सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना
मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?
एकाच वाटेचे पक्षी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?
माझ्या डोळ्यातील आसु अन
तुझ्या ओठांवरील हसु
यांचे साधर्म्य जाणताना
सांग ना सखे तुच आता
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?
सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?
--- शब्दमेघ ( डिसेंबर २००६ )
एक आठवण :
मी लिहिलेली माझी ही पहिलीच कविता .. (डिसेंबर, २००६) .. नेटवरतीच पहिल्यांदा कविता लिहायला सुरुवात केल्यानंतर सर्व प्रोत्साहन पर रिप्लाय देणार्या सर्व वाचकांमुळेच पुढचा प्रवास छान झाला ...
लेख आणि त्यातल्या त्यात कविता लिहिणे मला कधीच जमत नव्हते( लेख तर जमत नाहितच अजुन, हाच लेख कसा तरी लिहितोय)... आणि कधी जमेल हे स्वप्नातही वाटत नव्हते .. कारण मराठी मध्ये चक्क मी कायम काठावर पास होणारा मुलगा होतो.. अजुनही शुद्धलेखनाच्या भरमसाठ चुका होतच आहेत..
जून २००६ मध्ये मित्राने ऑर्कुट अकाँट ओपन करुन दिल्यावर ते कसे वापरायचे यामध्येच १-२ महिने निघुन गेले.. हळु हळु कम्युनिटी म्हणजे काय कळायला लागले आणि शब्दांच्या प्रवासास सुरुवात झाली.
डिसेंबर पर्यंत कविता फक्त वाचायचो .. रिप्लाय द्यायचो .. नेटवर बसण्याआधी फक्त एक कविता पाठ होती ती म्हणजे "कणा" .. यापलीकडे कवितेचे जग माझे तरी जास्त नव्हते ..
लोक कसे कविता करतात याचे खुप कोडे पडायचे मला ..
हळु हळु रिप्लाय देत देत शब्द जोडु लागलो होतो .. आणि विशेष म्हणजे शब्दांपेक्षा ही जास्त असे असंख्य मित्र त्यामध्ये जोडले गेले , बरेचसे जे आजही माझ्या सोबत आहेत .. आनंद त्या गोष्टीचा जास्त आहे ..
कविता लिहायला सुरुवात केल्यावर भेटलेले - नाम गुम जायेगा (सुनिल सामंत), राहुल देशपांडे , सनिल पांगे , संदिप सुरळे , सुधीर मुळीक, चैताली आहेर , विजय कणसे, स्व.अहं ब्रम्हास्मी या मित्रांकडुन लिहिण्यास खरेच खुप प्रोत्साहन मिळाले ..
माझ्या कवितेच्या प्रवासाचे खरे उगमदाते हेच आहेत..
कवितेच्या प्रोग्रॅम साठी जेंव्हा पहिल्यांदा पुण्यात गेलो होतो आणि घरी कळाले की गाणे-कविता च्या प्रोग्रॅमसाठी हा रात्री घरी आला नाही त्यावेळी आईची प्रतिक्रिया होती काय भिकारनाद लागलाय पोराला . असो ..
कविता लिहायला लागलो.. कविता वाचुन दाखवणे किण्वा मित्रांना ऐकविने हे जमत नसल्याने (अजुनही जमत नाहिच त्यामुळे मित्र जवळ राहिले आहेत असे मला वाटते .. त्यामुळे तुम्ही मित्र नसाल तर मैत्री करु शकता .. कवितेचे शब्द कधीच आयकायला मिळणार नाहि .. हा पण मित्र झाला तर शिव्या ऐकावव्या लागतात ती बात वेगळी) बर्याचश्या कविता तश्याच विस्मरणात जात होत्या.. आणि मग मला आनखिन एक सवय लागली ती डायरी मेंटेंन करायची ..
पहिली डायरी जेंव्हा माझ्या मित्र मैत्रीनींनी वाचली तेंव्हा मी ढापुन कविता करतो हेच त्यांचे माझ्याबद्दलचे मत होते ..
कारण मुळातच गावाकडची भाषा बोलणारा .. बर्यापैकी उद्धठ .. आणि दु:खाचे लवलेशही चेहर्यावर नसणारा एकुलता एक बिन्धास्त मुलगा असणारा मी आणि डायरीतील रडक्या, करुन कविता यांचा ताळमेळ असणे शक्यच नाही असे त्यांचे म्हणने होते ..
उलट नेटवरील असल्या धंद्याने तु गोत्यात येशील .. आणि नेटवरील मुली चाट करुन फसवतात तु नादि लागु नको .. भोळसाट आहे जरा तू .. असले बरेचसे डोस कायम पाजले जायचे.
"अशीच एक राधा" या स्त्री प्रोफाईल नावाने लिहिलेल्या स्त्रीच्या कवितेमुळे खुप वाद-संवाद झाले, कविता येथे दिल्याच आहेत त्या .. पण पुन्हा असा फेक प्रोफाईल घेवुन कविता लिहायचे नाही हे कळाले .. परंतु राधा म्हणुन ओळखणारे अजुनही त्याच प्रोफाईलने लिहिना असे जेंव्हा म्हणतात तेंव्हा ही छान वाटते ..
आपले नाव खुप कॉमन आहे म्हणुन एखाद्या कवितेचे नाव आपल्या प्रोफाईल ला द्यायला पाहिजे असे सगळ्या मित्रांचे मत होते .. शेवटी संदिप ने "शब्दसखा - शब्द झाले मोती" आणि मी माझ्या शब्दमेघ या कवितेवरुन "शब्दमेघ" या नावाने लिहिण्यास सुरुवात केली ..
कविते मुळे आणिखि एक मार्ग मिळाला ..र अंधशाळेतल्या मुलांसाठी ब्रेल लीपीतील पहिल्या कविता प्रकाशित करता आल्या , "शरपंजरी या एक्त्रीत केलेल्या पुस्तका नंतर त्यांच्याच साठीच्या " ये ना तु सख्या" ह्या राहुल सरांच्या अल्बम साठी गाणे देता आले. हा पुर्ण अल्बम हा रंग .. आकारमान यांच्या व्यतिरिक्त आहे हे सांगितले तर कोणाला खरेच वाटत नाहि .. आणि विशेष म्हणजे ऑर्कुट वरती भेटलेलो आम्हा मित्रांचा एकत्र अल्बम निघाला (काही गाणी येथे ऐकता येतील - www.jayshreeganesha.blogspot.com
( झाडांच्या पानात - गणेशा, पिकल शिवार - संदिप , ये ना तु सख्या - चैताली, सावरतो आवरतो पाउस - राहुलसर)
आजकाल हा प्रवास मंदावला आहे , तरी मिसळपाव ने खुप छान मित्र मैत्रीणी दिले आहेतच पण विशेषकरुन प्रकाश सर , नगरीनिरंजन , पाषानभेद यांच्या कवितेमुळे लिहिण्यास प्रोत्साहन मिळते आणि बाकीच्यांच्या आपुलकीच्या शब्दांमुळे खुप छान वाटते .. हा प्रवास जरी मंद झाला असेन तरी नक्कीच काही दिवसात पुन्हा लिहिण्यास सुरुवात होयील आणि याचे श्रेय फक्त मिपाला असेन ..
थांबतो .. बरेच लिहायचे राहुन गेले .. बरेच मनात नसताना लिहिले गेले .. लेख जमत नाहि अजुनही तुम्हाला हा प्रवास बरा वाटला तर कळवा ..
-- गणेशा
प्रतिक्रिया
28 Dec 2010 - 8:23 pm | प्रकाश१११
माझ्या डोळ्यातील आसु अन
तुझ्या ओठांवरील हसु
यांचे साधर्म्य जाणताना
सांग ना सखे तुच आता
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?
हे खरेच तू छान लिहिले आहेस .आणि तू छान लिहितोस .मी थोडासा वेळ जावा म्हणून लिहित असतो .
28 Dec 2010 - 8:53 pm | गणेशा
धन्यावाद ......
तुम्ही वेळ जाण्यासाठी म्हणत असताल .. पण त्या मध्ये ज्या बारीक बारीक गोष्टी येतात ना त्या पण तुम्ही खुप छान पद्धतीने टिपलेल्या असतात .. असे छोट्या छोट्या गोष्टींचे टीपन सहज लिहिताना जो करतो तोच खरा कवी असतो कारण असे जेंव्हा एखादा लिहितो तेंव्हा त्या निर्मितीचा आनंद नक्कीच खुप ग्रेट असतो आणि तो तुम्ही कायम घेतच असाल ह्याची मला १०० % गॅरंटी आहे
तुमची हीच गोष्ठ खुप शिकण्यासारखी आहे, पण ती अनुभवानेच येइल असे मला वाटते .. (बरोबर .. ?? )
आपला - गणेशा
28 Dec 2010 - 8:29 pm | प्राजु
कविता आणि लेख दोन्ही छान आहे. लिहित रहा.
29 Dec 2010 - 1:55 pm | चाणक्य
असेच म्हणतो
28 Dec 2010 - 8:31 pm | सुहास..
कविता वाचुन एका मित्राची आठवण झाली !!
तरी मिसळपाव ने खुप छान मित्र मैत्रीणी दिले आहेतच पण विशेषकरुन प्रकाश सर , नगरीनिरंजन , पाषानभेद यांच्या कवितेमुळे लिहिण्यास प्रोत्साहन मिळते आणि बाकीच्यांच्या आपुलकीच्या शब्दांमुळे खुप छान वाटते .
पाषाणभेद , असे नाव आहे ते . ( आमच्या मित्राच ना व्यवस्थित घ्यायच बरे का ? शाहीर पाषाणभेद ;) ) असो एकुण प्रवास आणि(मंदावलेला का असेना) या लेखाचा प्रवास आवडला .
मी थोडासा वेळ जावा म्हणून लिहित असतो . >>
आम्ही का लिहीतो ? हाच आम्हाला पडलेला प्रश्न आहे.
28 Dec 2010 - 9:01 pm | गणेशा
शाहीर पाषाणभेद .. अशी कायमस्वरुपी नोंद केली आहे .. धन्यवाद..
आणि बरे झाले तुम्ही फक्त तुमच्या मित्राच्या नावाचेच शुद्धलेखन पाहिले इतर पाहिले असते अवघड झाले असते ..
आणि जरी पाहिलेच असते तरी मिपा- पोलीस असा किताब तुम्हाला मी तरी दिला असता. शुद्धलेखन चुकले तर पोलीस पकडेन या भीतीने तरी असंख्य चुका करणारे (माझय सारखे) घाबरुन निट तरी लिहितील.. !!
28 Dec 2010 - 9:33 pm | प्रीत-मोहर
मस्त लिहिता गणेशा..असेच लिहा..
शुभेच्छा पुढील प्रवासाला :)
29 Dec 2010 - 10:29 am | पियुशा
तुम्हि मस्त लिहिता !
लिहित रहा आम्हि वाचत राहु
पु.ले.शु.
29 Dec 2010 - 10:42 am | प्राजक्ता पवार
कविता छान आहे . लिहित रहा.
29 Dec 2010 - 11:18 am | ज्ञानराम
सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?
हे कडवे आवडले.... प्रवास जरी मंदावला असला तरी. तो पुर्ण व्हावा ही सदिच्चा.
29 Dec 2010 - 11:47 am | स्वानन्द
खूपच छान कविता आहे. मला कविता वाचायला फारशा आवडत नसत. पण संदीप खरेच्या कविता वाचन ऐकल्यावर मला कवितेची गंमत आणि ताकत कळली. प्रतिभावान कवी अगदी मोजक्याच शब्दात कितीतरी गोष्टी अगदी ताकतीने सांगतो तेव्हा खरंच नतमस्तक व्हावसं वाटतं त्या प्रतिभेपुढे.
बाकी लिखाण मंद होणे वगैरे चलता है. शेवटी कला आहे ती. बळजबरी करून आपल्या हाताखाली राबवता येत नाही तिला. आपण मनापासून प्रयत्न करत रहायचे. ती प्रसन्न झाली की आपोआप प्रकट होते. ( हे आपलं माझं मत.)
पु.ले.शु.
29 Dec 2010 - 1:20 pm | गणेशा
सर्वांचे मनपुर्वक आभार मित्रांनो
30 Dec 2010 - 10:31 am | समीरसूर
खूप छान कविता.
माझी तू त्याची होताना...
शीर्षकच खूप काही सांगून जाणारे आहे. आवडली.
आपली गाणी प्रकाशित झालेली आहेत हे वाचून आपल्याविषयीचा आदर दुणावला. ऐकायला आवडतील. :-)
30 Dec 2010 - 6:39 pm | कानडाऊ योगेशु
जुन्या आठवणी जागवल्यास लेका गण्या तु!
ह्या कवितेनंतर "अमक्याची तू तमक्याची होताना" ह्या फॉरमॅटवर असंख्य विडंबने/अनुकरणे आली होती त्याचीही आठवण झाली.!
30 Dec 2010 - 8:10 pm | गणेशा
योग्या भाड्या .. काय मस्त दिवस होते ना .. जेंव्हा आपण कविता लिहायचो (नाही आपल्या भाषेत पाडायचो)..
मी तरी जुण्या पुराण्या टाकुन राहिलोय ना बे .. तु तर कुठं गडप बिडप झालाय लेकाच्या ..
परवाच "अंतर्धान" वरील तुझे ते विडंबन आठवत होतो .. पण मिळाले नाय यार कोठे मिळाले तर दे
30 Dec 2010 - 7:22 pm | नगरीनिरंजन
पहिलीच कविता छान लिहीलीस गणेशा! तुझा प्रवास भविष्यातही जोमाने होवो ही शुभेच्छा! माझ्या कविता तुला आवडल्या हे वाचून आनंद झाला.
30 Dec 2010 - 8:12 pm | गणेशा
धन्यवाद हो ..
पहिल्या कवितेचा उगम सत्यातुन झालेला असतो ना म्हणुन ती छान वाटली असेन.
बाकी नगरशी नाते तेंव्हापासुनचे आहे आमचे [:)]