प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
6 Jan 2011 - 5:58 pm

कोपित झेयुस शापित राजा
यकृत तुकडे गिधाड खाजा
पुराणवांगी ग्रीक नवाजा
अडम तडम तडतड बाजा

पितळ्यांच्या गायीला फ़्रेंच कल्हई
जैताच्या गावात ऊर्जेची उईउई
रशियन पतंगाला 'हिरवा' मांज्जा
अडम तडम तडतड बाजा

ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा
एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा
एआरडॅनी जयहो राजा
अडम तडम तडतड बाजा

गोरस पायथा मितीय शक्कल
घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल
डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा
अडम तडम तडतड बाजा

भ्रमणधनीवर आजा आजा
"देव कोण" ते कंपित फ़ज्जा
आस्तिक नास्तिक झगडा लज्जा
अडमतडम तडतड बाजा

प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी
जोहर यळकोट वृद्धी वृद्धी
शब्द बापुडे करती मज्जा
अडम तडम तडतड बाजा

शरदिनी अभ्यंकर, ६ जानेवारी ,पुणे

शृंगारभयानकहास्यबिभत्समांडणीसंस्कृती

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

6 Jan 2011 - 6:00 pm | श्रावण मोडक

कोलमडून पडलो. ऑन डिमांड अशी रचना म्हणजे धन्यच. तुमच्या क्षमतेपुढे दंडवत.

गणपा's picture

6 Jan 2011 - 6:41 pm | गणपा

>=O०=>
शीर साष्टांग दंडवत

बेसनलाडू's picture

7 Jan 2011 - 3:41 am | बेसनलाडू

(नतमस्तक)बेसनलाडू

नगरीनिरंजन's picture

7 Jan 2011 - 6:50 am | नगरीनिरंजन

+१
शब्दांची टांकसाळ आहे की काय तुमच्याकडे?

केशवसुमार's picture

6 Jan 2011 - 6:04 pm | केशवसुमार

एऽऽऽ धत्तड तत्तड!!!
(डब्बा एस्प्रेस)केशवसुमार

पुष्करिणी's picture

6 Jan 2011 - 6:09 pm | पुष्करिणी

शरिदिनीतैंपुढे नतमस्तक

प्रकाश१११'s picture

6 Jan 2011 - 6:10 pm | प्रकाश१११

कोपित झेयुस शापित राजा
यकृत तुकडे गिधाड खाजा
पुराणवांगी ग्रीक नवाजा
अडम तडम तडतड बाजा

एकदम छान नि डौलदार फटका
उत्तम बहारदार ब्याटिंग .एकदम फोर्मात .
मी जे लिहीन ते ब्रम्हवाक्य .असा बेछूट अहंकार . खबरदार कोणी काही म्हणाल तर. ??
एक तुतारी द्या मज आणुनी .फुंकून टाकीन सगळी गगने[?] दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
वा ..वा .मस्त

विजुभाऊ's picture

6 Jan 2011 - 6:16 pm | विजुभाऊ

इतके छान शब्द कसे सापडतात.
कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग.
विदग्धतेकडून दग्धतेकडे नेणारे तुमची कविता आता विरक्ततेकडुन ३१ अंशातून आरक्ततेकडे झुकू लागलीय.
प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते. हे तुमच्या कवितेच्या शब्दाशब्दातुन जाणवते.
दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते.
तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता.. हेच खरे तर तुमच्या कवितेचे यथार्थ वादातीत वचक प्रस्थापीत करणारे व्यक्तीमत्व

कित्ती दिवस ल्ह्यायचे म्हणत होतो...अगदी माझ्या मनातले शब्द ल्हिलेस ग.
प्रतिभेला पाझर फुटला की कार्पोरेशनच्या नळातून सुद्धा अमॄत वाहू लागते.
दूधभट्टीवर पाणीदार दूध मिळेल म्हणून जावे अन अमृताचा पेला ओठी लागावा तशी काहीशी अर्धस्वप्नवत अवस्था होऊन मन उन्मनी होते.
तुमच्या व्यग्रतेतून काकतालीय अथवा वदतोव्याघात न्यायाने कवीता प्रसवली जाते. वेदना विसारून वाचकाना विरहात विहारायाला लावणारी व्यवच्छेदक कविता..

बाब्बो ! :D ह्सनू हसून लोटपोट !! =))
शरदिनी ताई, तुम्ही म-हा-न आहात !! दंडवत _/\_

योगी९००'s picture

9 Jan 2011 - 11:45 am | योगी९००

कवितातर सुरेखच आणि हा प्रतिसाद तर उत्तमच..

या कवितेमुळे माझ्या आत्माला अनुभुती आणि मनोज्ञ मानसिकतेला महदोत्कट प्रचिती मिळाली..

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jan 2011 - 6:19 pm | परिकथेतील राजकुमार

अडम तडम तडतड बाजा तडतड बाजा...

भडकमकर मास्तर's picture

6 Jan 2011 - 6:38 pm | भडकमकर मास्तर

मनापासून लिहितोय, माफ करा...
ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा
एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा

गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे?
तुमच्या कविता एकूणच काव्य, कविता आणि रचनाकार कवि / कवयित्री यांचा अपमान करणार्‍या असतात, असे तुम्हाला वाटत नाही का? उर्मट वास जात नाही तुमच्या कवितांचा....

मुक्तसुनीत's picture

6 Jan 2011 - 6:42 pm | मुक्तसुनीत

गालिबला बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे?
मी म्हणतो , आमच्या पपू शर्दिनीताईना बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे ?

श्रावण मोडक's picture

6 Jan 2011 - 7:22 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा... हे आले शरदिनीला बोल लावायला. कुठं फेडाल ही पापं? ;)

केशवसुमार's picture

6 Jan 2011 - 7:50 pm | केशवसुमार

चिंचवडगावच्या गोलंदाजाकडून इतक्या सरपटी चेंडीची आपेक्ष्या नव्हती..
(मणापासूण)केशवसुमार

वा वा वा मास्तर!!! कोण कुठला गालिब, आणि कुठे आमच्या शरदिनी बाई..
उगाच का त्रास देताय! शांत बसा की जरा.

नंदन's picture

6 Jan 2011 - 6:47 pm | नंदन

भ्रमणधनीवर आजा आजा
"देव कोण" ते कंपित फ़ज्जा
आस्तिक नास्तिक झगडा लज्जा
अडमतडम तडतड बाजा

--- खी: खी: खी: :), हे आणि फ्रेंच ऊई ऊई भन्नाटच!

प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी
जोहर यळकोट वृद्धी वृद्धी
शब्द बापुडे करती मज्जा
अडम तडम तडतड बाजा

_/\_ शरदिनीतै! यातली 'शब्द बापुडे करती मज्जा' ही ओळ मला आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं :).

नंदोबा धर कान.
देशील....... देशील परत चॅलेंज शरदिनी तैंना ?
;)

अवलिया's picture

6 Jan 2011 - 6:50 pm | अवलिया

हा हा हा

शरदिनीताईंची कविता म्हणजे जीएंच्या कथांच्या काव्यरूप अर्काचा एकच पण
वाचल्यानंतर >>> अडम तडम तडतड<<<<< करायला लावणारा प्याला !

जय हो बाबा जालींदरनाथ !!!

अविनाशकुलकर्णी's picture

6 Jan 2011 - 7:03 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त

अडगळ's picture

6 Jan 2011 - 7:10 pm | अडगळ

एक एक कडवं म्हणजे पुंडलीकाची वीट आहे . प्रत्येकी वर युगे अठ्ठावीस उभं राहायला पाहिजे.तर कुठं अर्थ कळेल.

ठ्ठोब्बा रखुमाई.

गणेशा's picture

6 Jan 2011 - 7:19 pm | गणेशा

आपल्या कविता १-२ कडव्यांपलीकडे (ते ही बराच वेळ विचार करुन ) मला कळत नाहित .. माझी तेव्हडी पोच नाहिये
तरीही वाचाव्यासा का वाटतात ते ही कळत नाही..

शेवट पर्यंत वाचुन छान वआटले जास्त कळले नसले तरी बरेच काही वाचल्याचा भास झाला

लिहित रहा .. वाचत आहे.

वेताळ's picture

6 Jan 2011 - 7:26 pm | वेताळ

खुप दिवसानी आमची आठवण आली तुला. मस्त कविता लिहली आहेस. आत फक्त एक सांग तु जैतापुर अणुप्रकल्पाच्या बाजुने आहेस कि विरुध्द? म्हणजे कवितेला अर्थ लावायला जरा सोप्पे जाईल.

शरदिनीतै,
कवितेला नाद आहे, आणि मस्तवाल शब्दांमुळे गती आहे ! अप्रतिम!

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jan 2011 - 7:39 am | बिपिन कार्यकर्ते

छानच गं शरदिनी...

परवाचा प्लॅन नक्की ना?

श्रावण मोडक's picture

7 Jan 2011 - 11:51 am | श्रावण मोडक

हाहाहाहा... किती दिवसांपासूनचा प्लॅन आहे बिका तुमचा! कालच शरदिनीच्या खरडवहीत एक चक्कर टाकून आलो. तुमच्या खवत शरदिनीच्या उत्तरांची पानं खूप मागं गेली आहेत, त्यामुळं शोधत बसलो नाही. पण हा प्लॅन तेव्हापासूनचा दिसतोय. ;)

केशवसुमार's picture

7 Jan 2011 - 12:32 pm | केशवसुमार

काय शरू.. कशी आहेस.. अशा प्रतिसादांची आठवण झाली..
(स्मरणशील)केशवसुमार

श्रावण मोडक's picture

7 Jan 2011 - 12:59 pm | श्रावण मोडक

अभ्यंकर. शरदिनी अभ्यंकर. म्हणजेच, शरू अभ्यंकर. ;)
शरदिनीने अभ्यंकर कुलवृत्तांत एकदमच जाहीर केला राव. ही बातमी व्हायला हवी होती.
आमंत्रण नाही तर नाही, निदान अभिनंदनाचा धागा तरी हवा होता. खरडवहीत शरदिनीचा फटू वगैरे पाहायला मिळाला असता कदाचित.

वाहीदा's picture

7 Jan 2011 - 7:56 pm | वाहीदा

परवाचा प्लॅन नक्की ना?
स्वप्न पडतात का बिप्स तुला हल्ली शरु/ शरदिनी ची ??

मला हे वाचून मोहसिन नक्वी ने लिहिलेली अन गुलाम अली ने गायलेली 'आवारगी' गज़ल आठविली

कल शब मुझे बेशक्लसी आवाज ने चॉका दिया
मैंने कहा तू कौन है? उसने कहां आवारगी !! ;-)
यह दिल, यह पागल दिल मेरा, क्यूं लुट गया ... आवारगी !!
(शब : रात्र ,
बेशक्ल : abstract, without face
आवारगी : Vagrancy, an unsettled condition )

इन्द्र्राज पवार's picture

7 Jan 2011 - 8:27 am | इन्द्र्राज पवार

प्रथमच शरदिनीताईंच्या कवितेवर प्रतिसाद देत आहे....(यापूर्वीही त्यांच्या भन्नाट कवितांचा, तसेच त्यावर आलेल्या त्यांच्या रसिकांच्या प्रतिसादांचा, इथे आस्वाद घेतला आहेच, त्यामुळे त्यांच्या प्रतिभेविषयी अनभिज्ञ नाही)

प्रॉमिथ्यूसने आग चोरणे, झिअसने शाप देणे त्यामुळे गिधाडा [आम्हाला 'गरूडाने' असे सांगितले गेले होते] ने रोज त्याचे यकृत खाणे ही साखळी आजच्या काळातही जशीच्यातशी लागू आहे....त्यामुळे तुम्हीदेखील त्याच उद्देशाने त्या तिघांचे प्रतीक कवितेत वापरले असावे.

"पॅण्डोरा बॉक्स" आहे तुमच्या प्रतिभेत. [आता येथे उपलब्ध असलेल्या तुमच्या जुन्या कविताही वाचल्याच पाहिजे, पुन्हा एकदा]

इन्द्रा

भडकमकर मास्तर's picture

7 Jan 2011 - 1:28 pm | भडकमकर मास्तर

या ओवररेटेड कवयित्रीच्या चुका कोणीतरी दाखवतंय ते एक बरंय
ग्रीक पुराणाबद्दल कोणीतरी बोलले बरं झालं...

गिधाड झाले गरुडाचे
नशीब यकृताचे स्वादुपिंड नाही केले

ऋषिकेश's picture

7 Jan 2011 - 8:51 am | ऋषिकेश

हा हा हा.. शरदीनी 'तै' धमाल कविता!!!!
श्रा मो म्हणतात तसा कोलमडून पडलो :) मानलं तुम्हाला!!

बिली जोएलच्या "वी डिडन्ट स्टार्ट द फायर" ची आठवण झाली.. :)

Harry Truman, Doris Day, Red China, Johnnie Ray
South Pacific, Walter Winchell, Joe DiMaggio

Joe McCarthy, Richard Nixon, Studebaker, television
North Korea, South Korea, Marilyn Monroe

Rosenbergs, H-bomb, Sugar Ray, Panmunjom
Brando, "The King and I" and "The Catcher in the Rye"

Eisenhower, vaccine, England's got a new queen
Marciano, Liberace, Santayana goodbye

आणि त्यातच पुढे..

Birth control, Ho Chi Minh, Richard Nixon back again
Moonshot, Woodstock, Watergate, punk rock
Begin, Reagan, Palestine, terror on the airline
Ayatollah's in Iran, Russians in Afghanistan

"Wheel of Fortune", Sally Ride, heavy metal, suicide
Foreign debts, homeless vets, AIDS, crack, Bernie Goetz
Hypodermics on the shores, China's under martial law
Rock and roller cola wars, I can't take it anymore

अमोल केळकर's picture

7 Jan 2011 - 12:06 pm | अमोल केळकर

मस्तच मजा आली वाचून

अमोल केळकर

विनायक प्रभू's picture

7 Jan 2011 - 6:12 pm | विनायक प्रभू

शरु तै ना मास्तर का म्हणतात ते आज कळाले.

पूर्वी शरदिनी यांच्या कवितेतली लयबद्धता मला सहज कळून येत असे.

आताशाच्या कवितांमध्ये शब्दांवरील आघातांची काटेकोर कळून येत नाही. माझी मराठी बोलीभाषा घेतली, तर त्यातली आघातांची लय शरदिनी यांच्या बोलण्यातल्या लयीपेक्षा वेगळी असावी असे वाटते.

त्यामुळे कविता वाचण्यात पूर्वी जो काय आस्वाद मिळत असे, तोही मिळत नाही.

आहात कूठे ?

विनायक बेलापुरे's picture

9 Jan 2011 - 7:23 am | विनायक बेलापुरे

गोरस पायथा मितीय शक्कल
घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल
डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा
अडम तडम तडतड बाजा

एकूणच छान !

गंगाधर मुटे's picture

11 Jan 2011 - 7:10 pm | गंगाधर मुटे

अडम तडम तडतड बाजा

कसलेच संदर्भ माहीत नसल्याने कविता समजली नाही.

पण बाज आणि लय एवढी आवडली की कविता कळल्यासारखी वाटली. :)

वाहीदा's picture

11 Jan 2011 - 8:22 pm | वाहीदा

पण बाज आणि लय एवढी आवडली की कविता कळल्यासारखी वाटली
आम्हाला ही नेहमी हेच वाटते कविता कळली ... कळली असे म्हणेपर्यंत शेवटी काहीच कळत नाही
तिच तर मज्जा आहे शरदिनीताईंच्या कवितेची ;-)
आपण सगळे बसतो अकलेचे तारे तोडत , पण त्या कुठे कुठल्या ही कवितेचं रसग्रहण करतात?

घाटावरचे भट's picture

11 Jan 2011 - 10:59 pm | घाटावरचे भट

छान... संदर्भ कळले नाहीत पण तरीही छान!!