आमचा बोमडिला ला जाण्याचा प्रवास रात्रीचा असल्यामुळे फोटो काढता आले नाहीत परंतु परतीच्या प्रवासात हा प्रवास किती थरारक होता यासाठी मुद्दाम प्रपंच
एकी कडे खोल नदी व दुसरीकडे पहाड त्यात पाउस आणि वारंवार रस्त्यावर साचणारा चिखल यातुन मार्गक्रमण म्हणजे चालकाची कमाल होती.
बोमडिला हुन १५०० फुटावर बुधदाचा मोठा मठ आहे. या मठाद्वारे येथील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी शाळा चालविली जाते येथे त्यांच्या राहण्याची व जेवण्याची देखील मोफत सोय असते.
मठावरुन दिसणारी मनमोहक दृश्ये
मठधिपती व तेथील भिख्खुंचे निवास स्थान
महाराष्ट्राचे लाडके गायक सुधिर फडके यांचे मानस पुत्र दिपकजी यांची भेट बोमडिला येथे होणे हा एक दुग्ध सर्करा योग. त्यांच्या घरी जेवण व अण्णा(बाबुजी) यांच्या प्रतिभा आणि प्रतीमा मध्ये झालेल्या कार्यक्रमाची १ तासाची बैठक पहावयाला मिळाली ही तर मला मेजवानी च होती. दिपक जी हे शुध्द मराठी बोलतात हे वेगळे सांगणे न लगे. ते बोमडिला येथे राज्याच्या उद्योग विभागात जॉइंट डायरेक्टर आहेत् दोन वर्षानंतर ते त्यांच्या मुळ गावी तवांग येथे राहणार आहेत.
त्यांच्याच घरी पुण्याचा ह्रुषिकेश दिवेकर या तरुणाची भेट झाली. हा तिथे गेल्या ३ वर्शांपासुन हिन्दी शिकवतो व ९ आणि १० वि च्या विद्यार्थ्यांचे निषुल्क गणिताचे वर्ग घेतो हृषीकेश दिवेकर हा तेथील शाळेत प्राचार्य पदाचीही जवाबदारी सांभाळतो.
प्रतिक्रिया
27 Apr 2011 - 6:09 pm | यशोधरा
धन्यवाद. हृषिकेश दिवेकरांसारखे लोक जे तिथे राहून काही काम करतात, त्याविषयी माहिती लिहाल का?
28 Apr 2011 - 9:01 am | विश्वास कल्याणकर
माझी प्रथम ओळख झालेले श्री प्रशांत महामुनी हे शिलांग येथे सेवा भारतीचे कार्य करित असत त्याच्या कडे खासी हिल्स, जयंतिया व गारो हिल्स चे काम होते ते तेथील एका खेड्यात ५ वर्षे राहिले व तेथे खासी भाषा आत्मसात केली. ते तेथे १० वर्षे होते. सध्या ते गोहाटी येथे कार्य करीत आहेत. ते मुळचे पुण्याचे. त्यानंतर मला तेथे भेटलेले श्री सुमंत आमशेकर हे गोव्याचे, सुरेन्द्र तारखेडकर हे परभणीचे, उल्हासजी कुळकर्णी हे इंदुरचे, कु.नीना गुप्ता अरुणाचलच्या अतिदुर्गम भागात काम करते ती देवासची, प्रदिप जोशी, अरुणाचल मध्ये आहेत ते वर्ध्याचे, दिपकजी बोरोडे, अकोल्याचे, उत्तम इंगळे हे चंद्रपुरचे, डॉ. नागराजु हे बंगलोरचे, दिपक राठोड हे बुलढ्याणा जिल्ह्यातील नांदुरा येथील. विजय स्वामीजी हे शोलापुरचे. असे कितीतरी लोक तिथे आहेत. अतुल देशपांडे नागालैड मध्ये आहेत ते नांदेडचे. किती तरी अशे समाज सेवेची धुरा वाहणारे व स्वतःचा कुठलाही स्वार्थ नसलेले व आपआपल्या कुटुंबापासुन वर्षानुवर्षे दुर राहुन फाटलेले आभाळाला ठिगळे लावण्याचे काम करित आहेत. यांच्या संपर्कात आले कि माझ्या सारख्या तांदळाच्या कणांच्याही अक्षता झाल्याची अनुभुती होते.
27 Apr 2011 - 6:18 pm | अमोल केळकर
सुंदर निसर्ग
अमोल केळकर
27 Apr 2011 - 6:28 pm | सविता००१
यशो यान्च्याशी पूर्णपणे सहमत
28 Apr 2011 - 9:42 am | विसोबा खेचर
क्लास.!
28 Apr 2011 - 10:26 am | शिल्पा ब
डेंजरसली रोमँटीक निसर्ग...ह्रुषिकेश दिवेकर या तरुणाचे कौतुक वाटले.
28 Apr 2011 - 10:30 pm | प्राजु
मस्तच!
ऋषिकेश दिवेकर यांच्याबद्दल आणखी वाचायला आवडेल.
29 Apr 2011 - 1:34 am | आत्मशून्य
सही, यापेक्शा अजून काय पाहीजे भटकंती, साहस आवडणार्या प्राण्याला ? ह्रषिकेशच वीषेश कौतूक.
29 Apr 2011 - 2:56 pm | सुनिल पाटकर
फारच सुंदर.. फोटोही उत्तम. हे ठिकाण आहे कुठे ?.
29 Apr 2011 - 2:56 pm | सुनिल पाटकर
फारच सुंदर.. फोटोही उत्तम. हे ठिकाण आहे कुठे ?.
30 Apr 2011 - 4:18 pm | दीप्स्_मुम्बै
फोटो एक्दम म्स्त
30 Apr 2011 - 9:16 pm | ajay wankhede
स्वर्ग या पेक्षा वेगळा नसेलच...
अप्रतिम निसर्ग...
हा ठेवा जपू या