गाणी मणिरत्नमची

निमिष ध.'s picture
निमिष ध. in जनातलं, मनातलं
17 Feb 2011 - 10:38 am

नमस्कार! मिपा वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी इथल्या रथी-महारथींना नमस्कार करून सुरुवात करतो.

दिग्दर्शक मणीरत्नम सर्वाना एक सामाजिक आणि वेगळे विषय असणारे चित्रपट काढणारा म्हणून सुपरिचित आहेच. त्याच्या दहशदवादाच्या विषयावरील त्रिमूर्ती तर बहुतेकांनी पाहिली असेल ती म्हणजे रोजा, बॉम्बे (आता चित्रपटाचे नाव हेच होते) आणि दिल से . पण हाच दिग्दर्शक खूप अप्रतिम गाण्यांचे सादरीकरण आपल्या चित्रपटांमध्ये करतो. त्या गाण्यांची अजून एकदा आठवण करून देतो आणि जर कुठली गाणी माहिती नसतील तर अशा आहे की ती आवडतील (नाही आवडली तर सोडून द्या).

सुरवात करू त्याच्या जुन्या चित्रपटांपासून ज्यावेळेस तो हिंदी चित्रपटसृष्टीला माहिती नव्हता. चित्रपट आहे अग्नी नच्चतीरम (१९८८). रेल्वे फलाट आणि प्रत्यक्ष रेल्वेचा सुंदर वापर केलेला आहे या गाण्यामध्ये. अंधार आणि दिवे की जे काही भागच प्रकाशित करत आहेत ते एक वेगळाच अनुभव देऊन जातात. रात्रीची शेवटची लोकल गेली किवा तुम्ही कधी पहिल्या लोकल ची वाट पाहत बसलेले असता तेव्हा जसा दिसेल फलाट तसाच बरोबर चित्रित केलेला आहे. उगीच त्याला भडक करायचा प्रयत्न नाही.

पुढील चित्रपट बहुतेक अनेकांनी त्यांच्या बालपणी पहिला असेल. माझी तरी आठवण आहे. तो आहे अंजली (१९९०). या चित्रपटामध्ये त्यांनी इतक्या लहान मुलांकडून मोठे काम करून घेतले आहे. या एका गाण्यामाध्येच त्याची झलक आपल्याला दिसून येते. एका संकुलामध्ये राहणारी खोड्या करणारी मुले आणि ती काही नादान नाहीत - त्यांना सगळे माहिती आहे काय चालू आहे ते.

आता पर्यंत तो इलैराजा बरोबर काम करत होता. पण १९९२ मध्ये त्यांनी ठरवले एका नवीन संगीतकाराला संधी देऊ. आणि त्यांनी जगापुढे आणला ऑस्कर विजेता ए. आर. रहमान. चित्रपट होता रोजा. काश्मीर च्या बर्फाळ पर्वतांमध्ये नुकतेच लग्न झालेले जोडपे दहशदवादाला न घाबरता प्रेमात दंग आहेत याचे सुरेख चित्रीकरण ये हसीन वादीया या गाण्यात येते. तशी या चित्रपटातील सगळीच गाणी एका पेक्षा एक आहेत.

बॉम्बे (१९९५) त्याकाळी अत्यंत वादग्रस्त ठरलेला चित्रपट. मला आठवतंय चित्रपटगृहाबाहेर पोलिसांचा पहारा आणि रात्री गेलो म्हणून बरोबर घेतलेली विजेरी सुद्धा उघडून पाहिली होती. तर या चित्रपटामाधीलाही गाणी आठवणीत रहावीत अशी आहेत. केहेनही क्या ! मध्ये त्याला पहिल्यांदाच पाहून काळजीत पडलेली मनीषा की हा आपल्याला का आवडला तिला कळत नाहीये की काय करू आणि काय बोलू. पण चित्रीकरणासाठी उत्कृष्ट गाणे म्हणजे तुही रे. ती पावसाळी हवा - वादळाला सुरुवात होणार आहे अश्या वाटणाऱ्या समुद्रातल्या लाटा - मनीषाची तगमग आणि अरविंद स्वामी चे वाट पाहणे. अप्रतिम !

लोकांना फार न आवडलेला चित्रपट म्हणजे दिल से (१९९८). बहुतेक लोकांना तो झेपला नाही किवा शेवटी शहरूक आणि मनीषा दोघेही मारतात हे त्यांना आवडले नाही. त्यातील छैया छैया वर तर सगळेच जण नाचले पण धगधगत्या गावाच्या पार्श्वभूमीवर फुलणारे प्रेम दाखवणारे दिल से रे म्हणजे कळस. आता शहरूकनी त्याची स्टाइल मारली आहे असे म्हणून नका. पण पुन्हा एकदा दडपण धूडकावाणारी लहान मुले मणीरत्नमची समज दाखवून जातात. हा आता माझे आवडते गाणे मात्र जिया जले आहे. केरळची पार्श्वभूमी आणि हत्तींबरोबर नाच.

साथिया नावाचा चित्रपट बर्याच लोकांना आठवत असेल. तो बनवला होता मणीरत्नमच्या सहायकांनी. मणी नी तो आधीच २००० मध्ये दक्षिणेत अलाई पयुथे म्हणून बनवला होता. माधवन जो आता हिंदी मधेही खूप दिसतो, तो त्यावेळेस तिकडचा हीट तारा होता. तर साथिया साथिया गाणे बरेच प्रसिद्ध झाले होते आणि बर्याच नोकिया ची ती रिंग टोन (मराठी शब्द काय ?) होती. ते आपल्या रहमान नी पचाई निरमे म्हणून बनवले होते. रंगांचा वापर पहायचा तर तो इथे. हिरवा, लाल, पिवळा, निळा आणि पांढरा अप्रतिम रंगसंगती साधली आहे. त्याच्या निम्मी ही शाद अली ला साधता आली नाही. या गाण्यात २:५२ ला माझा आवडता कॅमेरा चा उपयोग आहे.

अजून एका गाण्याची ओळख करून देतो शेवटी. चित्रपट आहे युवा (२००४). यात तरुणाई चा जोश दाखवणारे धका लागे बुक्का हे मस्त गाणे आहे. पण आजकालच्या तरुणाई ची क्लब मध्ये जाऊन नाचण्याची आवड आणि व्यक्तिरेखांची ओळख दाखवणारे फन्ना.

सध्या तरी इतकेच. अता वाट पहायची नविन चित्रपटाची.

कलासंगीतचित्रपटमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

17 Feb 2011 - 11:09 am | स्वैर परी

वरील सगळी गाणी अतिशय आवडीची आहेत! :)

विजुभाऊ's picture

17 Feb 2011 - 11:21 am | विजुभाऊ

मणीरत्नमची गाणे चित्रीत करण्याची काही वेगळीच समज आहे. तो भावभावना फक्त शब्दात किंवा चित्रात दाखवून थांबत नाही. संगीतात देखील दाखवतो.
बॉम्बे चित्रपटात " हम्मा हम्मा "या गाण्यात एका ठीकाणी गाण्याच्या स्वरांचे स्केल चेंज करून जे सूचित केले आहे त्याला तोड नाही

निवेदिता-ताई's picture

17 Feb 2011 - 12:15 pm | निवेदिता-ताई

मस्तच.......

वपाडाव's picture

17 Feb 2011 - 12:38 pm | वपाडाव

दिल से चित्रपटाची विषेषता म्हणजे...
त्या चित्रपटातिल सगळी गाणी "सोलो" आहेत.
आणी "जिया जलें" हे गाणं सर्वात खास.
छैया छैया गाण्याची सुरुवात सुदधा कडक-
रिकाम्या ठेषणाच्या फलाटावर, हातात चहाचा कप आणी त्यात छतावरुन ओघळणारे पावसाचे थेंब.

त्याचा नवीन चित्रपट तर तुम्ही विसर्लात कि हो...
रावण- रान्झा रान्झा, थोक दे किल्लि, बेहने दे.
cinematography उत्तम.

छान धागा....

प्रशु's picture

17 Feb 2011 - 1:17 pm | प्रशु

सपने पाहिलात का? प्रत्येक द्रुश्य खुपच सुंदर आहे आणी चंदा रे चंदा तर खासच.

निमिष ध.'s picture

17 Feb 2011 - 11:01 pm | निमिष ध.

सपने हा राजीव मेनन नी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे त्यामुळे त्याचा उल्लेख या लेखात केला नाही.

मी_ओंकार's picture

17 Feb 2011 - 1:45 pm | मी_ओंकार

'पचाई निरमे' हे अत्यंत अप्रतिम गाणे. आणि त्याचे चित्रीकरणही अप्रतिम आहे. त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडे या गाण्याचा सबटायटलसहित व्हिडिओ होता त्यात शब्दांचे अर्थही समजल्याने गाणे फार भावले होते. 'हसती रहे' मध्ये शब्दांची आणि अर्थाची पूर्ण वाट लावली आहे.

- ओंकार.

छान आठवण करुन दिली ..
रोझा ने तर खरेच खुप धमाल उडवुन दिली होती..
गाण्यांचे चित्रीकरण म्हणजे काय हे तेथुन पुढेच जास्त उल्लेखनिय झाले आहे असे वाटते...

निमिष ध.'s picture

17 Feb 2011 - 11:03 pm | निमिष ध.

प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद. असेच प्रेम रहू द्या !

अन्या दातार's picture

17 Feb 2011 - 11:52 pm | अन्या दातार

'सपने' वरुन राजीव मेननचा विषय निघाल्यामुळे हा प्रतिसाद देत आहे. राजीव मेनन याने गेल्या वर्षी (२०१०) मध्ये एक चित्रपट तमीळ व तेलुगु या दोन्ही भाषांत केला. ये माया चेसावे (तेलुगु) आणि विन्नाईतंडी वारुवाया (तमीळ)
कथा-पटकथा अगदी साधी असूनही दिग्दर्शकाने अत्यंत कौशल्याने हाताळली आहे. त्यातीलच हे एक गाणे
हा चित्रपट मी दोन्ही भाषांमधून बघितला आहे. त्यावर एक स्वतंत्र लेख टाकेनच नंतर. तूर्तास रहावले नाही म्हणून इतकेच!

खडूस's picture

18 Feb 2011 - 10:47 am | खडूस

माझ्या माहितीप्रमाणे गौतम मेनन आहे.
चू.भू.दे.घे.

http://en.wikipedia.org/wiki/Ye_Maaya_Chesave
http://en.wikipedia.org/wiki/Vinnaithaandi_Varuvaayaa

- आहेच मी खडूस

अन्या दातार's picture

18 Feb 2011 - 10:51 am | अन्या दातार

धन्यवाद. चूक कबुल करतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Feb 2011 - 2:04 am | निनाद मुक्काम प...

दिलसे माझा आवडता सिनेमा
अभिनय व प्रत्येक गोष्टीत अप्रतिम व गाणी व त्यांचे सादरीकरण
लाजवाब
माझ्या मते हा सिनेमा ज्या कारणासाठी मनीषा दहशतवादी होते. ते आपल्या लोकांच्या पचनी पडले नाही .
हिरव्या भस्मासुर च्या नावाने मुठी आवळल्या जातत .त्या मानाने ईशान्य भारत व त्यांची परिस्थिती दाखवणारा हा सिनेमा खासच
माझे ह्या सिनेमात आवडते गाणे
'' ए अजनबी तुभी काही
दोन जीव एकाचवेळी दोन भिन्न मानसिक पातळीवर हे गाणे एकात असतात .
ध्येयासाठी प्रेरित मनीषा तिच्या मनातील प्रेयसीला साद घालत असते .ह्या गाण्याने तिचे भावविश्व व द्विधा मनस्थिती तिच्या चेहर्यातून साफ दिसून येते .(मणीच्या दिग्दर्शनाला .मनीषाच्या भाव मुद्रेला व गाण्याचे बोल व सादरीकरण ह्या सर्वाना सलाम
http://www.youtube.com/watch?v=clr-5FqjTLc

निमिष ध.'s picture

18 Feb 2011 - 8:18 pm | निमिष ध.

धन्यवाद
ए अजनबी खरोखर लाजवाब गाणे आहे. त्याचा वापर मात्र पूर्ण गाणे म्हणून न करता फ़क्त दृश्याच्या मागे त्यांचे भाव दाखवण्याकरता केला आहे. मूळ चित्रपटात ते असे तुकड्यांनी येते.

खडूस's picture

18 Feb 2011 - 10:45 am | खडूस

माझ्या माहितीप्रमाणे गौतम मेनन आहे.
चू.भू.दे.घे.

http://en.wikipedia.org/wiki/Ye_Maaya_Chesave
http://en.wikipedia.org/wiki/Vinnaithaandi_Varuvaayaa

तसे आपले फेवरीट बोम्बे मधील तूहीरे हेच आहे. अधून मधून रोजातलं रूक्मणी रूक्मणी, आन गूरू मधलं बरसो रे मेघा बी छान छान वाटतं,

खरतर लय लंबी लीस्ट हाय जसं की

कोइ यहा भानूमती - प्रींयांका
मोर पीया - यूवा
छैया छैया - दिल्से
सर्व गाणी - रावण
गोरी तूमने जबसे दील जीता - थीरूडा थीरूडा (चोर चोर)
होली आयी मस्ती छायी - दलपती

अरेरे कीती गाणी म्हणून आठवायची, तसबी ए.टी.एन. आपलं लय फेवरीट होतं कधी काळी...........

वपाडाव's picture

18 Feb 2011 - 3:13 pm | वपाडाव

ए.टी.एन. आपलं लय फेवरीट होतं

आपलं बी...

अवांतर : पण एक सांगु का?
ह्या सर्वांमधे एक गोश्ट कॉमन आहे
ती म्हंजे रहमान..
कदाचित त्यामुळे गाणी श्रवणीय आहेत.
जर ती श्रवणीय असतील तरचं बघायला चांगली वाटतात.

निमिष ध.'s picture

18 Feb 2011 - 8:23 pm | निमिष ध.

चंद्रलेखा माझेही आवडते गाणे आहे पण मला तरी ते फक्त ऐकायला आवडते. म्हणजे त्या गाण्यावरचा तो अनु अगरवालचा नाच काही फार आवडला नाही.

निवांत पोपट's picture

18 Feb 2011 - 3:13 pm | निवांत पोपट

दिल ही दिलमे ह्या चित्रपटामध्ये रेहमानने हे सुध्दा गाणे अप्रतिम दिले आहे.टॉम हॅंक्स आणिमेग रायन ह्यांच्या You've Got Mail
ह्या चित्रपटावर बेतलेला हा चित्रपट मात्र यथातथाच होता.

निमिष ध.'s picture

18 Feb 2011 - 8:26 pm | निमिष ध.

दिल ही दिल मे चा दिग्दर्शक मणी नव्हता - तो कथीर होता.

रहमान ची आवडती गाणी या विषयावर तर एक मोठी लेखमाला होईल. बर्याच चित्रपटांमध्ये तुम्ही म्हंटल्या प्रमाणे फक्त गाणीच श्रवणीय आहेत. बाकी चित्रपट यथातथाच असतात. बाकी हे जुन्या चित्रपटांपासून चालू आहे.

निवांत पोपट's picture

18 Feb 2011 - 8:31 pm | निवांत पोपट

होय. दिग्दर्शक मणीरत्नम नाहीच. माझा प्रतिसाद फक्त रेहमानच्या गाण्याबाबत होता.