http://misalpav.com/node/17534
इथं दिलेल्या आमंत्रणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद. आतापर्यंत ज्यांनी कनर्फ्म केलंय ते आहेत
वल्ली, मनराव, गणॅशा,, टारझन, साधासुधासौरभ, पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा, छोटा डॉन , वपाडाव,मी,प्यारे१ ,म्रुत्युंजय, आत्मशुन्य.
बुकिंग झालेलं आहे, अजुन पण कुणि येणार असेल तर क्रुपया उद्या ११ वाजेपर्यंत कळवा. इथं धाग्यावर वरची लिस्ट च्योप पास्ते करुन त्यातच नावं वाढवलीत तरी चालेल. मला किंवा वल्लीला व्यनि केला तरी चालेल. वरच्या सगळ्यांना व्यनि केलेलाच आहे.
मी आणि वल्ली हॉटेल सयाजीच्या लॉबीमध्ये सतराला संध्याकाळी साडेसात वाजता पोहोचु. पावणे आठ पर्यंत सगळ्यांनी यावं ही विनंती. बुकिंग हर्षद छत्रपति या नावानं केलेलं आहे.
उद्या ११ वाजेपर्यंत जे कनर्फ्म करतील त्यांच्यासहित बुकिंग फायनल केलं जाईल, रविवार असल्यानं हॉटॅलमध्ये असलेली गर्दी लक्षात घेउन ऐनवेळी काही प्रोब्लेम होउ नयेत म्हणुन ही सुचना.
प्रतिक्रिया
15 Apr 2011 - 4:15 pm | मृत्युन्जय
आयला १३ चा भारी आकडा फायनल झालेला दिसतोय कट्ट्यासाठी ;)
15 Apr 2011 - 4:26 pm | टारझन
१. येतांना सगळ्यांनी स्वतःचे पैशे सुट्टे घेउन यावे . दुसर्याच्या भरोष्यावर येऊ नये ;)
२. जास्त उषीर लावु नये .
३. येणार नसल्यास स्पष्ट कळवावे , उगाच येतो येतो म्हणुन टांग देऊ नये . नाही तर त्यांना डॉनरत्न किंवा टिंगीविभुषण दिले जाईल .
४. कट्ट्यात कंपुबाजी करु नये :)
५. एका प्लेट मध्ये एकानेच खावे , दोघांत खाऊन सगळ्यांची शान घालवु नये
६. सहकार्य करावे . :)
- मी एक पाटी क्लास
15 Apr 2011 - 4:43 pm | llपुण्याचे पेशवेll
प्रतिसाद संपादित.
-पुण्याचे पेशवे
15 Apr 2011 - 5:04 pm | अलख निरंजन
येतांना सगळ्यांनी स्वतःचे पैशे सुट्टे घेउन यावे . दुसर्याच्या भरोष्यावर येऊ नये
आणी स्वतचे बील स्वताच द्यावे. मिपाने पैशाच्या व्यवहारापासून दूरच राहावे.
15 Apr 2011 - 4:33 pm | गवि
शुभेच्छा..झक्कास होणार कट्टा याची खात्री आहे.
सोबत ५० फक्त आहेतच. इतरही नेहमीचे बा.ने. व्हिजिटर्स असतीलच.
पण तरीही.. प्रथमच जाणार्यांसाठी:
बेक्ड पोटॅटो एकदम रेकमेंडेड... :)
मश्रूम टिक्काही..
बाकी उगाच पोटाची भरताड करण्यासाठी भराभर गाजर, फ्लॉवर, सिमलामिर्ची असे काहीबाही सपक तुकडे लावलेल्या सळ्या हे वेटर्स टेबलवर आणून देत राहतील. ते तिथल्यातिथे थांबवून खास आवडीचे जिन्नस मागवावे. अन्यथा कोबीफ्लॉवर खाऊन पोट भरल्यावर आवडते कबाब अन टिक्के येऊ लागतील आणि खायला जागा उरणार नाही.
15 Apr 2011 - 5:24 pm | सूड
+१
15 Apr 2011 - 5:52 pm | प्रचेतस
मोलाची माहिती गवि.
डेझर्ट मध्ये काय रेकमेंड आहे ते पण सांगा की राव. फिरनी मस्ट हे मागे डॉनरावांनी सांगितले होतेच.
15 Apr 2011 - 6:00 pm | गवि
ते डेझर्ट नेहमी बदलत असल्याने सांगणे कठीण आहे. तीन व्हिजिट्सच्या वेळी फिरनीच फक्त चांगली वाटली. केक्सही असतात आणि त्यातला एखादा बरा असतो.
बुफेचे जेवण आणि स्वीटवर फार भर न देता ते सुरुवातीचे सळीवर लावून आणतात त्या पदार्थांवर ताव मारावा.
महेंद्र कुलकर्णींनी इथे फार छान लिहिले आहे सयाजी रू टॉ बा ने विषयी. आवर्जून वाचावे सर्वांनी.
15 Apr 2011 - 6:29 pm | प्रचेतस
लिंक लै भारी.
तेजायला, आतापासूनच उपास चालू करावा म्हणतोय आता.
15 Apr 2011 - 6:11 pm | गणेशा
गवी नॉनव्हेज चे पण सांगा की जमल्यास..
घासपुस हॉटेलात जावून खाणे जमत नाहि मला..
तरीही उद्या संधाकाळी चाललोय म्हणा आंबरस हाणायला ...
२ दिवसात भरपुर कॅलरी वाढवणार आहे .. जावुद्या मरुद्या...
आणि तुम्ही पण या की जमल्यास.. वाटल्यास एकत्र माघारी येवु ठाण्याला..
15 Apr 2011 - 4:39 pm | असुर
बाकी उगाच पोटाची भरताड करण्यासाठी भराभर गाजर, फ्लॉवर, सिमलामिर्ची असे काहीबाही सपक तुकडे लावलेल्या सळ्या हे वेटर्स टेबलवर आणून देत राहतील. ते तिथल्यातिथे थांबवून खास आवडीचे जिन्नस मागवावे. अन्यथा कोबीफ्लॉवर खाऊन पोट भरल्यावर आवडते कबाब अन टिक्के येऊ लागतील आणि खायला जागा उरणार नाही.
परफेक्ट!!! महत्वाचं खा, उगाच पोटाचा पेटारा करुन अडगळ भरु नका!!!!
आमच्या पहिल्यावहिल्या बार्बेक्यू नेशन पार्टीची याद येऊन नॉस्टॅल्जिक झालो!! बाकी गवि सकाळपासूनच लोकानला नॉस्टॅल्जिक करुन र्हायले!
--असुर
15 Apr 2011 - 4:42 pm | ५० फक्त
@गवि, अतिशय धन्यवाद माहितीसाठी. मला बाने ला जाउन ३-४ वर्षे झाली आता. त्यामुळं काही नीटसं लक्षात नाही. तेंव्हा तिथं झेंड्याची सिस्टिम होती. फार भारी वाटला होता तो प्रकार.
@ टारझन, सुचनांचं स्वागत, काय आहे प्रत्येक कार्यात लागतं कुणीतरी मोठं सगळ्यांना एकत्र करुन कार्य सिद्धिस नेणारं, परवा हे काम तझ्याकडं.
15 Apr 2011 - 4:54 pm | प्यारे१
>>>>>काय आहे प्रत्येक कार्यात लागतं कुणीतरी मोठं सगळ्यांना एकत्र करुन कार्य सिद्धिस नेणारं, परवा हे काम तझ्याकडं.
लोळून लोळून हसतोय.
नेहरु कुर्ता पायजमा जॅकेट टोपी घातलेला टारझन सर्रकन आठवला. ;) :)
टार्या आईची शप्पथ आहे तुला मला काही केलंस परवा तर..... ;)
15 Apr 2011 - 5:03 pm | छोटा डॉन
+१, सहमत.
टार्या हे काम करणार ह्यात काहीच वाद नाही, तुम्ही निर्धास्त र्हावा.
बाकी आमचे बील टारु भरणार हे त्याने खासगीत कबुल केले आहे ही उगाच अवांतर माहिती :)
- छोटा डॉन
15 Apr 2011 - 6:32 pm | टारझन
हो आम्ही वाटेल ते काम करुच ! :)
हातासरशी हे बील "मिपावरील कुपोषित बालक संगोपन निधी" मधुन भरल्या जाईल . मायबाप मिपाकरांनी ह्या निधीसाठी जमेल तसा पैसा टाकावा. कमित कमी ५० पैसे द्यावेत. १०,२०,२५ पैसे स्विकारले जाणार नाहीत. अजुन कोणाकोणाचे बिल भरायचे आहे ते कळवा .
अवांतर : प्यारे१ ला भेटायची इच्छा तिव्र होत चालली आहे. ;)
15 Apr 2011 - 6:08 pm | गवि
@ ५० फक्त.
अजूनही तीच झेंडा सिस्टीम आहे. पण झेंडा वर असला की वाढत राहायचे एवढेच ठरलेले आहे. काय वाढायचे हे त्यामुळे कळत नाहीच. तस्मात ते दिलेल्या क्रमाने घासफूसही सारखी सारखी आणून समोरच्या शेगडीत लावतात. मग ती खाल्ली जातेच.
झेंडा सिस्टीम आहे छान.
इतर एका प्रतिसादात महेंद्रजींच्या अत्यंत माहितीपूर्ण लेखाची लिंक दिली आहे. त्यातील काही माहिती :
"कमीत कमी दहा लोकं असतील तर बारमन्स पॅकेज देतात ते लोकं. पण त्या साठी आधी पासुन बुकींग करावे लागते. त्या पॅकेज मधे अनलिमिटेड सिलेक्टेड ड्रिंक्स आणि बार्बेक्यु असतो. स्कॉच मधे ब्लॅक ऍंड व्हाइट , टीचर्स, चा चॉइस होता तसेच बिअर वगैरे पण होत""
15 Apr 2011 - 6:16 pm | ५० फक्त
गवि, लिंक एकदम भन्नाटच , लई भारी. या की राव तुम्ही पण.
15 Apr 2011 - 6:20 pm | स्मिता.
झेंडा सिस्टीम तर आहेच आणि सळ्यांवर काय आणायचं हे पण वेटरला सांगता येतं. जर सरसकट व्हेज नको असेल तर तसं वेटरला सांगितल्यावर तो आणत नाही. त्यांच्या ठरलेल्या क्रमात जर आपला आवडता पदार्थ आला नाही तर त्यासाठी विनंती करता येते... असा माझा अनुभव आहे.
पुण्याच्या कट्ट्याला शुभेच्छा! कॅमेरा न्यायला विसरू नका :)
15 Apr 2011 - 6:25 pm | गवि
जर सरसकट व्हेज नको असेल तर तसं वेटरला सांगितल्यावर तो आणत नाही.
तेच आधी सांगा असं म्हटलं. नाही सांगितलं तर बेचव आयटेमही धडाधड आणून ठेवतात आणि वाया जाऊ नये म्हणून खाल्ले जातात.
पण सरसकट व्हेज नको असं नाही. उलट नॉनव्हेज बारबेक्यू मला तर एकदम सामान्य / बेचव वाटले. प्रॉन्स / फिश सोडून.
व्हेजमधेच खरे टेस्टी आयटेम्स मिळाले. आरवी, पनीर आणि मश्रूम टिक्का, कबाब असे
15 Apr 2011 - 6:28 pm | प्रचेतस
आरवी...
हा कुठला पदार्थ असतो ब्वा? पहिल्यांदाच ऐकतोय.
15 Apr 2011 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार
हा टार्याचा अपमान आहे हे गविकाकांच्या निदर्शनास (नम्रपणे) आणुन देउ इच्छितो.
15 Apr 2011 - 6:58 pm | छोटा डॉन
अरे पर्या, गविकाका बहुतेक व्हेज आयटमबद्दल बोलत आहेत, होय ना हो गविकाका ? ;)
असो, बाकी सयाजीत सगळेचे आयटम भारी असतात असे सांगु इच्छितो ;) , माझा तो वैयक्तिक अनुभव आहे
- छोटा डॉन
15 Apr 2011 - 7:09 pm | परिकथेतील राजकुमार
टार्य, व्हेज -नानव्हेज असा भेदभाव करत नाही. त्याला सगळे समानच ;)
साधु संत म्हणुनच जन्माला यायचा. पण ऐनवेळी ग्रह फिरले आणि नाडीपट्टी बदलली म्हणुन.
15 Apr 2011 - 11:33 pm | टारझन
हो ना राव .. कोण भुरटा माझी नाडीपट्टी घेउन गेला .. :)
अवांतर :- खाणे हा बोलण्याचा विषय नाही .. त्या दिवसी मी उपास सोडणार आहे ;)
15 Apr 2011 - 4:48 pm | पियुशा
कटट्याला शुभेच्चा :)
15 Apr 2011 - 5:00 pm | गणपा
अजुन एका आगाऊ जळजळ वाढवणार्या धाग्याची नांदी या धाग्यात दिसुन राहीली आहे.
करा लेको करा मेळावे कारा कट्टे करा. आणि मग त्याची रसभरीत वर्णन करा. ;)
तुमच्या कट्ट्याला आमच्या सुबेच्चा.
15 Apr 2011 - 6:05 pm | विंजिनेर
काय कराच्चे ते न सांगता करा. इथे आमची उगीच तडफड :)
असो. शुभेच्छा - उद्या कट्ट्यापर्यंत कोणी जेवू नका म्हंजे पैशे वसूल करता येतील शिवाय आप्पाल्या बायका/आया/तायांना दुपारी स्वैपाकघरांत सुट्टी !!.
16 Apr 2011 - 4:16 pm | निनाद मुक्काम प...
पियुशाच्या लेखात माझ्या प्रतिसादात जळजळ बरीचशी व्यक्त करून झाली आहे
आपल्या न सांगण्याने ते काय फोटो टाकायचे राहणार आहेत का ?
माझ्या आख्यानात मी तरी ......
असो मज्जा करा
.( हे सांगितले नाही तरी ते करणारच म्हणा .)
15 Apr 2011 - 5:29 pm | प्रास
आमंत्रणाच्या धाग्यावर दिलेल्याच आहेत पण -
इथेही पुणे सरुटॉबानेच्या खादाडी कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
:-)
15 Apr 2011 - 6:58 pm | राही
आरवी म्हणजे अळकुडी, अळवाचे कंद.
15 Apr 2011 - 8:22 pm | सर्वसाक्षी
मस्त मजा करा, न विसरता वृत्तांत टाका.
15 Apr 2011 - 9:00 pm | अर्धवट
दहा मिनिटे येउन नुसते सगळ्यांना भेटून गेलं तर चालेल का?
15 Apr 2011 - 9:46 pm | ५० फक्त
@ अर्धवट, जरुर जरुर ये रे, पण दहा मिनिटं म्हणुन आलास तरी पण एक तास तरी थाबशीलच बघ.
15 Apr 2011 - 9:15 pm | इरसाल
कट्ट्याला शुभेच्छा. कृपया फोटो टाकू नये.उगाच जीव जळायचा बार्बेक्यू मध्ये.
आयला हे तर गुडगाव मध्येपण आहे दोन आठवड्यापूर्वी चान्स हुकवला म्हणायचा
15 Apr 2011 - 10:18 pm | धमाल मुलगा
आम्ही जातीनं हजर राहू!
ह्याउप्पर अधिक काय लिहिणे?
||इति लेखनसीमा||
16 Apr 2011 - 12:09 pm | ५० फक्त
वल्ली, मनराव, गणॅशा,, टारझन, साधासुधासौरभ, पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा, छोटा डॉन , वपाडाव,मी,प्यारे१ ,म्रुत्युंजय, आत्मशुन्य. , एवढीच नावं कनर्फ्म आहेत आता पर्यंत. म्हणजे एकुण १३ जण. आत्ताच बुकिंग अपडेट केलं आहे. १-२ ऐनवेळी अॅडजस्ट करता येईल.
तर आता उद्या भेटुयात सरुटॉबानेला संध्याकाळी साडेसात वाजता आणि दंगा करु या.
पुन्हा एकदा गवि,स्मिता व असुर, मदत व सल्ल्याबद्दल अतिशय धन्यवाद.
16 Apr 2011 - 1:34 pm | विजुभाऊ
रामदास काका , प्रभु मास्तर आणि विजुभाऊ हे त्रिकूट विसरु नका रे
16 Apr 2011 - 7:50 pm | सूर्य
नंतर फोटु टाका म्हणजे झाले. :)
- सूर्य
18 Apr 2011 - 9:26 am | नरेशकुमार
सदर कार्यक्रमाचे फटू हाजीर करण्यात यावे. अषि विणंती मारत आहे.
18 Apr 2011 - 2:58 pm | चिंतामणी
फटू आणि रिपोर्ट लौकर टाका.
18 Apr 2011 - 10:39 am | मनिष
जरा फोटो-बिटो, व्रुत्त्तांत वगैरे येऊ द्या ना...
18 Apr 2011 - 3:11 pm | मी-सौरभ
काल जेवण लई भा हा री ही व्हतं :) कट्टा बी झ्याक झाला.
फटू येताते वाईच दम धरा.
गणेशा : कविता (मराठीतः पोएम) तयार झाली का??
18 Apr 2011 - 3:20 pm | मृत्युन्जय
फक्त फटु? वृत्तांत पन येनार की राव.
18 Apr 2011 - 3:25 pm | ५० फक्त
नमस्कार,
आज रात्री फोटो व रिपोर्ट दोन्ही टाकण्याची व्यवस्था केलेली आहे.
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि उत्सुकतेबद्द्ल धन्यवाद.
थोडी वाट पहावी लागते आहे हे मान्य..
५० फक्त
18 Apr 2011 - 4:01 pm | llपुण्याचे पेशवेll
ओक्के.
18 Apr 2011 - 5:20 pm | नरेशकुमार
फटु अनं रिपट साठी आतुरतेने वाट पाहल्या जाईल.
18 Apr 2011 - 6:19 pm | वपाडाव
अशा प्रकारे धम्याने सप्शेल हात दिलेला आहे...
बाकी...
वल्ली, सौरभ, टार्या, पुपे, प्यारे, गणेशा, आत्मशुन्य्,मनराव, मृत्युंजय या सर्वांचे हबिणंदण....
आन कट्टा घडवुन आणल्याबद्दल हर्षद यांचे सहस्त्र आभार...
न आलेल्यांना फटु टाकुन इनोची पुडी सप्रेम भेट देण्यात येइल...
अवांतर : डान्रावांना बोल्ण्याची हिंमत नाही अजुनतरी....
---
आपला वपाडाव...
18 Apr 2011 - 8:09 pm | चिंतामणी
का?? कश्यासाठी???
फोटो पाहून जळजळ होणार हे कश्यावरून????
शितावरून भाताची (म्हणजेच स्वतः वरून सगळ्यांची) परीक्षा करणे नेहमीच बरोबर असते असे नाही.
19 Apr 2011 - 6:22 pm | वपाडाव
ज्यांना जळजळ होईल त्यांच्यासाठी सांगितले होते हे....
आपणांस काळजी नसावी....
19 Apr 2011 - 12:30 am | ५० फक्त
नमस्कार,
आज रात्री फोटो व रिपोर्ट दोन्ही टाकण्याची व्यवस्था केलेली आहे.
सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल आणि उत्सुकतेबद्द्ल धन्यवाद.
थोडी वाट पहावी लागते आहे हे मान्य..
या वर दिलेल्या वचनानुसार रिपोर्ट मंडळापुढे ठेवला आहे, प्रतिसाद, शिव्या, कॉतुक काय मिळेल त्यात आनंद आहे.
http://misalpav.com/node/17727
५० फक्त.