एक स्वप्न प्रवास (११)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
12 Jun 2011 - 12:10 am

या पूर्वीचा दुवा
एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894
एक स्वप्न प्रवास.(७) http://misalpav.com/node/1966
एक स्वप्न प्रवास (८) http://www.misalpav.com/node/2085
एक स्वप्न प्रवास (९) http://www.misalpav.com/node/3210
एक स्वप्न प्रवास (१०) http://misalpav.com/node/3338
मला अचानक शंका आली मी एखाद्या प्राण्याच्या पोटात तर नाहिय्ये ना? ....मी वर पाहिले.त्या चिंचोळ्या दालनाची भिंत लांबवर वळत गेली होती. मधुनच ती आकुंचन पावत असावी असे मला वाटले.मला दरदरुन घाम फ़ुटला. माझ्या सर्वांगावर कसलातरी श्लेश्मल द्राव पसरतो आहे असे मला वाटले. मी बोट लावुन पहिले. हातावर गालावर पायावर कसलासा चिकट बुळबुळीत श्लेश्मल द्रव होता.अगदी कोटिंग केल्यासारखा.
मला एकाचवेळेस हुडहुडी भरुन थंडी वाजु लागली , पोटात एकदम मुरडा आला , जाम उकडत असावे तसा घाम आला, छातीचे ठोके एकदम सर्वाना ऐकु जातील एवढ्या मोठ्याना पडत होते.
मला जाणीव झाली...मी कुठल्यातरी प्राण्याच्या आतड्यात होतो....बापरे.....आता बाहेर कसे पडायचे?

बराच काळ काहीच सुचत नव्हते. मी तसाच बसून होतो. बसून तरी कसे म्हणायचे ...मी ज्या वाटेवर होतो ती अख्खी वाटच हलत होती. एक त्यातल्या त्यात बरे होते की भिम्तीवर डोके आपटले तरी लागत बीगत काही नव्हते. ती वाट आत चक्क घुसळली जात होती.
मला एका जागेवर रहाणे देखील अवघड होत होते.
मधूनच मला भोवळ आल्यासारखे वाटायला लागले. छे कुठून आपल्याला आजोबांच्या पेटीची आठवण झाली कोण जाणे.ती पिशवी सापडली नसती तर बरे झाले असते. पण आता काय व्हायचे ते होऊन गेले होते. यातून बाहेर पडायलाच पाहिजे होते.
नक्की काय करायचे तेच कळत नव्हते. वेळ घालवूनही चालणार नव्हते. अंगावर पडणारा तो श्लेश्मल पदार्थ आता पातळ व्हायला लागला होता. कपाळावरून तो डोळ्यात जायला लागला होता. रुमालाने तो पुसायलाच हव. मी रुमाल काधण्यासाठी खिशात हात घातला. अरे..मोबाईल आहे इथे...... मोबाईल ला इथे रेन्ज मात्र येत नव्हती. मधल्या काळात एक एस एम एस मात्र आला होता.
"GET AN IDEA" Welcome to the world of IDEA.
साला हे भलतच ..... हा मोबाईल इथे फेकून मारायचा म्हंटले तरी शक्य नव्हते.तो काय आयडीया देणार? मोबाईलची ब्याटरी मात्र फुल्ल चार्ज होती. माझ्या आसपास मोबाईलचा उजेड पडला होता. पण बाहेर पडायचा मार्ग मात्र कुठेच दिसत नव्हता.
बघुयात मोबाईची ब्याटरी काढून पुन्हा घालूयात चुकून माकून नेटवर्क रेन्ज मिळेल म्हणत मी मोबाईलची बॅटरी काढली. आणि हातात घेतली ती घासूनपुसुन पुन्ह आत टाकावी या विचारात असतानाच माझ्या बाजूची भिन्त जोरात हादरली. नक्की माय झाले ते कळेना. मोबाईलच्या बॅटरीचा स्पर्श भिंतीला झाला आणि भिंत थरारली होती.
मी पुन्हा एकदा बॅटरीचे चार्जिंगचे नोड्स भिंतीला लावले भिंत पुन्हा एकदा थरारली. भिंतीला एलेक्ट्रीक शॉक बसत होता. आता मी हेच करायचे ठरवले. साला आपल्या बाहेर पडता येत नसेल तर या पिशवीचे /प्राण्याचे होईल तेवढे नुकसान करायचे. मी बॅटरीचे चार्जिंग नोड्स भिंतीवर दाबून धरले. भिंत आता जोरजोरात हलू लागली.
बॅटरीच्या चार्जिंग नोड्स मधून जो काही विद्यूत प्रवाह येवू शकत होता त्यामुळे त्या भिंतीला शॉक बसत होता. किंवा काहीतरी गुदगुल्या किंवा इचिंग होत होते. हे आणखे एकिती वेळ चालले असते कोण जाणे कारन बॅटरी किती चार्ज होती हे मला कळायला काहीच मार्ग नव्हता दुसरे म्हणजे मी या वाटेवर येवुन किती वेळ झाला होता तेही समजत नव्हते.
मी बॅटरी त्या भिंतीवर दाबून धरली आता त्या भिंतीस्वरूप वाटेची आणखीनच जोरात हालचाल व्हायला सुरवात झाली. मला एका जागेवर बसणेच काय पण उभे रहाणे सुद्धा जमत नव्हते. मधूनच माझा तोल जायचा . मधूनच पाय घसरायचा. अचानक एकाएकी धुतलेल्या कपड्याला पीळ पडावा तसा त्या वाटेला पीळ पडायला लागला. मी त्यात ओढला जाईन अशी मला भिती वाटू लागली.
मी त्या भिंतीत बोटे नखे घट्ट रुतवली. ती भिंत जोरात हलली . मी हवेत उडालो. हवेत तरी कसे म्हणू. फक्त उडालो. पायाखाली जमीन नव्हती वरती सगळा अंधार भोवताली जे काही होते त्याला जमीन तरी कसे म्हणायचे. मी अधांतरी होतो. इकडुन तिकडे फेकला जात होतो. खाली की वर तेच कळत नव्हते. नशीब इतकेच की कुठे पडलो तरी काही लागत नव्हते.
खव्वाक.... खव्वाक....... आवाजासरशी माझ्या अंगावर उजेड अक्षरश आपटला . त्या सरशी मला जे जाणवेले ते म्हणजे मी उजेडात आलोय मी हवेत आहे. मला बहुतेक उडता यायला लागले असावे पण हे मात्र क्षणभरच . मी एका वाळुच्या ढिगार्‍यावर दाण्णक्न आपटलो. ती आजोबांची पिशवी माझ्या सोबत माझ्या शेजाअरीच पडली . मी स्वतःकडे पाहिले सगळे अंग भिजलेले होते. भोवताली फक्त वाळुच होते. नुसतीच वाळू........... वाळुचे वाळवंट. मी त्या पिशवीकडे पाहिले...
हिंदी चित्रपटातल्या जखमी नायकाचे शब्द आता माझ्या ओठी होते " मैं कहां हुं ....."
त्या पिशवीतून शब्द ऐकू आले..... गाढवा.... तुला मी मलेशियाला नेत होतो...... काय झाले काही कळाले नाही पोटात ढवळायला लागले..... त्यामुळे मी रस्ता चुकलो.....आपण गोबी च्या वाळवंटात आहोत.
...........
मला दरदरून घाम फुटला......... आता इथून परत कसे जायचे........... मला तर गोबीचे वाळवंट मंगोलीयात चीन आणि रशीयाच्या मध्ये कुठेतरी आहे असे आठवीच्या भुगोलाच्या तासाला कंग्रालकर सरानी शिकवल्याचे उगाचच आठवले. त्यापलीकडे मात्र काहीच माहीत नव्हते.
गोबीचे वाळवंट कुठे..कुठे आपले पार्ल्याचे घर........... आता जाणार कसे.......
पुन्हा पिशवीत घुसायचे......? नुकताच त्या जीवघेण्या अनुभवातून बाहेर आलो होतो.....आता पुन्हा तोच अनुभव घ्यायचा........
घामाने माझे अंगअंग ओले चिंब झाले होते......
मी जागा झालो.......... ए सी बंद झाला होता......
मे महिन्यातल्या उकाड्याने हैराण होत मी जागा झालो होतो
अ‍ॅन याही वेळेला तुझ्या स्वप्नात यायचे राहून गेले.....
पुढच्या वेळेस नक्की येईन.
तुझा मित्र
विजुभाऊ व्हिक्टर
( क्रमशः )

वावरविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

12 Jun 2011 - 1:43 pm | प्रास

आयला, काय भन्नाट लिवतांय....

२००८ साली सुरू झालेली ही 'स्वप्नमाला' मला ठाऊकच नव्हती. तुमच्या आधीच्या लेखांच्या दुव्यावरून पहिल्यापासून एका दमात सगळी वाचली. आणि त्यानंतरची प्रतिक्रिया हीच होती,

"विजुभाऊ, आयला! काय भन्नाट लिवतांय......"

व्हिक्टरच्या स्वप्नकथा आवडतांयत....... तेव्हा त्या 'क्रमशः' च्या पुढल्या लिखाणाची वाट बघतोय.....

आर्या अंबेकर's picture

12 Jun 2011 - 4:24 pm | आर्या अंबेकर

बरेच भाग लिहिलेत, वाचतेय एक एक.....

पैसा's picture

12 Jun 2011 - 6:40 pm | पैसा

"२ लेखांमधील अंतर" या लेखामुळे जागे झालेले दिसताय! पहिल्या भागापासून वाचायला सुरूवात केलीय. तुमची स्वप्नं काय भारी आहेत हो!

सगळे भाग वाचुन काढले , मस्त आहेत, इतक्या वर्षानी पुढचा भाग लिहल्या बद्द्ल धन्यवाद.
(जुने लेख वाचायला हवेत, बरच न वाचलेल चांगल हाती लागु शकेल)

विजुभाऊ's picture

13 Jun 2011 - 12:13 pm | विजुभाऊ

"२ लेखांमधील अंतर" या लेखामुळे जागे झालेले दिसताय!
एका अर्थाने ते खरे आहे. मी त्या भागातील स्वप्न प्रवास पुर्ण केला आहे अशा भ्रमात होतो. आणि लेख का सापडत नाही म्हणून शोधत होतो.
अजून एक दोन लेख अर्धे सोडलेले आहेत ते लवकरच पुर्ण करेन

विटेकर's picture

8 Nov 2013 - 7:06 am | विटेकर

+१०००००००

विटेकर's picture

8 Nov 2013 - 7:08 am | विटेकर

मि पा के जी ए है

विटेकर's picture

8 Nov 2013 - 7:10 am | विटेकर

लिहिता नातानतानहितालिहित.ललै त्रास होतो