दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-८)

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
13 Mar 2011 - 1:18 am

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी
(भाग-१)
(भाग-२)
(भाग-३)
(भाग-४)
(भाग- ५)
(भाग- ६)
(भाग-७)

या भागात २-५ चित्रपटांची कारकिर्द असलेल्या संगीतकारांना मागे ठेवुन यामधे सर्वात जास्त कारकिर्द असलेल्या संगीतकाराच्या कारकिर्दीचा आढावा घेउ.

अर्थशास्त्र आणि जर्नालिझम मधे M.A. असलेले व पाटण्यात करीत असलेली प्राध्यापकी सोडुन मुंबईला संगीताला वाहून घेण्यासाठी आलेल्या या कलंदराचे नाव होते "चित्रगुप्त". चित्रगुप्त श्रीवास्तव हे पुर्ण नाव.

काही काळ एस. एन. त्रीपाठी यांचे सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर १९४६साली स्वतंत्र काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटांना संगीत देताना शास्त्रीय संगीतापासुन पाश्चीमात्य संगीता पर्यन्त सगळ्यचा वापर केला. रोमँटीक युगलगीते ही खासीयत होती. तलत मेहमुदसारख्या गायकाकडुन आशाजींच्या बरोबर गायलेले "दो दिल धडक रहे है और आवाज एक है" असो वा मुकेश आणि लतादिदींनी गायलेले "देखो मौसम क्या बहार है" अथवा "तुमने हसी ही हसी में क्यू दिल चुराया जवाब दो" हे लतादिदीनी महेंद्र कपुर सोबत गायले गीत असो या युगलगितात रोमँटीसम दिसतो.

हिंदीत काम करीत असतानाच त्यांनी भोजपुरी सिनेमांनासुद्धा संगीत दिले. तीथे त्यांचा रूबाब राजासारखा होता. त्याच प्रमाणे काही पंजाबी आणि गुजराथी सिनेमांबरोबर A.V.M.ने तमीळमधे डब केलेल्या चित्रपटांनासुध्दा संगीत दिले.

चित्रपट- इन्साफ (१९५६)
दो दिल धड़क रहे हैं और आवाज़ एक है -२
तलत : नग़मे जुदा-जुदा हैं मगर साज़ एक है
(तलत मेहमुद व आशा भोसले)

चित्रपट- काली टोपी लाल रूमाल (१९५६)
लागी छूटे ना अब तो सनम
चाहे जाए जिया तेरी क़सम
लागी छूटे ना ..
(म.रफी व लता मंगेशकर)

दग़ा दग़ा वै वै वै
दग़ा दग़ा वै वै वै
हो गई तुमसे उल्फ़त हो गई
(लता मंगेशकर)

चित्रपट- भाभी (१९५७)

चल उड़ जा रे पंछी कि अब ये देश हुआ बेगाना
चल उड़ जा रे पंछी ...
(म.रफी)

चली-चली रे पतंग मेरी चली रे
चली बादलों के पार हो के डोर पे सवार
सारी दुनिया ये देख-देख जली रे
चली-चली रे पतंग ...
(म.रफी व लता मंगेशकर)

चित्रपट- गेस्ट हाउस (१९५९)
दिल को लाख सम्भाला जी फिर भी दिल मतवाला जी
कल तक मेरा था आज क्यों तेरा हो गया
(लता मंगेशकर)

चित्रपट- भारत (१९६०)

मुफ़्त हुए बदनाम, किसी पे हाय दिल को लगा के
जीना हुआ इल्जाम
किसी पे हाय दिल को लगा के
मुफ़्त हुए बदनाम
(मुकेश)

चित्रपट- चाँद मेरे आ जा (१९६०)
चाँद को देखो जी
मस्ती लुटाए जादू जगाए दिल में हमारे रे
चाँद ये कहता है
धरती की रानी, हँसती जवानी, दिन हैं तुम्हारे रे
(लता दिदींनी गायलेले अत्यंत सुमधुर गीत)

सजना सजना काहे भूल गए दिन प्यार के
सजना सजना मैं तो हार गई रे पुकारके
सजना हो ऽ ऽ
(लता दिदींनी गायलेले अत्यंत आर्त गीत)

चित्रपट- बडा आदमी (१९६१)
अखियन संग अखियाँ लागे आज
झूमे बार बार मेरे मन में प्यार
नित ऐस तो मौसम आये न
अखियन संग अखियाँ लागे आज
अखियन संग
(म. रफीसाहेबांनी यांनी गायलेले शास्त्रीय संगीतावर आधारीत असलेले अत्यंत सुमधुर गीत)

चित्रपट- ऑपेरा हाउस (१९६१)

बलमा माने ना
बैरी चुप न रहे
लागी मन की कहे
पा के अकेली मुझे
मोरी बहियाँ धरे
(लता मंगेशकर यांनी गायलेले शास्त्रीय संगीतावर आधारीत असलेले अत्यंत सुमधुर गीत)

देखो मौसम
क्या बहार है
सारा आलम
बेक़रार है
ऐसे में क्यूँ हम
दीवाने हो जाएं ना
(लता मंगेशकर व मुकेश यांचे पाश्चीमात्य संगीतावर आधारीत रोमँटीक गाणे)

चित्रपट- बेजुबान (१९६२)
दीवाने तुम दीवाने हम
किसे है ग़म क्या कहे ये ज़माना
वही है दिल वही हैं हम
मगर नज़र में नया है फ़साना
(लता मंगेशकर यांनी गायलेले अत्यंत सुमधुर गीत)

चित्रपट- मैं चूप रहूंगी(१९६२)
चाँद जाने कहाँ खो गया
तुमको चेहरे से पर्दा हटाना न था
चाँदनी को ये क्या हो गया
तुमको भी इस तरह मुस्कराना न था
(म.रफी व लतादिदींनी गायलेले सुंदर रोमँटीक गाणे)

कोई बता दे दिल है जहाँ
क्यों होता है दर्द वहाँ
तीर चला के ये तो न पूछो
दिल है कहाँ और दर्द कहाँ
(म.रफी व लतादिदींनी गायलेले सुंदर गाणे)

ख़ुश रहो अहल-ए-चमन हम तो चमन छोड़ चले
ख़ुश रहो अहल-ए-चमन
ख़ाक़ परदेस की छानेंगे वतन छोड़ चले
ख़ुश रहो अहल-ए-चमन ...
(म.रफी)

मेरे दिल कभी तो कोई आयेगा
हमदम जो तेरा बन जायेगा
(लतादिदीं)

चित्रपट- एक राझ (१९६३)
अगर सुन ले तो इक नगमा हुज़ूर-ए-यार लाया हूँ
वो कली चटकी कि दिल टूटा पर इक झंकार लाया हूँ
(किशोर कुमार)

पायल वाली देखना
यहीं पे कहीं दिल है
पग तले आये ना
((किशोर कुमार यांनी गायलेले शास्त्रीय संगीतावर आधारी एकमेव गाणे असावे)

उठेगी तुम्हारी नज़र धीरे धीरे
मुहब्बत करेगी असर धीरे धीरे
(लता मंगेशकर)

चित्रपट- गंगा की लेहरे (१९६४)

छेड़ो न मेरी ज़ुल्फ़ें सब लोग क्या कहेंगे
हमको दीवाना तुमको काली घटा कहेंगे
(किशोर कुमार व लतादिदींनी गायलेले सुंदर रोमँटीक गाणे)

मचलती हुई, हवा में छम छम
हमारे संग संग चलें गँगा की लहरें
(किशोर कुमार व लतादिदीं)

जय-जय हे जगदम्बे माता
द्वार तिहारे जो भी आता बिन माँगे सब-कुछ पा जाता
(लतादिदींनी गायलेले भक्तीरसपुर्ण गाणे)

चित्रपट- आकाशदिप (१९६५)
मुझे दर्द-ए-दिल का पता न था
मुझे आप किस लिये मिल गये?
मैं अकेले यूँ भी मज़े में था
मुझे आप किस लिये मिल गये?
(म.रफी)

दिल का दिया जला के गया,
ये कौन मेरी तन्हाई में
सोये नग़मे जाग उठे, होंठों की सेहनाई में
दिल का दिया ...
(लतादिदींनी गायलेले अत्यंत सुमधुर गीत)

चित्रपट- उंचे लोग (१९६५)
आजा रे मेरे प्यार के राही
राह निहारूँ बड़ी देर से, आजा ...
(महेन्द्र कपुर व लता मंगेशकर)

हाय रे तेरे चंचल नैनवा
कुछ बात करें रुक जाएँ
(लता मंगेशकर यांच्या आवाजातील अत्यंत सुमधुर गीत)

जाग दिल-ए-दीवाना रुत जागी वस्ल-ए-यार की
बसी हुई ज़ुल्फ़ में आयी है सबा प्यार की
(म.रफी)

चित्रपट- झबग (१९६७)

तेरी दुनिया से दूर, चले होके मजबूर, हमें याद रखना
जाओ कहीं भी सनम, तुम्हें इतनी क़सम, हमें याद रखना
(म.रफी व लता मंगेशकर)

चित्रपट- वासना (१९६८)

इतनी नाज़ुक ना बनो, हाय, इतनी नाज़ुक ना बनो
हदके अन्दर हो नज़ाकत तो अदा होती है
(म.रफी)
ये पर्बतों के दायरे ये शाम का धुआँ
ऐसे में क्यों न छेड़ दें दिलों की दास्ताँ
(म.रफी व लतादिदींचे नितांत सुंदर रोमँटीक गाणे)

चित्रगुप्त यांनी संगीतबध्द केलेल्या ४२ चित्रपटांची गाणी येथे ऐका/डाउनलोड करा)

(येथे सुद्धा ऐका/डाउनलोड करा)

कलासंगीतचित्रपटआस्वादसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

मस्त लेखमाला. अशीच सुरु राहू द्या.

होपफुली,,,, भाटकरबुवांबद्दल एक फुल्ल लेख लिहाल (नव्हे तशी विनंती करतो).

चिंतामणी's picture

13 Mar 2011 - 8:43 am | चिंतामणी

पुढच्या १-२ भागात भाटकरबुवांबद्दल सुध्दा लेख येणार आहे.

पैसा's picture

13 Mar 2011 - 10:34 am | पैसा

चित्रगुप्त यांची गाणी म्हणजे मूर्तिमंत माधुर्य!

बलमा माने ना
मुफ़्त हुए बदनाम,
लागी छूटे ना
छेड़ो न मेरी ज़ुल्फ़ें

एकेक गाणी आठवली तरी मन प्रसन्न होतं.

लिंक्सबद्दल धन्यवाद हे वेगळं सांगायला नकोच.

चित्रगुप्त यांची मुलं आनंद मिलिंद यानी त्यांचा वारसा पुढे चालवला.

सहज's picture

13 Mar 2011 - 11:43 am | सहज

संगीतकार चित्रगुप्त व लता मंगेशकर

लताजींनी ज्यांच्याकडे काम केले आहे अशा काही संगीतकारांबद्दल सांगीतलेल्या काही आठवणी येथे.

दुवा व चित्र - रेडीफ.कॉमवरुन

चित्रगुप्तांवरील लेख त्रोटक वाटला. लेखात अनेक सुंदर गीतांचा उल्लेख असला तरी अनेक चांगली गाणी निसटून गेली आहेत, ती इथे उल्लेखित आहे:

* देखो जी मेरी ओर [शिवभक्तः लता]

* जा रे जादुगर देखी तेरी जादुगरी [भाभी:लता]
*कारे कारे बादरा, जारे कारे बादरा [भाभी:लता]

* ना तो दर्द गया, ना दवा न मिली मैने ढूंढ के देखा जमाना [काली टोपी, लाल रूमालः लता]

* तेरा जादू न चलेगा ओ सपेरे [गेस्ट हाऊसः लता]

*मुस्कराओ, के जी नही लगता [कंगनः लता]

* जादू भारी ये चाँदनी [मॅडम एक्स्.वाय.झेडः लता]

* एक रात मे दो दो चाँद खिले [बरखा: लता, मुकेश]
* तडपाओंगे, तडपालो [बरखा, लता]

* रंग दिल की धडकन तो लाती तो होगी [पतंग:लता]
* तेरी शोख नजर का इशारा [पतंग:मुकेश, लता]
* ये दुनिया पतंग, नित बदलेगी रंग [पतंग:रफी]

* कान्हा जा रे [बूट पॉलिशः मन्ना डे, लता]

* मुफ्त हुवे बदनाम [बारातः मुकेश] (लेखात ह्या चित्रपटाचे नाव चुकून 'भारत' असे पडले आहे).
* आजा रे तेरा एक सहारा [बारात: लता]

* अगर दिल किसी से लगाया न होता [बडा आदमी: रफी]

* देखो मौसम क्या बहार है [ऑपेरा हाऊसः मुकेश, लता]
* बलमा माने ना [ऑपेरा हाऊसः लता]

* मेहलों ने छिन लिया, बचपन का प्यार मेरा [झबगः मुकेश, लता]

* आज की रात नया चाँद लेके आयी है [शादी: लता]

* बन के चकोरी, गोरी झूम झूम नाचो री [हम मतवले नौजवानः मुकेश]

* बिते नही रात सनम, करो कोई बात सनम [हम मतवाले नौजवानः मुकेश, गीता दत्त]

* मै कौन हूं, मै कहाँ हूं [मै चूप रहूंगी : रफी]
* तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो [मै चूप रहूंगी: लता]
* आये न बालम [मै चूप रहूंगी: लता, रफी व इतर]

* दिवाने तुम, दिवाने हम [बेझुबानः लता]

*अजनबी सी बन के करो ना इशारा [एक राजःकिशोर, लता]

* बैरी बिछुवा, बडा दुख दे हो राम [गंगा की लहरें: लता]
* देखो रे कोई कामिनिया [गंगा की लहरें: आशा]

* कही्ही से मौत को लाओ, तो गम की रात कटे [मेरा कसूर क्या है: रफी]
* साझिशे थी मेरे मिटाने की [मेर कसूर क्या है: लता]

*प्यासे हुवे नैन, सुलग गयी शाम [अफसाना:लता]

* आज इस दर्जा पिला दो [वासना: रफी]
* मै सदके जाऊं, मेरे सैंया, तुम सामने तो हो [वासना: लता]
* ये परबतों के दायरे [वासना:लता, रफी]

* कब तक हुझूर रुठे रहोगे [औलादः लता]

* लगी न छूटेगी प्यार मे जलिमा [परदेसी: लता]

नुसती गीतंची जंत्री द्यायची झाली तरी तिच्यात काही सूत्र असावे, जसे उदा. कालानुसार (chronological). वर मी गीतांचा नामोल्लेख ह्या तर्‍हेने केला आहे.

लेखाच्या निमीत्ताने लेखकाने ह्या अत्यंत गुणी संगीतकारच्या कारकीर्दीचा थोडातरी आढावा घ्यावयास पाहिजे होता. चित्रगुप्त दोन डिग्र्या बाळगून होते ह्याचे कौतुक का होते हे समजत नाही. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील बहारीस ज्यांचा हातभार लागला आहे त्या जवळजवळ सगळ्याच व्यक्ति कसल्याही डिग्र्या बाळगून नव्हत्या. पण त्यांच्यापाशी असलेली कला इतकी झगझगीत होती की त्याने आम्हास मोहवून टाकले, आमची जीवने खर्‍या अर्थाने संपन्न केली.

तसेच चित्रगुप्त काय किंवा अन्य कुणी कलाकार काय, हे 'संगीताची सेवा' वगैरे करण्यास आलेले नव्हते. तर हे काम आपल्याला आवडते, आपल्यात ह्या कामाची हुन्नर आहे, इथे आपण काही करू शकू हा आत्मविश्वास ते घेऊन ह्या मायानगरीत आले; ते आले हे असे करून आपापली पोटे भरण्यासाठी, ज्याप्रकारे आपण आपापल्या व्यवसायात आपापली पोटे भरण्यासाठी काम करतो तसेच हेही. असो.

चित्रगुप्तांनी एस. एन. त्रिपाठींकडे सहाय्यक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली, असे म्हटले जाते की संगीतात संपूर्ण भारतीय बाज असावा किंवा नाही, ह्यावरून त्यांच्यात काही मतभेद झाले. मग चित्रगुप्तांनी स्वतंत्र कारकीर्द सुरू केली. संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी दिलेल्या गाण्यांचा गाभा भारतीय शास्त्रीय संगीताचा असला तरी त्यावर त्यांनी पाश्चिमात्य संगीताचा बहारदार मुलामा चढवलेला आहे. पियानो त्यांच्या अनेक गाण्यांतून वाजत राहिला आहे, तसेच मेंडोलिन इंटरल्यूड्स व दोन वाक्यांच्या मधील तुकड्यांसाठी. व्हायोलिन्सच्या भरदार ऑर्केस्ट्राचे इंटरल्यूड पीसेस हेही त्यांच्या गीतांचे वैशिष्ट्य होते. गाण्याचे (मेलडीचे) ठेके मुख्यत्वे तबला-ढोलकवर असले तरी इंटरल्यूड्स गीटार- पियनो ह्यांच्या स्ट्रोक्सवर असायचे. छोटी बांसरीही त्यांनी प्रामुख्याने वाजवलीय. आणि क्झायलोफोनच्या स्ट्रोकसचा अगदी समर्पक वापर त्यांच्याइतका इतर कुणीही केल्याचे मला आठवत नाही.

'शिवभकत' ह्या त्यांच्या सुरूवातीच्या चित्रपटातील लताच्या 'देखो जी मेरी ओर' वर सी. रामचंद्रांची दाट छाया आहे, तो संपूर्ण बाज, त्यातील वाद्यांची रचना, अगदी ढोलक न वापरता ढोलकीचा वापर-- सगळे, सगळे सी. रामचंद्रांचे असावे असे! पण ह्यापुढे थेट शेवटपर्यंत त्यांची अगदी स्वतंत्र शैली आहे. नाचाची अनेक बहारदार गीते त्यांनी दिली आहेत, ती त्यांच्या भारतीय शास्त्रीय संगीताची जाण दर्शवतात.

शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर इत्यादींचा वावर असलेल्या इंडस्ट्रीत चित्रगुप्तांच्या वाट्यास बी किंवा सी. ग्रेड पिक्चर्स आले, पण त्यांच्या संगीतांवर त्यांनी स्वतःची मुद्रा झकास उठवलीय. ए. व्ही. एम सारख्या दक्षिणेकडील प्रोड्युसर्सचे चित्रपट त्यांच्याकडे (तसेच रविकडे !) जात. त्यांच्या ह्या दुय्यम स्थानामुळे एखाद्या विशीष्ट गीतकाराशी त्यांना टीमिंग करणे शक्य नव्हते. पण राजेंद्रकृष्ण हा गुणी गीतकार त्यांच्याप्रमाणेच दाक्षिणात्य प्रोड्युसर्सचा आवडता, त्यामुळे ह्या दोघांचे पेयरिंग अनेकदा झालेले आहे.

तत्कालिन सर्वच आघाडीच्या संगीतकारांप्रमाणे चित्रगुप्तांनीही स्वतःची टीम बांधली होती. डी. दिलीप (दिलीप ढोलकिया) हे त्यांचे प्रमुख अ‍ॅरेंजर होते. 'प्रायव्हेट सेक्रेटरी' मधील त्यांच्या सर्व गीतांवर चित्रगुप्तांची लोभस छाया आहे. (ह्या लेखमालिकेत त्यांच्यावरही काही यावे).

वेळेअभावी मी ही मालिका फक्त वाचतेय. आजच्या भागातली बरीचशी गाणी ओळखीची आहेत. आधीच्या भागांतलं एखादं-दुसरंच गाणं माहित असायचं. आज मात्र ओळखीची गाणी आणि तुमचं रसग्रहण यांमुळं मजा आली...

जाता जाता, तुम्ही लिहायचं मनावर घ्याच हो आता... :-)

बबलु's picture

14 Mar 2011 - 12:58 am | बबलु

प्रदिप साहेब, सुंदर प्रतिसाद.

>>> व्हायोलिन्सच्या भरदार ऑर्केस्ट्राचे इंटरल्यूड पीसेस हेही त्यांच्या गीतांचे वैशिष्ट्य होते.

अगदी. +१.

तुमचा अभ्यास फार उत्तम आहे. प्लीज एखादी लेखमाला येउद्या.

प्रीत-मोहर's picture

13 Mar 2011 - 8:29 pm | प्रीत-मोहर

मस्त!!!!!

संजय अभ्यंकर's picture

13 Mar 2011 - 10:56 pm | संजय अभ्यंकर

चिंतामणीजी व प्रदिपजींनी त्यांच्या बद्दल उत्तम लिहिले आहे.

त्यांचे एक गाणे..
जब से हम तुम बहारोंमें... http://www.youtube.com/watch?v=zV0RFk-ABWg

चिंतामणीजीं जवळ अनेक संगीतकारांच्या माहीतीचा खजीना आहे असे जाणवते.

हि लेखमाला अशीच चालत राहो व रसिकांना जुन्या दुर्मिळ गीतांचा आस्वाद घेता येवो हि इच्छा.