२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा.
श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत. पुढील कथेतून स्वामी समर्थांची दत्तभक्ती दिसून येते.
एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले.त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले.तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले.समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे.
श्री समर्थ रामदास स्वामींची पुढील आरतीही त्यांच्या दत्तभक्तीची साक्ष देते -
विधीहरीहर सुंदर दिगंबर झाले|
अनसूयेचे सत्त्व पहावया आले|
तेथे तीन बाल करूनि ठेवले|
दत्त दत्त ऐसे नाम पावले||१||
जय देव जय देव जय दत्तत्रेया|
आरती ओवाळू तुज दत्तत्रेया||धृ||
तीनही देवांच्या युवती पतीमागे आल्या|
त्यांना म्हणे वळखूनी न्या आपल्याला|
कोमल शब्दे करूनी करुणा भाकिल्या|
त्यासी समजाविल्या स्वस्थानी गेल्या||२||
काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन|
मातापुरि शयन होते प्रतिदिन|
तैसे हे अघटित सिद्ध महीमान|
दास म्हणे हे तो नव्हे सामान्य||३||
प्रतिक्रिया
19 Dec 2010 - 10:57 pm | सुनील
भीषण कथा!
बाकी दत्त हे भगवानाचे रूप फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्तर भाग येथेच ठाऊक आहे. उर्वरीत भारतात दत्ताला फारसे स्थान नसावे!
परंतु, "दत्त" हे आडनाव मात्र फक्त पंजावी आणि बंगाल्यांच्यात आढळते! पैकी , मला (बॉलीवूडमधिल) पुरुषी पंजाबी "दत्त" पेक्षा बंगाली स्त्री "दत्तीणी" अधिक आवडतात!
असो, आमच्या घराण्यात दत्त जयंती ही दुसर्या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे, तेव्हा हंडीत कोंबडं-बकरं शिजवण्यास आज हरकत नाही!
19 Dec 2010 - 11:20 pm | प्रियाली
पंजाबी दत्त (सुनील दत्त वगैरे ) हे तेथील सारस्वत ब्राह्मण आहेत. त्यांच्या दत्त या आडनावाचा आणि दत्त या दैवताचा फारसा संबंध नाही. दत्त हा शब्द दाता या अर्थाने वापरला जात असावा. चारुदत्त, शिवदत्त, वासवदत्ता वगैरे नावे हिंदु संस्कृतीत पुरातन आहेत.
दत्त/ दत्ता असे आडनाव लावणार्या बंगाल्यांचाही संबंध दत्त या दैवताशी नसावा पण नक्की माहित नाही.
22 Dec 2010 - 11:19 am | योगप्रभू
सुनील दत्त हा हुसैनी ब्राह्मण किंवा मोहयाल ब्राह्मण या पोटजातीतील आहे. या दत्त समुदायाचा पूर्वज राहिब दत्त याने करबलाच्या लढाईत इमामांच्या बाजूने लढून आपली सात मुले कुर्बान केली होती. त्यानंतर त्यांचे व विशेषतः शिया मुस्लिमांचे घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले व भारतात परतल्यावर ते स्वतःला हुसैनी ब्राह्मण म्हणवून घेऊ लागले. यातील अनेक लोक बिहारमध्ये स्थाईक होऊन तेथील भूमिहार ब्राह्मण या समाजातील पोटजात म्हणून मिसळून गेले. या लोकांना 'आधा हिंदू आधा मुसलमान' असे म्हणतात कारण त्यांच्या आचार-विचारात हिंदू-मुस्लिम प्रथापरंपरांचा संगम दिसून येतो. हुसैनी ब्राह्मण मोहरम, रोजे, उपवास, मातम करतात आणि बाकी चालीरीती हिंदूंप्रमाणे असतात. मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंधही यांच्यात मान्य असतात. म्हणूनच सुनील दत्तचा विवाह नर्गीसशी होऊ शकला. त्याचा मुलगा संजय याने पहिली पत्नी हिंदू केली व घटस्फोटानंतर केलेली दुसरी बायको (मान्यता) ही मुस्लिम आहे.
22 Dec 2010 - 5:57 pm | प्रियाली
सुनील दत्त मोहयाल ब्राह्मण आहेत असे वाटते. मोहयाल ही सारस्वत ब्राह्मणांची शाखा असल्याचे कुठेतरी वाचले होते. चू. भू दे. घे. माहितीबद्दल धन्यवाद.
परंतु
हे पटले नाही. दोन्ही विवाह हे अरेन्ज्ड मॅरेजेस नाहीत. सुनील दत्तचे नर्गीसवरील प्रेम आणि तिच्यासाठी मदर इंडियाच्या वेळेस त्याने पत्करलेला धोका वगैरे ठाऊक आहे. तेव्हा मुस्लिमांशी रोटी-बेटी संबंध मान्य आहेत म्हणूनच ही लग्ने झाली असा दावा करता येत नाही. अशाप्रकारे अनेक कलाकारांमध्ये हिंदू मुस्लिम विवाह झालेले आहेत. असो.
20 Dec 2010 - 9:53 am | कवितानागेश
दत्त हे भगवानाचे रूप फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्तर भाग येथेच ठाऊक आहे>>>
तुम्ही फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकातच फिरला आहात हे कळले! (ह.घ्या)
दत्तमंदीरे भारतभर आहेत.
(रशिया/अमेरिका/इन्डोनेशिया याबद्दल मला देखिल माहित नाही)
20 Dec 2010 - 6:52 pm | सुनील
दत्तमंदीरे भारतभर आहेत
शक्य आहे. पण माझ्या ओळखीतील कुणालाही (मराठी / उत्तर कर्नाटकी सोडून) दत्त माहीत नाहीत.
असो. माहितीबद्दल धन्यवाद.
22 Dec 2010 - 9:45 am | llपुण्याचे पेशवेll
गुजराथी लोकांना पण दत्त माहीत आहे. मध्यप्रदेशात अनेकांना दत्त माहीत आहेत, मध्यप्रदेशात अनेक दत्तमंदीरेही आहेत.
20 Dec 2010 - 3:06 pm | देशपांडे१
कोण स्वामी समर्थ ?
..
एकच जाहला समर्थ ...बाकी सगळे शून्य
त्रैलोक्यास पडे ठावे। सामर्थ्य जयाचे॥ समर्थ रामदासस्वामी
20 Dec 2010 - 1:16 am | गवि
प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो..
कसल्या या कथा?
"भूक लागली", हंडी भरत नाही म्हणून पोरेही कापून त्यात घातली.
कधी काय म्हणे बापऋषी भडकले, उडव आईचे मुंडके...आयजीच्या जिवावर भक्ती..?
चिलया बाळाचे पण असेच काहीसे.ऊठसूट पोरांना अन्न म्हणून वापरुन कसली आलीय परीक्षा. त्यांचा जीव काय तुमच्या फुकट मालकीचा झालाय का की घडा भरायला,पाहुण्याला रिझवायला घाला त्याचे मांस? स्वत: दत्त आले आणि आम्ही ओळखले तरी आम्ही आमच्या पोराला असल्या पाहुण्यांसाठी बिस्किटपुडा आणायला पण खदेडणार नाही.जाव दे.
आणि सगळेजण पळाले ते सकाम आणि जे बसले ते निष्काम? तर मग ते न पळण्याचे कारण दिलेय की त्यांनी यांचे खरे रूप ओळखले होते.म्हणजे जिवाची खात्री अतएव अभय समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते?क्षमेसह विचारतो.
20 Dec 2010 - 1:20 am | शिल्पा ब
सहमत.
20 Dec 2010 - 1:30 am | गवि
बरं. समजा या कथेत सर्व काही मायावीच होते आणि फक्त भक्तांना घाबरवून जिवाची भीती घालून परीक्षा पहायची होती म्हणून पोरांना हंडीत घातले आणि इतरांना भिववले. तरी शेवटी कथेचा संदेश काय?परमेश्वर दर्शनासाठी प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा?की पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा?
हे means "निष्काम"?
काय आहे हे?
20 Dec 2010 - 1:58 am | शुचि
समर्थ रामदास स्वामी आणि दत्तभक्ती असा लेखाचा विषय आहे. त्यासंदर्भातील कथा आहे. कथेतून संदेश वगैरे मला तरी द्यायचा नाहीये. आपल्या मताचा आदर आहे.
20 Dec 2010 - 2:11 am | गवि
शुचितै,तुम्हाला personally कथेतून संदेश द्यायचा नाही हे समजलंय हो अर्थातच. मी मूळ लेखकालाच म्हणतोय.तुम्ही स्वत:वर घेऊ नका हो.
बादवे: हपीसात काही FYI संदेश येतात तशी तुम्ही उगीचच For Your Information Only..(no action required) संगितली असेल कथा फक्त तर मग काहीच म्हणणं नाय. :)
20 Dec 2010 - 2:35 am | शुचि
गवि, संतसाहित्य, स्वामी समर्थ संप्रदाय आदि गोष्टींचा अभ्यास करणारेदेखील अभ्यासक असतात. कदाचित त्या लोकांना ही माहीती उपयोगी पडू शकेल.
मला तर ही गोष्ट आवडली. तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली. सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं. देव कधी कधी स्वप्नात येऊन दृष्टांत देतो यावर विश्वास दृढ झाला. सर्वांना या गोष्टी पटाव्यात असा आग्रह नाही. प्रत्येकाचा पिंड भिन्न असतो. पण मला या गोष्टी आवडू नयेत असा दुराग्रहदेखील बरोबर नाही.
तुम्ही तसा दुराग्रह धरताय असं माझं म्हणणं नाही. असो.
आरती तर सुंदरच आहे.
20 Dec 2010 - 3:37 am | आत्मशून्य
की कीतीही वाईट प्रसंग आले, दीसले, जाणवले तरी परमेश्वराला सकाम भक्तीने शरण जाण्यापेक्षा नीश्काम भक्तीने शरण जाणेच योग्य.
बाकी या कथेमधे परमेश्वर दर्शनासाठी पोरांना हंडीत घाला,प्रसंगी पोरांनाही भक्ष्य करा पती चे पोट भरण्यासाठी पोटची पोरे सप्लिमेंटरी अन्न म्हणून सोबत घ्या आणि भुकेला कमी पडली तर वापरा अथवा कोणताही हिसाचार बीभीत्सपणा करणे आवश्यक आहे असे कूठेतरी लीहिले आहे काय ?
सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही (म्हणजेच नीश्काम भक्ती सत्य दाखवते) असा धडधडीत उघड संदेश कथे मेधे दीलेला आहे ते सोडून गाढवासारखे जे लीहले नाहिये ते तात्पर्य मानयला काय तूम्ही भ्रमीश्ट झालात काय ? भल्त्याच गोश्टी सूचतात तूम्हाला interpret कराय्ला ?
लेको साधी सरळ तात्पर्य सांगणारी गोश्ट आहे आणी कथेतील ऊघड व्यक्त केलेले तात्पर्य सोडून बाकी सगळच तूम्ही चाटताय की ?
20 Dec 2010 - 3:38 am | शिल्पा ब
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही?
शंका: केवळ कोणालातरी देव दिसला असं वाटून कोणी लोकांची खांडोळी करून त्याला जेवायला वाढले तरी आक्षेप घ्यायचा नाही असा निष्कर्ष निघू शकतो...कारण समजा एखाद्या अडाणी माणसाने यावर विश्वास ठेवला तर ...? आणि आजच्या जगातही आपण असे बळी दिल्याचे वाचतोच ना? मग अशा प्रकारच्या कथा अंधश्रद्धा पसरवतात याला तुम्ही आक्षेप कसं घेता? तुम्ही किती ठिकाणी या कथेतून असा अर्थ निघतो जो योग्य आहे असं सांगत फिरणार?
20 Dec 2010 - 4:03 am | आत्मशून्य
ह्यावर स्पश्ट सागंता येते की ?भक्ती नीश्काम असेल तर कोणालातरी न्हवे तर प्रत्येक नीश्काम भक्ताला देव दीसेल आणी अशा द्रूश्यातील फोलपणा जाणवेल अनूभवाला येइल.
शंकासमाधानः आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांबाबत घडलेल्या misinterpretation मूळे जन्माला येतात.
उदाहरण म्हणून वरील बोल घ्या - म्हणे समजले म्हणून बसले एरवी पळालेच असते आरे महामूर्खा जिवाची खात्री नसणारे पळणारच की त्यात अनैसर्गीक काय आहे ? पण ज्या नीश्काम भक्तीमूळे तूम्हाला सत्यस्वरूप दीसले, जीव आणी शिव यांचे एक्य अनूभवाला आले, जेथे आत्म्याचे अमरत्व कळाले तेथे जीवाची भीतीच रहातच नाही अशा स्थीतीत पळून नाही गेले यात तूम्हाला उपहास करण्यासारखे अनैसर्गीक काय जाणवले बूवा ?
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन निष्काम म्हणजे नक्की काय करायचे नाही?
ह्यावर एक स्वतंत्र लेख लीहावा लागेल. इथे वीषय मावणार नाही.
20 Dec 2010 - 4:09 am | शिल्पा ब
<<<आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ?
आणि समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे असं आपलं मत आहे? अंधश्रद्धा का पसरते? अजुनही लोक असे बळी का देतात?
माफ करा पण अजिबातच समजत नाहीये म्हणुन पुन्हा विचारतेय?
20 Dec 2010 - 5:42 am | आत्मशून्य
याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात.
उदा:- ज्ञानेश्वरीमधे एक ओवी अशी आहे... जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात |
आता तूम्हीच थोडा वीचार करा वरील वाक्य जगाच्या ज्ञात अज्ञात इतीहासात कधी सत्य ठरले ? की सगळ्यानाच जे हवे ते मीळालेय ? हे अशक्यच नाही काय ?म्हणजेच १ माणूस म्हणाला मला अमूक गोश्ट मीळो, दूसरा म्हणाला कूणालाच कधीही काही न मीळो आता हे साध्य होइल काय ? कींबहूना
मग कोणत्या अर्थाने माऊली अशी म्हणाली आणी त्याचे कारण व साध्य ह्यामधे मतमतांतरे लोकांच्या बूध्दी प्रमाणे नींर्माण होणारच, म्हणजे सर्वच श्रधाळू पण १ सोडून एतर सर्व अंधश्रध्दाच की, मग या वरून माझेच खरे ह्या साठी वाद आणी स्वतःच्या मताच्या सामर्थ्यासाठी पून्हा आपलीच अंधश्रध्दा कूर्वाळने आलेच. अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक याच्याकडून सतपूरूशांच्या शीकवणूकीच्या अथवा त्यांनी दीलेल्या ज्ञानाच्या व्याख्येच्या misinterpretation मूळे जन्माला येतात. आणी मनूश्याच्या भौतीक गरजांच्या आगतीकतेवरती पोसल्या जातात. म्हणून या व्यक्ती तीतक्या प्रक्रूती सदरात मोडतात... म्हणूनच यांची व्याप्ती प्रचंड आहे. आपल्या क्रूती श्रध्दा आणी अनूभवांचे सावध आणी डोळस नीरीक्षण हा एकमेव यापासून लांब रहण्याचा मार्ग आहे.
कदाचीत हे ऊत्तरही तूम्हाला संपूर्ण समाधान देऊ शकणार नाही कारण त्याच्या समाधानासाठी अंधश्रध्देचा अनूभव व अभ्यास आणी तसाच तीतका नसला तरी श्रध्देचा अनूभव आणी अभ्यास उपयोगी पडेल.
समाजात असे अज्ञानी अन महामुर्ख लोक ते तुम्ही म्हणता तसे निष्काम वगैरे लोक यांचे प्रमाण काय असावे.
मोजणी केली नाही. पण निष्काम लोकांचे प्रमाण नीश्चीतच अत्यल्प असावे. तसेच हे प्रमाण कलीयूग अथवा इतर यूगांशी संबधीत अजीबात नाही. मूळात हा फरक ओळखणे थोडे कठीन काम आहे. म्हणजे जसे केवळ हलचाल केली नाहीये म्हणून दोन व्यक्ती मधील नेमकी कोणता व्यक्ती स्वप्न पहात आहे हे ठाम ठरवता येते काय ?
20 Dec 2010 - 5:37 am | गोगोल
> आणी जे महामूर्ख अज्ञानी आहेत ते अर्थातच ह्याला हिंसाचार म्हणून वीरोध नाही का करणार ? मग कशाला अंधश्रद्धा पसरतील.
म्हणजे उद्या समजा तुमचा शेजारी असा क्लेम करतो की तो विष्णूचा अवतार आहे. मग तो त्याच्या मुलांना कापून हन्डित घालतो आणि मग बायकोला म्हणतो की अत्माशुन्याची मुलं पण कापून घाल. याला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरणार की तुमचे मूलं कापून देणार?
- अक्कलशून्य
20 Dec 2010 - 5:41 am | शुचि
माझा या प्रतिसादावर आक्षेप आहे. हा फार वयैक्तिक होतो आहे. समं कडे तशी तक्रार करते आहे.
20 Dec 2010 - 5:54 am | आत्मशून्य
त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच.
पण त्यानी माझे या पानावरील सर्व प्रतीसाद वाचले असतील तर त्यांच्या शंकाना योग्य ऊत्तर आहेच. बाकी लोक फार मोठ्मोठ्याना misinterpret करतात मग मला कोणी गाढ्व म्हटले तर राग कूठवर धरणार ?
20 Dec 2010 - 5:56 am | शुचि
मला मुलांचा संदर्भ खटकला. असो.
20 Dec 2010 - 6:24 am | संकेत
मुलांचे संदर्भ तुम्हाला खटकले असते तर असले बिन्डोक लेख तुम्ही लिहिले नसते.
20 Dec 2010 - 6:31 am | आत्मशून्य
लेख बिन्डोक आहे की नाही यापेक्शा तात्पर्य काय आहे हेच अभ्यासा, ऊपयोगाला ते येते.. बाकी गोश्टी फक्त वाद करतात.
पंचतंत्र माहीत असेलच त्याची ऊपयूक्तता पण कळत असेल.. आता त्या गोश्टवाचून शेवटी काय बिन्डोकपणा आहे कोल्हा कधी बोलतो काय एव्ह्डेच अकलेचे तारे ऊधळता येणे अपेक्षीत आहे काय ?
20 Dec 2010 - 6:53 am | गोगोल
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय?
बाय डिफॉल्ट, पंचतंत्र तील गोष्टी या गोष्टी आहेत हे भोल्या भाबड्या लोकांना ही माहीत असते. या दोन गोष्टींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय.
20 Dec 2010 - 7:36 am | आत्मशून्य
उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन जर मूल कापायला सांगितल तर लोक करणार नाहीत काय ?
तूम्हाला असे म्हणाय्चे होते काय की एखाद्या मान्त्रिकने या गोष्टीचा दाखला न देता जर मूल कापायला सांगितल तर लोक वीरोध करणार नाहीत काय ?
मला वाटते सफरचंद आणी टॉमेटोची तूलना न करण्या इतपत भारतीय खेड्यातील लोकही हूशार आहेत.
20 Dec 2010 - 7:07 am | आमोद शिंदे
हे काय नविनच? मुलांचा संदर्भ तुम्हाला आणि तुमचे समर्थन करणार्या अक्कलशुन्यांना चांगलाच आवडलेला दिसतो.
20 Dec 2010 - 7:17 am | आत्मशून्य
मी फक्त कथेचे तात्पर्य काय असावे या बाबत बोललो आहे.
मला नावडने आणी आवडने ह्याने तूम्हाला ते कळण्यास मदत झाली की तूम्हीबी झिन्ग्ल्यावानी न्हाइत्या इचारात भर्कट्ताय ?
20 Dec 2010 - 7:47 am | आमोद शिंदे
तात्पर्य काही का असेना लहान मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय?
20 Dec 2010 - 7:58 am | आत्मशून्य
तात्पर्य काही का असेना लहान मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय ?
जो तात्पर्याकडे दूर्लक्ष कर्तूया, त्याच्या लहान मुले कापण्याकडे लक्ष जाण्याला कीती म्हून म्हत्व द्यायचा ? जो सोन सोडून लोखंड मौल्यवान समजतूया. सून्दर नदीकीनारा सोडून लैघान पाण्याचे डपकेच जास्त पसंत करतूया, हीरे सोडून दगड जमवतूया... तेजस्वी रूपेरी कीनार सोडून ढगाचा काळेपणाच जास्त न्याहाळतूया........
20 Dec 2010 - 8:45 am | अप्पा जोगळेकर
श्री. आत्मशून्य,
तुम्हाला नरमांस आवडते का ? त्याची पाकॄ संस्थळावर देउ नये अशी विनंती आहे.
20 Dec 2010 - 6:57 am | गवि
आत्मशून्यजी,
Your quote:
>>>>>>>>>
त्याना मला - अक्कलशून्य म्हणायचा पूर्ण अधीकार आहे, मी सूध्दा इथे वयैक्तीक नाव घेऊन कोणावर तरी अशी टीका केली आहेच.
>>>>>>
आपण मला काही न समजलेल्या गोष्टींबाबत महामूर्ख बावळट म्हणालात पण आम्ही माट्र वयैक्तीक नाव घेऊन कोणावर टीका केलेली नाही याची नम्र नोंद आमच्या आणि शुचितैंच्या उपरिनिर्दिष्ट संवादातून आपल्याल येईलच. आपली श्रद्धास्थाने दुखावली गेल्यावर निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो.
माझ्या महामूर्ख बावळट डोक्यात इतपत तरी समजूत ठेवल्याबद्दल मी जगन्नियंत्याचे (अश्रद्ध असलो तरी जमेल तसे) आभार मानतो.
(बावळट) गवि
20 Dec 2010 - 7:30 am | आत्मशून्य
मी सूध्दा वैयक्तीक बाबीत जाणार न्हवतो पण मी आपले नाव लीहिले कारण पहीला प्रतीसाद आपल्यालाच द्यायचा होता आणी चर्चेला अशी भडक सूरूवात करून लोकांची reaction बघायची होती की लोक मला टीकीचे धनी जास्त करतील की त्यानी कथेमधील तात्पर्याकडे लक्ष दीलेले नाही हे जास्त बघतील आणी मी या पानावरच एका प्रतीसादात तसे स्पश्ट केलेले आहेच तसेच जर आप्ल्याला तो अनावश्यक अपमान वाटत असल्यास मी त्याबद्दल माफी पण मागतो.
निष्कामतेचा एक भाग असलेले निष्क्रोध राहणे कठीण असते हे मी समजून घेतो :
क्रूपया गैर समज बाळगू नका व मला गांधीवादी तर मूळीच बनवू नका, एथे अर्जूनाने केलेले संपूर्ण यूध्द नीश्काम गणले जाते, तेवां निष्कामतेबाबत एका जाणकाराकडूनच माहीती घ्या म्हणजे अशी अंधश्रध्दा टळेल
20 Dec 2010 - 7:34 am | गवि
ठीक. गैरसमज मिटला. धन्यवाद.. :)
20 Dec 2010 - 7:49 am | आत्मशून्य
पण जाती व्यवस्थेची किड आणी त्यासोबत अध्यात्माला चीकटलेला PRESENTATION मधील अवघड्पणा मूळेच लोक भरकट्त्यात, भडकत्यात, नावे ठेव्त्यात, तात्पर्य इसरत्यात, आन नेमके हेच टाळून आपलेच ज्ञान पून्हा पाश्चीमात्य संस्क्रूती आप्ल्याला Ageless Body Timeless Mind, The Monk who sold his ferari अथवा ओशो चे पूस्तकमधून इकत घ्यायाला लावते. आन ते आप्ल्याला लै झ्याक वाटते, कारन त्यात त्याने तात्पर्यावरच भर दीलेला अस्तूया. ते बीभीत्स अथवा भडक वंगाळ भाग गाळून टाक्त्याती. आहे टाळायाला आप्ले आपनच शीकायला पायजेल :)
20 Dec 2010 - 6:24 am | आत्मशून्य
भूगोल साहेब हा इन्शूरन्स मॅटर न्हवे की क्लेम करावा ? शूध्द प्रचीती ही क्लेम आणी प्रीटेन्शन रहीत असते. त्याला रोकडा अनूभव म्हणतात.
जसे मी म्हणालो अंबा गोड असतो , असा गोड असतो, तसा गोड असतो, पण तो तूम्ही खाललाच नसेल तर ती फक्त जाहीरातच ना ? आता तो खाल्लाच नसेल तर त्याच्या गोडपणाची (शेवटी फक्त) कल्पना करायला अक्कल लागते. पण प्रत्यक्षात खाल्ला तर त्याची चव अनूभवायला अक्कलशून्यता पूरेशी असते.
आणी हो ऊत्तर द्यायचे राहीलेच की ?
ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील.
शिल्पा ब तै हे घ्या misinterpretation चे अजून एक ताजे ऊदाहरण की लोक स्वतःच्या मताचा अनूनय कसा करतात.
20 Dec 2010 - 7:01 am | गोगोल
फारच गंभीर्यानी घेतला. ते फक्त गवी आणि इतरांना महामूर्ख ठरवन्याबद्दल होते.
> ते फार सोप आहे, जर माझ्याकडून नीष्काम भक्ती आचरली जात असेल तर कोणत्याही फ्रॉड क्लेम करणार्यच्या
> बापाची पण हीम्मत नाही को तो मला हे पट्वू शकेल की मी माझ्या मूलांचा बळी द्यावा. म्हणून म्हटले ना थोडे सावध > आणी सजगपणे नीरीक्षण करा आणी तूमच्या मनातील अंधश्रध्दा तत्काळ दूर होतील.
हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती.
20 Dec 2010 - 7:14 am | आत्मशून्य
शून्याचा सराव हाय. तवा तस काय बी समजू नका
हे आर्ग्युमेंट फारच "सॉलिड" आहे. म्हणजे एखादा जर बळी द्यायला पटवू शकला नाही तर तुमची भक्ति निष्काम होती. पण जर यदा कदाचित त्याने तुम्हाला पटवले आणि तुम्ही बळी दिलात आणि नंतर कळले की तो फ्रॉड होता, तर हे होऊ शकलं कारण की तुमची भक्ति निष्काम नव्हती.
नाय तस न्हाय ते, नीष्काम भक्ती ही जर तर गोश्टीस्नी थारा नाय देत.
20 Dec 2010 - 7:07 am | आत्मशून्य
"आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो"अशी सूरूवात केली तर लोक माझ्याबद्दलच वाद करतील की मी त्यासोबत मांडत असलेल्या वीशयाकडे लक्ष देतील आणी त्त्याचे तात्पर्य यावर चर्चा करतील असो गगनविहारी साहेब तूमचा आणी इतरांचा अपमान करायची माझी इछा,भावना नाही त्यासाठी हा माफीनामा.
20 Dec 2010 - 12:01 pm | विलासराव
बाकी करमणुक होतेय.
20 Dec 2010 - 2:06 am | डावखुरा
अनसूयेचे सत्त्व पहावया आले|
तेथे तीन बाल करूनि ठेवले|
20 Dec 2010 - 2:34 am | शिल्पा ब
चिलया बाळाची गोष्ट खुप लहानपणी वाचली होती पण आता आठवत नाही...कोणी सांगेल का? केवळ गोष्ट म्हणुनच हो..
20 Dec 2010 - 2:38 am | शुचि
http://shimagaphag.com/general_phag/general_7.html इथे सापडेल
20 Dec 2010 - 2:49 am | शिल्पा ब
धन्यवाद.
हम्म....विचित्र कथा आहे....त्या काळात चीलायाच्या आईला मांस मिळाले नाही? बरं नाही तर नाही पण म्हणून एका गोसाव्याला जेऊ घालायला बाळालाच कापले? अशा कथा विकृत आहेत असं माझं मत. बाकी असो.
20 Dec 2010 - 5:08 pm | योगी९००
लहानपणी या गोष्टीमुळेच मला घरी कोण पाहुणा जेवायला आला तर भिती वाटायची.
मी माझ्या मुलांना ही गोष्ट अजिबात सांगणार नाही.
20 Dec 2010 - 3:19 am | Pain
तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरणे थांबवले नाहीत हे तर वाईट आहेच पण चक्क स्वामींबद्दल अशा अघोरी कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) आपल्या मुलाचा बळी द्यायला मागेपुढे बघत नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे.
२) तर्कदृष्ट्या काय आवडलं विचाराल तर स्वामी समर्थांवरची तसेच दत्तात्रेयांवरची श्रद्धा अधिक दृढ होण्यास मला मदत झाली.
तर्कदृष्ट्या? तार्किकदृष्ट्या विचार केला असता गगनविहारी, शिल्पा ब यांनी सांगितल्याप्रमाणे अनुमाने निघतात. तुमचे विचार ही आंधळी भक्ती आहे, त्याला तर्क म्हणून तर्काला बदनाम करू नका. ती फार महत्त्वाची आणि उपयुक्त गोष्ट आहे.
३) सकाम भक्ती ही कनिष्ठ हे कळलं.
प्रत्येक भक्ती किंवा कृती ही सकामच असते. निष्काम भक्तीचे उदाहरण देउ शकता का?
20 Dec 2010 - 3:35 am | शुचि
माझी आधीची प्रतिक्रिया उडविण्यात आली आहे पण आशा करते आपण ती वाचून तिच्यापासून बोध घेतला असेल.
तर्काचा ठेका तुम्ही घेतल्यासारखेच तुम्ही बोलताय.
तीच गोष्ट मिपाची. मिपाचा ठेका घेतलाय काय तुम्ही कोणी किती लिहायचं हा नियम केलाय काय तुम्ही?
उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा.
20 Dec 2010 - 7:16 am | Pain
हा धागा आणि त्यावरील तुमचे काही प्रतिसाद वाचले. त्यातल्या नक्की कुठल्या प्रतिसादाबद्दल बोलत आहात ते माहित नाही. शिवाय मी वाचल्यापूर्वीच उडवली गेली असेल तर काही करु शकत नाही. असो.
तर्काचा ठेका ? मी योग्य गोष्टींसाठी योग्य ते शब्द वापरण्याचा आग्रह धरतोय. तुम्हाला माझे पटत नसेल तर शब्दकोषात पाहून तपासू शकता.
मिपाबद्दल: तसा ठेका असता तर फार बरे झाले असते.
कोणी किती लिहावे असा नाही पण मिपावर काही एका किमान दर्जाचे साहित्य प्रसिद्ध व्हावे असे वाटते.
उदाहरण तुम्हाला देणार नाही. करायचं ते करा
तुम्हाला समजलं नसेल तर सांगा की. त्यात काय?
22 Dec 2010 - 10:05 am | llपुण्याचे पेशवेll
+१ पेन यांच्याशी सहमत आहे.
पण अजून एक प्रश्न .. किमान दर्जा काय आहे?
20 Dec 2010 - 3:46 am | संकेत
हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे.
नमस्कार संपादक,
या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? वरच्यासारखे घाणेरडे आणि गलिच्छ प्रकार साधूसंतांच्या नावे खपवणारे आणि आपल्या तुंबड्या भरणारे लेखक होते. ते भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या नादी लावून आपले खिसे भरत होते परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? आपल्या मुलांना कापून टाकण्याच्या भाकड कथांना प्रसिद्धी देणार्या या सदस्येला मिपावर काही स्पेशल स्टेटस आहे का, असल्यास ते आम्हा इतर सदस्यांना सांगावे. जर तसे नसेल तर हे असे लेख मिपावर का राहावेत याचे कारण मिळावे.
धन्यवाद,
संकेत.
20 Dec 2010 - 4:11 am | शुचि
>> परंतु या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता? >>
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहे. त्यात जर मुले कापण्याचा संदर्भ आला असेल आणि अनेकांच्या मनावर परिणाम झाला असेल तर काढून टाका हा लेख.
एका पांढर्या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले.
माझा यावर निरुपाय आहे. कारण दोन्ही प्रकारची माणसं मिपावर येणार. गोष्टीतला काळा ठीपका अधोरेखीत करून , लेख उडवायचा असेल तर उडवा. पण हे लक्षात ठेवा तुम्ही पांढरा कागद पहायला विसरताय.
20 Dec 2010 - 7:05 am | आमोद शिंदे
समर्थ रामदास आणि दत्तभक्ती असा विषय आहेम म्हणून आम्ही मुले कापण्या विषयी दुर्लक्ष करावे असे तुमचे आहे काय? निष्काम भक्तीसाठी तुमच्या स्चतःच्या मुलांना हंडीत शिजवाल का?
20 Dec 2010 - 9:59 am | मनीषा
एका पांढर्या कागदावर एकच काळा ठीपका काढला आणि २ माणसांना विचारलं काय दिसतय - एक म्हणाला पांढरा कागद तर दुसरा म्हणाला काळा ठीपका. तसं या कथेत काहींना समर्थांची दत्तभक्ती दिसेल, निष्काम भक्तीचे फायदे दिसतील तर काहींना काळा ठीपकाच दिसेल तो म्हणजे मूल कापून घातले.
काही लोकांना पांढरा कागद आणि काळा ठिपका - दोन्ही दिसत असतील ..
20 Dec 2010 - 5:00 am | इंटरनेटस्नेही
फक्त एका कथेला प्रसिद्धी मिपावर दिल्याने सारखं आपलं अंधश्रद्धेला खतपाणीची, अंधश्रद्धेला खतपाणीमाळ का ओढली जात आहे ते कळत नाही. कथेमधनं बोध घ्यायचा असतो. कथेतील काही बाबी जरी टोकाच्या वाटल्या तरी त्या (सहसा)सांगोपांगी असुन त्या खर्या की खोट्या याची शहनिशा करण्यापेक्षा कथेतुन भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो, तो घेणे जास्त श्रेयस्कर. कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना?
20 Dec 2010 - 7:20 am | Pain
भक्ती करताना ती काही तरी मिळावे म्हणुनच करण्यापेक्षा निष्काम भावनेने करणे श्रेयस्कर हा बोध मिळतो
म्हणजे काय व हा संदेश कसा मिळतो ?
व्यावहारिक गोष्टींसाठी भक्ती, नवस करणारे बाजूला ठेवू.
भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ?
20 Dec 2010 - 10:13 am | अर्धवटराव
(आयला.. कशाला या वादात पडतोय मी..)
>>भक्ती ही देव प्रसन्न व्हावा, दर्शन मिळावे, वर्दान मिळावे, मोक्ष मिळावा, आध्यात्मिक प्रगती व्हावी या किंवा अशा हेतूनेच भक्ती किंवा तप केले जाते ना ?
नाहि. या कारणांपलिकडे देखील एक कारण असतं... ते म्हणजे "आनंद" . भक्तीतुन्/भगवत्प्रेमातुन मिळणार्या आनंदासाठीही भक्ती करतात... किंबहुना ति भक्तीची परमोच्च स्टेट असावी (हा आमचा निष्कर्श बरका... अनुभव नाहि) संदर्भ द्यायचाच तर तुकारामांचे (त्यांनिच रचले असतील तर) "आनंदाचे डोही आनंद तरंग" आणि "तुका म्हणे गर्भवासी सुखे घालासे आम्हासी" हे अभंग.
(अभक्त) अर्धवटराव
20 Dec 2010 - 6:26 pm | इंटरनेटस्नेही
या कारणांपलिकडे देखील एक कारण असतं... ते म्हणजे "आनंद" . भक्तीतुन्/भगवत्प्रेमातुन मिळणार्या आनंदासाठीही भक्ती करतात...
देअर यु आर, मिस्टर पेन!
21 Dec 2010 - 5:37 am | Pain
कर्मण्येवाधिकाकारस्ते मा फलेशु कदाचन हे आपलीच भगवतगीता सांगते ना?
त्याच महाभारतात त्यांच्या लहानपणीच्या गोष्टीत, धनुर्विद्येच्या परि़क्षेत, तुम्हाला काय दिसते अस प्रश्न द्रोणाचार्य विचारतात. सगळे जण झाडे, फळे, डोंगर इ. उत्तरे देतात त्यांना धनुष्याला हातही लावून दिला गेला नाही.
अर्जुन म्हणाला, त्याला फक्त पोपटाचा डोळा दिसतोय.
आपल्याला काय हवे हे माहिती पाहिजे, आणि ते शोधण्याची ज्वलंत इच्छा पाहिजे, तरच ते शोधता येईल.
21 Dec 2010 - 5:38 am | Pain
ठीक आहे.
मग तो आनंद मिळावा ही इच्छा/ कामनाच झाली ना?
म्हणजे ती भक्ती/ आराधना ही सत्काम झाली.
21 Dec 2010 - 8:49 am | अर्धवटराव
टेक्निकली येस !! प्रेमानंदाची कामना हि पण एक प्रकारची इच्छाच आहे. पण त्याकरता भक्ती "करता" येत नाहि... ति "होउन जाते". तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते... तसलच काहितरी. हे प्रेम का? तर तो स्वभाव आहे... एकदा हा अमृतदंश झाला तर त्याला औषध नाहि.
(प्रवचनकार) अर्धवटराव
22 Dec 2010 - 9:42 am | Pain
नाही. इतकी महत्त्वाची गोष्ट इतकी बेभरवशाची किंवा "झाली तर होणारी" असू शकत नाही, असल्यास त्याला काही अर्थ नाही.
ज्यांना होत नाही त्यांनी वाट बघत बसायची का ? जे हे करायचे ठरवतात, ते निश्चायाने तडीला नेतात.
22 Dec 2010 - 9:52 am | गवि
मुळात कोणतीही क्रिया निष्काम असूच शकत नाही हे मान्य का होत नसावे सर्वत्रांस ?
ईश्वराने जग निर्माण केले असे धरले तरी इतक्या पसार्याची आणि तो घडावा याची ईषणा (म्हणजे कामनाच ना एका प्रकारची) त्याने केली आणि तसे घडवले ही.
(ईश्वराचे अस्तित्व मानून...) ईश्वरालाही जे चुकले नाही ते आपण का चुकवू पाहतोय..?
निष्काम अशी कोणतीही क्रिया जगात अस्तित्वात असेल तर पर्पेच्युअल मोशन (ऊर्जेच्या इनपुट शिवाय अनंत चालत राहणारे अक्षय यंत्र) ही अशक्य समजली गेलेली कल्पनाही शक्य म्हणावी लागेल.
तुम्ही लग्न "करता" पण प्रेम "होउन" जाते
इत्यादि सुद्धा काव्यात्मक पातळीवरची उदाहरणे झाली. त्यात (प्रेम या कल्पनेच्या ) खोलात जाण्याचे धाडस आपण करत नाही, पण त्यातही कामना, कार्यकारणभाव, सकाम प्रयत्न वगैरे असतातच..
22 Dec 2010 - 9:52 am | अर्धवटराव
तुम्हाला त्यात बेभरवशाचं काय वाटलं बरं... आपल्या स्वभावात स्थीर राहणं अर्थहीन कसं? आणि निश्चयाने तडीने नेण्याचं म्हणाल तर त्याकरताच हा साधनेचा वगैरे प्रपंच... निश्चयाने तडीस नेण्यासाठी.
अर्धवटराव
20 Dec 2010 - 5:28 am | अर्धवटराव
एक अद्भूत कथा म्हणुन हि गोष्ट वाचनीय आहे. बाकी भक्ती वगैरे विषयापासुन आम्हि चार हाथ लांब आहोत. आयला... इथे प्रत्येक क्षणाला काहितरी प्राप्त करण्याचि, उपभोग घेण्याचि ईच्छा मनात येतेय... कसली निष्काम भक्ती नि काय..
जे काहि थोडंफार भक्ती वगैरे विषयावर वाचन झालय त्यावरुन तरी असं वाटतं कि भक्ती एक फार सुंदर, सहज अशी प्रेमभावना आहे. प्रेम तर स्वाभावीक असतं, आणि ते अनुभवल्याशिवाय जाणवत देखील नाहि. मग या प्रेमानुभवाला अद्भूततेची जोड का द्यावी लागते बरं ?? म्हणजे कसं कि भक्ती अनुभवायची आहे काय... तर मग काहितरी गूढ-अद्भूत्-विचित्र-विवेकाला न पटणार्या, फँटसीयुक्त गोष्टीला तयार रहा. हा मेळ बसत नाहि. तुकोबांचे अभंग कुठेच गूढ वगैरे वाटत नाहि. समर्थांचे श्लोक अविवेकी जाणवत नाहित. एक मात्र कळते कि या लोकांनी जो प्रेमानुभव घेतलाय तो अजुनतरी आपल्याला आलेला नाहि. बाकि काहि विशेष नाहि...
अवांतर : कथेचं तात्पर्य असं दिसतय कि फायनल सत्य जाणण्यासाठी काय काय बघायची, सहन करायची आणि तरिही डोकं शांत ठेऊन विचार करायची तयारी लागते याचा हा एक नमुना. आपापल्या वकुबाप्रमाणे मार्ग चालायचा.
20 Dec 2010 - 6:38 am | शुचि
सर्वांची माफी मागते या धाग्याबद्दल. पुन्हा असा काय कोणताच धागा परत निघणार नाही माझ्याकडून.
20 Dec 2010 - 6:47 am | गोगोल
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय?
म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय?
नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी?
20 Dec 2010 - 7:03 am | आमोद शिंदे
संपादक मंडळाला विनंती: कृपया हा लेख अजिबात उडवू नये. फक्त तात्पर्याकडे पाहा म्हणत मुलांना हंडीत शिजवण्या विषयी लेख लिहिणार्य लेखिकेचा विकृतपणा इथे कायम स्वरुपी ठेवला पाहिजे.
20 Dec 2010 - 7:13 am | गोगोल
त्या स्वत:च हा धागा उडवतील. मागे पण त्यांनी असे केलेले आहे.
माझा पर्सनली या गोष्टीला काही एक विरोध नाही. हिंदू पुराणात अशा कितीतरी गोष्टी भरलेल्या आहेत (जशा की इन्सेस्ट, बळी देणे ई ई). पण जर का कुणाला तरी ते पटले नाही तर त्याला महामूर्ख आणि बावळट ठरवणे म्हणजे मत स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणे आहे. त्याला माझा नेहमीच विरोध राहील.
20 Dec 2010 - 7:32 am | Pain
याला निष्काम ईमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणावे काय?
म्हणजे संपादकांपैकी कुणीतरी असे म्हणावे की शुची ताई तुम्ही काळजी कारू नका. लिहा बिनधास्त. मी बघतो तुम्हाला कोण काय म्हणत ते..अशी अपेक्षा आहे काय?
नसेल लिहायच तर नका लिहु. जाहिरात कशासाठी?
अगदी खरे. पूर्वीपासून असेच सुरु आहे. यांना थांबवणे इतके सोपे नाही.
इथे जुन्या जाणत्या लोकांनीही उदा. केशवसुनीत, राजेश घासकडवी वगैरे लोकांनीही त्यांना हेच सांगितले आहे पण काही उपयोग झाला नाही. मी १-२ महिने मिपापासून दूर होतो पण सध्या येउन पाहिले तर काँग्रेस गवतासारखे ते फोफावलेले दिसते.
सगळे जण लेखक नसतात, किंवा काही खरोखर सगळ्यांबरोबर शेअर करावेत असे अनुभव प्रत्येकाला येत नाहीत. साधारणपणे आपले आयुष्य नॉर्मलच असते.
नुसते कागद पेन किंवा सध्याच्या काळात काँप्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असले म्हणजे आपण लेखक होत नाही.
20 Dec 2010 - 7:48 am | सन्जोप राव
उदा. केशवसुनीत, राजेश घासकडवी वगैरे लोकांनीही त्यांना हेच सांगितले आहे
केशवसुमार माहिती आहेत. केशवसुनीत कोण?
20 Dec 2010 - 7:52 am | आमोद शिंदे
केशवसुनीत = केशवसुमार + मुक्तसुनित असे असावे.
20 Dec 2010 - 8:48 am | Pain
क्षमस्व.
"मिपावरती मी पितरांचा कौल काढला नवा" हे फर्मास विडंबन करणार्या केशवसुमारांचा उल्लेख करायचा होता.
20 Dec 2010 - 5:17 pm | सुप्परमॅन
माफी नको पण लेख आवरा आणि हे इमोसनल अत्याचारही बंद करा.
20 Dec 2010 - 6:55 am | कुळाचा_दीप
एक नंबर गोष्ट ... आवडली !
बाकी प.प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती तर लय भारी होते
20 Dec 2010 - 7:16 am | नरेशकुमार
20 Dec 2010 - 7:49 am | आमोद शिंदे
ह्यावर निषेध न नोंदवता माझ्या प्रतिसादाची तीव्रता ज्यांना झोंबली त्यांच्या आक्षेपाला माझ्यालेखी काडीचीही किंमत नाही.
20 Dec 2010 - 7:55 am | प्रदीप
आपण कुणाबद्दल वैयक्तिक (आणि इथे असंबंद्धही) आरोप करतांना एक रेषा ओलांडली आहे हे आपणास समजले नाही, ह्यात नवल नाही.
माझा आक्षेप संपादकांना उद्देशून आहे. ते असल्या आक्षेपांना 'काडीपेक्षा' जास्त किंमत देतील असे वाटते.
20 Dec 2010 - 7:57 am | आमोद शिंदे
हाहाहा..इकडून अजून एक ब्लॅकमेलिंग का? चालू द्या...
20 Dec 2010 - 7:56 am | स्वानन्द
हा हा...
असं असेल तर मग तुमच्या प्रतीसादांना देखील आमच्या लेखी काडीचीही किंमत नाही हे वे.सां. न. ल. :)
20 Dec 2010 - 7:59 am | आमोद शिंदे
हू केअर्स?
"पोरेही कापून त्यात घातली."
ह्यात तुम्हाला काहीच आक्षेपार्ह दिसत नसेल तर तुम्ही माझ्या प्रतिसादांना किती किंमत देता हू केअर्स?
20 Dec 2010 - 8:33 am | स्वानन्द
आणि स्वतःची चूक दुसर्यांनी ( ज्यांनी लहान मुले कापण्यावर तुमच्याही आधी टीका केली आहे ) दाखवून दिली तरी ती मानण्याची तुमची तयारी नसेल, तर तुम्ही आमच्या प्रतीसादाची केअर करता की नाही ते, हू केअर्स?
20 Dec 2010 - 8:29 am | मदनबाण
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!! ;)
असो...
जाता जाता :--- शिबी राजाची कथा मात्र आठवली !!!
(दत्तात्रेयांचा दास)
20 Dec 2010 - 8:41 am | गवि
सगळ्यांनी अशा कथा वाचल्या असतील भरपूर पण चर्चेची संधी मिळाली नसावी.मी तरी त्यामुळेच मनातले मांडले.इतरांचेही असेच असावे.
20 Dec 2010 - 8:52 am | Pain
कथा वाचल्या / ऐकल्या आहेतच. त्या काढणे बहुदा शक्य नाही पण त्यात नवीन भर पडायला नको असे तुम्हाला वाटत नाही का?
20 Dec 2010 - 9:01 am | गवि
अर्थातच वाटते.नपेक्षा माझ्या सुरुवातीच्या कॉमेंट्ना अर्थ काय राहिला?
20 Dec 2010 - 9:27 am | Pain
तुम्हाला नाही, मदनबाण यांना दिलेला प्रतिसाद आहे. तुमच्या प्रतिसादाच्या खाली आहे म्हणजे तुम्हाला दिलाय अस नसतं.
प्रेषक मदनबाण दि. सोम, 20/12/2010 - 08:29.
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!!
असो...
20 Dec 2010 - 9:46 am | गवि
ह्म्म्.. आता लक्षात आलं. इतका वेळ मोबाईलवरून चालू असल्याने तो कॉमेंटबॉक्सच्या वगैरे लेआउटचा अंदाज आला नाही, म्हणून मलाच आहे असं समजून दिलं ठोकून उत्तर..
आता लक्षात ठेवीन.
20 Dec 2010 - 9:54 am | मनीषा
ह्म्म... वरील काही प्रतिसाद पाहता,असे वाटले की अशा कथा कोणी कधी वाचल्याच नसाव्यात !!!
होय! अशा अनेक कथा अहेत .... पण अशा प्रकारच्या कथांचा वाचक वर्ग वेगळा आहे . ज्यांना अशा गोष्टी वाचायला, ऐकायला
आवडतात तेच लोक अशी पुस्तके विकत घेतात अथवा अशा कथा जिथे सांगीतल्या जातात अशा व्याख्यानांना हजेरी लावतात.
पण ज्यांना अशा कथांमधे रूची नाही ते त्या पासून दूर राहतात.
मराठी संस्थळांवर, जिथे असे साहित्य वाचायला मिळण्याची अपेक्षा नसते तिथे येणार्या सभासदांकडून असे धागे चुकुन का होईना उघडले जातात, वाचले जातात ... जे सर्वसामान्यांच्या अभिरूचीला पात्र नाहीत.
भक्ती, धर्म . . इ. ला विरोध नाही पण त्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवण्याला विरोध आहे..
कशावर विश्वास ठेवायचा आणी कशावर नाही ही पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे ... पण आपले विचार न पटणार्या लोकांना अश्रद्ध, पाखंडी वगैरे ठरवणे गैर आहे.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय बोलायचे/वाचायचे/ऐकायचे ही तुमची खाजगी बाब आहे त्यावर कुणी अक्षेप घेऊ शकत नाही , पण तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलत किंवा लिहित असाल तर काळजी घेणे जरूर आहे असे वाटते.
अर्थात हे माझे मत आहे. बाकी एकेकाची समज , जाण .. इ. इ.
20 Dec 2010 - 8:37 am | पक्या
हॅ हॅ हॅ , काय चर्चा चालू आहे, प्रतिसाद कर्ते नको तिथे उर्जा वापरत आहेत.
देवादिकांच्या , संतांच्या अशा हजारो गोष्टी सापडतील. कोणत्याही पुस्तक भांडारात अशी अनेक पुस्तके मिळतील. एव्हाना अशी पुस्तके वाचून किंवा अशा गोष्टी ऐकून अनेक मुलांचे बळी जायला हवे होते ना .
नरसिहाची गोष्ट तर सर्वशृतच आहे. बापाने स्वतःच्या मुलाला उकळत्या तेलात टाकले, कड्यावरून खाली फेकले, हत्तीच्या पायाखाली दिले वगैरे. आणि भक्त प्रल्हादाची ही गोष्ट आपण मुलांना पण सांगतो.
अशा प्रकारच्या गोष्टींमधुन तात्पर्य घ्यायचे सोडून लोक नसत्या चर्चा करत बसतात.