सगळेच मद्य मुळात 'फॅट फ्री' असते. अगदी खरच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईन सारख्या काही ड्रिंक्स मधे नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी 'आहे काय न नाही काय' असे. मग तरी, सर्व सामान्य समाजाप्रमाणे जी व्यक्ती मद्य पान करतात ती जाड का असतात?
फर्स्ट थिंग्स फर्स्ट: जाडी हा खूप 'unexclusive' विषय आहे. अमुक अमुक माणसंच जाड असतात आणि बाकी नाही असे अजिबात नाही. व्हेजिटेरियन, नोन व्हेजिटेरियन, व्हेगन किंवा इंडियन, अमेरिकन, ओस्त्रेलीयन ई. कुणी पण जाड असू शकत किंवा जाड होऊ शकत. कारण जाडी हि ९५% कॅलोरी इन्टेक वर अवलंबून असते. उरलेले ५% हे होर्मोन्ल प्रोब्लेम किंवा जेनेटिक कारणा मुळे असू शकते.
तरी पण आपण खूपदा ऐकतो - 'बियर बंद करा म्हणजे जाडी कमी होयील', 'दारवा पिऊन पिऊन पोट किती सुटलंय बघा कि आधी' वगेरे. फक्त बियर मुळे पोट सुटतं का? नाही. फक्त मद्य पान करून माणूस जाड होतो का? अजिबात नाही. (उलट, लिव्हर कायम चे काम करणं बंद होऊन वजन कमीच होते :( ) मग होतं तरी काय ती बियर प्यायल्या वर?
कुठल्या हि मद्यात इथेनॉल असते जो एक अल्कोहोल (केमिकल नाव) चा प्रकार आहे. एरवी आपण काही पण खाल्लं कि आपल शरीर लगेच त्याचे पचन सुरु करते आणि अन्नातल्या ग्लुकोज/ carbohydrates (शर्करा) , फॅट (चरबी), प्रोटीन ला अब्सोर्ब करत आणि जर ह्या पैकी कुठला हि पदार्थ गरजे पेक्षा जास्त प्रमाणात असेल (खाल्लं असेल) तर त्याचे 'फॅट' किंवा चरबी मधे रुपांतर होवून त्याचे थर आपल्या शरीरावर जमा होत राहतात. माणसाचं वजन वाढणे हि पण एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. असे एका रात्रीत कोणी १० किलो वजन वाढवू शकत नाही. जेव्हा आपण महिनोन महिने अश्या प्रकारे गर्जे पेक्षा जास्त खात राहतो तेव्हा आपण जाड होतो.
तर मग, अल्कोहोल च्या बाबतीत काय घडतं? समजा तुम्ही बियर पिताय (फक्त समजा!!) आणि त्या बरोबर फ्रेंच फ्रायीस किंवा काजू खाताय (कुठला हि चकाणा ). अश्या वेळी, त्या चकाणा च्या कॅलोरी अब्सोर्ब व्हायच्या आधी अल्कोहोल च्या कॅलोरीस अब्सोर्ब होऊन वापरल्या जातात. म्हणजे, तुम्ही जो चकाणा खाल्लात त्या सगळ्या एक्स्ट्राकॅलोरीस होतात. आणि शिवाय, एका मायील्ड बियर पाईंट मधे साधारण १५० कॅलोरीस असतात. तुम्हीच सांगा फक्त एक पाईंट बियर कोण पितंय? जरी व्हिस्की, वोडका पीत असलात तरी त्यात मिक्स करता त्या जूस, कोला ई. मधे पण भरपूर कॅलोरी असतात. ड्रिंक्स घेताना कॅलोरीस चा हिशोब ठेवणं खूप अवघड होतं, आणि म्हणून 'अल्कोहोल कॅलोरीस' खूप जास्त प्रमाणात शरीरात वाढतात. तर एकूण तुमच्या प्येयाचा उष्मांक बराच वाढल्या मुळे तुमचे वजन वाढते.
पण मग त्या 'बियर बेली' चं काय? २५+ वर्षाच्या पुरुष किंवा स्त्री दोघांच्या शरीरात एक्सेस चरबी जमा होण्याचा ठिकाण म्हणजे 'abdomen' (पोट). स्त्रियांच्या शरीरात हिप्स वर पण पुष्कळ प्रमाणात चरबी जमा होण्याची tendency असते. जेव्हा अल्कोहोल मधून मिळणाऱ्या कॅलोरीस वाढतात तेव्हा त्या सर्व चरबी बनून जाडी वाढवतात. अजून एक महत्वाची बाब म्हणजे, चकाणा! चकाणा म्हणून आपण किती कॅलोरी रिच पदार्थ खातो. चीज, फ्रेंच फ्रायीस, काजू, खारे दाणे, चीझ्लिंग, चीज बॉल, फ्राईड चिकन, फिश, सॉसेज ... आज हि यादी पूर्ण करून होणार नाही, म्हणून इथेच थांबते. :) ह्या पदार्थांचा दुसरा प्रोब्लेम म्हणजे, ड्रिंक्स सारखंच आपण नेमकं किती (!!) खाल्लं ह्याचा अंदाज लावणं खूपच अवघड असत.
Moral of the story: अल्कोहोल नी वजन वाढतं पण त्याच्यात फॅट किंवा साखर असते म्हणून नाही तर त्याच्यातून मिळणाऱ्या अल्कोहोलिक कॅलोरीस खूप असतात आणि जोडीला असलेला चकाणा पण त्या आगीत तेल तुपाचं काम करत म्हणून.
प्रतिक्रिया
7 Jan 2011 - 11:02 am | परिकथेतील राजकुमार
ग्रेट. आम्ही कायम हेच सांगत आलो आहोत की खा कमी आणि प्या जास्ती ;)
असे लेख लिहिले तर कोण कशाला सदस्यत्व रद्द करेल ?
7 Jan 2011 - 11:37 am | आदिजोशी
आम्ही कायम हेच सांगत आलो आहोत की खा कमी आणि प्या जास्ती
सहमत आहे. उगाच खाऊन पोट भरलं की दारूसाठी कमी जागा उरते हा साधा हिशोब काही अज्ञानी लोकांना कळत नाही.
7 Jan 2011 - 12:00 pm | अवलिया
सहमत आहे.
7 Jan 2011 - 11:08 am | गवि
म्हणजे लो कॅलरी चकण्याच्या पाकृ येणार तर.. वा वा... :) हिक्...
7 Jan 2011 - 11:15 am | विजुभाऊ
आता ठरवलं बॉईल्ड एग , चीज,खारे पिस्ते , खारे काजू , रोस्टेड बदाम या ऐवजी चखण्यात फक्त टोमॅटो काकडीचे कापच खायचे. सोबत शेळीचे दूध प्यायचे.
7 Jan 2011 - 11:48 am | स्पा
बिअर प्यायला चालू करायला हरकत नाही ;)
7 Jan 2011 - 12:10 pm | गवि
गोल्डन ईगल म्हणून मोहन मीकिनचा ब्रँड आहे. क्वचितच कुठेकुठे मिळतो. पण अजून केला नसेल तर ट्राय करून बघ.
याद करोगे हमें...!
7 Jan 2011 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
गोल्डन ईगलचा उल्लेख बर्याचदा सु. शिं च्या कथात यायचा.
मात्र बिअर प्यायची तर एकतर झिंगारो नाहीतर लाल तुफान ;)
7 Jan 2011 - 12:30 pm | स्पा
झीन्गारोची खासियत काय आहे...??
मागे एकदा 'knock out ' ट्राय केलेली.. भलतीच स्त्रोंग आहे
7 Jan 2011 - 2:20 pm | उमराणी सरकार
बकवास बियर... हीच खासियत...
स्ट्राँग प्यायची तर हेवर्डस ५००० पिवुन बघा..
लाईट मध्ये रॉयल च्यालेंजर किंवा किंगफिशर चा पिचर उत्तम...
7 Jan 2011 - 5:43 pm | अप्पा जोगळेकर
स्पावड्या . बसूयात एकदा आणि पिउयात कैणण १००००. सगळ्यात ष्ट्राँग. चकणा वगरे खायचा नाही. नंतर डायरेक्ट जेवायचं मजबूत.
7 Jan 2011 - 12:53 pm | गवि
गोल्डन ईगल - खूप क्लासिक हिस्टरी असलेली बियर आहे ती.
मधे ती मिळेनाशीच झाली होती. उत्तर भागात मिळत असेल तर असेल.
पण आता रिव्हाईव्ह झालेली दिसते. मला एका चांगल्या हॉटेलात योगायोगाने मिळाली आणि बेहद्द फॅन झालो. पण मिळत नाही सगळीकडे अजूनही.
झालस्तर खजुराहो पूर्वी आवडती होती. अर्थात त्याचा "फटका" इफेक्टसाठी...
एल्.पी. ही परत आलेली दिसते.
7 Jan 2011 - 12:14 pm | स्पा
धन्यवाद.. गुगलून बघतो
7 Jan 2011 - 12:50 pm | गणपा
माहितीपुर्ण लेख... बराच उपयोग होईल याचा ;)
7 Jan 2011 - 1:23 pm | नगरीनिरंजन
'फॅट फ्री मद्य' होय... मी चुकून फक्त 'फ्री मद्य' एवढेच वाचले आणि घाईघाईने धागा उघडला. :-)
तरीही फक्त मद्याने जाडी वाढत नाही ही गुडन्यूज हाती लागली हे ही नसे थोडके.
7 Jan 2011 - 2:16 pm | उमराणी सरकार
मंडळींनो, मॅक्डोवेल्स नं.१ डाएट प्या, आणि निश्चिंत व्हा...
7 Jan 2011 - 2:29 pm | विलासराव
ही आमची नेहमीची आवडती बिअर.
7 Jan 2011 - 2:34 pm | गवि
ते तर आहेच..किंग इज किंग ऑल्वेज.. :)
हापूस हा हापूसच असतो ..आणि सगळ्यांनाच आवडतो.. पण तरी पायरी, लंगडा, दशहरा, रायवळ यांची मजा वेगळीच..
पापलेट हा पापलेटच असतो.. आणि सगळ्यांनाच आवडतो.. पण तरी बांगडे, हलवा, मांदेली यांची मजा वेगळीच...
7 Jan 2011 - 3:57 pm | नन्दादीप
>>>>ही आमची नेहमीची आवडती बिअर.
ईलासराव...मॅक्डोवेल्स नं.१ डाएट ही व्हिस्की हाय...(आमच्या दारू बद्दलच्या थोड्याश्या ज्ञानानुसार)
7 Jan 2011 - 8:14 pm | विलासराव
>>>>>>>ईलासराव...मॅक्डोवेल्स नं.१ डाएट ही व्हिस्की हाय...(आमच्या दारू बद्दलच्या थोड्याश्या ज्ञानानुसार)
अहो मी किंगफिशर बद्दल लिहिलय ते.
7 Jan 2011 - 2:53 pm | चिप्लुन्कर
आम्ही मात्र अल्कोहोल फ्री मद्याच्या प्रतीक्षेत
7 Jan 2011 - 4:00 pm | नन्दादीप
red bull, cloud 9....ईत्यादी, ईत्यादी..
पण "Why to drink and drive if u can smoke and fly..??" है ना...गुडन गरम जिंदाबाद
7 Jan 2011 - 4:02 pm | स्पा
ब्रीझेर घ्यायला हरकत नाही
7 Jan 2011 - 3:14 pm | सुहास..
अल्कोहोल नी वजन वाढतं पण त्याच्यात फॅट किंवा साखर असते म्हणून नाही तर त्याच्यातून मिळणाऱ्या अल्कोहोलिक कॅलोरीस खूप असतात आणि जोडीला असलेला चकाणा पण त्या आगीत तेल तुपाचं काम करत म्हणून. >>>
हे मला अॅप्लिकेबल होत नाही. बरीच वर्षे झाली ढोसतोय. चकण्यासकट
बाकी सगळेच यादी देत सुटलेत म्हटल आपण ही द्यावी.
आमची यादी !!
१) रम - ओल्ड मॉन्क
(तीन पेग , हिवाळा स्पेशल! याबद्दल विशेष सांगायची गरज नाही. )
२) व्हाईट रम - ओन्ली बकार्डी
(अडीज पेग, झणका !! )
३) व्हिस्की - बकार्डी रिजर्व्हा
(तीन पेग .आईशप्पथजड झालेल्या जिभेवर तरारुन चव येते, क्लांईट समोर भाव खात, सहसा मिळत नाही बारांमधुन, ओन्ली इन स्टार होटेल)
४) बियर - किंगफिशर, हेनकेन
(एक पिचर , फक्त ड्राफ्ट, पुण्यात एका ठिकाणी वुडन कास्क मधे मिळते. त्याच्या चवीच तर सोडुन द्या. पण जो बियरचा अॅम्बर कलर असतो ना तो तिथेच पहायला मिळेल. गरजुंनी व्यनी करावा. )
५) वाईन - अॅमझेक , आंग जु
(व्होल बॉटल,भातापासुन बनविलेली अनुक्रमे जपानी आणि चायनीज वाईन, दोराबजी मध्ये उपलब्ध !! )
६) वाईन (रोजे) - अॅन्टोनिलो , मरेम्मा
(व्होल बॉटल.इटालियन वाइन , तिथल सरकार वाइनच्या व्कालिटी-करिता काहीतरी प्राइझ देत . हा ब्रॅन्ड त्याचा विनर आहे. दोराबजी मध्ये उपलब्ध ! )
७) ब्रॅन्डी, कोनियाक - मॅक्डोवेल्स
(तीन पेग,भारतीय ब्रॅन्डमध्ये या ब्रण्डची ब्रॅन्डी सर्वात उत्तम, सर्दी झाली असेल रात्री तीन पेग घ्या. दुसर्या दिवशी नीट, नान्याला बोचणार्या थंडीसाठी आम्ही सल्ला देत आहोत. )
८) व्होडका - स्मिरनॉफ.
(तीन पेग.खास सावध लोकांसाठी,पेगमध्ये चिमटीभर मीठ टाकलत तर कुणाच्या बापाला वास जात नाही. सोबत अर्थातच लिंबु पिळावा आणि पांणी. दारुचा कडवटपणाचा तिटकारा असण्या लोंकासाठी स्पेश्शल .)
९) जीन - ही काय प्यायची गोष्ट आहे .
१० ) लिक्युर - बेनेटिक्टाईन (डिओ ऑप्टिमो मॅक्सीमो)
(तीन पेग, आमच्या देवाकरिता असा अर्थ होतो याचा, विकीत शोधा कळेल, कोनियाक आणि बेनेटिक्टाईन च बेमालुम मिश्रण असत. )
११ ) कॉलटेल - ब्ल्यु सी
(दोन ग्लास, व्होडका+ ब्ल्यु क्युरासव हे कॉकटेल बोलायची नाही. प्यायची गोष्ट आहे. )
१२ ) कधे - मधे , जिर्याची आणि मोहाची ही चालते.
सर्वात महत्त्वाची,सर्वात कमी वेळा पण सर्वात आवडती म्हणजे शॅम्पेन !!
(नो स्पेसिफिक ब्रॅन्ड , कुठलीही चालेल .)
डिसक्लेमर : पार्टी कट्टा असताना वर दिलेली मात्रा कमी - जास्त होण्याची शक्यता आमच्याकडुन नाकारता येत नाही.
धन्यवाद.
7 Jan 2011 - 3:46 pm | सहज
सुहास अरे, तहान लागली! :-)
डिसक्लेमर बेस्टच!
7 Jan 2011 - 6:08 pm | नंदन
काय अभ्यास, काय अभ्यास! ;)
>>> ४) बियर - किंगफिशर, हेनकेन
(एक पिचर , फक्त ड्राफ्ट, पुण्यात एका ठिकाणी वुडन कास्क मधे मिळते. त्याच्या चवीच तर सोडुन द्या. पण जो बियरचा अॅम्बर कलर असतो ना तो तिथेच पहायला मिळेल. गरजुंनी व्यनी करावा. )
--- दूलाली मध्ये का? अलीकडे लागरबरोबर एलचीही लोकप्रियता वाढते आहे, असं ऐकलं.
7 Jan 2011 - 6:12 pm | सुहास..
दूलाली मध्ये का? अलीकडे लागरबरोबर एलचीही लोकप्रियता वाढते आहे, असं ऐकलं. >>>
एकदम बरोबर !! काय खतरा टेस्ट .
आता खरे अभ्यासु कोण हा प्रश्न पडला आहे.
7 Jan 2011 - 6:26 pm | मेघवेडा
>> काय अभ्यास, काय अभ्यास!
असेच म्हणतो! दंडवत रे सुहाश्या! __/\__
बाकी आपल्याला चखणा/चकणा/चकाणा/फलाणा/ढेकणा आवडत नाय. फक्त स्थायूजल नि स्वर्णजल.. काम फिट!
7 Jan 2011 - 6:30 pm | सुनील
३) व्हिस्की - बकार्डी रिजर्व्हा
बकार्डी रिजर्वा ही व्हिस्की? थोडं गल्ली चुकलं काय?
बाकी लिष्ट बेष्टच आहे!
7 Jan 2011 - 4:43 pm | सुहास..
सुहास अरे, तहान लागली! >>>
धन्स !
आपले वजन वाढल्याचे (शारीरिक बरे का ! आपल्या आंतरजालीय मोजणीयंत्राचा काटा तुटेल इतपत वाढलेल्या वजनाची चर्चा या धाग्यात नको.) कट्ट्याच्या वेळी वाटत होते म्हणुन तहान लागल्यावर पाणी प्यावे अशी सुचना करतो आहे. ;)