बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
29 Jun 2011 - 9:06 pm

मित्र हो,
आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे.

(संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य)
आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.

रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात होते माझे (ईश्वरनजींचे) स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे.
१. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?

उत्तर - त्या पट्ट्या ग्राहक जेंव्हा ते ऐकायला येतो त्यावेळी तयार केल्या जातात......
.....नाडीकेंद्रातर्फे काही लोक पेरून ठेवलेले असतात त्यांनी व नाडीपट्या शोधायसाठी नाडीवाचकाने विचारलेल्या प्रश्नातून सर्व माहिती मिळवली जाते. नंतर त्या आधारे नाडीपट्टी बनवून वाचली जाते.

नाडीकेंद्र चालक श्री. ईश्वरनजींचे स्पष्टीकरण -
याठिकाणी बी. प्रेमानंद अभावितपणे नाडीपट्यात व्यक्तीचे नाव लिहिलेले असते असे मान्य करतात. रिसबुडांना तेच मुलतः अमान्य आहे म्हणून ते प्रेमानंदांशी वाद उकरून काढत होते.
आता तर अनेक लोकांच्या नाडीपट्यातील नावाची शहानिशा तमिळ तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ताडपट्टीतील भाषा तमिल नसते त्यात काहीही भविष्य कथन नसते आदी आक्षेप फुसके ठरले आहेत.ताडपट्टीत व्यक्तीच्या जन्मदिनांकाची व ग्रहस्थितीची नोंद असणे शक्य नाही म्हणणाऱ्यांनी त्या नोंदी पहाव्यात व मग आपले मत ठरवावे.

८. सध्या आमची तमिळेतर भागातील नाडी केंद्रांची समस्याच अशी आहे की आम्हाला बाहेर जमलेल्या ग्राहकांची भाषा धड बोलणारी माणसे मिळत नाहीत. मग नाडी केंद्रात भविष्य पहायला आलेल्या लोकांना त्यांच्या भाषेत बोलते करून त्यांच्या कडून नकळत माहिती मिळवायला लागणारे भाषापटुत्व व संभाषण कुशलता फार दूरची गोष्ट. उलट भविष्य कथन त्या त्या भाषेत टेप करून देताना भाषांतरकाराच्या रुपांतराचा दर्जा फारच खालचा असतो अशी सर्वसाधारणपणे तक्रार असते. शिवाय आमच्यासारख्या रंगाने, पोशाखाने व बोलण्याच्या धाटणीने तात्काळ ओळखू येणाऱ्या लोकांनी जमलेल्या ग्राहकांशी सलगीकरून माहिती जमा करणे कसे शक्य आहे? हे विरोधकांनी प्रयोग करून आम्हला दाखवावे.
९. नाडी केंद्रांची जागा शहरी भागात मिळेल त्या ठिकाणी एक बेडरुमच्या फ्लॅटमधे असते.त्या तेवढ्या जागेत जर ताडपत्राच्या नव्या पानांवर लेखन करायला आम्ही ताडाच्या पानांच्या झावळ्या व कातरकाम करून कचरा करू लागलो तर शेजारपाजारचे रहिवासी आमच्यावर नजर ठेऊन आमचे ते काम बंद पाडतील.
१०. बी. प्रेमानंदांनी म्हटल्याप्रमाणे केंद्राची माणसे लोकात मिसळवणे, पट्ट्या केंद्रात लिहित बसून तयार करणे या सर्व त्यांच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. कारण आम्हाला तसे करायची गरज नाही. नाडीवाचक उपलब्ध असलेल्या पट्टयातील मजकूर वाचतो तो त्या व्यक्तीला जुळत असेल असे त्या व्यक्तीने मान्य केले तरच त्या पट्टीतील मजकूर एका ४० पानी वहीत उतरवून त्याच्यावरून ग्राहकाला त्याच्या भाषेत त्यातील कथन टेप करून देतो. त्या आधी मोबदला घेतला जात नाही. अर्थात हे सर्व नाडी विरोधकांना पक्के ठाऊक आहे की त्यांच्या या तकलादू, निरर्थक सबबींमधे काही दम नाही. तरीही महर्षींच्या दिव्यदृष्टीने नाडी ग्रंथांची निर्मिती झाली आहे. हे सत्य अशा संस्थांना वा व्यक्तींना तत्वतः मान्य करता येत नाही कारण मग त्यांच्या आधी ठरवलेल्या तत्वांचा - बुद्धिवादाचा - पायाच निखळतो अशी त्यांची धारणा असल्याने त्यांना अशा सबबींवर भिस्त ठेऊन खोटी व भलतीसलत कारणे द्यावी लागतात.
११. त्यामुळे अशा बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे पण ते तो लोकलज्जेस्तव कधीच मान्य करणार नाहीत. नाही तर मग त्यांची सार्वजनिक छी थू झालेली त्यांना परवडण्यासारखी नाही.
भाग ६ समाप्त. पुढे चालू.....

धोरणमांडणीप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

11 Jul 2011 - 4:16 pm | आत्मशून्य

रवीवारी सकाळी आपल्याशी फोनवर बोलणे झाले त्याप्रमाणे मी आपण सूचवलेल्या नाडीकेंद्रात एका मित्रासोबत गेलो होतो व त्यांना आपण माझी पट्टी मलाच का देत नाही हा प्र्श्न विचारला तर सूरूवातीला त्यांनी दूर्लक्ष केले, मी थोडा मूद्दा ताणून धरत पून्हा हाच प्रश्न विचारला तर त्यांचा चेहरा थोडासा कडवट भासून उत्तर आले की हा प्रश्न एका अमूक अमूक व्यक्तीला भेटायला पून्हा या तेव्हां त्यांनाच विचारा मी ऊत्तर देणार नाही. पण मी चीकाटी सोडली नाही व पून्हा चर्चेच्या योगात हाच प्रश्न केला की माझी पट्टी मला का देत नाहीत तर फक्त इतकेच सांगून संभाषण आटोपते घ्यावे लागले की पट्या त्यांना परत करायच्या असतात... आता सांगा बरे हा कोणाचा पराभव आहे ?

अवांतर : प्रतीसादास प्रतीक्रीया न आल्याने पून्हा डिस्कोमोड मधे एडीट करत आहे.

स्वानन्द's picture

11 Jul 2011 - 7:23 pm | स्वानन्द

अवांतर : प्रतीसादास प्रतीक्रीया न आल्याने पून्हा डिस्कोमोड मधे एडीट करत आहे.

अलख निरंजन's picture

12 Jul 2011 - 7:45 pm | अलख निरंजन

आपण माझी पट्टी मलाच का देत नाही?

१. नाड्या ह्या पुरातन ऋषींनी लिहिलेल्या असल्याने तो अमुल्य ठेवा आहे. तो जतन करुन ठेवणे हा नाडीकेंद्रांचाच हक्क आहे.
२. आणखी शेकडो वर्षांनी जेव्हा तुम्ही पुनर्जन्म घेउन ह्याच नाडी केंद्रावर पट्टी मागायला याल तेव्हा ती उपलब्ध असली पाहिजे. नाहीतर माझी पट्टीच मिळाली नाही म्हणून नाडी थोतांड असे लिहायला तुम्ही पुन्हा मोकळे.
३. पोपटाने तुमचे कार्ड काढून त्यातले भविष्य वाचून झाल्यावर ते कार्ड पुन्हा गट्ठ्यात जाते, त्यात तुमचे भविष्य आहे म्हणून तुम्हाला देउन टाकत नाहीत. तुम्ही तिथेही 'माझे कार्ड मला द्या' असा हट्ट धरता का?

*ओकांना अजून हे कसे सुचले नाही?

मित्रा,
खरच नाही सुचले इतके सुटसुटीत उत्तर...
धन्यवाद....

मित्रा,

हा प्रश्न एका अमूक अमूक व्यक्तीला भेटायला पून्हा या तेव्हां त्यांनाच विचारा मी ऊत्तर देणार नाही.

पुर्वी हे लोक मला असेच दमवायचे. कल आना, करून - तर कधी हेडऑफिस से पुछकर बताएंगे । असे म्हणून कटवायचे. आपल्याला थोडासा मासला मिळाला इतकेच. असो.
चिकाटी सोडू नकोस. आता त्या व्यक्तीला भेटून विचारणा करावी ही विनंती.

आत्मशून्य's picture

11 Jul 2011 - 10:34 pm | आत्मशून्य

चिकाटी सोडू नकोस. आता त्या व्यक्तीला भेटून विचारणा करावी ही विनंती.

तूम्हीच का उत्तर देत नाही ?

Nile's picture

11 Jul 2011 - 11:34 pm | Nile

उत्तराने बिंग फुटलं तर?

पंगा's picture

11 Jul 2011 - 11:48 pm | पंगा

उत्तराने बिंग फुटलं तर?

तर मग पोरी उठून येतील.

(कळले नसल्यास झिम्मा खेळणार्‍या कोकणच्या राजाकडे पृच्छा करा.)

पंगा's picture

11 Jul 2011 - 11:47 pm | पंगा

प्रतिसाद वर योग्य ठिकाणी हलवला आहे. येथून काढून टाकावा.

नरेशकुमार's picture

12 Jul 2011 - 8:37 am | नरेशकुमार

प्रतिसाद कसा काय हलवता येतो ?
मला कधि जमले नाही. शिकवन्याचि क्रुपा करावी.

अति अवांअरः लिहिलेले कळावे म्हनुन मुद्दाम ब्लॅक मधे लिहिलेले आहे.

माननीय ओक साहेब,
आपण आज वर शेकडो वेळा नाडी केंद्रावर अनेक लो़कांच्या नाड्या काढवल्या आहेत, तरी त्यापैकी निदान काहींचे ऑडियो-व्हिडियो रेकॉर्डिंग मिपावर का टाकत नाही?

शशिकांत ओक's picture

8 Aug 2011 - 9:32 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्त,

ऑडियो-व्हिडियो रेकॉर्डिंग मिपावर का टाकत नाही?

नाडी केंद्रावर जाऊन तेथील अनुभवाची सीडी वा ऑडिओ मिपाकरांपैकी टाकावी अशी मी मिपाकरांना विनती करतो.
तेंव्हा आपण केंद्रावर वर्णी लाऊन ते काम करावे ही विनंती.

हे म्हणजे ये वं म्हैस घाल मन्हा *** शिंग असे झाले.

आत्मशून्य's picture

2 Aug 2011 - 9:10 pm | आत्मशून्य

.