इशान्य भारताची सहल-बोमडिला

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
24 Apr 2011 - 11:50 am

अरुणाचल प्रदेशाच्या वेस्ट कामेंग जिल्ह्यातील एक टुमदार शहर म्हणुन बोमडीला चे वर्णन करता येईल. समुद्र सपाटीपासुन अंदाजे ९००० फुटावर असलेले हे शहर सर्व बाजुने हिमालयाच्या रांगांनी वेढलेले आहे. बुध्द धर्मीयांचे प्राबल्या असल्याने येथील लोक हे सुशिक्षीत व संस्कृतीक दृष्ट्या खुपच समृध्द आहेत. मात्र येथे जायला केवळ रस्ता हाच एक उपाय आहे. याच्या उत्तरेस असलेल्या तवांग ला गुवाहाटी येथुन हेलीकॉप्टर सेवा आहे. माझ्या दोन दिवसांच्या येथील वास्तव्यात मला स्वर्गात असल्याची अनुभुती आली. भारताच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा अधिक म्हणजे ६९% साक्षरता येथे आहे. लोकसंख्या मात्र १०००० च्या आसपास आहे. येथे अन्य भागातुन येणार्‍या रस्त्यांची देखभाल ही मिलीटरी कडे आहे. येथे कायम पाउस येत असल्याने प्रवासात कायम २-३ फुट माती असते व ती साफ करण्याचे काम मिलीटरी सतत करुन वाहतुक सुरळीत करित असते.

अरुणाचलची राजधानी इटानगर होण्याआधी १० कि.मी. आधी नहरलगुन येथे शासकीय कार्यालये होती. त्यामुळे हे शहर मुख्य आहे. येथे हेलीपैड असुन केन्द्रीय मंत्री किंवा अन्य उच्चाधिकारि प्रथम येथे येतात. येथुन बोमडीला येथे जाण्यासाठी लहान बसेस जातात. संपुर्ण प्रवास हा रात्रीचा असतो. सकाळी ६ वाजता निघणारी बस ही बोमडीला येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता पोचते. अरुणाचल सिमेतुन निघुन ही बस आसाम च्या सखल प्रदेशात प्रवास करुन पुन्हा अरुणाचल सीमेत प्रवेश करते. त्यामुळे रात्री दोनदा चेकींग होते. अरुणाचल सीमेतुन पापेनपारे जिल्ह्यातुन बाहेर निघुन आसाम मधील सखल प्रदेशातील प्रवास केल्यानंतर पुन्हा बस वेस्ट कामेंग जिल्ह्यात प्रवेश करते. बुलढाण्याचे वन अधिकारी श्री बेडेकर यांचे अपहरण याच जिल्ह्यात झाले होते. हा जिल्हा पुर्ण पहाडी आहे. एका बाजुला कडा आणी दुसर्‍या बाजुला नदी यामधील लहानशा रस्त्यातुन बस मार्ग आक्रमण करीत असतांना झोप लागणे शक्य नसते. त्यात रस्त्यावर २-३ फुट चिखलात बस बरेचदा अडकते व चिखल साफ होत पर्यंत थांबुन राहते त्यामुळे संपुर्ण प्रवास हा थरारक असतो.

वाटेत दिसणारी झुम
हिमालयाच्या पर्वत रांगा
बोमडीला च्या ८ हजार फुट उंचीचा चढ चढत असतांना बसचा वेग १० कि.मी इतका असतो

बोमडिला सभोवतालची गावे व तेथे जाणारे वळणदार रस्ते

गावात जाणारे वळणदार रस्ते

विलोभनीय बोमडीला

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

मस्त फोटो कल्याणकर, एकदम रिफ्रेश झालो बघून! तुमच्याकरवी या भागाची नव्याने ओळख होतेय. BTW जेव्हा जेव्हा हे ईशान्य भारताचे (सिक्कीम, अ.प्र.,मेघालय) फोटो बघतो तेव्हा तेव्हा जाम जळजळ होते. केव्हा जायला मिळणार आहे देवास ठाऊक.

आत्मशून्य's picture

24 Apr 2011 - 3:11 pm | आत्मशून्य

भारत लै समृध्द है.

गवि's picture

28 Apr 2011 - 2:36 pm | गवि

सहमत.

चिंतामणी's picture

24 Apr 2011 - 5:58 pm | चिंतामणी

लेखमाला चांगली चालली आहेच. पण फोटोंची कमी होती.

ती भरून काढल्याबद्दल आभार.

चिंतामणी's picture

24 Apr 2011 - 6:00 pm | चिंतामणी

लेखमाला चांगली चालली आहेच. पण फोटोंची कमी होती.

ती भरून काढल्याबद्दल आभार.

धमाल मुलगा's picture

26 Apr 2011 - 8:43 pm | धमाल मुलगा

पहिल्या फोटोलाच आम्ही आसमंतात विलीन झालो आहो ह्याची नोंद घ्यावी.

इतक्या निसर्गरम्य ठिकाणची फोटोग्राफी..नव्हे नव्हे, स्वर्गाचेच फोटो असे इथे डकवून आमचा जीव घेतल्याबद्दल विश्वासरावांवर भा.द.सं.नुसार कलम ३०२ अंतर्गत गुन्हा का दाखल करु नये? :)

यशोधरा's picture

28 Apr 2011 - 2:22 pm | यशोधरा

वा!! काय सुरेख भाग आहे! फोटोंबद्दल धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Apr 2011 - 5:20 pm | llपुण्याचे पेशवेll

छान लेख. अशीच नवनवीन माहीती देत रहा. इशान्य भारत आमच्यासाठी पूर्णपणे अपरीचित भाग आहे.