वसंतकाव्यमाला कट्टा वार्तांकन

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
31 May 2011 - 7:57 pm

मित्र हो,

आधी ठरल्याप्रमाणे रविवारी २९ मे २०११ रोजी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. 'मी मराठी' चे राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. नेहमी जालावर शब्दरुपाने भेटणार्‍या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, कशा बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला.

सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर आम्ही स्थानापन्न झालो. जुजबी गप्पा झाल्या. नंतर राजने 'मी मराठी' वर आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेबाबत आणि आगामी काळात मराठी व अन्य भाषेतील साहित्य प्रकाशनाच्या साकार होऊ घातलेल्या त्यांच्या कल्पना सांगितल्या. प्रसन्नने आपल्या रसाळ कथनातून आधी पत्रकारिता व नंतरच्या काळातील त्यांनी उघडलेले "वर्थ कम्युनिकेशन्स" तर्फे दिली जाणारी "कंटेंट मॅनेजमेंट"ची सेवा यावर गप्पा रंगल्या. डॉ. कुलकर्णींनी मराठी काव्यातील गझला प्रकारावर नवनव्या कवींच्या प्रयोगावर माहितीपुर्ण कथन केले. जालावर या तर्‍हेचे प्रयोग करणे व वाचकांची दाद मिळवायचे सोपे साधन असे त्यांनी म्हटले. औरंगाबाद - नांदेड कडील लेखकांच्या वाङ्मयसेवेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 'स्पंदन' नावाचा काव्संग्रह डॉ. कुलकर्णींना प्रेमपुर्वक राजेना भेट दिला. हृदयाचे व पोटूशा बालकाचे स्पंदन दाखवणारे त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ फारच बोलके होते.

जवळून जाणाऱ्यांची कलकल, बालकांच्या फुग्याच्या खेळात आम्हालाही बसल्या बसल्या फुगे परत द्यायला सामिल व्हावे लागत होते. शेंगदाणे-चुरमुरेवाल्यांच्या प्रेमळ हाकांमुळे काही सुरळीपुडे हातात घेऊन गप्पा होत होत्या. त्यावेळी हैयो हैयैयोंच्या शब्दरूपाने ओकांची काव्यस्पर्शी ओळख करून दिली गेली. सजवल्यावर एखादी 'ठकी' कशी एकदम 'बार्बी डॉल' वाटायला लागते तशी, दिलेल्या काव्यपंक्तींना काव्यालंकारात मढवून आगळ्या तर्‍हेने कसे सादर केले ते दाखवले गेले.

ओकांची ठकी हैयोंची बार्बी

शशिनामधारी असे कांत अलकाचा ।

मंगलाचरणी नमी तो पुत्र जनार्दनाचा ।।

जीवनी असे जो रत सततोद्योगी ।

आधी नाट्यसेवा नंतरी कूटकोडी।।

होता वार रवी उदेला एकतीस वेळा ।

सप्त मासी वरुषे ४० वर नऊ मिसळा।।

पावाल त्यात मजला उत्पन्न जेष्ठपुत्राला ।।

नसे बंधु विवाहिता दोन बहिणी व पुत्र-पुत्री ।

पदवी वाणिज्य धरली कास देशरक्षणाची।

चढलो पायरी विंग कमांडर पदाची ।।

गतीशीघ्र वाहने घेती घोट अरिचा ।

त्रिशूल वायुसंगे मम धर्म गणिताचा।।

हे दयानिधे, अल्पमतिस काव्यस्फुरण दे ।

जमतील जे काव्यकुजनी तयांना आत्मसंतोष दे।।नांवधारी शशि, कांत अलकाचा |

नमी मंगलाचरणी पुत्र जनार्दनाचा ||

जीवनी असे रत सततोद्योगी |

जनसेवा नाट्यसेवा लिही कूटकोडी ||

कूटातूनि भानुदिनी एकतिसाव्या |

काढा पन्नासी एका, मासी सातव्या ||

भेटा मज, कुलोत्पन्न ज्येष्ठपुत्रा |

भगिनीद्वया परिणीता, तनयस्वजा मात्र ||

मात्रा गणिती वणिजशास्त्रज्ञाता |

मिळे बढती चढे विंगकमांडर पदा ||

शत्रुकंठा फोडण्या विमाने व्याधापरि |

शूलत्रय वायुसवे, देशरक्षा तरि ||

तरि प्रेमरूप दयानिधे दे काव्यस्फूर्ती |

तोषवी काव्यकूजनी समाहृतचित्ती ||

हैयोंच्या बार्बीतील अभ्यासावयाच्या बाबी

  • काव्याच्या प्रत्येक श्लोकात प्रथम-द्वितीय पंक्तीमधील, प्रथम अक्षर समान,

    उदा: (न-न, क-क म-म त-त)

  • काव्याच्या प्रत्येक श्लोकात तृतीय आणि अंत्य पंक्तीतील प्रथम अक्षर समान

    उदा: (ज-ज, भ-भ, श-श,)

  • काव्याच्या प्रत्येक श्लोकात प्रथम पंक्तीतील दुसरे अक्षर आणि तृतीय पंक्तीतील दुसरे अक्षर समान.

    उदा: (व-व, ट-ट, त्र-त्र , )

  • काव्याच्या प्रत्येक श्लोकात अंत्यचरणातील शेवटचे अक्षर वा शब्द पुढील श्लोकाच्या सुरवातीचा.

    उदा: (कूट, मात्र, तरि)

वरिल अभ्यासावयाच्या बाबींतले नियम चौथ्या मुद्द्याला तमिळमधे अंतादि यमकम् असे म्हणतात. ह्या द्रविड, विशेषत: तमिळ काव्यप्रकारांच्या बाबतच्या विशेषता असून, मूळ ओकांनी केलेल्या कवितेतील शब्द इकडेतिकडे करून, थोडे यथोचित बदल करून हैयोंनी त्या जशाच्या तशा मराठीमधे आणण्याचा एक प्रयत्न वर केला आहे. ह्यावर चर्चा झाली. उपस्थितांनी असे काव्यप्रकार प्रथमच पहाण्यात येत आहेत असे अचंब्याने म्हटले. (आता हे लिहिताना "असा काव्यप्रकार मराठीत आहे का?" ह्या हैयोंच्या सदराची आठवण होते.) त्याशिवाय हैयोंनी ओकांच्या लक्षात आणून दिलेल्या द्राविड भाषांतील यमकांच्या विविध प्रकारांची रंजक माहिती दिली गेली.

द्राविड भाषाकुलातील काव्यप्रकारामधे आढळणार्‍या अंतादि यमकम् बद्दल बोलताना, श्री अभिरामि भट्टर लिखित तमिळ भाषेतील 'अभिरामी अंतादी' या एका आगळ्या वेगळ्या शंभरश्लोकी प्रासादिक काव्याबद्दल चर्चा केली गेली. त्याचा एक नमुना खाली पाहूया. या शंभरश्लोकी काव्यातील पहिले पाच श्लोक इथे उदाहरणादाखल घेतले आहेत.

(बरहाच्या माध्यमातून मराठी वाचकांना सोईचे जावे म्हणून तमिळ लिपीचे देवनागरीत रुपांतर केले आहे)

काप्पु

(गणपति प्रार्थना)

तार् अमर् कॊऩ्ऱैयुम् चण्पक मालैयुम् चात्तुम् तिल्लै

ऊरर्तम् पाकत्तु उमै मैन्तऩे-उलकु एऴुम् पॆऱ्ऱ

चीर् अपिरामि अन्ताति ऎप्पोतुम् ऎन्तऩ् चिन्तैयुळ्ळे-

कार् अमर् मेऩिक् कणपतिये-निऱ्कक् कट्टुरैये

-- --

उतिक्किऩ्ऱ चॆङ्कतिर्, उच्चित् तिलकम्, उणर्वुटैयोर्

मतिक्किऩ्ऱ माणिक्कम्, मातुळम्पोतु, मलर्क्कमलै

तुतिक्किऩ्ऱ मिऩ् कॊटि, मॆऩ् कटिक् कुङ्कुम तोयम्-ऎऩ्ऩ

वितिक्किऩ्ऱ मेऩि अपिरामि, ऎन्तऩ् विऴुत् तुणैये:            ॥१॥

तुणैयुम्, तॊऴुम् तॆय्वमुम् पॆऱ्ऱ तायुम्, चुरुतिकळिऩ्

पणैयुम् कॊऴुन्तुम् पतिकॊण्ट वेरुम्-पऩि मलर्प्पूङ्

कणैयुम्, करुप्पुच् चिलैयुम्, मॆऩ् पाचाङ्कुचमुम्, कैयिल्

अणैयुम् तिरिपुर चुन्तरि-आवतु अऱिन्तऩमे.                ॥२॥

अऱिन्तेऩ्, ऎवरुम् अऱिया मऱैयै, अऱिन्तुकॊण्टु

चॆऱिन्तेऩ्, निऩतु तिरुवटिक्के,-तिरुवे.- वॆरुविप्

पिऱिन्तेऩ्, निऩ् अऩ्पर् पॆरुमै ऎण्णात करुम नॆञ्चाल्,

मऱिन्ते विऴुम् नरकुक्कु उऱवाय मऩितरैये.                ॥३॥

मऩितरुम्, तेवरुम्, माया मुऩिवरुम्, वन्तु, चॆऩ्ऩि

कुऩितरुम् चेवटिक् कोमळमे.कॊऩ्ऱै वार्चटैमेल्

पऩितरुम् तिङ्कळुम्, पाम्पुम्,पकीरतियुम् पटैत्त

पुऩितरुम् नीयुम् ऎऩ् पुन्ति ऎन्नाळुम् पॊरुन्तुकवे.            ॥४॥

पॊरुन्तिय मुप्पुरै, चॆप्पु उरैचॆय्युम् पुणर् मुलैयाळ्,

वरुन्तिय वञ्चि मरुङ्कुल् मऩोऩ्मणि, वार् चटैयोऩ्

अरुन्तिय नञ्चु अमुतु आक्किय अम्पिकै, अम्पुयमेल्

तिरुन्तिय चुन्तरि, अन्तरि-पातम् ऎऩ् चॆऩ्ऩियते.......        ॥५॥

....असे हे काव्य पुढे १०० श्लोकांनी संपन्न होते. सारांशाने वरील कथनाचा अर्थ सांगावयाचा झाला, तर अभिरामी देवीची स्तुती असे सांगता येईल. अंतादि काव्यप्रकाराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला सुरुवात शेवट नसतो.

...करता करता, आलेल्या सदस्यांना निघण्याचे वेध लागले... जाता जाता हैयो हयैयो म्हणजे कोण यावर विचारणा झाली. त्यावर "योग्य वेळी हैयो आपला परिचय करून देतील" असा विश्वास ओकांनी व्यक्त केला..  कॉकटेल फ्रुट ज्यूसने कटट्याची सांगता झाली.

--

कविताभाषावाङ्मयशब्दक्रीडामौजमजाप्रकटनबातमीविरंगुळा

प्रतिक्रिया

वसंतकाव्यमाले बद्दल अभिनंदन !

नाही मराठी व्याकरणावर चर्चा झालेली दीसली नाही ?

...करता करता, आलेल्या सदस्यांना निघण्याचे वेध लागले

नक्की काय करताना सदस्यांना निघण्याचे वेध लागले ?

धनंजय's picture

1 Jun 2011 - 4:45 am | धनंजय

प्रसिद्ध तमिऴ वकील आणि इंग्रजी आणि तमिऴ भाषेतील लेखक चक्रवर्त्ति राजगोपालाचारि तर नसतील ना?

शशिकांत ओक's picture

1 Jun 2011 - 12:47 pm | शशिकांत ओक

....कदाचित ते सध्या हताय नसावेत....
हैयोंना उद्देशून आपण म्हणत असाल तर ते सध्या हयात आहेत.

गवि's picture

1 Jun 2011 - 2:27 pm | गवि

वा. कट्टा छानच झालेला दिसतोय.

ग्रेट.. सुरुवात छान आहे. असेच मेळावे होत राहोत.

बादवे. आपणच हैयो का? अशी शंका कोणी विचारली नाही का? नसल्यास मी विचारतो. :)

आपण आला असता तर जास्त मजा आली असती.
हैयो - तो मी नव्हेच?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2011 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, सी.गोपालचारि कोठून येणार कट्ट्याला ! :)

बाकी, वृत्तांताबद्दल आभारी.........!

-दिलीप बिरुटे