील पहिला भाग ज्यात व्यक्तीचे त्याच्या आई-वडिलांचे, पती-पत्नी जोडीदाराचे नाव, जन्मदिनांक, भावा- बहिणींची, मुलांची संख्या शिक्षण व नोकरी धंदा याचा उल्लेख येतो. ते सर्व उल्लेख १०० टक्के बरोबर आले असे आपण म्हणाल, नाडीकेंद्रवाले नव्हे. तेंव्हा त्या पट्टीतील मजकूर व दिली गेलेली ऑडिओ टेपसह त्यातील कथन यावर प्रकाश टाकावा...
ही कसोटी आपण नाडीकेंद्रवाल्यांची घेत नाही आहात. असे वाटत असेल तर ते ही बरोबर नाही. महर्षींच्या ताडपट्टीतील लेखनाची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे.

मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे....

आपण फक्त एकटे कशाला सर्व मिपाकरांनो वरील प्रमाणे सचोटीने आपापली नाडी ताडपट्टी पहा व आपला अनुभव कळवा.
यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी.

Nile's picture

1 Jul 2011 - 12:36 pm | Nile

घाबरलात की काय??

'तुमच्या' म्हणजे 'ओकांच्या नाडी परिक्षेला अर्थात ओकांना कसेही करून खोटे ठरवायला करायची कारवाई' असे मनात असेल तर मला त्यात इंटरेस्ट नाही. कारण नाडी ग्रंथ मी लिहिलेले नाहीत.

पण तुमचा तर दुर्दम्य विश्वास आहे ना त्यावर? मग आता का लगेच माघार घेताय? आणि माघार घेणारच असाल तर मग इथून पूढे त्या नाडीची टिमकी बंद होईल असे समजावे का आम्ही?

आपण फक्त एकटे कशाला सर्व मिपाकरांनो वरील प्रमाणे सचोटीने आपापली नाडी ताडपट्टी पहा व आपला अनुभव कळवा.
यासाठी जे पैसे पडतात ते खर्च करायची तयारी असावी.

किती तो धंदेवाईकपणा!! वा!!

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 1:23 pm | श्रावण मोडक

तुमच्या चिकाटीचे कौतूक आहेच. पण तरीही, ही चिकाटी टिमकी वाजवण्यासाठीची नाही असे मानण्यासाठी एक काम करा.
जगभरात किती ठिकाणी अशा नाडी ताडपट्ट्या आहेत त्याची एक यादी द्या. म्हणजे मला अंदाज घेता येईल की या उद्योगात मला कमाल किती पैसे फक्त प्रवासासाठी खर्च करावे लागतील. मग मी पुढचा निर्णय घेईन. ही यादी इथं न देता मला व्यनितून कळवली तरी हरकत नाही.
आता पुढचा भाग:
एखाद्या केंद्रात मला सापडलेली नाडीपट्टी माझ्या फक्त बालपणीचे काही सांगत असेल तर ती माझी नाडीपट्टी असे मी मानायचे. मग त्या नाडीपट्टीतील बालपणाव्यतिरिक्तचा मजकूर कुणाचा म्हणायचा? अशा किती कालखंडासाठीच्या किती नाडीपट्ट्या मी पाहणे अपेक्षीत आहे? म्हणजेच, माझ्या नाडीपट्ट्यांची कमाल संख्या किती असेल? त्यासाठीचा प्रवास खर्च सोडा, तो मी करेन; त्याकरिता मला नाडीकेंद्रात काही द्यावे लागणार आहे का?
ओकांची फजिती वगैरे क्षुल्लक हेतू यामागे नाहीत. तितका वेळही नाही आमच्याकडे. मुळात ओकांची फजिती करून काहीही साध्य होणार नाही. नाडीपट्टी, अशा विषयातले 'अनुभव' हे फक्त वैयक्तिकच असतात असे म्हणायला सारेच केव्हाही मोकळे आहेत.

मित्रा,
माझा व्यक्तिगत नंबर दर वेळी सही खाली असतो. तरीही सर्वांच्या सोईसाठी
मो. क्रमांक.- ०९८८१९०१०४९ कृपया रात्री ९ नंतर संपर्क करावा.
ता. क. - आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधनमंडळाच्या सभागृहात सायंकाळी ६वाजता भाषण आहे त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.इच्छुकांनी नोंद घ्यावी.

शशिकांत ओक's picture

1 Jul 2011 - 10:58 pm | शशिकांत ओक

मित्रा,
व्यनि कशाला माझ्या सही नंतर माझा मो क्रमांक दर वेळेला येतो. त्यावर जरूर संपर्क करावा.

मी काहीही असत्य बोलणार/ लिहिणार नाही याची ग्वाही

चांगले आहे.

माझा या नाडीपरिक्षेवर काडीचाही विश्वास नाही..

अमेरिकेतून आल्यावर आपल्या व्यग्रतेत कशाला तसदी घेता...शिवाय त्याला खर्च येतो... विचार करा. मग ठरवा.

पिवळा डांबिस's picture

2 Jul 2011 - 12:03 am | पिवळा डांबिस

फोन नंबर दिल्याबद्दल धन्यवाद.

आपल्या व्यग्रतेत कशाला तसदी घेता...
ते सोडा...
धिस इज गेटिंग इंट्रेष्टींग!!!!!
:)

शिवाय त्याला खर्च येतो...
होय, आमचा खर्च आम्हीच करणार...
अंदाजे किती खर्च येतो ते कळवाल का?
तसेच ते लोकं काही ऑडियो टेप वगैरे, अर्थातच सशुल्क, देतात का?
नायतर सगळं एकदम लक्षात कसं रहायचं माणसाच्या?
:)

गवि's picture

2 Jul 2011 - 6:47 am | गवि

मित्र हो,

पिडांचे बोल

धिस इज गेटिंग इंट्रेष्टींग!!!!!

सगळं एकदम लक्षात कसं रहायचं माणसाच्या?

मृगनयनींचे बोल...

बाकी तथाकथित बुद्धीवादी संस्थांचा, विचारांचा पराभव कधीच झालेला असूनही त्यांपैकी काही जण बाहेरच्या जगात स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा क्षीण प्रयत्न करताना दिसतात...

यावरून वाटले की
बी. प्रेमानंद आणि इथले काही वाचीवीर सदस्य यात काय फरक?

शशिकांत ओक's picture

28 Jul 2011 - 11:31 pm | शशिकांत ओक

मित्रा,

मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येतो आहे...
तेंव्हा तुम्ही जर व्यनि करून मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवलांत तर मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे....

आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण नाडी परीक्षा घ्यायला येणार होतात, ती झाली का. सहज विचारावे असे वाटले म्हणून जरा उशीराची विचारणा....

श्रावण मोडक's picture

29 Jul 2011 - 11:06 am | श्रावण मोडक

बहुदा त्यांच्या नाडीताडपट्टीत ते लिहिलेले नसावे. त्यांच्या ताडपट्टीत इतरच काही माणसांच्या अचानक भेटीगाठी लिहिलेल्या असाव्यात. त्यामुळं ते नाडी सोडवायला गेलेच नसावेत. या माणसांना भेटल्यानंतर त्यांना नाडी आवळून घ्यावी असे वाटले असणार. ;)

पिवळा डांबिस's picture

1 Aug 2011 - 11:42 pm | पिवळा डांबिस

शशिकांतराव,
अगत्याने विचारणा केल्याबद्दल धन्यवाद.
खेदजनक बाब ही की अगोदर अपॉइंट्मेंट ठरवूनही घरात एका कुटुंबियाच्या आजारपणामुळे मीच ती अपॉईंटमेंट राखू शकलो नाही. आणि पुण्यातील माझं यावेळेचं वास्तव्य फक्त ५ दिवसच असल्याने त्यात बसणारी दुसरी अपॉइंटमेंट शक्य झाली नाही. असो. आय होप टू हॅव बेटर लक नेक्स्ट टाईम!!
आपला,
पिडां

आत्मशून्य's picture

2 Aug 2011 - 12:12 am | आत्मशून्य

अहो मी तूमची ओनलाइन (नाडी) परीक्षा घेतली तर चालेल काय ? म्हणजे डमी परीक्षा... जसंकी नाडी ओळखायचं प्रत्यक्षीक... म्हणजे प्रत्यक्ष नाडी बघायला जाताना कंफ्यूशन कमी असेल. ;)

शशिकांत ओक's picture

8 Aug 2011 - 9:45 pm | शशिकांत ओक

मित्रा,
निदान आपण नाडी ग्रंथांच्याबद्दल असे विचारणा करून आपला सकारात्मक हेतु स्पष्ट केलात. इथे अजून अनेक मिपाकर नाडीकेंद्रांजवळ राहात असूनही स्वतःची पट्टी पहायला जात नाहीत. पण छद्मि टीकाटिपणी करत राहातात. असो.
असे चालतेच. मी मनावर घेत नाही. कारण जेंव्हा नाडीग्रंथ पहायची वेळ येते तेंव्हाच ती निघते.
उत्तराबद्दल धन्यवाद.

Latest official current world population estimate, for mid-year 2010, is estimated at 6,852,472,823.

6,852,472,823 लोक संख्या आहे ..जगाची .... तेवढ्या पट्ट्या लिहुन ठेवल्या आहेत का ??

मित्रा,
ही संख्या काहीच नाही.
असे तर्क अनेकांनी आधी देखील केले.त्यात प्रस्तूत लेखक ही होता.
कारण आजची ही जनसंख्या पण आधी कित्येक शतके जन्मलेले लोक धरले तर गणना करा ना.... तर कदाचित कॅलक्युलेटरचे आकडे कमी पडतील...
त्याचे उत्तर गणिती आडाख्यांनी सुटत नाही....

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 10:30 pm | श्रावण मोडक

मेलो... विषय संपला.

शशिकांत ओक's picture

1 Jul 2011 - 10:49 pm | शशिकांत ओक

मित्रा,
आता विषय सुरु झाला.
हे कसे शक्य आहे या शोधाचा.....

नितिन थत्ते's picture

2 Jul 2011 - 7:52 am | नितिन थत्ते

याचा अर्थ

१. सगळ्या नाडीपट्ट्या आधीच लिहिलेल्या नाहीत. त्या पृच्छक आल्यावर (ऑपॉप किंवा जाणूनबुजून) लिहिल्या जातात. तसे असेल तर कोणाचीही नाडीपट्टी कोणत्याही केंद्रावर मिळायलाच हवी.

किंवा

२. जसे सगळ्यांचे एका दिवसाचे भविष्य १२ च भागात सांगता येते. तशा कदाचित काही विशिष्टच संख्येने (५ लाख/१०लाख/१ कोटी) नाडीपट्ट्या असू शकतात. तेवढ्याच आहेत. नाडीपट्टीत जितपत जीवनक्रम लिहिलेला असू शकतो तसा तंतोतंत जुळणारे अनेक लोक असतात. म्हणजे नितीन नाव थत्ते आडनाव असलेले १९६३ मध्ये जन्मलेले, आईचे नाव अमुक असलेले आणि वडिलांचे नाव तमुक असलेले, एक मुलगी असलेले तिचे नाव अमुक अक्षराचे असलेले, माझ्यासारखे शिकलेले, माझ्यासारखीच नोकरी करणारे अनेक लोक आजच्या घडीला जगात (ही संख्या किमान काही हजार असणार) असणार.

शशिकांत ओक's picture

2 Jul 2011 - 12:58 pm | शशिकांत ओक

मित्रा ,

कोणाचीही नाडीपट्टी कोणत्याही केंद्रावर मिळायलाच हवी

चर्चा कशाला अनुभव घ्यावा.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jul 2011 - 8:17 am | प्रकाश घाटपांडे

चर्चा वाचुन धन्य जाहलो!
शरण तुला शशिकांता मी रे ऽऽ शरण तुला शशिकांताऽऽ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2011 - 10:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

... दलाला दलाला दलाला दलाला!

आत्मशून्य's picture

2 Aug 2011 - 12:14 am | आत्मशून्य

आपणाला णंदलाला अस टायपायचं होतं का ?

शशिकांत ओक's picture

2 Jul 2011 - 12:54 pm | शशिकांत ओक

प्रिय पका काका,
काल भाषणाला आपली हजेरी अपेक्षित होती असे प्रकाश दादा पेंडशांच्या बोलण्यात कळले.

शरण तुला

महर्षींच्या चरणी जरूर ...

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jul 2011 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार

ओकांना कॉर्नर करण्याचा कंपूचा पुन्हा एकदा घॄणास्पद प्रयत्न ! अर्थात कंपूकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून खेद झाला. अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.

काही लोकांनी त्यांच्यासाठी वापरलेले शब्द बघुन मिपा प्रगल्भतेकडे निघाली आहे, का रसातळाकडे असे वाटून गेले. अर्थात, ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा..!

संतप्त

परा भयंकर

आत्मशून्य's picture

2 Jul 2011 - 2:10 pm | आत्मशून्य

पराशेठ,

ज्याचीत्याची जाण, समज आणि संवेदनशीलता यावरही काही गोष्टी अवलंबून असतात हा भाग वेगळा

हे ओक साहेबांच सूदैव म्हणावं की दूर्दैव ? ते ज्या गोश्टीचा प्रसार गूरू आज्ञेने करत आहेत, त्याला जो पैसा मोजावा लागतो ना तो आपल्यासारख्या सामान्य लोकांच्यासाठी खरोखर मोठी रक्कम आहे. आणी ती खर्चून जर काही(?) त्रूटी अनूभवाला येत असतील तर त्या विरूध्द कोणालाही संताप येणे साहजीक आहे. अर्थात अनूभव न घेऊन बाजूने अथवा विरूध्द बोलणार्‍यांबाबत मी मत व्यक्त करणार नाहीच.

पण माझ्या स्वानूभवानूसार मि ओक साहेबांचे लिखाण वाचून प्रभावीत झालो आणी नाडीपट्टी केद्रांची माहीती विचारून मग केंद्रात जाऊन त्याप्रमाणे पट्टी बघीतली (तो संवाद व्यनी आणी स्क्रीन शोट्स रूपाने आजही जपून ठेवला आहे )

आता जर यामधून भ्रमनिरास झालेला अनूभवाला आला पण जर ओक साहेब सदरील विषयावर अजूनही (आता) एकतर्फी भासणारं लेखन करतच आहेत तर त्यांना शंका विचारल्या तर काय चूक ? बर काही शंका विचारल्या तर त्यांनी लिहलेला पूस्तकाचा रेफरन्स दिला , मग यासाठी ओक साहेबांनी लिहलेल पूस्तकही वाचलं आणी मगच शंकाना सूरूवात केली, पून्हा पैसा खर्च पण त्यात शंका समाधान मिळाले नाहीच. हाती फक्त निराशा...

आणी आता जर त्या शंकाही संपूर्णपणे दूर्लक्शीत केल्या गेल्या वा अजून पैसा खर्च करत शंका व्यावसायीक पध्दतीने काम करणार्‍या केद्रचालकांना विचार असे सूनवले गेले तर राग येणार नाही काय ? ओकांच्या लेखनावर नाडी केंद्रवाल्याना प्रश्न विचारायचा संबंध काय (उदा. पराशेठच्या चित्रपटाच्या परीक्षण लिखाणावर चित्रपट दीग्दर्शीत करणार्‍याची कॉलर पकडली, तर तो ते खपवून घेइल काय ? )? ज्यानं लिहलय त्यानेच उत्तर द्यावे/चर्चा करवी. एकदा पैसा खर्च केला.. पून्हा शंका समाधानासाठी अजून खर्च केला, आता नाडी वाल्यांनाच काय मी हा प्रश्न संसदेमधेही विचारायला तयार आहे फक्त आता बिन खर्चीक मार्ग त्यांनी सांगावा. खर तर स्वतःच उत्तर देणे जास्त श्रेयसकर.

जेव्हा मनापासून श्रध्दा ठेऊन वागलेला मनूष्य अशा अनूभवाला सामोरा जातो तेव्हां त्याचा मनस्ताप व झालेला आर्थीक भूर्दंड व अनिश्चीततेची टांगती तलवार यागोश्टींपूढे जाण, समज आणि संवेदनशीलता या गोश्टी प्रचंड थीट्या पडतात. मिपाची प्रगल्भता काय कामाची जर ओक साहेबांच्या इथल्या लिखाणामूळे एका सन्माननीय, श्रध्दाळू मीपाकराला अशा अनूभवातून जावे लागत असेल ?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jul 2011 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. आत्मशून्य साहेब,

खरेतर तुम्ही माझे नाव घेतलेत म्हणून हा प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन लिहित आहे. मात्र खरे सांगायचे तर हा प्रतिसाद फक्त तुम्हालाच नाही पण कोणतासा एक प्रतिसाद हा आपल्याला उद्देशून आहे किंवा आपल्याला टोचुन आहे से वाटून त्या वर भाष्य करणार्‍या सगळ्या नविन सदस्यांसाठी आहे. (तुम्ही कदाचीत त्या उद्देशाने लिहिले नसेल देखील पण तुम्ही प्रतिवाद करायला उभे ठाकलात म्हणून हे लिहित आहे.)

तुम्हा लोकांना मला येवढेच सांगावेसे वाटते की तुमचा अभ्यास अतिशय कमी आहे :) माझा वरचा प्रतिसाद काय आहे हेच तुम्हाला मुळात कळलेले नाही आणि त्या प्रतिसादाची उगमस्थाने तर नाहीतच नाहीत :) थोडा धीर धरा, अभ्यास वाढवा, अगदीच लक्षात नाही आले तर ह्या प्रतिसादामागचा नक्की अर्थ बिनधास्त खव किंवा व्यनीतून विचारा. मात्र असे गैरसमज करुन घेऊ नका. तुमचे किंवा अजुन कोणाचे एखादे विधान पटले नाही तर मी सरळ त्या सदस्याचे नाव लिहून तसे बोलायला कचरणार नाही ;)

पराशेठ,लेखनातील काही महत्वाचे संदर्भ जे माझ्या डोक्यावरून गेले असं आपण म्हणता आहात आणी ते समजून घ्यायचे असतील तर मला अभ्यास वाढवावाच लागेल असं सांगत आहात तर त्यात आता पूर्ण तथ्य आहे असे मला वाटत आहे. कराण मला ते खरोखर समजले नाहीयत. माझ्या डीस्कोस्टाइल (यापानावरील रंगीबीरंगी) लेखनाच्या प्रकाराने व ओक साहेबांचे नाडी लिखाण व त्या अनूशंगाने त्यांच्या कृती यावर मी व्यक्त करत असलेल्या विरोधी मतांमूळे आपण ज्या कोणाला उद्देशून बोललात त्यात माझा समावेश असावा असा माझा ग्रह झाला होता म्हणूनच मी माझी व्यथा विस्तार पूर्व आपल्याला सांगीतली होती. असो, माझा हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद त्यामूळे बाकी इतर काही विषेश गोश्टी जाणायची फारशी गरज सध्या वाटत नाही :)

Nile's picture

2 Jul 2011 - 2:31 pm | Nile

ओकांना कॉर्नर करण्याचा कंपूचा पुन्हा एकदा घॄणास्पद प्रयत्न !

भां** बा***! मी तर म्हणतो ओकांना कोपर्‍यात घेऊन एकदाचा भरतरत्न वगैरेच का देऊन टाकत नाही कोणी? सोबतीला हैयोहैय्ययोंना ही ज्ञानपीठ वगैरे देऊन टाका. पर्‍यालाच आयोजक करा कार्यक्रमाचा.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jul 2011 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार

भां** बा***! मी तर म्हणतो ओकांना कोपर्‍यात घेऊन एकदाचा भरतरत्न वगैरेच का देऊन टाकत नाही कोणी? सोबतीला हैयोहैय्ययोंना ही ज्ञानपीठ वगैरे देऊन टाका. पर्‍यालाच आयोजक करा कार्यक्रमाचा.

औषध घ्या. आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.

Nile's picture

2 Jul 2011 - 2:54 pm | Nile

अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.

अहो हीच तर अस्सल मराठी अभिव्यक्ती आहे परासेठ, तुमच्या सविताभाभीसारखं नाय काय! =))

अजातशत्रु's picture

5 Jul 2011 - 6:57 pm | अजातशत्रु

अहो हीच तर अस्सल मराठी अभिव्यक्ती आहे परासेठ, तुमच्या सविताभाभीसारखं नाय काय! =))

=) =) =)

.
.
.
.
.
.
.

बाकी काहींचा 'टोन' कधि कधी बदलतो पाहून आनंद जाला :)
हे प्रगल्भतेचे लक्षण असावे

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2011 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

अहो हीच तर अस्सल मराठी अभिव्यक्ती आहे परासेठ, तुमच्या सविताभाभीसारखं नाय काय! =))

तुमचा टोन बदलल्याने आणि तुमचे चित्त पावन नसल्याने तसेच तुम्ही स्पॅनीश दिसत नसल्याने आम्ही उत्तर द्यायला बांधील नाही.

आणि हो उगा आमचा आणि सविताभाभीचा संबंध जोडू नये. घासुगुर्जींना राग येतो.

राजेश घासकडवी's picture

11 Jul 2011 - 9:44 pm | राजेश घासकडवी

हे पहा पराशेठ, गेले बरेच दिवस पहातोय, तुम्ही काही ना काही कारण काढून, अवांतर करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहात. सविताभाभीसारख्या देवीसमान पवित्र हिंदू स्त्रीबद्दल बोलताना पातळी सांभाळा, इतकंच म्हणतो.

माझं नाव जाहीरपणे घेतलं म्हणून लिहिलं. नाहीतर शशिकांत ओकांच्या या लेखनावर प्रतिसाद द्यायची माझी काही टाप होती का?

श्रावण मोडक's picture

11 Jul 2011 - 9:56 pm | श्रावण मोडक

तुम्ही काही ना काही कारण काढून, अवांतर करून लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहात.

छ्या... ओकांच्या धाग्यावर लोकांना उचकावण्यासाठी वेगळे प्रयत्न कशाला?
त्यांना तुम्हालाच उचकवायचं होतं. तुम्ही उगाचच उचकलात. ओकांच्या धाग्यावर घासूगुर्जींना प्रतिसाद द्यायला लावतोच, असं परा परवा म्हणत होता. ते असं खरं केलं त्यानं... छ्या...
तुमचं काही जात नाही हो. पैज मी हरलो ना. कुठून भरू आता ती? ;)

अजातशत्रु's picture

16 Jul 2011 - 7:01 pm | अजातशत्रु

तुमचा टोन बदलल्याने आणि तुमचे चित्त पावन नसल्याने तसेच तुम्ही स्पॅनीश दिसत नसल्याने आम्ही उत्तर द्यायला बांधील नाही.

आमचा टोन कधीच बदलत नाही :)

आमचे चित्तही पावन अन् पवित्र आहे....
( तुमचे काय ते तपासून घ्या.)

राहीला प्रश्न स्पॅनीश दिसण्याचा तसे आम्ही दिसण्याचा सुतराम संबंध नाही.
आम्हाला न पाहताच आम्ही तसे दिसत नाही, असा कयास कम जावई शोध बरा लावलात :)
असो आम्हि पक्के भारतिय दिसतो यात मात्र तीळमात्र शंका नाहि.

आणि हो उगा आमचा आणि सविताभाभीचा संबंध जोडू नये. घासुगुर्जींना राग येतो.

तुमचा आणि सविताभाभींचा संबंध जोडण्याचा प्रश्न आला कुठे? मी केवळ श्री.Nile यांनी दिलेल्या उत्तुंग प्रतिसादाला दाद दिली.

अवांतर : 'त्या' धाग्यावरील प्रतिक्रियेतून बर्‍याच जणांना ते स्पॅनीश लोकांसारखे दिसत आहेत,असा भास झालेला दिसला आणि याचे त्यांना कोण कौतुक अन् अभिमान....हे पाहून मलाही भरुन आले.. :)
.
.
.
.
.
.
.
.
.

अतीअवांतरः मला माझे पारशी कलिग्स आणि इतर पारशी लोक भेटल्यावर पारशी मध्येच बोलायला सुरुवात करतात
(मी ही मोडक्या तोडक्या पारशीत त्यांच्याशी संवाद साधतो) (बहुतेक ती फारसी असावी)
म्हणून मि काय स्वतःला पारशी समजत नाहि ब्वॉ...
आणि स्पॅनीशही..
आम्ही आपले भारतियच भले ;)

जयहिंद

पंगा's picture

16 Jul 2011 - 7:07 pm | पंगा

अतीअवांतरः मला माझे पारशी कलिग्स आणि इतर पारशी लोक भेटल्यावर पारशी मध्येच बोलायला सुरुवात करतात
(मी ही मोडक्या तोडक्या पारशीत त्यांच्याशी संवाद साधतो) (बहुतेक ती फारसी असावी)

हिंदुस्थानातले पारशी लोक सर्वसाधारणतः (थोड्याशा वेगळ्या बाजाची का होईना, पण) गुजराती बोलतात, अशी ऐकीव माहिती होती.

'पारशी' भाषेबद्दल नव्यानेच ऐकले.

असो.

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jul 2011 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार

अजातशत्रु, तुम्ही डॉक्यावर पडला आहात काय हो ?

माझ्या प्रतिसादात मी अगदी व्यवस्थित श्री. निळ्या ह्यांचे वाक्य कॉपी पेस्ट करुन मग त्यानंतर माझा प्रतिसाद दिला आहे. त्याचा अर्थ मी तो प्रतिसाद श्री. निळ्या नालायक ह्यांनाउद्देशुन दिलेला आहे.

थोडे निट वाचा, वाचलेले मेंदूपर्यंत जौन त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येउ द्या, मग त्यावर भाष्य करा ना :)

दिसले पाचर की निघाले लगेच शेपूट घेउन :P

शशिकांत ओक's picture

2 Jul 2011 - 2:37 pm | शशिकांत ओक

मित्रा,

ओकांना कॉर्नर करण्याचा ..

गेल्या काही वर्षापासून मिपाकरांनी हे माझ्याबाबत अनुभवलेले आहे. प्रयत्न झाले. पुढेही होतील...
बुद्धिवादी लोकांची ही खुमखुमी असते. करायचे काही नाही मात्र फाटे फोडून व गिल्ला करून वाचकांचा मानसिक गोंधळ उडवून द्यायचा....
अन्य ठिकाणी याला जास्त जोर आहे.
'मला वेळ नाही म्हणून नड रे - - ला, असे फुकाचा वेळ असलेला एक दुसऱ्याला सुचवतो. आडनावाचे विडंबन, ठक कि भ्रम अशा प्रतवारीत नाडीवाल्यासेनांना दोन्हीकडे टाकावे, परदेशी नियतकालिकातून त्यांनी जर नाडीला मान्यता दिली तर मग आम्ही पाहू. आदि वाचून मजा वाटली.
साधे सोपे सरळ अनुभव घेण्याचे काम कसेही करून टाळणे हे मला नवीन नाही.
आम्ही अनुभव घ्यायची गरज नाही. तर्कानेच आम्ही नाडीग्रंथांना उडवून लावतो. नाडीला प्रायमाफेसी केसच नाही असे म्हणणारे अनेक मान्यवर आहेत. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की ...
असे लोक या पुढे नाडी ग्रंथांचा अनुभव घेण्यास पुढे आले व नाडीग्रंथांतील अदभूतता पटली तरी समाजात आपली प्रतिष्ठा अबाधित राहावी म्हणून ते नाडीग्रंथांना दूषणे देत राहतात. असे मला पुर्वीच प्रत्ययाला आले आहे.
नाडीग्रंथांतील लिपी व काव्यानंद घेण्याचा धागा गाजला.
तेथे नाडीग्रंथांवरील लिखाणाचा बंदोबस्त करावा असा धागा निघाला. कालांतराने कोणाला 'शरण आलो' म्हणून तर कोणाला नाडीकथनाचे फोलपण सांगणारे आम्हीच मुर्ख ठरलो. म्हणून नाद सोडावा लागला.
यात ओकांचे काहीही मोठेपण नाही. महर्षींच्या कार्याची फक्त झलक त्यांनी लोकांना सादर केली इतकेच.
नाडीमहर्षींच्या कथनात येते की बुद्धीच्या वाटेने सामोरे जाऊ नकोस. हृदय-प्रेम भावनेने सामोरे जा व पहा.

आत्मशून्य's picture

2 Jul 2011 - 2:43 pm | आत्मशून्य

पण एक गोश्ट आवर्जून नमूद करतो...

बुद्धिवादी लोकांची ही खुमखुमी असते. करायचे काही नाही मात्र फाटे फोडून व गिल्ला करून वाचकांचा मानसिक गोंधळ उडवून द्यायचा....

आपल्या लिखाणातून माझ्या मनात निर्माण झालेल्या शंकांचा गॉधळ नेमक्या कशा स्वरूपाचा आहे हे वरील वाक्यात आपण अचूक टीपलेत. यावर अजून भाष्य ऐकायला आवडेल.

शशिकांत ओक's picture

3 Jul 2011 - 2:36 pm | शशिकांत ओक

मित्रा,

मनात निर्माण झालेल्या शंकांचा गॉधळ नेमक्या कशा स्वरूपाचा आहे हे वरील वाक्यात आपण अचूक टीपलेत. यावर अजून भाष्य ऐकायला आवडेल.

श्री. जी. ईश्वरनजींचा संपूर्ण लेख त्याच्यावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या बाबत कसे बुद्धीभ्रम करतात. शोध-अभ्यास करायची वरवर भाषा करून प्रत्यक्षात काही न करता कशी शेखी मिरवतात.
नाडीकेंद्रात बसून ब्लँक ताडपट्यावर लेखन केले जाते म्हणून त्यात इच्छुक व्यक्तीचे नाव कोरलेले दिसते. ते ग्राहकाला दाखवले जाते असे विधान केले. मात्र तसे असेल तर केद्रातील हा खोटेपणा का उघड केला नाही याचे स्पष्टीकरण कै. मा.श्री. रिसबुडांसारख्या खऱ्या विचारकाला ते टरकावतात कि तुम्ही लेख नीट वाचलेला नाही म्हणून....
आता नाडीकेंद्राचे संचालक ईश्वरनजींनी अशा खोडसाळ आरोपांना ठणकाऊन काय काय म्हटले आहे ते आपण वाचत आहात.

हा या लेखाचा गाभा आहे. आणखी काय काय भाष्य हवे..

आत्मशून्य's picture

3 Jul 2011 - 3:32 pm | आत्मशून्य

समजा आपण मूर्ती नसलेले मंदीर कीती सूंदर आहे यावर पाने खरडत आहात... काय उपयोग त्याचा जर मंदीराच्या आत मूर्तीच नाहीये ? त्याच प्रमाणे आपले लेख आणी त्याचा गाभा काहीही असो काय उपयोग त्या लेखनाचा जर मूलभूत शंका समाधान तूम्ही करत नाही ?

शशिकांत ओक's picture

3 Jul 2011 - 4:30 pm | शशिकांत ओक

मित्रा,
मग विचारणा कशाला

आत्मशून्य's picture

4 Jul 2011 - 1:26 am | आत्मशून्य

गोडवे गायले गेले म्हणून मंदीर बघायला गेलो तर ... मूर्तीच नाहीये असा अनूभव आला... तेव्हां किती गोडवे गाणार मूर्ती नसलेल्या मंदीराचे ....? ठीक आहे ज्यांच्या आज्ञेने आपण काम करत आहात ते पटीने श्रेष्टच, खरतर तूलनेचा विचारच नाही... पण याचा अर्थ असा नाही की लोकांपूढे आपलंच घोड सतत दामटत रहायचं...... लोकांच्या प्रश्नांचे शंका समाधान करता येत नसेल तर गूरू आज्ञा पाळयला अजून जेकाही जास्त प्रयत्न करावे लागतील त्यात पूढाकार घ्या. उगीच लोकांची उत्सूकता जागी झालि अथवा तूमच्या लिखणावर शंका व्यक्त केल्या की त्याना हीकडे जा तिकडे .. हे माझ्या अखत्यारेत नाही, पैसा खर्च करावा लागेल अशी तोंडाला पाने नका पूसु... गूरूंचा मान राखावा.....

नावातकायआहे's picture

3 Jul 2011 - 3:06 pm | नावातकायआहे

ओक साहेब!

तुमच्या चिकाटिला सलाम!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jul 2011 - 7:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रेडीट कार्ड विकणारे सेल्समन कसे गळ्यात पडून फोन करतात, स्नेल-स्पॅम्स पाठवतात, त्याची आठवण झाली.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jul 2011 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार

क्रेडीट कार्ड विकणारे सेल्समन कसे गळ्यात पडून फोन करतात, स्नेल-स्पॅम्स पाठवतात, त्याची आठवण झाली.

अतिशय चुकीचा प्रतिसाद.

असे सेल्समन वैयक्तिकरीत्या फोन करुन अथवा प्रत्यक्ष भेटुन त्यांचे काम करत असतात. ओक साहेबांनी कोणाच्याही खव मध्ये जाउन माझे लेख वाचा, किंवा फोन करुन माझे लेख वाचा अशी विनंती केलेली नाही. धाग्यासमोर लेखकाचे नाव दिसत असताना देखील धागा उघडायचा आणि वर लेखकालाच अशा शब्दात बोचकारायचे हे अत्यंत चुक आहे. संपादकांनी ह्याची त्वरित दखल घ्यावी.

मृगनयनी's picture

4 Jul 2011 - 12:17 pm | मृगनयनी

+++++++++++++++++++ १०८

सहमत रे पर्‍या!!! :)

* धर्म हा संस्कृतीचा पाया आहे - स्वामी विवेकानन्द.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jul 2011 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पराशेट तुमच्याच शब्दांत, बोर्डावर नाचल्यानंतर लोकं शिट्या मारतात अशी तक्रार करू नये.

शाहिर's picture

5 Jul 2011 - 1:48 pm | शाहिर

बोर्डावर नाचल्यानंतर लोकं शिट्या मारतात अशी तक्रार करू नये

मराठी_माणूस's picture

11 Jul 2011 - 10:03 am | मराठी_माणूस

तिकिट काढुन आत तर गेलात ना ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jul 2011 - 11:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसा फेको, तमाशा देखो*। ... तमाशा नाही आवडला तर शिव्या मिळणार, आवडला तर शिट्या! नाड्यांचा फक्त सप्तरंगी तमाशाच आहे एवढंच काय ते गोष्टीचं सार.
कोणातरी निबंधलेखक ढोंग्याला महर्षी म्हटलं म्हणून काय तो ज्ञानी माणूस थोडाच होणार? अगदी इसापनीती आणि पंचतंत्रातही असल्या प्रकारांच्या विरोधातल्या बोधकथा सापडतात.

*मिपावर पैसा फेकावा लागत नाही, नाड्यांच्या तमाशासाठी फेकावा लागतो म्हणतात.

मुद्दामच डिस्को दिवे लावले प्रतिसादात. लक्ष वेधून घ्यायला बरं पडतं.

पिवळा ...
मित्रा,

मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येतो आहे...
तेंव्हा तुम्ही जर व्यनि करून मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कळवलांत तर मी स्वतः या तुमच्या नाडीपरिक्षेला सामोरा जायला तयार आहे....
माझा या नाडीपरिक्षेवर काडीचाही विश्वास नाही..

आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ झाला असेल तर.... कदाचित....मन बदललेले नसेल तर....
विचार करा. मग ठरवा.