अंगळ मंगळ टंगळ चंगळ
शनीवारात येता चम्बळ
फुफाट्यातला फाटका फटाका
मोजून सटका.
चालुनी चालुनी ;चप्पल दमली
घालु जाता अंगठा तुटका
येता ध्वनी फीमेल कानी.
क्यूमेल होऊनी काया फुलते.
हलते डूलते निर्लज्ज लाजते
अंगळ मंगळ टंगळ चंगळ
चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ
नव्या वर्षाची हीच जिंगळ
घेऊनी सज्ज मद्यमंडळ
खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
दादोजींचा दुर्दम्य दंगा ,
औरंगनगरी थेट पंगा
अशोकाची निष्पर्ण छाया
बारामतीत जाई वाया
विलासातले सुशील सारे
नारायणाच्या शीडात वारे.
दंगा घाला पिंगा घाला
हातात हात ..हळू चाला
नव्या वर्षाची हीच जिंगळ
घेऊनी सज्ज मद्यमंडळ
खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
जाल गाते गीत गोडीचे
संवाद लिहूनी तोडाफोडीचे.
साद घालुनी प्रतिसाद घेती
अम्मळ ढम्मळ पेये पिती
स्नीग्धतेची चर्चा करती
उणी दुणी अन कॅलरी काढती
नव्या वर्षाची हीच जिंगळ
घेऊनी सज्ज मद्यमंडळ
खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ
प्रतिक्रिया
7 Jan 2011 - 1:22 pm | प्रकाश१११
विजुभाऊ छान प्रयत्न . लगे रहो...
7 Jan 2011 - 1:23 pm | अवलिया
जमेल जमेल... येत्या वर्षभरात प्रयत्न केला तर पुढच्या वर्षीसाठी सफाईदार काव्य होईल
7 Jan 2011 - 1:39 pm | गणेशा
छान ..लिहिले आहे
आवडले
7 Jan 2011 - 1:46 pm | परिकथेतील राजकुमार
अल्फामेल विजुभौंची कविता झकास आहे.
11 Jan 2011 - 7:01 pm | गंगाधर मुटे
छान लिहिली.