या आधीचे कथाभागः १, २, ३, ४, ५ आणि ६
..........आणि असं बरंच काही, रात्रीचे बारा वाजून गेले तरी संजय वाचतच होता.
**********
सोमवारी संजयने त्याच्या ऑफिस मधल्या रोलोडेस्कमधून जिमचं कार्ड शोधून काढून त्याला फोन लावला. आधी 'डॉ. अर्डमन स्वत: जागेवर नसल्याने निरोप ठेवू शकता' असं त्यांच्या सेक्रेटरी ने सांगितलं. स्वत:चं नाव आणि फोन नंबर दिला तरी जिम आपल्याला इतक्या दिवसांनी ओळखेल याची संजयला खात्री नव्हती. पण तासाभराने जिमने कॉल रिटर्न केला.
"Of course, I remember you very well, tell me, how can I help you?"
"Thanks, Jim, this was about my wife. Her name is Padma....."
मग संजयने त्याला पद्माच्या दुखण्याची सविस्तर माहिती आणि चालू असलेली ट्रीटमेंट सांगितली.
"I would highly appreciate if you could carry out the confirmatory diagnosis of XMRV at CDC."
जिम ने त्याला सांगितलं की दोन गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. "XMRV is shown to be associated in 70% of CFS cases, not 100%; in other words, this is still considered by many experts as an opportunistic virus, like HBV in some cases. So 'detecting' XMRV is not diagnostic, only indicative. And I concur with Dr. Ganu's diagnosis without the test.
Secondly, if I see her here officially, I will be obligated to report her to CDC, which could significantly affect your privacy and travel plans."
संजयने 'ट्रीटमेंटचं काय?' असं विचारल्यावर जिम म्हणाला, "I have seen alternative treatments work in some cases, and I think she is in good hands with her physician, so I would go on as you now do. No change. Just give it time."
"Can I call you a few times to follow up?"
"By all means! In fact, since the cases are quite rare, please do call frequently, I would like to know how she fares."
"Many thanks, Jim, really appreciate it!"
"Anytime! Just one cautionary suggestion: You will need to significantly change your own expectations. OK? Ciao!"
***********
दोन-एक आठवड्यांनी एकदा संजय शुक्रवारी घरी आल्यावर दोघींना म्हणाला, "चला जरा फिरून येऊयात, घरात बसून कंटाळल्या असाल दोघी, हवाही छान आहे, जरा mall मध्ये खरेदी करूयात काहीतरी. किंचित थकवा होता तरी पद्मा उत्साहाने निघाली. पण mall मध्ये पोहोचून अर्धा तासच झाला असेल-नसेल तोवरच तिला उभं राहवेना, 'घरी जाऊयात का रे?' म्हणाली. काही विशेष खरेदी न करताच सारे घरी परतले. संपदाला हवं असलेलं स्टोरीबुक घ्यायचं राहिलं म्हणून ती थोडीशी फुरंगटूनच घरी आली.
पुन्हा आठवडा भर संजयला वेळ मिळाला नाही, पण वीकेंडला त्याने विचारलं, "जाऊ यात का बाहेर? संपूचं पुस्तकही घेऊयात राहिलेलं. अर्ध्याच तासात येऊ परत."
"अर्धा तास drive? अरे मला बाथरूम पर्यंत जाणं जीवावर येतं रे!" पद्मा म्हणाली.
"ओके, काही हरकत नाही, मी आणि संपू जाऊन येतो, तुम्ही दोघी थांबा घरी." संजय म्हणाला, आणि संपदाला गाडीत शेजारी बसवून बाहेर जाऊन आला.
"संजू," रात्री जेवणं संपवून सगळे पलंगावर पडल्यावर पद्मा त्याच्या जवळ आली, "सगळं कळतं रे मला, तुझं frustration, तुझी चीडचीड, तुझा अपेक्षाभंग."
"कशाचं म्हणतेस तू?" त्याने पुस्तक बाजूला केलं.
"आज नाही येऊ शकले मी तुझ्या बरोबर बाहेर फिरायला, sorry! तुझ्या भावना मला कळत नाही असं वाटतं का तुला? अजून काही तू म्हातारा झालेला नाहीस, तुला माझ्याकडून कुठलंच सुख मिळत नाहीये, मी स्वत:ला खूप खाते रे मनात! तुझं सगळ्या अपेक्षा ठेवणं अगदी रास्त आहे. मी मुद्दाम नसेल काही केलं, तरीही तुला माझ्या inability मुळे खूप सहन करायला लागतंय हे सारखं जाणवतं मला. खरंच, सोडून दे मला तू. निदान तू तरी आनंदात राहशील."
संजयने पुस्तक परत डोळ्यापुढे घेतलं, "हे बघ, तुला योग्य वाटेल तसं वाग, असले विचार करणं सोडून दिलंस तर बरं," तो तुटकपणे म्हणाला.
*************
ख्रिस्टमसला दोन आठवडे उरले असतांना संपदा शाळेतली गम्मत घरी सांगत होती, मध्येच ती म्हणाली "आपण कधी पेटिंग झू ला गेलो नाही किती दिवसांत, जाऊयात या विकेंड ला? "
पद्मा म्हणाली "We will do better than that, let us to Kohls Children Park tomorrow!"
संजय तिच्याकडे चकित होऊन बघत म्हणाला, "पार्क? तो अर्ध्या तासाचा drive आहे डियरफील्डहून!"
"That's OK, we will go."
सगळेच खूष झाले, आणि शनिवारी दिवसभर मजा करून आले.
पुढच्या विकेंडला पदमाने चक्क लेक मिशिगनच्या पूर्व किनार्यावरच्या Michigan राज्यातल्या Grand Beach वर जायचा घाट घातला.
"अगं तिथे जायलाच दोन-अडीच तास लागतील!"
"अरे लागू देत रे, गेल्या वेळी आपण गेलो तेंव्हा अशीच थंडी होती आणि तुला ते फार आवडलं होतं, माझ्या लक्षात आहे ते. Let's go."
संध्याकाळी उशीरा परत येतांना गाडीत ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, "आवडली ट्रीप?"
"हो गं, पण तू दमली असशील."
"हो दमले तर आहे नक्कीच.."
"मग का ठरवलंस जायचं?"
काही क्षण ती शांत राहिली, मग म्हणाली, "मी तुझ्या ब्रीफ केस मध्ये इन्व्हीटेशन कार्ड पाहिलं काल, परवा तुमच्या डिपार्टमेंटची ख्रिस्टमसची पार्टी होती सहकुटुंब...तू बोलला नाहीस.."
"अगं त्यात काय, मला नव्हतं जायचं.."
"नाही, तुला आवडतं जायला, मला माहितीये, पण मी येऊ शकत नाही म्हणून तू विषयच काढला नाहीस, मला कळलं! म्हणून मी आज ठरवलं की हिमतीवर जायचंच."
त्याला भरून आलं, त्याने हातातली तिची बोटं घट्ट पकडली. "Thank You?!"
**********
नव्या वर्षाचा काही कार्यक्रम मित्रांबरोबर potluck dinner वगैरे करून करूयात असं संजयने सुचवताच पद्मा "मला नाही रे झेपायचं" म्हणाली. त्याला तिचं असं कधी उत्साही तर कधी मरगळलेलं असणं याने गोंधळात पडायला झालं.
त्याने तिला विचारताच ती म्हणाली, "संजू, माझ्या सारख्या ए टाइप पर्सनेंलिटीच्या, कायम काही तरी कामात गुंतून राहणारीला हे असं बसून किंवा पडून राहणं म्हणजे शिक्षा आहे! पण म्हणून मी हट्टाने थोडं जरी काम करायचा प्रयत्न केला की लगेचच मला दुप्पट त्रास होतो, पुन्हा प्रचंड थकवा आणि बारीक debilitating ताप! आणि थोडा उत्साह दाखवला की तुझ्या अपेक्षा वाढतात! हे सगळं कायमचं संपलं तर फार बरं होईल!"
"अगं काय बोलतेयस तू, राणी? तुला माहिती आहे मला तू लवकर धडधाकट झालेली हवी आहेस."
"हो, तेच ना! धडधाकट नसेन तर तुला काय कामाची?"
"हे बघ, तू उगाचच अर्थाचा अनर्थ करते आहेस, मी मनातही आणले नाहीत ते विचार तू डोक्यात आणून स्वत:चा छळ करून घेते आहेस, जरा शांत झालीस की मग आपण बोलू, तू आता आराम कर. मी बाहेर जाऊन येतो."
"बघ, काढलीस पळवाट, निघालास, जा बाबा तू. मी काढेन माझं दुखणं जमेल तसं."
***********
दुसऱ्याच दिवशी जिमला फोन लावून थोडं पद्मा विषयी, पण बरंचसं स्वत:चं frustration ऐकवलं.
जिम म्हणाला, "Do you recall what I told you? You will need to significantly change your own expectations. This is exactly what I meant. You will have to patient, look, there will be ups and down. Keep at it, be perseverant. You've got be steadfast, Man! Do you 'really' understand her pain?"
"Yes, I do!"
"Then show it! Help her get over it. If you are serious about her getting well, then you've got to do it."
त्याला डॉ. गानूंचं बोलणं आणि फोन वरचा शेवटचा प्रश्न आठवला, "But you will need to be extremely patient with her, throughout her recovery. जमेल तुम्हाला?"
*************
"तुला मनी आठवते?" आई एक दिवस त्याला एकटा बसलेला पाहून म्हणाल्या
"मनी? आपली मनीमाऊ?"
संजय खूप लहान असतांना त्यांच्या घरात आलेली ती अत्यंत लाघवी मांजर होती.
"हो. तुला आठवत असेल, एक दिवशी कुणी तरी सोडून दिलेली किंवा हरवलेली ती इवलीशी मनी आपल्या दाराशी आली. तुझ्या बाबांनी मला सांगितलं 'हे बघ, तुला थोडा त्रास होईल हे मान्य आहे, पण आपण काही बोलावून नाही आणलंय तिला, बिचारी आश्रयाला आलीय, तिचा भाग असेल तेवढा खाईल, तिचा आणि आपला भोग असेल तेवढी राहील, आणि जायचं तेंव्हा तिच्या कर्माने जाईल.' आठवतंय?"
संजयने आईकडे पाहिलं, "हो, आठवतंय मला. पण हे तू मला आज का सांगतेयस?"
त्याच्या कडे किंचित हसत पाहत त्या म्हणाल्या, "या व्हायरसचं तसंच आहे रे बाळा, आज तो पद्माच्या आश्रयाला आलाय, जाईल जायचा तेंव्हा. पण तिला तिचे भोग सहन करायला खंबीर मदत हवीये, आणि ती तूच द्यायला हवीस. मी जाईन परत दोन महिन्यांत, तूच आहेस तिला मग मदतीला."
क्षण भर स्तब्ध झाला संजय, म्हणाला, "खरंय तुझं, आई. पण मला ही माझ्या करियर कडे पाहायला हवं."
"अरे आणखी काय हवंय रे तुला करियर मधून? इतकं नाव कमावलंस एवढ्या लहान वयात, सोन्यासारखी हुशार मुलगी आहे, सर्वांना पोटभर जेवायला मिळेल, कपडेलत्ते मिळतील इतका पगार आहे, गाडी आहे, हे सुंदर घर आहे, कंपनी ठेवेल इथे या देशात तोवर राहाल या घरात, आणि आलासच परत मुंबईत तर ठाण्याचं ते चांगलं घर घेतोय आपण तेही तुमचंच आहे. आणखीन काय हवंय तुला?"
"अगं पण किती मोठी जबाबदारी आहे माझ्यावर नवीन इंस्ट्रूमेंट्सची? त्या सगळ्याला कधी वेळ देणार मी?"
"किती एंजीनीयर्स आहेत रे एकूण? आणि जगभरात हजारो माणसं रोजगाराला लावणारी ही महाकाय कंपनी तुझ्या एकट्याच्या जीवावर चालतेय का?" तीक्ष्ण स्वरात आई म्हणाल्या.
"तसं नाही गं?"
"मग कसं? अरे शेवटी कशासाठी हा सगळा आटापिटा? आपल्या आवडत्या माणसं बरोबर चार क्षण सुखाने जगता यावेत म्हणूनच ना? गाडी जोरात कोणी चालवावी? ज्याला ब्रेक केंव्हा लावायचा ते कळतं त्यानेच."
**************
कामावरून गाडीतून घरी पोहोचता पोहोचता किशोर कुमारच्या सीडीवरचं शेवटचं गाणं सुरु झालं. ते संपेपर्यंत घर आलं होतं. अत्यंत अर्थपूर्ण शब्दांच्या त्या अप्रतिम गाण्याने, आयुष्यात कधीही न भेटलेल्या किशोर कुमारने, जणू त्याला खणखणीत कानफटीत वाजवली, कितीतरी वेळ सुन्न होऊन संजय गाडीत बसून राहिला होता.
किशोरचं गाणं संपलं तसे त्याला एक एक संवाद आठवू लागले:
"आज मी थोडंसं उठून बाहेर जावं, मोकळ्या हवेत बसावं म्हंटलं तर मला ती साधी हलकी प्लास्टिकची खुर्चीही उचलवेना रे! हातातलं बळच संपल्यासारखं झालंय!"
""मला एक पाऊल दुसरया पावलापुढे टाकणं हेही कधी कधी संकट वाटतं, असं वाटतं मी म्हणजे प्रवाहाविरुध्द्ध वाहू पाहणारा इवलासा मासा आहे. पायातली शक्तीच नष्ट झाली आहे असं वाटत राहतं."
मंझिले अपनी जगा हैं, रास्ते अपनी जगा
जब कदम ही साथ ना दे, तो मुसाफिर क्या करें
अगं काय खुळी आहेस का तू वेडाबाई? सोडण्यासाठी हात धरला होता का तुझा?
यूं तो है हमदर्द भी हमसफर भी है मेरा
बढ़के को कोई हाथ ना दे, दिल भला फिर क्या करें
"आता आपलं आपण ताट वाढून घेणं, पाणी फुलपात्रात ओतून घेणं, म्हणजे काही मोठं काम आहे का? पण तेवढ्यानेही मी थकते रे. अन्नाचा घास चावणं, गिळणं हे देखील मला शिक्षा वाटते. तेवढीही देवाने मला शक्ती देऊ नये म्हणजे मी किती पाप केलं असेल गेल्या जन्मी?"
डूबने वाले को तिनके का सहारा ही बहोत
दिल बहेल जाये फक़त, इतना इशारा ही बहोत
इतने पर भी आसमां वाला गिरा दे बिजलीयां
कोई बतला दे ज़रा, ये डूबता फिर क्या करें
http://ww.smashits.com/audio/player/frameset.cfm?SongIds=10811
***********
संध्याकाळी जेवणं संपल्यावर सर्व जण आपापल्या गाद्यांवर झोपायला गेले. पद्मा ला आज पडल्याबरोबर झोप लागली.
'डूबने वाले को तिनके का सहारा ही बहोत....'
'मी तुझा 'तिनका' बनेन, राणी! आणि मला खात्री आहे, आपण दोघं ही व्यवस्थित किनारा गाठू, गाठलाच पाहिजे आपल्याला, आपल्या पिलासाठी. '... तो हळुवारपणे तिला थोपटत राहिला, ती आश्वस्त, संथ लयीत झोपली होती.
*******
शुक्रवारी संध्याकाळी संजय लवकर घरी आला. आई आतल्या घरात होत्या, स्वयंपाक घरात असलेल्या पद्माने त्याला विचारलं, "संजू, आईंनी कणिक मळून ठेवली आहे, मी फुलके करायला घेतले, ८-१० केले मी पण आता माझ्याने होत नाहीरे, पुढचे ७-८ फुलके तू करशील का? तेवढंच आईंना कमी काम." संजयच्या आ वासलेल्या चेहेर्याकडे पहात ती म्हणाली, "मी शिकवते तुला इथे शेजारी खूर्चीवर बसून, जमेल तुला..हात स्वच्छ धुवून ये."
पुढची २०-१ मिनिटे पहिल्याच २-३ फुलक्यांशी झटापट करण्यात गेली, पण एकदाचं जमलं! टरारून टम्म फुगलेला फुलका पाहून कोण आनंद झाला संजयला! त्याने संपदाला कॅमेरा घेऊन बोलावलं आणि चक्क व्हिडिओ काढायला लावला.
आई कौतुकाने मागे उभ्या राहून पाहत होत्या, "हे बरं झालं! आता आणखी चार गोष्टी शिकून घे, चांगलं शिकवतेय पद्मा, मीही सांगेन २-३ साध्याश्या रेसिपीज."
त्या वीकेंडला झपाटल्यासारखं संजयने वरणाला फोडणी देणं, दोन-एक भाज्या, एक कोशिंबीर हे शिकून घेतलं. मग जसा वेळ मिळेल तसा संजय मदत करायचा स्वयंपाकघरात, हळू हळू पद्माची कळी खुलायची, तिच्याने काम होत नाही म्हणून तिला जे गिल्टी वाटायचं ते कमी झालं, "माझी मदत नाही तर निदान तुझ्यामुळे तरी त्याच्या आईंना काम कमी पडतं" म्हणायची.
********************************
वीकेंडला घरच्या घरीच पद्माचा वाढदिवस साजरा करायचं आई आणि संजयने ठरवलं.
"मी शिरा करीन, तो चालतो तिला, तू कार्ड आणि काही तरी तिला आवडेल असं गिफ्ट आण," आई म्हणाल्या.
शनिवारी सकाळीच संपदाला घेऊन संजय mall मधल्या Michaels Arts & Crafts स्टोअर मध्ये गेला. बराच वेळ शोधाशोध करून त्याने छोटं इझेल, ब्रश वगैरे रंग-सामान आणि एक मध्यम आकाराचं drawing book विकत आणलं.
"बाबा, हे कुणासाठी, माझ्यासाठी?" संपदाने विचारलं, " नाही बेटा, हे आपल्या दोघां कडून आईला तिच्या वाढदिवसासाठी, ओके?"
"अरे काय हे? विनाकारण वायफळ खर्च करतोयस ते?" पद्मा आल्याबरोबर म्हणाली, "नसत्या अपेक्षा ठेवू नकोस हं, आधीच सांगते, ते बसून पेंटिंग करणं वगैरे मला काही जमणार नाही!"
संजय हिरमुसला आणि त्याचा चेहेरा खर्रकन उतरला. तो काही तरी बोलणार तोच त्याला जिमचं बोलणं आठवलं - "...look, there will be ups and down. Keep at it, be perseverant. You've got be steadfast..."
संजयच्या डोक्यात एक आयडिया आली. दोन तासांनी त्याला थोडा वेळ मिळाला तेंव्हा त्याने तिने शेवटचं वाचून अर्धवट ठेवलेलं एक मराठी पुस्तक उचललं आणि स्टडीमध्ये जाऊन बसला चित्रकलेचं सर्व साहित्य घेऊन. संपदाला पद्मा वाचून दाखवत असलेलं कृष्णकथांचं कुठलंसं सचित्र पुस्तक होतं. त्यातल्या उखळाला बांधून ठेवलेल्या बालकृष्णाचं एक चित्र पाहून त्याने पेन्सील घेतली, चित्र समोर ठेवून रेघा ओढायला सुरुवात केली. शाळेत असतांना त्याच्या अचाट 'कले' बद्दल त्याचा 'उद्धार' करणाऱ्या चित्रकलेच्या सरांना 'क्षमस्व हो!' असं मनातल्या मनात म्हणून त्याने तासभर बसून ते चित्र रेखाटलं, नाक-तोंड काही न काढता तो रंग भरायला लागला. कृष्णाच्या शरीराचा नील वर्ण काही केल्या जमेना. इतक्यात पद्मा आणि संपदा दोघी आल्या खोलीत आणि आश्चर्याने पाहत राहिल्या.
"आजी हे बघ!" संपदा चित्कारली "बाबा चित्र काढतायेत.."
आई उठून आल्या, "अरे चांगलं जमलं आहे की!"
"अगं कसलं चांगलंय? चेहेरा कुठे काढलाय अजून? हिंमतच नाही डोळे वगैरे काढायची. आणि तो रंग कुठे जमतोय?"
"मी सांगते रंग कसा करायचा ते" पद्मा म्हणाली. तिने मग दोन तीन रंग मिसळून अगदी हवी ती रंगछटा जमवून आणली आणि मग त्याला सांगितलं 'हा वापर शरीराला' म्हणून. त्याचं रंगवणं सुरु झालं तसं इतर सर्व जण आपापल्या कामाला गेले.
शरीर रंगवून झाल्यावर त्याने पद्माला बोलावून 'अगं ते मोरपीस राहिलं, ते आणि बाकीचं पूर्ण करतेस का' म्हणून विचारलं. "छे रे! मला कुठली आलीये शक्ती? तूच कर जमेल तसं." कंटाळून तो उठला, 'बघेन नंतर."
**********
सोमवारी संध्याकाळी संजयला उशीरच झाला यायला. आईंनी ओठांवर बोट ठेवून त्याला आवाज न करायची सूचना केली, आणि त्याचं लक्ष वेधलं कोपर्यातल्या पेंटिंगकडे. सुंदर मोर पीस लावलेला बाल कृष्ण खट्याळ डोळ्यांनी पहात होता. संजयने डोळे विस्फारून आईकडे पाहिलं, त्यांचे डोळे समाधानाने हसले, आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली, हळू आवाजात म्हणाल्या "दुपार पासून बसली होती पोर रंगवत, आत्ता झोप लागलीय तिला!"
************
घरासमोरून निघतांना डावी-उजवीकडे एकदा बघून घेऊन संजयने गाडी रिकाम्या रस्त्यावर वळवली, वेग घेण्याआधी किंचित थबकून खिडकीतून डावीकडे नजर टाकत घराकडे पाहिलं, दार बंद होतं पण बाहेरच्या बैठकीच्या खोलीच्या खिडकीत पद्माचा चेहेरा आणि हलता हात दिसला. त्याने हसर्या चेहेर्याने हात केला, टर्न इंडिकेटर बंद केला आणि गाडीला वेग दिला. 'आज सकाळीच वेळ मिळाला की डॉ. गानूंना फोन करावा....मुंबईत असणार त्या आज, सेल फोनवरच गाठावं लागणार. जिम ला ही फोन करावा लगेचच.. '
*****************
सकाळी तर नाही जमलं, पण दुपारी घरी निघायच्या आधी संजयने जिमला फोन लावला,
"हाय जिम."
"Hey buddy! How is Padma?"
"She is doing better, eating well, and even took a walk with me around the sub-division."
"Oh, that's great! I think that is just about right. She doesn't need any correction."
"What do you mean, Jim?"
"Just what I said," एका शब्दावर जोर देत जिम पुन्हा म्हणाला, " SHE doesn't need any correction."
"I don't understand..if she doesn't, then who does?"
"Go home, sleep over it if necessary, you will understand; then call me again later."
***********
ठरल्याप्रमाणे संजयने संध्याकाळी बाहेर पॅटिओ वर उभं राहून डॉ. गानूंना फोन लावला. डॉ. गानूंनी गेल्या आठवड्यात काय काय घडलं ते विचारल्यावर त्याने सगळं सविस्तर सांगितलं. त्याला पद्माने थोडासा स्वयंपाक करायला शिकवला, हळू हळू का होईना, पण बाहेर फेरफटका मारला, हे ऐकल्यावर त्या "अरे वा!" म्हणाल्या, "आय थिंक वी आर ऑन द राईट पाथ, आय वूडंट वरी अबाऊट हर. तुम्ही जे केलंत ते आधिक कॉन्शसली चालू ठेवा, संजय. मला परत आठवड्याने फोन करा.
"Thank you, Doctor!"
"आणि हो, तिने म्हणे तुम्हाला चक्क फुलके आणि भाज्या करायला शिकवलं म्हणता?" त्या हसत म्हणाल्या...
"हो ना! "
"आणि चित्र काढून रंगवायला शिकवलं?"
आता संजय खळखळून हसला.
"गम्मत आहे की नाही? तुम्हाला शक्य असलेल्या पण तुम्ही आजवर न केलेल्या नव-नवीन गोष्टी तुम्ही शिकताय! याचा अर्थ कळतोय तुम्हाला?"
थोडंसं थांबून संजय म्हणाला, "I know, together, we have turned her disability into my ability."
"Perfect! Keep it up!"
**********
घरात येऊन त्याने जिम ला फोन लावला.
"Jim, I think I understand what you meant, you think I am the one who needs the correction, right?"
क्षणभर थांबून, पण मग हसून जिम म्हणाला, "Yes Sir! That's right! And I know you will constantly be correcting yourself now, isn't that right?"
"You bet, my friend!"
**********
३१ डिसेंबरला संध्याकाळी अचानक पद्मा म्हणाली, "चला, आपण ते स्कूल ग्राउंडवरचं New Year चं फायरवर्क पाहून येऊयात का गाडीने जाऊन?"
"अरे, नेकी और पूछ-पूछ? नक्कीच जाऊयात," संजय म्हणाला.
"ओके, मग कॅमेरा घे बरोबर. चला संपू आणि आई."
संपदा नाचतच झटपट तयार झाली आणि आजीला घेऊन गाडी मागच्या सीटवर बसली. संजय ड्रायव्हिंग ला तर light lavender चुडीदार मध्ये पद्मा त्याच्या शेजारी.
गाडी सुरु करतांना जुनी गाणी आइंच्या आवडीची म्हणून संजयने Golden Oldies ची एक सीडी प्लेयर मध्ये सरकवली आणि प्ले चं बटन दाबलं.
गाडी वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागेपर्यंत पाहिलं गाणं सुरु झालं होतं. आणि नकळत संजय स्वत:शीच हसला. पद्माने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं, " का रे हसलास?"
"काही नाही गं, किशोर कुमार ने रस्ता कसा शोधायचा ते शिकवलं, आता हेमंत कुमार रस्त्यात काय शोधायचं ते सांगतो आहे!"
पद्माने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
"सांगेन मी कधीतरी तुला, शोनू!" संजय म्हणाला.
**********
आपणां सर्वांना हे वर्ष निरामय आरोग्याचे आणि सकारात्मक दृष्टीकोनाचे जावो!
- बहुगुणी
प्रतिक्रिया
6 Jan 2011 - 3:31 am | मस्तानी
नक्की शब्द सुचत नाहीयेत पण ...
6 Jan 2011 - 3:42 am | रेवती
कथा फारच आवडली.
धन्यवाद! :)
माझी कल्पनाशक्ती भलतीकडेच धावत होती.
अंदाज केल्याप्रमाणे शेवट अजिबात नाही.
6 Jan 2011 - 4:15 am | सेरेपी
छान शेवट.
6 Jan 2011 - 4:26 am | वाचक
वैद्यकीय परिभाषेचा चांगला मेळ घालत, फुलवलेली कथा. शेवटही सकारात्मक आणि उत्तम केलात, तुमच्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्यात आता, पूर्ण कराव्या लागतील.
(शेवटीही व्हिडिओ टाकायच्या ऐवजी ओळीच द्यायच्यात)
6 Jan 2011 - 4:56 am | नंदन
कथा आवडली. वाचकरावांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. शीर्षकावरून (आणि हिंदी गाण्यांची जाणती आवड दर्शवणार्या तुमच्या आधीच्या लेखांवरून) लेखात हे गाणं गुंफलं जाईल असं वाटत होतंच, ते कथेच्या प्रवाहात अगदी चपखल बसतं आहे.
6 Jan 2011 - 4:57 am | नाटक्या
किशोर कुमार ने रस्ता कसा शोधायचा ते शिकवलं, आता हेमंत कुमार रस्त्यात काय शोधायचं ते सांगतो आहे!
या एका वाक्यानेच सगळं सांगीतलत तुम्ही... आभारी आहे!!
6 Jan 2011 - 4:59 am | गोगोल
कथा लिहिलाबद्द्ल तुमचे अभिनंदन. फारच आवडली.
6 Jan 2011 - 5:08 am | प्रभो
'बहुगुणी' कथा आवडली.... :)
6 Jan 2011 - 5:24 am | Nile
मस्त कथा, लेखातली व्याधी प्रसंग कुणा जवळच्याची आठवण करुन देणारे, किशोरच्या गाण्यांनी जीवनातल्या प्रसंगांना गुंफणं ओळखीचं, वैयक्तिक. यामुळे लेख जास्तच जवळचा वाटला. अश्याच वेगवेगळ्या कथांची मेजवानी आम्हाला मिळत राहो!
तुम्हालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
6 Jan 2011 - 5:53 am | अर्धवटराव
लय लय लय लय लल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्य्य्य भारी !!
अर्धवटराव
6 Jan 2011 - 8:13 am | अरुण मनोहर
परिणाम कारक लिखाण.
6 Jan 2011 - 8:28 am | यशोधरा
मस्त कथा. खूप आवडली.
6 Jan 2011 - 11:41 am | मुलूखावेगळी
"I know, together, we have turned her disability into my ability."
किशोर कुमार ने रस्ता कसा शोधायचा ते शिकवलं, आता हेमंत कुमार रस्त्यात काय शोधायचं ते सांगतो आहे!
>>>>>
ह्या लाइन्स खुप काही सान्गतायेत
आनि लिखनाची स्पीद जबरदस्त. त्यामुळे वाचनाची लिन्क पन लागली
एका व्याधीच्यामुळे फुललेले सहजीवन छान लिहीलेत एकदम
आनि मेडिकल टर्म्स सुध्दा कळतील असे
असेच लिहीत रहा.
पुलेशु
6 Jan 2011 - 11:54 am | पियुशा
कथा खुप आवडलि
शेवट असा झाला ते जास्ति आवड्ल !
:)
6 Jan 2011 - 2:18 pm | प्रसन्न केसकर
अतिसुंदर. शब्द खुंटले!
सीएफएफ किंवा सीएफएस हा खरंतर भयानक आजार पण भारतात त्याबाबत बरीच कमी जनजागृती आहे. बहुतेकदा पेशंटला स्वतःलाच आपल्याला असा काही आजार आहे हेच कळत नाही अन उगीचच अपराधी वाटायला लागतं. इतरांबाबत तर बोलायलाच नको. वैद्यकीय भाषेचे अवडंबर टाळुन मस्त माहिती दिलीत या चित्तथरारक दीर्घकथेतुन. मनोरंजनातुन प्रबोधनाचा उत्कृष्ठ नमुना आहे हा. वाचनखुण साठवुन तर ठेवलीच आहे. आता सगळ्या परिचितांनाही वाचायला देईन.
6 Jan 2011 - 2:27 pm | स्मिता.
बहुगुणी,
कथा फार फार फार फार आवडली. काहिही नाट्यमय न होता नेहमीच्या प्रसंगांतूनच ती साकारलीये तरी शेवटच्या भागापर्यंत खिळवून ठेवणारी होती.
महत्त्वाचे म्हणजे रंजित शोकांतिका नसल्याने बरं वाटलं. उलट सकारात्मक बदल परिणामकारक झालाय.
मस्तच! असेच लिहित रहा.
7 Jan 2011 - 3:51 am | सविता
आवडली!!!
7 Jan 2011 - 5:06 am | सखी
कथा आवडली. स्मितासारखेच म्हणते, सकारात्मक बदल परिणामकारक झालाय - असा बदल आजारी माणसाला मिळाल्यावर आजाराशी लढण्याचं दुप्पट बळ येतं. मला संजयच्या आईचा त्याच्याशी झालेला संवाद (सल्ला) खूप आवडला - आजारपण कोणीही मागुन घेत नाही.
7 Jan 2011 - 6:48 am | नगरीनिरंजन
कथा आवडली!
7 Jan 2011 - 10:57 am | ५० फक्त
अतिशय छान कथा, खुप खुप धन्यवाद.
मी पण माझ्यांत काही बदल करेन आता. बदल करण्यासाठी असं काही होण्याची वाट बघणं योग्य नाही.
हर्षद.
7 Jan 2011 - 4:26 pm | प्राजक्ता पवार
कथा आवडली .
8 Jan 2011 - 12:43 am | प्राजु
नात्यांचे पदर हळूवार उलगडत गेले आहेत. संजय चं वागणं, पद्माचं वागणं.. खूप सहजपणे साकार झालय कथेत.
कथा अतिशय सुंदर आहे. खूप आवडली.
18 Jan 2011 - 8:47 pm | अतुल पाटील
कधी कधी कोणाला करेक्शन ची गरज आहे हे समजे पर्यन्त वेल निघून गेलेलि असते. संजय ला थोडे उशीर क होइना पण कळले. खूप छाण.
23 Apr 2014 - 4:59 am | शुचि
A big wow!!! किती सुंदर रंगवली आहे कथा बहुगुणी जी. अतिशय आवडली. फारच realistic वर्णन आहे. अतिशय माहितीपूर्ण देखील!
23 Apr 2014 - 6:35 am | बहुगुणी
शुची: प्रतिसादाबद्दल आभार.
तुम्ही धागा वरती काढलाच आहे तर एक दुरुस्ती:
कथेच्या अखेरीस असलेला व्हिडिओ-दुवा गायब झाला असल्याने क्लायमॅक्सला गाणं कोणतं होतं ते कळत नाही, ते होतं हेमंतकुमारचं "राह बनी खुद मंझील"
14 Feb 2015 - 4:05 am | रुपी
एक दमात सगळे भाग वाचून काढले. सकारात्मक शेवट आवडला. तुमच्या आणखी काही कथा असतील तर वाचायला नक्की आवडेल.
14 Dec 2020 - 1:01 pm | NAKSHATRA
आपल्या आवडत्या माणसं बरोबर चार क्षण सुखाने जगता यावेत म्हणूनच ना? गाडी जोरात कोणी चालवावी? ज्याला ब्रेक केंव्हा लावायचा ते कळतं त्यानेच."