डिस्क्लेमर १: मद्यपान आपल्या स्वास्थ्या साठी हानिकारक असते. ह्या लेखाचा हेतू - 'कुठली ड्रिंक घेतलेली चांगली' हे सांगायचा नसून, 'कुठली ड्रिंक प्यायलात तर किती कॅलोरीस शरीरात वाढतील?' हे सांगण्याचा आहे. धन्यवाद.
३१ डिसेंबर ची पार्टी. 'अरे आज मस्त बसू या.. उद्या काय हापिसात सुट्टी. उगीच लवकर उठायचे टेन्शन नाही!' 'आज आम्ही के. पी. ला जाणार आहोत. हार्ड रॉक कॅफे ला. फुल धमाल.' 'आम्ही सगळे मित्र मंडळी नेहमीच त्या बीच रिसोर्ट ला जातो.' असे आज बहुतेक लोकांचे पार्टी प्लान्स असतील... म्हणजे आमच्या सारखे नसाल तर. आमच्या ह्यांना प्लानिंग करायला खूप आवडत. पण एक्झिक्युशन ची वेळ आली कि मात्र, 'अरे, पिझ्झा ऑर्डर करू की!' :( असो. जर तुम्ही teetotaller असाल तर पुढे वाचू नका. नाही ऐकणार? बरं. मग नका म्हणू, ह्या लेखात आम्हाला उपयोगी अस काहीच नव्हतं. (आपण डिस्क्लेमर टाकलेला बरा!)
तर मुद्दा ड्रिंक्स मधल्या कॅलोरीस चा. डायेट वर आहात तर कुठली ड्रिंक घेऊ शकता? कुठलीच नाही. डायेट वर एरवी असतो, आज एक दिवस सूट आहे. तेव्हा जरा 'लो कॅल लो गिल्ट' अशी ड्रिंक सांगा न. लो कॅल लो गिल्ट म्हणजे एक स्मॉल पेग रम/व्हिस्की/वोडका/जीन/ब्रांडी आणि पाणी! ह्याहून जास्त काही पण घेतलंत तर ते लो कॅल राहणार नाही!! गिल्ट हा खूप वैयक्तिक विषय आहे, त्यामुळे त्यावर चर्चा इथे नको. काय?
तरी पण, जर कुणाला कॅलोरी कोन्शिय्स होऊन ड्रिंक ची निवड करायची असेल तर हि लिस्ट घ्या. ह्याचा नीट अभ्यास करा आणि मग ठरवा, काय आणि किती घ्यायचं ते. आणि हो, कुठल्या हि मद्यात 'फॅट' नसते. मग तरी वजन कसे वाढते? (क्रमशः)
१. ब्रांडी (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
२. जीन (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
३. रम (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
४. वोडका (४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
५.व्हिस्की(४०%) ३० मी ली ६५ कॅलोरीस
६.व्हाईट वाईन, ड्राय १ ग्लास (१२० मी ली) ७९ कॅलोरीस
७.रेड वाईन १ ग्लास (१२० मी ली) ८२ कॅलोरीस
८.व्हाईट वाईन,स्पार्कलिंग १ ग्लास (१२० मी ली) ९१ कॅलोरीस
९. व्हाईट वाईन,स्वीट १ ग्लास (१२० मी ली) ११३ कॅलोरीस
१०.बियर,लागर, मायील्ड ३३० मी ली १५० कॅलोरीस
११. बियर, strong ३३० मी ली २२२ कॅलोरीस
१२. रोझे वाईन १ ग्लास (१२० मी ली) २३४ कॅलोरीस
आणि हो, लिस्ट जरा तिरपी तार्पी झाली आहे, त्याला वर्ड टेबल मध्ये कॉपी पेस्ट करून इन्सर्ट करण्याचा पेशंस माझ्यात नाही. सॉरी! :)
प्रतिक्रिया
31 Dec 2010 - 11:39 am | सूर्यपुत्र
म्हणजे काय??
31 Dec 2010 - 11:42 am | खादाड अमिता
जे मद्यपान करत नाहीत ते
31 Dec 2010 - 11:45 am | सिद्धार्थ ४
कुठल्या हि मद्यात 'फॅट' नसते. मग तरी वजन कसे वाढते? ???
वाचायला आवडेल...
31 Dec 2010 - 1:18 pm | नेत्रेश
मद्यात खुप जास्त प्रमाणात शर्करा असते ज्यामुळे वजन वाढते.
31 Dec 2010 - 11:45 am | llपुण्याचे पेशवेll
लिस्ट तिरपी होण्याचे कारण पेशन्स नाही इतकेच आहे का? :P
31 Dec 2010 - 11:53 am | सूर्यपुत्र
>>लिस्ट तिरपी होण्याचे कारण पेशन्स नाही इतकेच आहे का?
;)
=))=))
31 Dec 2010 - 12:03 pm | खादाड अमिता
असा प्रष्ण पडण, हा लेख उद्या सकाळी जर प्रकाशित केला असता तर साहजिक होता. कि तुम्ही आड्व्हान्स सेलिब्रेशन करता? :)
31 Dec 2010 - 12:17 pm | गवि
पुपे.. उद्या कदाचित नागमोडीही असू शकेल..किंवा खादाडताईंनी कशी का टंकलेली असेना आपणांस (तुम्ही आम्ही बरं का..)ती नागमोडी दिसू शकेल:
31 Dec 2010 - 11:53 am | गवि
"रॉयल च्यालेंज" या व्हिस्कीलाही वरील "व्हिस्की"चे जनरल प्रमाण लागू होईल का?
स्पेसिफिक शंकेच्या तसदीबद्दल क्षमस्व.. :)
(यावर्षीपासून मुद्द्याचे प्रश्न विचारणारा) गवि
31 Dec 2010 - 11:59 am | खादाड अमिता
कुठ्ल्याही व्हिस्की ला हि सरासरी लागु होयील.
31 Dec 2010 - 12:03 pm | सूर्यपुत्र
>> जर तुम्ही teetotaller असाल तर पुढे वाचू नका. नाही ऐकणार? बरं. मग नका म्हणू, ह्या लेखात आम्हाला उपयोगी अस काहीच नव्हतं.
असं का म्हणतां??
कोणत्या माहितीचा उपयोग कधी, कुठे, कसा होईल, सांगता थोडेच येते...... ;)
:beer:
-(Tea-totaller)
31 Dec 2010 - 12:07 pm | खादाड अमिता
सूर्यपुत्र ह्यान्च सांगणं ऐकून सर्व teetotallers नि पण हा लेख जरूर वाचावा. :)
31 Dec 2010 - 12:07 pm | नगरीनिरंजन
माहिती तशी उपयुक्त आहे पण कॅलरीज मोजून पिण्याची सवय नसल्याने आणि त्यात गंमतही नसल्याने चान चान असे म्हणतो.
31 Dec 2010 - 12:58 pm | गवि
गिनकर पिऊं मैं जाम तो होता नही नशा.
मेरा अलग हिसाब है, सच बोलता हूं मैं..
ही गझल आठवली...
31 Dec 2010 - 12:12 pm | सूर्य
कुठल्या हि मद्यात 'फॅट' नसते. मग तरी वजन कसे वाढते?
वाचायला उत्सुक आहे.
कॅलरिज सुद्धा कमीच दिसत आहेत.
- सूर्य
31 Dec 2010 - 12:31 pm | llपुण्याचे पेशवेll
जबरा. मजा आहे. सूर्य आणि सूर्यपुत्र दोघेही मिपावर आहेत.
31 Dec 2010 - 12:17 pm | आनंद कवठेकर
check links on left side in below URL :-)
http://caloriecount.about.com/activities-inactivity-ac7
Calories burned with Quiet Sitting Quietly and Watching Television - 66 calories per hour
Calories burned with Quiet Sleeping - 59 calories per hour
Cheers
(sorry for English typing)
31 Dec 2010 - 12:18 pm | श्रावण मोडक
गंभीर मोड - चांगली माहिती.
योग्य निर्णयाकडे नेण्यासाठी माणसाची कॅलरीजची (उष्मांक) आवश्यकता किती तेही जरा सांगा की. गरज आहे सध्या. ;)
विनोद मूड - चाकणा आणा रे... ;)
31 Dec 2010 - 9:00 pm | रामदास
म्हणूनच मी म्हणतो क्रेडीट रेटींग नसलेलीच प्यावी बॉ !!
31 Dec 2010 - 12:22 pm | सहज
खरी हानी होते ती चखणा व नंतर जेवण. हे दाखवून दिल्याबद्दल आभार!
आता फक्त पेयपान!
31 Dec 2010 - 1:26 pm | धमाल मुलगा
ह्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल सहजरावांना मिळत आहे, 'मिपा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड'!
टाळ्या....
31 Dec 2010 - 12:39 pm | महेश-मया
एकदा का ड्रिंक्स सुरु केली तर लक्शात येत नाही कि किती कॅलोरीस पोटात गेली तर हि आकडेवारी कोण लक्शात ठेवनार
31 Dec 2010 - 1:00 pm | गणपा
बाबौ
धम्या, डोण्या, अॅड्या, पर्या नी नाना वाचताय ना लेको. =)) =))
सदर धाग्यावर या पांडवांची प्रतिक्तिया जाणुण घेण्यास उत्सुक :D
31 Dec 2010 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार
ज्यांच्या डोक्यात खाताना आणि पिताना देखील कॅलरीज वगैरेचे विचार असतात त्यांनी एकदाच मन घट्ट करुन विष पिउन मोकळे व्हावे.
धन्यवाद.
31 Dec 2010 - 1:09 pm | अवलिया
विषात किती कॅलरी असतात?
विष पिउन मृत्यु येण्याचे कारण नक्की काय असते?
ही प्रक्रिया नेमकी कशी घडते?
विष कुठे मिळते?
त्यासाठी लायसन्स लागते का?
31 Dec 2010 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार
आणि डायेट मध्ये कुठले विष घ्यावे ? :- हा प्रश्न राहिला रे नानबा.
31 Dec 2010 - 1:12 pm | अवलिया
करेक्ट ! उपवास असल्यास त्यादिवशी कोणते विष घ्यावे हा पण उपप्रश्न होऊ शकतो
31 Dec 2010 - 3:12 pm | धमाल मुलगा
गणपाकाकांनी आम्हाला क्यालरी फ्रीक ठरवल्याबद्दल निषेध.
घ्या घेतलेल्या नावांपैकी एकाची तरी 'मेन्टेन्ड तब्येत' सुटलेली आहे का? नाय ना? मंऽऽग....
(स्वगतः धम्या बदनाम हुवा..बाटली तेरे प्यार में..)
अरे, कशी प्यावी ह्याचं सुध्दा एक शास्त्र असतं. तुम्ही प्यायला बसणार, आणि वचावचा हे खा, ते खा करणार..मग क्यालरी वाढतील नायतर काय?
आदरणीय अभ्यासू श्री. सहजमामा व्यनिवाले ह्यांच्या चिकित्सक अभ्यासू वृत्तीचा फायदा नुकताच आम्हाला आला आहे. त्यांची परवानगी आहे हे गृहित्त धरुन त्यांनी खवमध्ये दिलेला एक क्यालरींचा तौलनिक विदा इथे डकवत आहे. गरजूंनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.
1 mug of beer (250 ml) (150 calories) - One tandoori roti (150 calories)
1 glass of white wine (200 ml) (120 calories) - 4 cups light microwave popcorn (120 calories)
1 glass rum and diet Coke (133 calories) - 1 cup vegetarian Chinese chilly dish (135 calories)
1 glass of rum and Coke (182 calories) - 1 medium katori cooked soya beans (180 calories)
1 glass of martini with one olive (184 calories) - 1 slice cheese pizza (183 calories)
1 tequila shot (100 calories) - 1 chappati or two phulkas (102 calories)
1 glass of gin and tonic (178 calories) - 1 medium katori dal fry (177 calories)
1 glass of Bailey's lrish Cream (468 calories) - 2 chappatis (204 calories) 1 medium katori aloo mutter ( 217 calories) Green salad (45 calories) Total: 466 calories
1 glasss of Cosmopolitan (151 calories) - 1 soy vegetarian burger (140 calories)
1 glass of Zima (rum cocktail) (185 calories) - 1 medium katori cooked masala dal (183 calories)
जनहितार्थ जारी.
द्वारा,
माहिती प्रसारण आमंत्रणालय.
31 Dec 2010 - 3:22 pm | आदिजोशी
अशा हि & हि टेबलाची आम्हास गरज नाही.
पिऊन बाईक चालवण्याच्या आम्ही विरोधात आहोत. कार्यक्रम झाला की रिक्षासाठी पैसे उरत नाहीत. त्यामुळे आम्ही चालतच घरी जातो. त्यात पाऊले वाकडी पडत असल्याने २ किमी चे अंतर आम्ही ५-६ किमीत संपवतो. चालण्यासारखा दुसरा व्यायाम जगात नाही.
आणि म्हणूनच मी, धम्या, पर्या आणि डाण्या आपली फिगर मेंटेन करून आहोत.
मागची अनेक वर्ष १ ग्रॅमनेही वजन वाढू दिलेलं नाही आम्ही. ज्यादा बोलियाचं काम नाही.
31 Dec 2010 - 5:19 pm | सुहास..
अशा हि & हि टेबलाची आम्हास गरज नाही. >>
मान्य !! आम्हाला फक्त त्या टेबलाची गरज आहे.
पिऊन बाईक चालवण्याच्या आम्ही विरोधात आहोत. कार्यक्रम झाला की रिक्षासाठी पैसे उरत नाहीत. त्यामुळे आम्ही चालतच घरी जातो. त्यात पाऊले वाकडी पडत असल्याने २ किमी चे अंतर आम्ही ५-६ किमीत संपवतो. चालण्यासारखा दुसरा व्यायाम जगात नाही. >>
अमान्य ! आम्ही गाडी चालवत घरी पोहोचतो आणि आजवर भरपुर कॅलरीज घश्याखाली घातल्या आहेत (इतका की आमच्या भंगारवाल्याचा धंदा आमच्यामुळे चालतो असे तो सर्वांना गर्वाने सांगतो) आमचे शारिरिक वजन अजिबात कमी वा जास्त झाले नाही.
31 Dec 2010 - 1:14 pm | सन्दीप
डाएट विस्कि मधे किती कालरीज असतात हो.
31 Dec 2010 - 2:08 pm | प्रसन्न केसकर
यांना व्यनि करावा...
31 Dec 2010 - 2:40 pm | धमाल मुलगा
गप ना! :D
मंडळी, प्रसन्नदाचं ऐकू नका.नायतर दुसर्या दिवशी पॅथलॉजी लॅबमधले तुम्हाला विचारतील, 'काय राव..काल गांधीजयंती सेलिब्रेट करुन आलात काय?' =)) =))
31 Dec 2010 - 2:05 pm | प्रसन्न केसकर
फक्त अल्कोहोल मधल्या आहेत. त्या बरोबर मिसळली जाणारी शीतपेये, चकणा यातल्या कॅलरिजबद्दल पण माहिती द्या की जरा.
आणि ही माहिती मद्यपानाने वाढणार्या रक्तातील अल्कोहोलच्या प्रमाणाविषयी. (उगीच रात्री पोलिसांकडच्या फुंकण्यात फुंकर मारायची वेळ आली तर असावी म्हणुन.)
भारतीय कायद्यानुसार १०० मिली रक्तात ३० मिग्रॅ पेक्षा अधिक अल्कोहोल असताना वाहन चालविणे गुन्हा आहे. व्हिस्की, रम, जीन, व्होडका आदि हार्ड ड्रिंक्सचे दोन पेग किंवा दीड मोठ्या बाटल्या बीयर पिल्यावर सुमारे ४५ मिनिटांनी सामान्य माणसाच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण उच्चतम पातळीस म्हणजे १०० मिली मध्ये ५० मिग्रॅ या पातळीवर पोहोचते. त्यानंतर ते जास्तीत जास्त मिनिटाला ०.१५ मिग्रॅ या प्रमाणात उतरते.
१९८८ च्या मोटर वाहन कायद्याच्या १८५ कलमानुसार मद्यधुंद वाहनचालकाविरुद्ध पोलिस व परिवहन अधिकार्यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ही कारवाई अटक व न्यायालयीन खटला भरुन तदानुषंगीक शिक्षा अश्या स्वरुपाची असते. ताब्यात घेतल्यावर पुरावा जमा करण्यासाठी संबंधितास सरकारी दवाखान्यात नेऊन त्याच्या रक्ताची तपासणी करावी लागते (थोडक्यात `वरात' निघु शकते.) त्यानंतर संबंधितास अटक केल्यानंतर जामीन मिळेपर्यंतचा काळ (सहसा हा दुसरा दिवस निम्मा संपेपर्यंतचा असु शकतो) लॉकअप मध्ये मुक्काम ठोकावा लागतो. त्यानंतर न्यायालयात खटल्याच्या सुनावणीस हजर रहावे लागते. संबंधिताचा दोष सिद्ध झाल्यास न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई (२००० रुपयांपर्यंत दंड) व अपवादात्मक परिस्थितीत तुरुंगवासाची शिक्षा (जास्तीत जास्त सहा महिने) होऊ शकते. या संदर्भात कारवाई झाल्यास संबंधितांच्या नावावर तशी नोंद होते (क्राईम रेकॉर्ड तयार होते.) व त्याचे परिणाम दुरगामी असु शकतात.
एखाद्याच्या सुदैवाने जरी हे सर्व झाले नाही (प़कडले नाही) तरीदेखील मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना अपघात होण्याची शक्यता असतेच. पुण्यासारख्या शहरात दर वीकांताला मद्यधुंद वाहनचालकांमुळे किमान ४ ते ५ अपघात होतात व त्यातील ६० टक्के अपघातात संबंधित वाहनचालकाच्या डोक्यास इजा होते.
(डिस्क्लेमरः या माहितीचा हेतु पार्टी करु नये असा संदेश देण्याचा नसुन पार्टी करताना योग्य ती काळजी घेण्याचे महत्व अधोरेखीत करणे एव्हढाच आहे.)
31 Dec 2010 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार
धन्याचे वादस हो. पण आपल्याला हा प्राब्लेम येत न्हाय. ;)
सायकलवाला
परा
आपले लेखन वाचुन आम्हाला आमच्या प्रिय तात्यावर गुदरलेल्या प्रसंगाची आठवण झाली.
31 Dec 2010 - 2:25 pm | लॉरी टांगटूंगकर
आपले लेखन वाचुन आम्हाला आमच्या प्रिय तात्यावर गुदरलेल्या प्रसंगाची आठवण झाली.
शेठ तुम्ही प्रसंग सांगा.पॉप कर्ण(corn कसे लिहू??)तयार आहेत.
31 Dec 2010 - 2:41 pm | पिंगू
>>> मद्यात खुप जास्त प्रमाणात शर्करा असते
तरीही मद्य कडू असते.. हे कसे काय बुवा ;)
- (कधीही मद्यपान न केलेला) पिंगू
31 Dec 2010 - 3:24 pm | आदिजोशी
"अति झालं आणि हसू आलं" असं होतं त्या साखरेचं
31 Dec 2010 - 5:05 pm | Nile
मिपावर इतक्या कॅलर्या जाळणार्या पर्या, डान्या, नान्या वगैरेंना मद्यांच्या कॅलरीजचा प्रश्नच नाही. प्या लेको बिंधास्त. एखादी बाटली इकडे पण देत चला म्हणजे झालं. (मांजाला सील न फोडलेल्या दारुच्या बाटल्यांची काच फार चांगली असते म्हणुन मागतोय)
31 Dec 2010 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार
कुणाचा 'कायपोचे' करायचा आहे बे ?
31 Dec 2010 - 9:04 pm | रामदास
समोर आणि पायतळाशी बार ,
गर्जा जयजयकार दारूचा गर्जा ज..य..ज.. का...र्र्र्र्र...
1 Jan 2011 - 12:01 am | बिपिन कार्यकर्ते
आपण सुटलो ब्वॉ लफड्यातून!!!! हिक्क्क्क्क्क्क!!!!!!!!!!
1 Jan 2011 - 10:56 am | परिकथेतील राजकुमार
मला बिकाच्या लफड्यांच कायमच कौतुक वाटत आले आहे.
1 Jan 2011 - 11:07 am | श्रावण मोडक
खरंय राव, (लफडी) करतात तरीही सुटतात! ;)
2 Jan 2011 - 2:52 pm | पिवळा डांबिस
अरेरे!!!!!
परमेश्वरा! तू या तुझ्या मेंढरांना माफ कर!!!!
नाहीतर उद्या त्यांची सागुती करण्यावाचून मला गत्यंतर उरणार नाही!!!
४५० नॉनअल्कोहोलिक कॅलरीज!!!!
मग वजन वाढल्याबद्दल मला दोष देऊ नकोस!!!!!
आमेन!!!
2 Jan 2011 - 9:57 pm | विलासराव
२०११ मधे आमचं पिणं बंद.