ख्रिस्ती धर्मांतरण व इशान्य भारतातील दहशतवाद

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
15 Apr 2011 - 4:31 pm

आसाम, नागालैंड, त्रिपुरा, मणीपुर, मेघालय, मिझोराम, व अरुणाचल प्रदेश हा प्रदेश सर्वसाधारण पणे ईशान्य भारत संबोधल्या जातो. सिक्किम व पश्चिम बंगाल चा दार्जिलींग जिल्हा जरी भौगोलीक दृष्ट्या इशान्येस असला तरी त्याचा इशान्य भारत या सज्ञेत अंतर्भाव होत नाही. नॉर्थ इस्ट इंडिया ख्रिश्चन कौन्सील मात्र वरील संपुर्ण भुभागाचा ईशान्य भारतात समावेश करते. मणीपुर व त्रिपुरा राज्य वगळता इतर संपुर्ण भाग पुर्वी आसाम राज्य म्हणुन ओळखला जात असे. त्रिपुरा चा अपवाद वगळता सर्व भाग हा डोंगरांनी व्याप्त आहे. भारताची ही राज्ये म्यानमार, बांगला देश, चीन व तीबेट या देशांच्या सीमांना लागुन आहेत.

गेल्या १०० वर्षात या राज्यांच्या लोकसंख्येच्या धार्मीक प्रोफाईल मध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. या काळात ख्रिश्चन धर्मातरणाच्या तीव्र चळवळीला वेग आलेला पहावयास मिळतो. खरे तर काही राज्ये संपुर्ण पणे ख्रिश्चन झालेली आढळतात या भागात १९०१,१९५१(स्वातंत्र्य प्राप्तीनंतर) व १९६१ मध्ये ख्रिश्चन लोकसंख्येची टक्केवारी पुरेशी बोलकी आहे

१९०१ ------------ १९५१---------------- १९६१

अरुणाचल प्रदेश Not Available -- 0.051 ------------ 10.29
आसाम ----------- 0.40 ------------ 2.00 ---------------- 3.32
मणीपुर ---------- 0.016---------- 11.84 ------------- 34.12
मेघालय ------------6.16 ----------- 24.66 ------------- 64.58
मिझोराम ----------0.05 ------------ 90.52 ------------- 85.73
नागालैंड -----------0.59 ------------ 46.05 ------------- 87.47
त्रिपुरा ---------------0.08 -------------- 0.82 -------------- 1.69

ख्रिश्चन मिशनरींनी आपल्या सोबत शिक्षण व इतर नागरी सुविधा आणल्या हे जितके खरे असले तरी, जगातल्या अनेक भागात त्यांनी त्या भागातली जीवनशैली, शेकडॉ वर्षापासुन चालत आलेल्या परंपरा, आचारविचार, व तिथले ज्ञ्यान याचा देखिल समुळ नाश केला. त्यांनी तेथील लोकांचा आपल्या धर्मावरचा अनादर वाढवुन पश्चिमेकडिल परक्या संस्कृती कडे त्यांना आकर्षित केले. इशान्य भारतात त्यांनी नविन ख्रिश्चन झालेल्यांना त्यांच्या ख्रिश्चनेतर बांधवाच्या विरुधद लढ्यासाठी उभे केले. या दुफळीमुळे ह्या धर्मांतरीत झालेल्या जमाती भारतीय समाजापासुन दुरावल्या व त्या ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या हातचे बाहुले बनल्या. भारतातील बहुतांश मिशनर्‍यांनी फुटीरतावादाला खतपाणी घालण्याचाच प्रयत्न केला. येथिल धर्मांतरीत जमातीना देशाबद्दल अभिमान बाळगणे तर सोडाच देशातुन फुटण्याबाबतच चिथावणी दिली जाते. आज ख्रिश्चन अतिरेकी ख्रिश्चन होण्यास नकार देणार्‍या लोकांना बंदुकीच्या जोरावर धर्मांतरण करण्यास भाग पाडण्यात धन्यता मानतात.

इशान्य भारतात सर्वप्रथम प्रवेश चर्च चा झाला नाही तर ब्रिटिश प्रशासनाचा झाला. अमेरिकन बाप्टिस्ट मिशन हे सुरुवातीला ब्रम्हपुत्रेच्या खोर्‍यापुरतेच सिमीत होते व त्याचा प्रवेश नागा हिल्स मध्ये १८७२ मध्ये ब्रिटिश सरकार चे प्रशासन तेथे आल्यानंतर झाला. मणिपुरच्या आदिवासी भागात पहिले ख्रिश्चन मिशन, अमेरिकन बाप्टिस्ट १८९४ मध्ये म्हणजे मणीपुरमध्ये ब्रिटिश प्रशासन तिथे आल्यानंतर तीन वर्षानंतर आले. १८६६ मध्ये गारो हील्स मध्ये ब्रिटिश प्रशासन आले व त्यामागोमाग अमेरिकन बाप्टिस्ट १८६७ मध्ये प्रवेश करते झाले. मिझो हिल्स मध्ये ख्रिश्चन मिशनरी १८९० मध्ये ब्रिटीश प्रशासन आल्यानंतर प्रवेश करते झाले. कैथोलीक मिशन चा प्रवेश गारो हील्स मध्ये १९३० मध्ये गवर्न्रर मायकेल कीन यांच्या मदतीने सुकर झाला. एका जुन्या ख्रिश्चन इव्हीन्जीलीस्ट च्या म्हणण्यानुसार त्याकाळी तेथे ख्रिश्चनिटीला इतका तीव्र विरोध होता की धर्म प्रचारकाला गावात राहण्यासाठी जागा मीळणे व जेवण देखील मिळण्याची मारामार होती तसेच गॉस्पेल शिकवण्यासाठी जागा ही मिळत नसे. त्यावेळी ग्राम प्रमुखाने(गाव बुढा) यांची जागेची सोय केली. हा ब्रिटीश प्रशासनाकडुन नियुक्त असे त्यामुळे गावकरी त्यावर आक्षेप घेउ शकत नसत.

१८२२ चे सुमारास सर्वप्रथम कुच बिहार चा गवर्नर डेव्हीड स्कॉट च्या मेंदुत आसाम मधील गारो हील्स च्या लोकांचे ख्रिस्तीकरण करण्याची कल्पना आली. त्याने तात्कालीन सेक्रेटरी टू गवर्नमेंट बेली ला लिहीले." I am satisfied that nothing permanently good can be obtained by other means (than sending a missionary) and that, if we do not interfere on behalf of the poor Garo, they will soon become Hindu or half-Hindu." यावर बेली ने तितक्याच उत्साहपुर्वक उत्तर पाठविले त्यात शेवट त्याने असे लिहीले "I do not think the favorable opportunity for making this interesting experiment should be lost. ब्रिटीश राजवटीत ख्रिश्चन धर्माप्रचारकांना मानव जातीचे साम, दाम, दंड भेद या सर्व मार्गाने धर्मांतरण घडवुन आणण्याचा जणु परवानाच मिळालेला होता.

ख्रिश्चन धर्माप्रसारकांनी इशान्य भारतात असा प्रचार सुरु केला की येथील जनजातीला कुठलाच धर्म नाही. खरे तर या जनजातींची निसर्ग पुजेवर असिम श्रध्दा होती आणि आहे. त्या जनजातींचा आत्म्याच्या अमरत्वावर व मनुष्याच्या पुनरजन्मावर विश्वास आहे. तसेच त्यांच्यातील धार्मीक विधी त्यांचे धर्मगुरु करतात. जसे खासी मध्ये लिंगडोह, आओ मध्ये पुतीर, मीझो मध्ये पुयीथॉम, गारोमध्ये कमल नोक्मा.

आद्य वसाहतकार जे. एच लोरेन याने तर गारो मिझो मानत असलेले देव व जिझस ख्राईस्ट हे जणु एकच आहेत हे निरनिराळ्या उदाहरणावरुन पटवुन भ्रम निर्माण करण्याचे कार्य केले.आजही धर्मांतरण करतांना ते जनजातीच्या श्रध्दा स्थानाला जिझस सोबत सरमिसळ करुन त्यांना भ्रमीत करतात. आसामच्या संत सनारदेवांच्या लोकप्रिय बारगीतामध्ये राम व कृष्णाच्या नावाऐवजी जिझसचे नाव टाकुन ते प्रचलित करण्याचा उपद्व्याप केला होता. स्थानिक वैष्णव सभेनी यावर तिव्र आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी तो प्रकार बंद केला.

स्थानिक चर्च मध्ये चमत्कार पेटी ठेवणे हा तर तेथील नियमीत प्रकार आहे. गावातिल लोकांना आपल्या मनोकामना लिहुन त्यात टाकण्यात सागितले जाते. कुणी कर्ज, पक्के घर तर कुणी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे अशा गरजा लिहून टाकतात. काही आठवड्याने त्यांना त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याइतके पैसे देण्यात येतात. साहजिकच संपुर्ण कुटुंब च्या कुटुंब धर्मांतरित होते.

संपुर्ण नागांना ख्रिश्चन करण्यामध्ये तेथे पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात हे मुख्य धोरण होते. रोमान कैथोलिक ख्रिश्चन हे प्रोटेस्टंट ब्रिटिशांच्या काळात नागालैंड मध्ये प्रतिबंधित होते. पण स्वातंत्र्य प्राप्तिनंतर ते देखील नागालैंड मध्ये प्रवेश करते झाले. त्यांच्या धर्मांतरणाच्या यशाची किल्ली म्हणजे त्यांचे शिक्षण विषयक धोरण होते.Father Thomas Menamparambil लिहीतात :- "शिलांग, गुवाहाटी व दिब्रुगड येथील boarding houses नी या प्रदेशाच्या धर्मांतरणात प्रमुख भुमिका पार पाडली. त्यांनी उत्तम प्रशिक्षीत धर्म शिक्षक आणी lay leaders तयार केले. दरवर्षी मोठ्या संख्येत जेष्ट विद्यार्थी निवडुन त्यांना बाप्तिस्मा देण्यात येत असे. आणि याच तरुण विद्यार्थ्यांच्या मदतीने गारो हिल्स, नागालैंड, मणिपुर आणी काहि प्रमाणात मिझोराम मध्ये चर्च ची निर्मीती करण्यात आली.

धर्मांतरणाचे कामाच्या सुरुवातीला त्यांनी जनजातीला रोमन लिपी दिली. सुरुवातीला खासि व गारो ही भाषा बंगाली/आसामि या लिपित लिहीली जात असे त्याबदल्यात ती रोमन लिपीत लिहीण्याचे आवश्यक करण्यात आले व त्याचाच प्रसार करण्यात आला व त्यांना बायबल चे साहित्यच सहज पणे उपलब्ध करण्यात आले. १९७० पासुन चर्च ने उघडपणे आसामच्या त्रिपुरातील व बोडो जनजातींसाठी रोमन लिपीचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. तेंव्हा त्रिपुरा सरकार मधील दोन मर्क्सिस्ट मंत्र्यानी या चर्चच्या उघड कृतीला जातीय राजकारण म्हणुन तिव्र विरोध केला. पण चर्च ने रोमन लिपी लादण्यासाठी बंदुकीचा देखील वापर केला. २१/८/२००० रोजी बोडो साहित्य सभेचे अध्यक्ष श्री बिनेश्वर ब्रम्ह यांची चर्च पुरस्कृत National Democratic Front of Bodoland च्या अतिरेक्यांकडुन हत्त्या करण्यात आली. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी बोडों भाषेसाठी देवनागरी चा पुरस्कार केला. आज मणीपुर सोडल्यास सर्व इशान्य भारतातील राज्यांची अधिकृत राजभाषा ही इंग्लीश आहे याची नोंद घेतली पाहिजे.

ख्रिश्चन धर्मांतरणानंतर या जनजाति चे लोक आपल्या स्थानीक उत्सवापासुन स्वत:ला दुर ठेवतात कारण हे उत्सव आता त्यांचे नाहीत असे ते मानतात किंबहुना हे त्यांच्या मनात बिंबवल्या गेले आहेत. यामुळे आज मेघालयातील ख्रिश्चन खासी हे त्यांच्या सद सुक मीन्स्तेम उत्सवात किंवा नॉन्गक्रेम उत्सवात भाग घेतांना दिसत नाहित. अरुणाचल प्रदेशातील धर्मांतरीत जनजाती त्यांच्या शोलुंग किंव मोपीन उत्सवापासुन दुर राहतात किंवा त्यांना तेथे जाण्यापसुन मज्जाव केला जातो. गारो धर्मांतरीत ख्रिश्चन त्यांच्य पारंपरिक वांगला नृत्य उत्सवात भाग घेत नाहीत. हा प्रकार या प्रदेशातील संपुर्ण जनजाती ख्रिश्चन धर्मांतरीत झाल्या आहेत तेथे प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे आचार विचार , त्यांची नावे देखील इंग्लीश असतात, वेषभुशा देखील ते पाश्चीमात्यां प्रमाणे करतात. इतकेच काय पण संगीत देखील पाश्चात्यच असते. त्यांची नावे देखील गमतीदार असतात जसे -first born, last born, Tractor, Engine.etc.

१९६२ पर्यंत ख्रिश्चन धर्मांतरणाची धामधुम ही अरुणाचलात नगण्य होती किंवा अजिबात नव्हती असे म्हटले तरी वावगे होणार नाही. मात्र ही अराष्ट्रीय व फुटिरतावादी तत्वे विभिन्न नावानी व वेगवेगळ्या स्वरुपात निरनिराळ्या माध्यमाद्वारे आसाम-अरुणाचल सिमे वर कार्यरत होती. पण हळुह्ळु व गुप्तपणे त्यांनी अरुणाचल प्रदेशात आपला कली प्रवेश करुन घेतला. या कामी.त्यांनी अरुणाचलचे विद्यार्थी जे आसाम व मेघालयातील मिशनरी शाळेत शिकत होते व तेथे ख्रिश्चन झाले द्या, त्यांची मदत घेतली. १९७० पर्यंत आसाम-मेघालय सीमेवरील राज्याच्या ८ टक्के लोकांना ख्रिश्चन करण्यात त्यांना यश आले होते. तरि अरुणाचल प्रदेशात त्यांना मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करण्यात यश आले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गैर - अरुणाचली लोकांना या राज्यात प्रवेशासाठी सरकारने घातलेले इनर लाईन परमीट चे प्रतिबंध. तरी देखिल अरुणाचलात चर्च चे स्थानीक लोकांमध्ये असलेले पगारी दलाल व भरपुर पैशाचे आमीष यामुळे अरुणाचल मध्ये धर्मांतरण हे वेगाने नसले तरी संथ गतीने सुरुच आहे.

छळवणुक व पिळवणुक व इतर धाक दपटशा या द्वारे चर्च चे धर्मांतरण हे अव्याहत सुरु आहे. एखाद्या कुटुंबात धर्मांतरीत न झालेले सदस्यांचे जमिनीचे वाद धर्मांतरीत झालेल्या सदस्यासोबत तिथे कायम असतात. त्यामुळे त्याचि परिणती कलहात होत असते, तसेच कुटुंबातील जेष्ट सदस्याचे निधन झाले असल्यास त्याचे दहन करायचे की ख्रिश्चन परंपरेने करायचे हा वाद देखील असतो अशे अनेक वाद व त्याचे संघर्षा त झालेल्या रुपांतराला antiChristian म्हणुन प्रसिध्दी माध्यमात भरपुर प्रसिध्दी दिली जाते. वास्तवीक हे वाद कौटुंबीक स्वरुपाचे असतात. पण त्याचा लाभ मात्र लगेच ख्रिश्चन चर्च उकळते.

The National Socialist Council of Nagaland (NSCN), या अतिरेकी संघटनेचे दोन गट आहेत. या दोन्ही गटाचे प्रमुख हे ख्रिश्चन आहेत. आणी या दोन्ही गटांना चीन मधील World Council of Churches,ही धर्मप्रसारक संस्था शस्त्रे व दारुगोळा पुरविते. NSCN चे कार्यालये न्युयॉर्क, जिनेवा व हेग येथे असुन या कार्यालयावरील बोर्ड वर Peoples Republic of Nagaland चे चिन्ह असते. या संघटनेने दोनदा संयुक्त राष्ट्र सभेत स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आहे. NSCN चे स्वतंत्र सरकार नागालैंड मध्ये कार्यरत आहे. आणी हे सरकार स्थानीक लोकांकडुन पैसे गोळा करते. सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनातुन एक तृतियांश हिसा वितरणाच्या अगोदर "नागालैंड टैक्स" म्हणुन वसुल केल्या जातो. या संघटनेने अमाप पैसा पिळुन काढल्यामुळे नागालैंड मधील बहुतेक बैंकानी आपल्या शाखा येथुन बंद केल्या.. या अनधिकृत सरकारच्या लेटर हेड व स्टैंप वर "Nagaland for Christ" असे लिहिलेले असते..याभागातील बहुतेक अतिरेकि संघटना या याच धर्तीवर कार्यरत असतात. इशान्य भारतातील चर्च देखील सिमावर्ती तस्करी व बनावट नोटाच्या व्यवसायाशि निगडीत असल्याबद्दल प्रसिध्द आहे. डिसेंबर १९९८ मध्ये बेडांग तामजेन नावाचा जेमीनाग धर्मप्रसारकास बनावट नोटा बनविण्यासंदर्भात अटक झाली होती.

त्रिपुरा येथील बाप्टिस्ट चर्च ची स्थापना ६० वर्षापुर्वी न्युझीलंड च्या धर्मप्रसारकानी केली होती. १९८० पर्यंत काही हजारच धर्मांतरण होउ शकले. तेंव्हा तेथील हिंदू व बौध्द धर्मीय जमातींचा सफया करण्यसाठी एक मोठ्या प्रमाणात वांशीक दंगा पधदतशीर पणे येथील चर्च ने अमलात आणला. हजारो स्त्रियांवर अतिरेक्यांकडुन बलात्कार करण्यात आला व तितक्याच स्त्रीया पळवण्यात येवुन त्यांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात बाटविण्यात आले. या अतिरेक्यांना आस्ट्रेलीया व न्यु़झीलैंड येथील अतिरेकी ख्रिश्चन गटांकडुन लष्करी मदत मिळाली. या अतिरेक्यांची अविरत देवाणघेवाण ही इस्लामीक अतिरेक्यांशी व आय. एस.आय.सोबत सुरु असते. त्यांच्याकडुन त्यांना बांगलादेश सीमेवरुन शस्त्र पुरवठा देखील होत असतो.

त्रिपुरा राज्याच्या एकुण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोक हे जनजातिचे आहेत व त्यातील १० टक्के हे १९९१ पर्यंत ख्रिश्चन झालेले होते. ह्या धर्मांतरीत झालेल्या जमाति हिंदु जनजातींना जबरदस्तीने ख्रिश्चन करण्यास प्रवृत्त करीत असतात. आणि या कामी ते National Liberation Front of Tripura (NLFT) ची मदत घेतात. एन.एल.एफ.टी हा एक ख्रिश्चन अतिरेकी गट असुन त्याचि स्थापना डिसेंबर १९८९ मध्ये झाली. या गटाच्या वरीष्ट पातळीवरील फळीतील ९० टक्के लोक हे ख्रिश्चन आहेत. NLFT चे संबंध हे पाकिस्तानच्या ईटर सर्विसेस इंटलीजन्सेस एजेन्सी (ISI ) external intelligence agency आणी तीची बांगलादेश मधील शाखा, Directorate General of Field Intelligence (DGFI) यांच्याशी आहेत.

१९९७-९८ मध्ये NLFT चे पुढारी ISI कडुन प्रशिक्षण व शस्त्रे मिळविण्यासाठी पाकिस्तानात गेल्याच्या बातम्या होत्या.. ISI ने NLFT च्या पुढार्‍यांच्या पासपोर्ट व विसा ची व्यवस्था केल्याचे बोलले जात होते. त्रिपुरा पोलीसाच्या हवाल्यानुसार NLFT चे संबंध हे नागालैंड स्थित National Socialist Council of Nagaland- Isak-Muivah (NSCN-IM), मणीपुर स्थीत Kanglei Yawol Kanna Lup (KYKL) आणी आसाम मध्ये कार्यरत असलेली National Democratic Front of Bodoland (NDFB) यांच्याशी होते. NLFT तिच्या स्थापनेपासुनच त्रिपुराचे ख्रिश्चन राष्ट्र स्थापण्यासाठी सशस्त्र संघर्ष करित होती. जबरदस्तीने धर्मांतरण करण्या पाठोपाठोपाठच तेथील पुजार्‍यांच्या हत्या, हिंदु उत्सवांवर जबरद्स्तीने बंदी, अपहरणे आणी हत्या याचे सत्र सुरु करणारी हीच संघटना होती.

सुरुवातिपासुनच बाप्टिस्ट चा वरदहस्त असल्यामुळे या संघटनेला आपला पाया मजबुत करण्यास मदत झाली तिच्या अतिरेकी कारवायांमुळे सरकारने १९९७ मध्ये तिच्यावर बंदी घातल्यावर संघटनेने आपल्या कारवाया बांगलादेश सीमेपलिकडुन सुरुच ठेवल्या. बाप्टिस्ट चर्च चे धर्मगुरु या अतिरेकी बंडखोरांना शस्त्रे व दारुगोळा पुरवितात. CRPF ने एप्रिल २००० मध्ये त्रिपुरा येथील नौपाडा बाप्टिस्ट चर्चचा सचिव नागमन्लाल हलम याला घुसखोरांना मदत करणे व मोठ्याप्रमाणात विस्फोटक सामग्री बाळगल्याबद्दर अटक केली होती. या विस्फोटकात ६० जिलेटीन स्टीक्स, ५ किलो पोटैशियम, २ किलो सल्फर आणि बॉम्ब बनविण्याची अन्य सामग्री सापडली होती. याच चर्च चे अन्य कनिष्ट सदस्यांना यापुर्वी अटक केल्यानंतर त्यांनी ही माहीती दिलि होती. हे विस्फोटक पुढे NLFT ला पुर्विण्यासाठी खरेदी करण्यात आल्याचे या सर्वांनि कबुल केले होते. जतना कोलाइ नावाच्या चर्च च्या एका अन्य अधिकार्‍याला अटक झाल्यावर त्याने आपण गोरिला प्रशिक्षण घेण्यासाठि NLFT base ( 8 ) या कैंप वर गेल्याचे कबुल केले होते.

वरिल सर्व बाबीवरुन हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते की बंदुकीच्या नोकावर ख्रिश्चन कन्वर्शन करणे हा बाप्टिस्ट चर्च चा एकमेव अजेंडा त्रिपुरामध्ये आहे. NLFT ने त्यांच्या अखत्यारित असलेल्या प्रदेशात हिंदुं जिवनपध्दतीचा संपुर्ण नाश व त्यांचे ख्रिश्चन धर्मांतरण हेच ध्येय ठेवले आहे.

गेल्या अनेक दशकांपासुन त्रिपुरातील स्थानिक जमातीच्या लोकांना त्यांच्या घरातुन ओढुन काढुन बळजबरीने त्यांचे धर्मांतरण घडवुन आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. जेंव्हा येथील जनजाती हिंदु उत्सवांमध्ये सहभाग घेतात तेव्हा अतिरेकी गट त्या समुहावर आक्रमण करुन त्यात सहभागि होणार्‍याची हत्या करवुन आणतात. त्रिपुरातील पहाडातिल जनजाती जमातिया हे मार्च मध्ये ते मानत असलेल्या त्यांच्या पारंपरिक देव गादिया याची पुजा करतात. गादिया हा भगवान शंकराचा ते अवतार मानतात. हि पुजा मार्च मधे केली जाते. अतिरेक्यांनी असे फरमान त्यावे ळी काढले की ही पुजा फक्त ख्रिस्मस लाच करावी.

ऑगस्ट २००० मध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री शातिकली महाराज यांची हत्या करण्यात आली. जमातीया जमातिचा धर्मगुरु लवकुमार जमातिया याची डिसेंबर २००० मध्ये हत्या करण्यात आली.२००१ मध्ये ८२६ अतिरेकी हल्ले करण्यात आले त्यात ४०५ लोकांची हत्या करण्यात आली व ४८१ लोकांचे अपहरण केले गेले. हे सर्व करण्यामागे असलेले कारण म्हणजे जमतिया जमात ही संघटित जमात असुन धर्मांतरणाला त्यांचा प्रखर विरोध आहे. बाप्टिस्ट चर्च त्यांचे धर्मांतरण करण्यात पुर्ण पणे अपयशि ठरली आहे.

ख्रिश्चनिटी म्हणजे प्रेम आणी अनुकंपा हा बुरखा इशान्य भारतात तरी फाटला असुन त्यांचे नग्न रुप तिथे पहावयास मिळते. सुदैवाने तेथील जनजातींना हे कळावयास लागले आहे की त्यांच्या धर्मातरणाने ते त्यांचे पारंपरिक अस्तित्वच गमावुन बसले आहेत. त्या आपल्या बांधवांना आपला सक्रिय आधार हवा आहे. आपण त्यासाठी त्यांना प्रतिसाद द्यायला हवा. त्यांच्या पाठीशी तिथे कार्यरत असलेल्या अनेक ज्ञ्यात अज्ञ्यात व्यक्तीना कोणत्याही प्रकारे आपला हातभार लागला तरी हे फाटलेले आभाळ शिवण्यास मदत होईल यात शंका नाही.

साभारःhttp://www.christianaggression.org/item_display.php?id=1141970933&type=a...

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

15 Apr 2011 - 6:05 pm | धमाल मुलगा

सरकार, प्रशासन, आणि आपण सगळेच ज्यांना ह्याची झळ बसली नाही ते डोळे मिटून 'सारं काही आलबेल' आहे ह्या भ्रमात वावरतोय.

आज मणीपुर सोडल्यास सर्व इशान्य भारतातील राज्यांची अधिकृत राजभाषा ही इंग्लीश आहे याची नोंद घेतली पाहिजे.

अत्यंत पध्दतशीरपणे पोखरण्याचं काम आहे हे.
एकदा मातृभाषेचीच नाळ तुटली की मग त्यातलं साहित्य, लोककथांचे सार, गाणी वगैरेपासून दुरावत जाणार. काही पिढ्यांनंतर अमुक एक भाषा बोलणारा/जाणणारा म्हणून संग्रहालयात ठेवायची वेळ!

मुळचे सण साजरे न करु देणं म्हणजे त्या सणांच्या अनुशंगानं येणार्‍या सांस्कृतिक गोष्टींपासून दुरावा निर्माण करणं. एकदा संस्कृतीच उरली नाही, की मग दुसरा पर्याय न राहून आपोआप आहे त्या गोष्टीलाच स्विकारुन जगणे हेच उरते.

एकेका ठिकाणची आख्खी संस्कृतीच्या संस्कृतीच नष्ट करण्याचं षड्यंत्र आहे हे कोणालाच दिसत कसं नाही?

आमचा एक नागा मित्र म्हणाला होता. "इंडिया मे आके इतने अच्छे दोस्त मिलेंगें ऐसा सोचा भी नही था|"
अरे? 'इंडिया में आ के' म्हणजे? इथपर्यंत नाळ तुटली आहे की ते आपल्याला एका देशातलेही मानत नाहीत?

ह्या सगळ्याला इशान्य भारताकडं झालेलं अक्षम्य दुर्लक्ष हेही तितकंच खरं आहे म्हणा. :(

सध्या सरकारी स्तरांवर काय परिस्थीती आहे? त्याबद्दल कोणी काही सांगू शकेल काय?

विश्वासराव,
वास्तवाची ही जाणिव करुन देण्याचा तुमचा हा उपक्रम स्तुत्य आहेच. पण तुम्ही स्वतः सेवानिवृत्तीनंतर '(असल्यास)पेन्शन खात, उगाच अकलेचे तारे तोडणार्‍यांसारखे जगण्यापेक्षा हे व्रत अंगिकारलंत त्याबद्दल फार आदर वाटतो.

विश्वास कल्याणकर's picture

16 Apr 2011 - 8:44 am | विश्वास कल्याणकर

आपण व्यक्त केलेल्या भावनांबद्दल आभार. या निमित्ताने जे नोकरित कळ्ले नाही ते माहीत होते, नविन लोक भेटतात व मनाला समाधान वाटते एवढेच.

स्वर भायदे's picture

15 Apr 2011 - 7:17 pm | स्वर भायदे

१) अत्यंत पध्दतशीरपणे पोखरण्याचं काम आहे हे. हो हेच वास्तव आहे. ख्रिस्ती मिशनरी आपल्या देशातील गरीबी आणि अज्ञान याचा फायदा घेऊन धर्म प्रसाराच कार्य अनेक वर्ष करीत आहेत.दुर्दैव म्हणजे आपल सरकारही अश्या संस्थासाठी पायघड्या घालत आहे.
मदर टेरेसा या देखील भारतात फक्त धर्म प्रसारासाठी आल्या होत्या. हे वाक्य अनेकांना खटकेलही परंतू अनेक वेळा त्यानी अशी कबुली दिल्या बद्दल वृत्तपत्रात वाचले आहे. कृपया त्याच्या अनुयायी मंडळीनी माझ्याकडे वृत्तपत्राच्या तारखा मागू नयेत. कारण असा पुरावा मी देऊ शकत नाही.
२) आपणही आपली मानसिकता बद्दलण्याची गरज आहे.
आपल्या मुंबईमध्ये वि.ही.प. व संघ यांनी नागालॅण्ड व मणिपूर मधील काही मुलांना शिक्षणा करीता आणले होते.या मागे उद्देश हा होता की त्या मुलांमध्ये देशाबद्दल आपले पणाची भावना निर्माण व्हावी. या मुलांना कॉलेज व ते ज्या ठिकाणी रहात होते त्या परीसरातील लोकांकडून चिनी संबोधले जायचे. अशा प्रकारामुळे ते या देशातले नाही ही भावना त्याच्या मनात तयार झाली असती तर त्यात त्यांचा काय दोष ?
३) या ख्रिस्ती मिशनरी तेथील आदिवासीच्या हातामध्ये बंदुका देवून वेगळ्या देशाची मागणी करत आहेत व यापूढे या मागणी साठी भयंकर रक्तपात करवतील. हे घडण्या आधी आपल्या सरकारचे डोळे उघडावेत. व या इशान्य भारतातील राज्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न व्हावे.
४) या देशामध्ये धर्मांतर बंदी कायदा करणे आवश्यक आहे.

विदारक सत्य वाचून हैराण.

अविनाशकुलकर्णी's picture

15 Apr 2011 - 10:58 pm | अविनाशकुलकर्णी

वाचले अस्वस्थ झालो..काय करावे?
महाराष्ट्रात पण लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे.

पक्का इडियट's picture

16 Apr 2011 - 12:06 pm | पक्का इडियट

खरोखर अतिशय गंभीर आहे परिस्थिती याची पून्हा एकदा खात्री पटली.

आपण आणि आपल्यासारखे अनेक जे काम करत आहेत त्याला खरेच तोड नाही.

परमेश्वर आपले हात अजून बळकट करो अशी प्रार्थना !!!

खालील दुवे देखील जरुर वाचावेत

१) दोन धर्मातील संघर्ष की कोंदा (?) विरुद्ध पाना जमातीमधील वैरभावना असेही म्हणले जाते की ह्या दोन जमाती ज्या गेल्या काही दशकात हिंदू किंवा ख्रिस्ती झाल्या आहेत, त्यांच्या आजच्या सामाजीक विषमतेच्या मुळ संघर्षाला धार्मीक रंग मिळाला आहे.

२) हिंदू संघटनांनी केलेला संघर्ष - जशास तसे??

३) यु ट्युब दुवा.
धर्मप्रसार करण्याच्या संशयाखाली काही ख्रिस्ती नन्सना महाराष्ट्रात मारले गेले.

जातीय दंगली, गटा गटात वैर म्हणजेच प्रामुख्याने सत्तासंघर्ष हे तुम्ही गेल्या १०० वर्षातले बघीतले तर (पूर्व आशीयाच्या टोकापासुन) अफगणीस्तान पासुन अगदी शांत देश, हिरवागार वनराईचा, हॅपीनेश कोशंटवाल्या गोंडस भूतानसकट थायलंडपर्यंत (आठवा ब्रिटीश इंडीयाचा नकाशा) अधून मधून सगळे भयानक नरसंहार व जातीय दंगलीप्रेमी लोक आहेत. व जणु काही इतर प्रश्न नाहीत व जात, पात, धर्म यावरच लक्ष केंद्रीत करुन दंगल करणे यातच आपले कर्तव्य मानतात. यात मी सर्व धर्मांना, जमातींना दोष देत आहे.

बाकी तुमच्याच आकडेवारीनुसार नागालँड, मिझोरम, मेघालय ख्रिस्तीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे व त्यालाही १९६१ म्हणजे ५० वर्षे झाली आहेत. तरी ते अजुनही भारतात कसे किंवा आता नेमका संघर्ष काय ह्याही प्रश्नावर आज उहापोह होउन जाउ दे! ब्रिटीश इंडीयाच्या नकाशातील प्रदेशातील ब्रिटीश गेल्यावर काही देश वेगवेगळे झाले. ज्या विभागात अन्य कुणी स्वतंत्र क्लेम केला नाही अथवा तत्कालीन भारतीय सरकारने मोडला काढला नाही ते आजच्या ओळखल्या जाणार्‍या रिपब्लीक ऑफ इंडीयात ऑपॉप सामील झाले. आता ज्याच्या त्याच्या जितक्या अस्मीता जागृत होत आहेत तसे तसे त्या त्या जमाती आपले संघर्ष त्यांना जमत आहे त्या त्या मार्गाने सशस्त्र, सनदशीर मार्गाने पुढे आणत आहे. व भारत सरकार त्यांना जसे जमेल तसे प्रत्येक ठिकाणी मुकाबला करत आहे.

आनंदयात्री's picture

17 Apr 2011 - 9:28 pm | आनंदयात्री

छान. सुंदर लेख आहे. आधीच्या लेखासारखाच माहितीपुर्ण आहे. आकडेवारी देउन तुमचे मुद्दे पृव केल्याबद्दल विषेश धन्यवाद.