या आधीचे कथा भाग: १, २, ३ आणि ४
ती हसली, "हो, उजेड 'मी बघेन' म्हणणार्याचा, साधा कुकर धड लावता येत नाही तुला, एक तर पाणी जास्त नाही तर डाळ जळते!"
"ठीक आहे, ठीक आहे, तू ये तर, मग बघू!"
*******
पद्माचं भारतातलं वास्तव्य निम्म्यावर आल्यावर एकदा डॉ. गानूंनी संजयला फोन करायला सांगितलं. त्याने ठरल्या वेळी फोन केला.
"नमस्कार, डॉक्टर."
"नमस्कार, मी तुम्हाला पद्मा चं tentative diagnosis सांगण्यासाठी फोन करायला सांगितलं..तिलाही आजच संध्याकाळी सांगणार आहे."
संजयच्या पोटात गोळा आला..
"I would not worry too much about it, लोकांना याहून किती तरी अधिक दु:खदायक डायग्नोसिस सांगायची वेळ येते माझ्यावर, yours is among the easier news!" त्या आश्वस्त स्वरात म्हणाल्या, "पद्मा ला व्याधी आहे ती chronic fatigue syndrome म्हणजे CFS ची. मी मुद्दाम व्याधी हा शब्द वापरतेय, कारण हा रोग नाही. अवघड आहे, बरं होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल पण कॅन्सरइतका दुर्धर, fatal नाही."
'CFS? कुठे बरं ऐकला होता हा शब्द आधी?' संजयचं विचारचक्र जोरात चालू होतं...आधी काही केल्या त्याला आठवेना. मग अचानक संजयला जिम आठवला, आणि CFS कुठे ऐकलं तेही आठवलं.
******************
नॅनोअॅरे विषयीच्या चर्चासत्रांच आयोजन त्याने केलं तेंव्हाच्या एका चर्चासत्रात त्याची जिम शी भेट झाली होती.
जिम लक्षात राहण्याचं कारण म्हणजे त्याची झालेली पहिली भेट. डॉ. जेम्स अर्डमन हे Atlanta च्या Center for Disease Control (सीडीसी) इथे काम करणारे वरिष्ठ संशोधक. त्यांचा कर्करोगाच्या संशोधनाशी संबंध नसला तरी ते स्वत: होऊन चर्चासत्रात सामील झाले, आणि त्यांनी आवाहन केलं की संजय आणि त्याच्या सहकार्यांनी नॅनोअॅरेची इतरही applications विकसित करावी, त्यांचा रोख होता दुर्धर, महत्वाच्या पण कर्करोगाच्या तुलनेने फार कमी लोकांमध्ये आढळणार्या व्याधींवर, त्यातल्या काहींची नावं संजयने ऐकली होती (auto immune disorders, fibromyalgia, वगैरे) तरी gulf war illness, chronic fatigue syndrome सारखी नावं त्याला नवीनच होती.
जिमचं भाषण चालू असतांना त्या व्याधींची लक्षणं ऐकून, 'हे बहुतेक psychological problems दिसताहेत' असा विचार संजयच्या डोक्यात आला. आणि जणू काही संजयचे विचार त्यांनी अंतरदृष्टीने वाचले असावेत इतक्या सहजतेने त्यांनी थबकून सरळ पहिल्या रांगेत बसलेल्या संजयकडे पाहिले, आणि म्हणाले, "You think it is all in the head, right?" संजय गडबडला, आणि लक्ष देऊन ऐकू लागला. "No, it is not! These are not psychological disorders, they have a definite 'organic' basis, they are more than just 'functional' problems."
मग पुढे त्यांनी ऑरगेंनिक आणि फंक्शनल यांमधला फरक समजावून सांगितला, "Functional complaints can be too easily brushed aside by busy doctors, because they have an ever increasing number of drugs available to suppress functional symptoms.
But that's like covering up a car’s "check engine" light. People with functional complaints may feel frustrated when their doctor tells them that all their tests are normal.
Doctors who are unable to establish physical evidence of organic disease may determine it to be functional and treat it empirically. But that is treating the symptoms, not treating the cause.
Holistically-oriented doctors with good clinical acumen find a patient’s reporting of functional symptoms, particularly when woven into the fabric of that patient’s life story, to be an opportunity to shed light on the earliest origins of disease."
जिम ने पुढे सांगितलं, "Understanding the root causes of functional symptoms is crucial, and to do that, we need tools like NanoArray which can detect multiple disease biomarkers quickly, easily."
मीटिंग संपली तेंव्हा एकमेकांशी पुन्हा संपर्क साधण्याचं ठरवून संजय आणि जिम आपापल्या स्थळी रवाना झाले.
*******************
"काय आहे CFS, डॉक्टर? न्युरोलॉजीकल?"
"Well, you are close, it is a neuro-immune disorder. मी तुम्हाला थोडी माहिती पाठवेन ई मेल ने, मला ई मेल आय डी द्या तुमचा." संजयने तो दिला. "मी हे डायग्नोसिस खरं तर अजून दोन एक महिने थांबून करायला हवं, कारण ६ महिन्यांहून आधिक काळ असा थकवा राहणं, बाकी इतर सर्व रोग लक्षणं rule out झाल्यावर, हे याचं क्लासिकल डायग्नोसिस. पद्माला थकवा जाणवून अजून तितके दिवस झालेले नाहीत. पण दुर्दैवाने अजून तरी याला कन्फर्म्ड डायग्नोस्टिक टेस्ट नाही. त्यामुळे सध्या तरी हे diagnosis of exclusion आहे, इतर दुखणी नाहीत म्हणजे हे असावं, अशा अर्थी. एक्स एम आर व्ही नावाच्या एका व्हायरस मुळे ही व्याधी उद्भवते असं आतापर्यंतच्या रिसर्च वरून वाटतं, त्या व्हायरसच्या तपासणीची सोय फक्त एक-दोनच ठिकाणी खात्रीशीर होते, Atlantaचं CDC ही त्यापैकी एक जागा...."
..."The good thing is, CFS संपूर्ण विश्रांतीने पूर्ण बरा झाल्याची उदाहरणं आहेत. But you will need to be extremely patient with her, throughout her recovery. जमेल तुम्हाला?"
संजयला काय बोलायचं हेच सुचत नव्हतं, "हो हो, डॉक्टर, नक्कीच, यू कॅन ट्रस्ट मी टू बी पेशंट."
***************
आणखी महिनाभर राहून पद्माच्या प्रकृतीत म्हणावा तसा नाही तरी थोडा फरक नक्कीच पडला. डॉ. गानू मधून मधून तपासत होत्याच, शिवाय वैद्यांचीही औषधं सुरूच होती. त्यांनी प्राणायामही करायला शिकवून तो रोज सकाळी तासभर करायचाच अशी ताकीद दिली, त्याचा फायदा दिसून पद्माचा दुपारचा थकवा कमी झाला. वजन चक्क वाढून पद्माला नवीन ड्रेस शिवावे लागले. थकवा यायचा आठवड्यातून दोन-एक दिवस, मग दोन-तीन तास झोपून राहिली की बरी व्हायची. परतायला महिना उरला तसं एकदा डॉ. गानूंनी तिला भेटायला बोलावलं, आई आणि आई-नानांना घेऊनच या म्हणाल्या.
सगळे गेल्यावर म्हणाल्या, "मला पद्मा ने परत जायला काही हरकत दिसत नाही, पण तिला अजून काही महिने तरी नोकरी करता येईल असं वाटत नाही,"
पद्मा ने त्यांच्या कडे पाहून मान डोलावली, "हो, मलाही तसंच वाटतं."
"शिवाय," डॉक्टर पुढे आई-नानांकडे पहात म्हणाल्या "तिने घरी एकटी राहून cope करण्यापेक्षा तिला तुमच्या पैकी कुणाची सोबत असली तर फार बरं. तुमचा व्हिसा आहेच ना?"
"खरंय, आहे व्हिसा," पद्मा च्या आई म्हणाल्या, "पण तिची बहिण आहे धाकटी, नेहा, तिचं कॉलेज संपत आलंय...तेवढं संपलं तीन एक महिन्यात की जाऊ शकेन मी. तसं चालेल का?"
"पद्मा, तू राहू शकशील का इथे तीन महिने?" डॉक्टरांनी विचारलं.
"नाही हो, संपदाची शाळा सुरु होईल..."
संजय च्या आई म्हणाल्या, " अहो मी आहे की. मी जाईन."
"आई तुम्ही?" पद्मा म्हणाली, आईना गेल्याच वर्षी mild heart attack येऊन गेला होता.
"अगं त्यात काय? मी घेते माझी औषधं वेळेवर सगळी, का s ही काळजी करू नकोस. आई नानांना नाही जमत तर येते मी, कोणी तरी जोडीला असल्याशी कारण तुला, हो की नाही?"
"ठीक तर, जा तुम्ही दोघी संपदाला घेऊन. सगळी वर्षभराची औषधं व्यवस्थित घ्या सप्रेंकडे एकदा जाऊन, आणि मला फोन करत चला मधून मधून, काय?"
डॉक्टरांचे आभार मानून सगळे परतले.
अडीच महिने भारतात काढून ऑगस्ट च्या अखेरीस पद्मा-संपदा आजीला घेऊन डियरफील्डला यायला निघाल्या.
(क्रमशः)
*********
- बहुगुणी
प्रतिक्रिया
4 Jan 2011 - 6:19 pm | यशोधरा
ह्म्म.. किंचितसा अंदाज बहुतेक यायला लागलेला आहे.
पटकन पुढचा भाग पोस्टा म्हणत नाही, कारण तुम्ही तो पोस्टताच.
4 Jan 2011 - 8:14 pm | धमाल मुलगा
च्यायला....
मस्त गोष्ट सांगता हां तुम्ही! :)
वैद्यकिय परिभाषेचा आधार घेत घेत वास्तवाला गोष्टीतून गुंफण्याचं कसब छानच आहे.
4 Jan 2011 - 11:39 pm | रेवती
वाचतिये आणि
Holistically-oriented doctors with good clinical acumen find a patient’s reporting of functional symptoms, particularly when woven into the fabric of that patient’s life story, to be an opportunity to shed light on the earliest origins of disease."
वाचल्यानंतर काय नक्की असेल याचा अंदाज बांधतिये. मला जे वाटतय ते असेल काय अशी उत्सुकता आहे.
तुमचे लेखन नेहमीच चांगले असते.