धिक्कार ते अधिकार : १ http://www.misalpav.com/node/17920
धिक्कार ते अधिकार :२ http://www.misalpav.com/node/17974
मेन्सचा रिझल्ट आल्यावर कळले, की ३४-३५ मार्कांनी इन्टरव्ह्यू कॉल हुकला. (तेव्हा ते फक्त ३०-३५ मार्क्स वाटले, पण नंतर पुढे त्यांचं महत्त्व कळालं...)
*************************************************************
मेन्स देऊन परत आल्यावर मी माझा दिल्लीतला मुक्काम हलवला.. तसंही तिथं राहून आता काही फायदा नव्हता. मी नागपूरला आलो, आणि S.I.A.C. नावाच्या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेत राहून अभ्यास करायला लागलो. पुन्हा प्रीलिम्स दिली. ह्यावेळी मात्र वेळ वाया घालवायचा नाही म्हणून लगेच दादाकडे अभ्यासाला निघून गेलो. प्रीलिम्सचा रिझल्ट जवळ आला, तसा आमच्या (प्रिपरेशनच्या) ग्रुपने मुंबईतून परीक्षा द्यायची असे ठरवलं. आता आली पंचाईत !!
माझी ही मुंबईची, आणि दादाला हे माहीत असल्याने तो काही जाऊ देणार नाही हे वाटतंच होतं. तो बोललाही तसं, पण मी अभ्यास करण्याचं सांगून, ग्रुपचा फायदा वगैरे सांगत त्याला कन्व्हीन्स केलं. वहीनींनी पण मला मदत केली. आलो मुंबईला..
इथे आल्यावर हिने खुप समजून घेतलं. खरंतर आम्ही जवळपास दोन वर्षांनी एवढे जवळ राहत होतो, पण तिने कधीच भेटायचा वगैरे हट्ट केला नाही...
ह्या वेळी माझ्या मित्रांना वाटायचं, की मी खुप टाईमपास करतोय. कारण की, ऑलमोस्ट दर दुसर्या-तिसर्या दिवशी मी हिला कॉलेजला जातांना भेटायचो. (ती सांभाळून घेत असली तरी मला चैन पडायला पाहीजे ना ;-)) तसंच, मी रोज संध्याकाळी मरीन ड्राइव्हवर पळायला आणि व्यायाम (इन्क्लूडींग डोळ्यांचा :D) करायला जायचो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं होतं, की मी सिरीयस नाहीये अभ्यास आणि परीक्षेबद्दल म्हणून.. पण खरंच सांगतो, ह्याचा मला खूप फायदा झाला. तसाही दिवसभर अभ्यास करण्याचं नाटक करत बसण्यापेक्षा, स्वतःशी प्रामाणिक राहून, एन्जॉय करत अभ्यास केलेला कधीही बरा... मित्रांशी गप्पा मारत, कचर्याचा निचरा करत केलेला अभ्यास मेंदूवर कोरलाही जातो आणि तुम्ही कंटाळत पण नाही.
.....झालं. होल्ले होले Mains आली आणि आम्ही लिहून घालवली. नागपुरला परतलो. आता पुढचं टेन्शन यायला लागलं. ह्याही वेळी नाही झालं तर काय? एक तर आपण नुस्ते बी.एस्सी., त्यातही सेकंड क्लास.. म्हणून मग एम. बी. ए. साठी CET दिली. पुन्हा DUची Lawची परीक्षाही दिली.. आंणि पुढच्या भविष्याकडे वाट लावून बसलो.
मेन्स ते तिचा रिझल्ट ह्यात खूप वेळ जातो, जवळपास चार महीने. आपण परीक्षा दिली हेही विसरायला होतं कधी कधी...
४ मार्च २००९ :
आई-पप्पांना नात्यातल्या एका ठिकाणी जायचं होतं. मी त्यांना बस-स्टँडवर सोडायला जाणार, एवढ्यात मित्राचा फोन आला, "मेन्सचा रिझल्ट आलाय. पण सर्व्हर बिझी आहे." मी म्हटलं, बरं... आतून भिती वाटत होती. आईला सांगितलं. आईनी धीर दिला, "जास्त टेंशन घेऊ नकोस, जे होईल ते बघता येईल." मी त्यांना सोडून परत आलो. गावात कुठलं आलंय नेट्-बीट?? दादाला फोन केला नी रोल नंबर सांगितला. थोडा वेळ गॅसवर... दादानी फोन केला नी बोलला, " कॉन्ग्रट्स ! मेन्सचा किल्ला मारला तू." मी पुन्हा चेक करायला सांगितलं. नंतर भैयाला फोन करुन पुन्हा बघ म्हटलं... झालो होतो, आम्ही मेन्सच्या दरवाज्याला खिंडार पाडून इंटरव्ह्यूच्या खोलीकडे रवाना झालो होतो... काही दिवसातच इंटरव्ह्यूची तारीख सांगणारं पत्र आमच्या हातात पडलं...
४ एप्रिल २००९:
माझा इंटरव्ह्यू सकाळच्या सत्रात होता.. सकाळी सकाळी सजून UPSC च्या दरवाज्यातून आत शिरलो. आजपर्यंत ह्या गेटला फक्त आसुसल्या नजरेने बघत आलो होतो. आत येवून एका हॉलमधे आम्हाला गोलाकार टेबलांभोवती, इंटरव्ह्यू बोर्डप्रमाणे बसवण्यात आलं. मला श्री. चलम ह्यांचा बोर्ड होता. एक बोर्ड सहा जणांच्या मुलाखती घेणार, आणि माझा नंबर पाचवा.. ऑब्व्हियसली, टरकत होतीच... शेवटी माझा नंबर आला. आधीच्याचा इंटरव्ह्यू सुरु असतांनाच तुम्हाला बोलावून बाहेर बसवतात. मी बाथरुममध्ये जावून, सगळी ताकत लावून हलका होवून आलो. काही लोक एकदम "कूल" बनत होते. आपण टेंस होतो ब्वॉ... बोलावणं आलं..
दारावर टकटक करुन, "मे आय कम इन, सर" करुन आत शिरलो. इशारा केल्यावर खुर्चीत बसलो. तिथेही एका गोलाकार टेबलाभोवती सहा जण बसले होते. चेयरमन समोर, आणि दोघं जणं तर अगदीच पाऊण हाताच्या अंतरावर.. (ही जनरली तुमच्या हावभावांवर वगैरे नजर ठेवतात.)
चलम गुरुजींनी सुरुवात केली. "सो मिस्टर चिन्मय"
मी "यस सर" बोललो. मला वाटत होतं की माझ्या नावाच्या अर्थापासून सुरवात करतील. मी प्रॅक्टीस पण केली होती तशी... ;-)
चलम : "Chinmay, Yesterday was Ramnavmi."
मी : "Yes sir"
चलम : "It is celebrated at a few places even today"
मी: "May be, Sir"
चलम : "So tell about any large, ancient temple of Ram"
मी गप....
नंतर बोललो, "Do you want to know about any temple in and around Nagpur, Sir?"
ते म्हणे, "No. Tell me about a very famous temple, throughout India. It should be a large one, and atleast thousand years old"
मी मनात विचार करतोय. काही आठवेचना. एकदा मनात आलं की अयोध्येचं नाव घ्यावं, पण म्हटलं नको, अजून सब-ज्युडाईस आहे जागा. तेव्हढ्यात सरच बोलले, "Don't tell about Ayodhya as it is a disputed site."
मी काहीच बोलत नाही हे पाहून त्यांनी प्रश्न विचारला,
"Is Rama an ancient persona, or a modern one?"
मी उत्तर दिलं,"According to Hindu mythology, Ram is God and an ancient persona."
"So, tell me."
मी बोललो, "सॉरी सर, आय कान्ट रिकलेक्ट."
चलम : "Ok. It is Bhadrachalam, on the banks of Godavari in Andhra pradesh."
मी म्हणालो, "थॅन्क यु, सर."
त्यांनी पुढची तोफ डागली, "हू वॉज परशुराम?"
सगळे मेंबर्स त्यांच्याकडे बघायला लागले. त्यांनी 'ऐसेईच' टाईपमधे खांदे उडवले. मी मनात म्हणालो, "च्यायला, हे येडं मला IAS बनवायला बसलंय का पुजारी बनवायला?"
मी उत्तर दिलं, " परशूराम वॉज सन ऑफ सेज जमदग्नी अॅन्ड रेणूका. अॅन्ड ही किल्ड हीज मदर ऑन द ऑर्डर्स ऑफ हिज फादर."
चला, समाधान झालं असेल असं वाटत असतांनाच पुढचा प्रश्न, "विल यु डू दॅट?"
म्हटलं, "नो सर. अॅन्ड माय फादर वोंट एव्हर टेल मी टू डू सो." सगळे हसले.
त्यानंतर क्लायमेट चेंज, क्योटो प्रोटोकॉल वगैरे वर प्रश्न विचारुन त्यांनी मला बाजूच्या मॅडमच्या हातात सोपवलं. मॅडमनी गोध्रा, ऑनर किलींग वगैरे गोष्टींवर पिद्दा पाडला. त्यानंतर अरुणाचल, वंशवाद, भाजपाचा इलेक्शन मेमोरेंडा (जो त्याच दिवशी आला होता) वगैरे वर पिडून झालं. शेवटी एकानी माझ्या ग्रॅज्युएशन कॉलेजचे ३ प्लस आणि ३ मायनस पॉईंट विचारले.
सगळ्यात शेवटच्या सदस्याने प्रश्न विचारला," एवढ्यात कुठलं नवीन पुस्तक वाचलयंस?"
मी उत्तर दिलं, "ययाति, वि.स. खांडेकरांचं. पुस्तक जुनं आहे, पण मी आताच वाचलंय."
म्हणे, "ते तर मराठीत आहे."
म्हटलं," मी तेच लिहीलंय छंद म्हणून".
मला संक्षिप्त कहाणी विचारली पुस्तकाची. सांगितली. मला म्हणे, " तू काय शिकला ह्यातून ?"
म्हटलं, "भौतिक सुखं उपभोगण्यात काही वाईट नाही. पण कर्तव्य आलं, की ड्युटी प्रिसाईड्स ओव्हर प्लेजर."
फंडा भारी झाल्याने असेल कदाचित, एका मिनिटानी मला बाहेर पाठवण्यात आलं...
झालं... इन्टरव्ह्यू नंतर मी नागपूरला परत आलो. पहील्या वेळी प्रीलिम्सला उडलो, दुसर्या वेळी मेन्सला, त्यामुळे ह्यावेळी इन्टरव्ह्यूत दांडी उडणार अशी मला आशंका होती...
४ मे २००९:
प्रीलिम्स पून्हा जवळ आली होती. पण अभ्यासात काही मन रमेना.. म्हणून मग मावशीकडे जावून तिला आणि बहीणींना पिडत बसलो होतो. अडीच-तीनच्या दरम्यान मित्राचा फोन आला. (ही पण एक गंमत.. ह्या वर्षी सगळे रिझल्ट्स मला फोनवरच कळले.) "रिझल्ट आलाय. तुझी १३५वी रँक आहे." माझा विश्वासच बसेना. पुन्हा दादा, वैनी, भैय्याला फोन करुन बघायला सांगितलं.. नंतर SIACला आलो. सगळे अभिनंदन करत होते. मी त्यांना बोललो," थांबा रे बाबांनो, मला स्वतःच्या डोळ्यांनी बघु द्या एकदा.." बघितला रिझल्ट... काय वाटत होतं ते सांगता येत नाही...
वयाच्या १९व्या वर्षी २४चा गणला गेलेला, आणि वयाच्या ४०व्या वर्षी ग्रॅज्यूएट होण्याचं भविष्य वर्तवल्या गेलेला मी, २६व्या वाढदिवसाच्या महीनाभर आधी UPSCच्या फायनल मेरीट लिस्ट मधे आलो होतो !!
मला आधी माझ्या त्या "मातीत हात" वाल्या आजोबांना आणि त्या ज्योतिष्याला पेढे द्यायचे होते. आजोबांना ते दिलेही नंतर... ज्योतिषिबुवा मात्र माझं वर्तमान कळल्याने आणि आपलं भविष्य चुकल्याच्या धक्क्याने असेल, आधीच भुतकाळात जमा झाले होते.. :-(
नेमका दिवस आठवत नाही...
मी आईसोबत तुळजापुरला भवानी मातेच्या दर्शनाला गेलो होतो. मातेचं दर्शन घेऊन, गाभार्या बाहेरच्या आरतीमंडपात आलो. तेव्हढ्यात माझ्यासोबत सिलेक्ट झालेल्या मित्राचा फोन आला... मला IAS अलॉट झाली होती. I finally became an IAS Officer :-)
**************************************************************
हा लेख लिहीण्यामागे फक्त तोपगिरी वा आत्मस्तुती हा उद्देश नाही. तो थोडाफार असेलच. पण मुख्य कारण हे आहे की आता रिझल्ट्सचा वेळ जवळ येतोय.. कुणीही अपयशी ठरु नये ही सदिच्छा असली तरी कुणाला ना कुणाला अपयशाला सामोरं जावंच लागेल. कदाचित त्यातला कुणी आपल्या ओळखीतलाही असेल. अशावेळी एखाद्या खचलेल्या, ढेपाळलेल्या जीवाला, जो आत्मघाताच्या टोकावर उभा आहे त्याला, माझ्या ह्या प्रवासातून काही आधार मिळावा म्हणून हा खटाटोप. पालकांनीही अपयशाचे प्रामाणिक विश्लेषण करुन त्यांना पुढे लढायला आधार द्यावा ही विनंती..
माझ्या सिलेक्शन नंतर एका ठिकाणी मी बोललो होतो.
"अपयशानंतर आत्महत्या करुन स्वतःचा फोटो घरात टांगवून घेण्यापेक्षा, आय. ए. एस. बनून फोटो पेपरात झळकावून घेण्यात जास्त मजा आहे."
शेवटी सुरेश भटांच्या ह्या ओळी आहेतच की लढायची ताकत द्यायला....
"आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव
विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही !!"
लढो....
***********************************************************
समाप्त !!
प्रतिक्रिया
16 May 2011 - 2:16 pm | मृत्युन्जय
झक्कास. आय. ए. एस. होणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे नक्की. लेखमाला जमली देखील उत्तम आहे. अभिनंदन. आय. ए. एस. आणि लेखमालेसाठी सुद्धा.
16 May 2011 - 6:22 pm | सखी
असेच म्हणते. अजुन अनुभव वाचायाला आवडतील.
19 May 2011 - 3:39 am | टारझन
मस्त रे चिगो .. सहि जा रेला भिडु :)
19 May 2011 - 9:05 am | चिगो
कैसा है भाई? लाईफ बोले तो टकाटक ना? येण्जॉय...
16 May 2011 - 2:36 pm | प्यारे१
शिका काहीतरी प्यारे.... शिका.
संपलं आयुष्य सगळं.
टिवल्याबावल्या करण्यात.
यु पी एस सी करताना (अर्थात सगळीकडंच पण मुख्यत्वे) वाढणारं वय, स्वतःची क्षमता, कुवत आणि याबरोबरच आर्थिक स्थितीचा विचार व्यवस्थित करुन मनोधैर्य टिकणं आणि कुटुंबाकडून टिकवलं जाणं आणि अभ्यास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं.
बाकी चिगो साहेब ;),
सध्या कुठे? आय ए एस झाल्या नंतरचे अनुभव ऐका/वाचायलाही आवडेल.
16 May 2011 - 2:42 pm | श्रावण मोडक
अधिकारानंतरचं वाचण्यास उत्सुक आहे.
16 May 2011 - 3:29 pm | चिगो
पण अजून मी प्रोबेशनमध्ये आहे.. त्यामुळे अधिकारांचा वापर कमीच आहे तसा..
16 May 2011 - 4:25 pm | श्रावण मोडक
हरकत नाही. वाट पाहतो.
पण खरं तर या प्रोबेशनमध्येही अनेक अनुभव असे असतील, की जिथं आपल्या मूळच्या धारणा आणि व्यवस्थेतील 'प्रत्यक्ष' यांचा एक सामना होत असावा. आणि ते अनुभव आपल्या धारणांचीच फेरमांडणी करत असावेत. तसे असेल तर तेही अनुभव पुढे-मागे वाचायला आवडतील.
16 May 2011 - 3:29 pm | चिगो
पण अजून मी प्रोबेशनमध्ये आहे.. त्यामुळे अधिकारांचा वापर कमीच आहे तसा..
16 May 2011 - 3:11 pm | नगरीनिरंजन
अभिनंदन! छान गोष्ट आहे तुमची. शिवाय उमेदवारांना प्रेरणादायीही ठरावी.
आता प्रशासकीय नोकरीतले अनुभव वाचण्यास उत्सुक आहे.
16 May 2011 - 4:02 pm | सहज
लिहीत रहा.
16 May 2011 - 4:04 pm | प्रास
आनंद झाला तुमची लेखमाला वाचून! सगळ्या प्रतिकूल गोष्टींमधूनही तुम्ही आपलं इप्सित साध्य केलंय.
सध्या कुणीकडे असताय आयएएस बनून?
आपले एक मिपाकर मित्र 'आळश्यांचा राजा' यांचे त्यांच्या कामकाजासंबंधीचे अनुभव वाचताना अनेक गोष्टी नव्याने समजल्या. तुमच्याकडूनही अशाच अनुभवजंत्रीयुक्त लेखांची अपेक्षा करणं चुकीचं वाटू नये ही अपेक्षा....
ब्युरोक्रसीमधील पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!
पुलेप्र.
16 May 2011 - 4:17 pm | ५० फक्त
चिन्मय, अभिनंदन, खरोखर अभिमान वाटला, प्रिंट काढुन ठेवले आहे. अतिशय धन्यवाद.
16 May 2011 - 11:07 pm | नावातकायआहे
आई शप्पत!
अभिनंदन, खरोखर अभिमान वाटला, प्रिंट काढुन ठेवले आहे. अतिशय धन्यवाद.
16 May 2011 - 5:34 pm | चिगो
सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद.. सध्या मी आसाममधील नगाँव येथे असिस्टंट कमिश्नर म्हणून पोस्टेड आहे... ही पोस्ट प्रोबेशन करता असते.. वर श्रामो बोललेत त्यासारख्या माझ्या मुळच्या धारणा आणि व्यवस्थेतील 'प्रत्यक्ष' यांच्यात तफावत जाणवते काही वेळा.. मी सध्या तरी "देखो और सिखो" तत्वावर चालतोय..
आणि ते अनुभव आपल्या धारणांचीच फेरमांडणी करत असावेत.
कधी कधी असं होतंही... पण मग माझी काही धोरणं ह्या व्यवस्थेच्या अनुभव-हीनतेमुळे होती हेही तितकंच खरं... म्हणून सध्या फक्त पाहणे-परखणे-शिकणे सुरु आहे..
16 May 2011 - 6:03 pm | बिपिन कार्यकर्ते
उत्तम. श्रामोंशी सहमत.
16 May 2011 - 6:52 pm | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे. खूप आवडलं आणि आयएएसची परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होण्याबद्दल अभिनंदन! :)
16 May 2011 - 6:53 pm | प्रभो
भारी रे!!
16 May 2011 - 6:55 pm | गोगोल
छान लिहिले आहे.
अभिनंदन, आयुष्यात तुम्ही दाखवलेली जिगर फार कमी लोक दाखवू शकतात.
16 May 2011 - 7:03 pm | रेवती
अभिनंदन!
प्राथमिक खडतर प्रवासाची सांगता चांगली झाली.
तुम्ही कोणत्या राज्यात काम करणार आहात?
16 May 2011 - 7:31 pm | धमाल मुलगा
ह्या संपुर्ण लेखमालेतलं सर्वात प्रचंड भावलेलं, मनापासून आवडून गेलेलं काय असेल तर स्वतःच्या अनुभवातून आलेला आणि इतर जे प्रयत्न करतायत त्यांना दिलेला दोन अक्षरी सल्ला... "लढो...." फिनिश!
ह्या संपुर्ण घटनाक्रमांनंतर येणार्या त्या एका "लढो" चं वजन प्रचंड आहे हे आपसुकच जाणवतं. :)
चिअर्स मॅन!
17 May 2011 - 9:45 am | चिगो
मनापासून आवडून गेलेलं काय असेल तर स्वतःच्या अनुभवातून आलेला आणि इतर जे प्रयत्न करतायत त्यांना दिलेला दोन अक्षरी सल्ला... "लढो...." <<
आणखी काय सांगणार, राजा? काय आणि कसं जिंकायचं, हे ज्याचं तोच ठरवतो.. आपण फक्त हिम्मत द्यायची लढायला.. कोणीतरी बोललाय," Success is not absence of failures. It means reaching your ultimate goal. It is about winning the War, not every battle." मी कदाचित त्याचीच गोष्ट सांगितलीय..
17 May 2011 - 1:37 am | आत्मशून्य
मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद चीगो.
17 May 2011 - 2:53 am | इंटरनेटस्नेही
अभिनंदन सर.
17 May 2011 - 3:10 am | पिंगू
भारी रे चिगो.. तुझ्या चिकाटीला सलाम..
- पिंगू
17 May 2011 - 5:09 am | अभिज्ञ
मस्तच लेखमालिका.
तुमच्या चिकाटिला सलाम.
वयाच्या सव्वीसाव्या वर्षि एवढा अभ्यास म्हणजे कमाल आहे.
आम्ही विंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षालाच वैतागलो होतो कि कधि एकदाचि हि परिक्षेची कटकट संपते म्हणून.
:)
अभिज्ञ.
17 May 2011 - 9:52 am | चिगो
ह्याचा अर्थ UPSC च्या जगापासुन खरोखरच अभि़ज्ञ आहात.. काही लोक तर असे असतात की आम्ही त्यांच्याबद्दल म्हणायचो, " सही उम्र मे अगर शादी और बच्चे हो जाते, तो आज बाप और बच्चे एक साथ एक ही NCERT पढ रहे होते.." ;-)
अर्थात हे म्हणतांना आम्ही त्यांच्या चिकाटीलाही मानायचो म्हणा..
17 May 2011 - 8:47 pm | गोगोल
मला वाटल होत की वरची लिमिट वय वर्षे ३० असते.
18 May 2011 - 8:03 am | चिगो
मला वाटल होत की वरची लिमिट वय वर्षे ३० असते.
<<
वयोमर्यादा अशी : ओपन/ जनरल = ३० वर्षे, इतर मागासवर्गीय = ३३ वर्षे, अनु. जाती जमाती = ३५ वर्षे...
आता जर एखाद्याचं लग्न २१-२२ व्या वर्षी झालं, तर ३५व्या वर्षी त्याला ५वी-६वी जाणारा मुलगा/मुलगी असू शकते की राव..
आणि आम्ही ६वी पासूनच्या NCERT वाचणं सुरु करतो... म्हुण ह्यो ज्वोक.. :-)
17 May 2011 - 7:18 am | प्रीत-मोहर
भारी रे!!! अभिनंदन तुझ ... धम्याशी प्रचंड सहमत आहे :)
17 May 2011 - 7:47 am | माझीही शॅम्पेन
जबरदस्त रे मित्रा ! तुझ मनापासून अभिनंदन !
नुसत अपयश ही यशाची पहिली पायरी आहे अस म्हणन सोप्प असत आणि खरोखर इतक यश संपादन करण खूपच अवघड !!
17 May 2011 - 9:16 am | मितभाषी
शाब्बास!!!!!!
17 May 2011 - 9:57 am | सविता००१
जबरदस्त रे चिगो. अभिनन्दन!
17 May 2011 - 12:24 pm | समीरसूर
चिगोसाहेब (आता तुम्हाला साहेबच म्हणायला हवे :-)),
मनापासून अभिनंदन!
आएएस होण्यासाठी कष्ट, बुद्धिमत्ता, आणि धेयासक्ती (फोकस) हे गुण किती महत्वाचे आहेत हे आपल्या सातत्यपूर्ण तयारीवरून दिसून येते.
आमच्यासारख्यांच्या बाबतीत सगळाच आनंदीआनंद असतो. :-)
नक्की काय करायचे आहे हेच कळत नाही. त्यामुळे जे घडते ते आपले म्हणत पुढे सरकायचे असे चाललेले असते. कष्ट, फोकस वगैरे नावालाही नसतात...कुठलेही देदीप्यमान (आपल्यासारखे) यश मिळवायचे म्हणजे कठोर परिश्रम आणि ध्येयप्राप्तीसाठीच्या प्रयत्नांमध्ये सातत्य या दोन गुणांची सगळ्यात जास्त आवश्यकता असते हे आम्हाला वय निघून गेल्यावर कळले. :-)
आमचा एक मित्र अजित जोशी आएएस झाला तो काळ आठवला. तो २००३ च्या सुमारास आयएएस झाला. दादरला ग्रंथालयात चिकाटीने अभ्यास करतांना त्याला पाहिलेले आहे. केवळ वडापाव खाऊन जेवणाची वेळ मारून नेणारा अजित आठवला की त्याच्या यशाचे रहस्य कळते. नंतर त्याने 'पानिपत फाउंडेशन'चे खूप काम केले; वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी शाळा चालवल्या. कष्टाला पर्याय नाही हेच खरे.
तो आएएस झाल्यानंतर अस्मादिकांना आएएस करण्याची खुमखुमी (ताप, वेड, धुंदी, मोतीबिंदू, खूळ, काहीही म्हणा) आली होती. पण आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार? प्रचंड कष्ट उपसण्याची तयारी आणि सातत्य या फ्रंटवर अस्मादिक नेहमीच भुईसपाट होत आलेले आहेत. :-) त्यामुळे २-३ दिवसातच हा ज्वर उतरला आणि आम्ही जमिनीवर आलो. खर्डेघाशी करण्यातच जन्म जाणार हे नक्की कळल्यावर निमूटपणे नोकरीसाठी वणवण सुरु केली. :-)
आपले पुनश्च अभिनंदन! हे यश नुसतेच स्पॄहणीयच नाही तर अनुकरणीयदेखील आहे. आपल्या तयारीवर, ध्येयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकण्याच्या इराद्यावर आधारित आपण एखादी लेखमाला/पुस्तक लिहिल्यास खूप उपयुक्त ठरेल.
--समीर
17 May 2011 - 6:34 pm | चिगो
आता तुम्हाला साहेबच म्हणायला हवे..<<
नाय हो.. तेवढं सोडून बोला...
तुम्ही अजित जोशी सरांचे मित्र, होय? सरांचे काम आम्हां सगळ्यांसाठीच अनुकरणीय आहे.. सरांनी माझा मॉक इंटरव्ह्यू घेतला होता.. स्वॉलिड होता तो...
आपल्या तयारीवर, ध्येयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकण्याच्या इराद्यावर आधारित आपण एखादी लेखमाला/पुस्तक लिहिल्यास खूप उपयुक्त ठरेल.<<
हॅ, काहीतरीच काय, राव? येवढं टंकता टंकता टेकीला आलो मी... तसेही बर्याच जणांनी अशी पुस्तके आधीच लिहीली आहेत.. म्हणून धन्यु पण न-धन्यु (स्वैर अनुवाद ;-))
17 May 2011 - 8:53 pm | गोगोल
> म्हणजे कठोर परिश्रम आणि ध्येयप्राप्तीसाठीच्या प्रयत्नांमध्ये सातत्य या दोन गुणांची सगळ्यात जास्त आवश्यकता असते
+१.
मी तर म्हणतो की ईथे मिपावर चिगोंसारखे बरेच जण असतील की ज्यांनी अथक परिश्रम घेऊन काहीतरी साध्य केले आहे. अशा मिपाकरांनी जर त्यांचे अनुभव शेअर केले तर काहीतरी शिकायला तरी मिळेल.
निरर्थक वाद, चर्चा, काथ्याकुटांपेक्षा असे धागे कितीतरी उपयोगी ठरतील.
8 May 2014 - 1:14 pm | इनिगोय
अजित जोशी - डहाणूकर काॅलेज का?
तेच असेल, तर कोणती बॅच? सध्या कुठे असतात?
8 May 2014 - 2:06 pm | बॅटमॅन
अजित जोशी म्ह. तेच का ते पानपतास २०११ साली असलेले आयएएए? पानपतच्या लढाईला २०११ साली २५० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त मोठा समारंभ झाल्ता तेव्हा. झालंच तर त्यांच्या कामामुळे तेही तिकडे पापिलवार होते असे ऐकून आहे. त्यांचा नामोल्लेखही पानपतास केलेल्या एका कोनशिलेत आहे, २०१३ साली तिकडे गेलो असताना पाहिला आहे.
8 May 2014 - 2:07 pm | बॅटमॅन
*आयएएस.
13 May 2014 - 4:05 pm | चिगो
अजित सर हरीयाणात आहेत. त्यांची "ईंटभट्टा शाला"चा उपक्रम बराच नावाजल्या गेलाय..
13 May 2014 - 5:49 pm | बॅटमॅन
ओह अच्छा, धन्यवाद. बाकी तो उपक्रम काय आहे म्हणे? वीटभट्टी कामगारांच्या पोरांना ऑन साईट शिकवतात का? सहीच की.
18 May 2011 - 1:02 am | कौशी
खुप छान लिहीलेस... लिहीत राहा.
18 May 2011 - 11:44 am | रामदास
झालेली अपेक्षा तिसर्या भागात पूर्ण झाली.
या तिन्ही भागांचा एक नेटका लेख बनवून विद्यापिठाने ग्रॅज्युएट होणार्या प्रत्येक मुलाला मार्क लिस्टसोबत द्यावा असे वाटते.
अभिनंदन.
19 May 2011 - 2:32 am | चिगो
या तिन्ही भागांचा एक नेटका लेख बनवून विद्यापिठाने ग्रॅज्युएट होणार्या प्रत्येक मुलाला मार्क लिस्टसोबत द्यावा असे वाटते.<<
अरे बापरे, डायरेक्ट परमवीर चक्र, पद्मभुषण, भारतरत्न सगळं एकसाथ दिलं की काका तुम्ही मला... :-)
एवढी लायकी आहे की नाही, माहीत नाही. पण तुमच्या भावनांसाठी धन्यवाद.. थँक्स..
18 May 2011 - 2:22 pm | आनंदयात्री
अभिनंदन. लेखमाला आवडली, धन्यवाद.
19 May 2011 - 2:50 am | अमोल केळकर
अगदी असेच म्हणतो. :)
अभिनंदन
अमोल केळकर
19 May 2011 - 10:55 am | वपाडाव
|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||
ह्या उक्तीची प्रचिती आली आम्हा मिपाकर मंडळीना....
आपले सहस्त्र हबिणंदण...
20 May 2011 - 3:11 pm | आळश्यांचा राजा
असेच प्रोबेशनकाळावरही येऊ द्यात!
23 May 2011 - 7:55 am | निनाद
चिगो फारच छान लेखन, आवडले!
अनेकांना हे स्फूर्तिदायक ठरेल हे नक्की.
हे लेखन ११वी, १२वी च्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे असे वाटते.
एकुण लेखनाची पद्धत पाहून, अजुन भरपूर लेखनाची अपेक्षा आहे.
23 May 2011 - 8:29 am | पैसा
चिन्मय, सगळीच लेखमालिका आवडली. तुझ्या पुढच्या कारकीर्दीतही सामान्य माणसांच्या शक्य तेवढा जवळ रहा. आणखी काय सांगू? एक लढाई तू जिंकलीस. फार मोठं युद्ध तुझी वाट पहातय. तेव्हा अर्जुनासारख्या शंका आल्या तरी चालेल पण योग्य रस्ता सोडू नको. बस्स. इतकंच.
8 May 2014 - 12:22 am | भडकमकर मास्तर
मस्त लेखमाला... :)
8 May 2014 - 1:08 am | सखी
सगळी लेखमाला परत वाचली, परत तितकीच आवडली.
8 May 2014 - 1:16 am | सुहास झेले
धन्यवाद भडकमकर मास्तर खाणकाम केल्याबद्दल... एक अप्रतिम लेखमाला वाचण्यास मिळाली :) :)
8 May 2014 - 2:56 am | पिवळा डांबिस
सुरेख लेखमाला!!
का कुणास ठाऊक पण आजवर नजरेतून सुटली होती...
ड्रिलिंग केल्याबद्दल डेन्टीस्ट डागतरांचे आभार!!!
वरचा मित्रवर्य श्रामोचा प्रतिसादही आवडला...
(आणि त्याची आठवण एक कळ उठवून गेली...) :(
चिगोसाहेब, तुमचे अनुभव असेच शेअर करा. तो आसामातल्या अनुभवाचा धागाही आवडलाय!!! काही वेगळं वाचायला मिळतंय!! जियो!!
14 May 2014 - 12:39 am | चाणक्य
माझ्याही नजरेतून सुटली होती. छान लेखमाला खरच
13 May 2014 - 10:42 pm | Prajakta२१
प्रेरणादायी लेखमाला :-)
धन्यवाद
13 May 2014 - 11:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ! आजच ही सगळी लेखमाला वाचली !!
बेलाटेड अभिनंदन ! ही लेखमाला तरुणाईसाठी नक्कीच बोधकारक आहे !!!
13 May 2014 - 11:34 pm | मधुरा देशपांडे
उत्तम लेखमाला.
30 May 2014 - 12:55 pm | विटेकर
यशासारखे दुसरे काहीच नसते हे म्हणतात ते किती खरे आहे !
30 May 2014 - 4:28 pm | समीरसूर
चिगोसाहेब,
पुन्हा वाचलं आणि पुन्हा अंगावर सर्रकन काटा आला. निश्चित ध्येय, अपार कष्ट, जिद्द, सातत्य, आणि तीक्ष्ण बुद्धी या जबरदस्त गुणांच्या बळावर तुम्ही जो हा यशाचा एव्हरेस्ट सर केलेला आहे, तो खरोखर अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. तुमचं लिखाण खूप छान आहेच. तुमच्या जिद्दीला आणि विचार करण्याच्या पद्धतीला सलाम! या वयात मला स्वतःला एवढा प्रगल्भ विचार जमला नसता. म्हणूनच असे कुठलेच रोमहर्षक अनुभव माझ्या गाठीशी नाहीत. आणि म्हणूनच तुमच्या या उत्तुंग यशाचं जरा काकणभर जास्तच कौतुक वाटतं. :-)
तुम्हाला पुढील रोमहर्षक आणि भरीव प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! :-)
--समीर
11 Jun 2015 - 9:13 am | चिगो
धन्यवाद.. पण
हे म्हणजे उगाच काहितरीच, राजे.. आम्ही तुमच्या 'सटल सेन्स ऑफ ह्युमर'चे फॅन आहोत. तो दुनियादारी (चित्रपट नव्हे) ;-) पाहील्याशिवाय येत नाही, हा अनुभव आणि मत..
30 May 2014 - 4:57 pm | माधुरी विनायक
अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद या अनुभव कथनासाठी. परीक्षार्थी आणि त्यांचे पालक/ कुटुंबिय अशा दोन्ही गटांसाठी उपयुक्त अनुभव कथन. तुमच्या चिकाटीला सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
10 Jun 2015 - 10:00 pm | मोदक
चिगोशेठ.. प्रणाम!!!!!!
@ मधुरा देशपांडे - लिंकबद्दल धन्यवाद.
11 Jun 2015 - 4:43 am | रुपी
अतिशय प्रेरणादायी आहे तुमची लेखमाला.
उत्खनन करणार्यांचे आभार!
11 Jun 2015 - 9:02 am | श्रीरंग_जोशी
अनेक वर्षांनी उशिराने का होईना या यशाबद्दल तुमचे अभिनंदन.
खूप प्रेरणादायी अनुभवकथन. आजवर वाचायचे राहून गेले होते.
या निमित्ताने स्व. प्रमोद महाजन यांचे एक वाक्य आठवले.
No defeat is final until you stop fighting.
11 Jun 2015 - 10:26 am | स्वीत स्वाति
चिगो अभिनन्दन..
11 Jun 2015 - 12:23 pm | सिरुसेरि
अप्रतिम प्रेरणादायी अनुभवकथन . कुठेतरी नरेन्द्र जाधव यांच्या 'आमचा बाप आणि आम्ही' ची आठवण आली.
तुमच्या लेखावरुन तुमचे भाऊसुद्धा खुप कर्तुत्ववान आहेत हे दिसते. त्यांचाही ध्येयप्रवास तुमच्या नजरेतुन वाचायला मिळाला तर तो असाच प्रेरणादायी ठरेल . अधिकारपदावर पोचल्यावर आतापर्यंत आलेले अनुभव यांबद्दलही सांगा .
11 Jun 2015 - 2:06 pm | चिगो
धन्यवाद..
होय.. दादाचे कर्तुत्व, त्याचा ध्येयप्रवास आणि आतापर्यंत त्यानी केलेलं काम माझ्यापेक्षा अत्यंत उत्तुंग आहे. पण त्याबद्दल मी लिहीणे, हे अनुभवहीन आणि म्हणूनच उथळ, वरवरचे वाटेल. त्याला फुरसत मिळालीच आणि इच्छा असेल तर तुम्ही सुचवलंय ते सांगून बघेन..
प्रत्येक अनुभवाला काही कंगोरे असतात. ते सगळेच कुठल्याही सरकारी नियमावलींनी बांधलेल्या सरकारी कर्मचारी/ अधिकार्याला उघडपणे सांगता / मांडता येत नाहीत. आणि शेवटी कितीही संतुलिततेचा आव आणला तरी अभिनिवेश थोडाफार तरी झळकणारच. माझे लिखाण म्हणूनच 'बायस्ड'होईल, त्यामुळे मी फार लिहीत नाही.. जे काही थोडंफार अनुभवलंय, ते ह्या आधी मांडलंय मिपावर. (लिंक मिळत नाहीय. क्षमस्व..)
11 Jun 2015 - 6:06 pm | श्रीरंग_जोशी
हा त्या अनुभवकथनाचा दुवा -
थरार : नको इतका जवळून !!
त्याबाबरोबर हा दुवाही द्यावासा वाटला,
सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..
11 Jun 2015 - 3:36 pm | उपास
तुमच्या चिकाटीला सलाम आणि हे असं लिहून ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.. हे नजरेतून सुटलं होतं तेव्हा पण आता वाचायला मिळालं आणि भरुन पावलो. ह्यापेक्षा प्रेरणादायी ते वेगळ्ं काय.. !
माझी स्वतःची जिद्द, पेशन्स अशा परिक्शांच्या तयारीला कमी पडले, तसेच पदवीनंतर कुठलीही काँपिटीटीव्ह परिक्षा न देता आल्याचं कायम शल्य आहे मनात, नोकरीची घाई करायला नक्कोच होती असं आता वाटतं.. असो!
11 Jun 2015 - 4:37 pm | सिरुसेरि
काँपिटीटीव्ह परिक्षा मध्ये सगळीच उत्तरे बरोबरच वाटतात . जसे की- भारतातील पहिले बंदर कुठले - यांवर विशाखापट्ट्नम आणि कोलकत्ता दोन्ही उत्तरे बरोबरच वाटतात .
11 Jun 2015 - 4:58 pm | चिगो
मान्य..
डोळ्यात तेल घालून वाचणे म्हणजे काय आणि त्याची कसोटी ही परीक्षेच्या दिवशी कळते. एक शब्द हुकणे/चुकणे ह्यापायी बोंब होते सगळी. तुम्ही प्रिलीम्सबद्दल बोलताय बहुतेक, पण उदाहरणच द्यायचे झाले तर २००८च्या मुख्य परीक्षेत 'सायंस अँड टेक्नॉलॉजी'वर पुर्वीच्या परीक्षांमध्ये "टू मार्कर्स" असलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न होते, प्रत्येकी १५ मार्कांचे.. घाईघाईत आणि तणावात बर्याच जणांनी ह्या पंधरा मार्कांच्या प्रश्नाची उत्तरे दोन मार्कांच्या प्रश्नांसारखी दोन ओळींत लिहीली. म्हणजे तब्बल ४५ मार्कांसाठी फक्त ६ मार्कांची उत्तरे!! जिथे एका मार्काच्या फरकानेपण (तो फरक कुठल्या रँकवर आलाय ह्यावरुन) ३-४ ते १०-१२ रँक्स असा फरक पडू शकतो, तिथे ही चुक आत्मघाती होती.. पण ती झाली आणि बरेच जण झोपले, हे नक्की..
12 Jun 2015 - 10:34 pm | असंका
अत्यंत प्रेरणादायी लेख....
धन्यवाद!!
16 Mar 2017 - 3:17 pm | इरसाल कार्टं
मस्तच!
26 May 2020 - 1:39 pm | मोदक
हे धागे नेहमीच प्रेरणा देत असतात.. __/\__
बाकीच्यांना याचा आस्वाद घेता यावा म्हणून लेख वर काढत आहे.
22 May 2024 - 12:58 pm | diggi12
मस्तच
22 May 2024 - 1:28 pm | Bhakti
प्रेरणादायी!!