स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा.
श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत. पुढील कथेतून स्वामी समर्थांची दत्तभक्ती दिसून येते.
एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले.त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले.तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली.तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले.समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे.
श्री समर्थ रामदास स्वामींची पुढील आरतीही त्यांच्या दत्तभक्तीची साक्ष देते -
विधीहरीहर सुंदर दिगंबर झाले|
अनसूयेचे सत्त्व पहावया आले|
तेथे तीन बाल करूनि ठेवले|
दत्त दत्त ऐसे नाम पावले||१||
जय देव जय देव जय दत्तत्रेया|
आरती ओवाळू तुज दत्तत्रेया||धृ||
तीनही देवांच्या युवती पतीमागे आल्या|
त्यांना म्हणे वळखूनी न्या आपल्याला|
कोमल शब्दे करूनी करुणा भाकिल्या|
त्यासी समजाविल्या स्वस्थानी गेल्या||२||
काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन|
मातापुरि शयन होते प्रतिदिन|
तैसे हे अघटित सिद्ध महीमान|
दास म्हणे हे तो नव्हे सामान्य||३||
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भीषण
पंजाबी दत्त
सुनील दत्त हुसैनी ब्राह्मण..
मोहयाल ब्राह्मण
भारतभर
धन्यवाद
गुजराथी लोकांना पण दत्त माहीत
कोण स्वामी समर्थ ?
प्लीज भावना दुखावून घेऊ
सहमत.
बरं. समजा या कथेत सर्व काही
समर्थ रामदास स्वामी आणि
शुचितै,तुम्हाला personally
गवि, संतसाहित्य, स्वामी समर्थ
आरे गगनविहारी बावळटा आणी इतर मूर्खहो याचे means फक्त इतकेच आहे
सकाम म्हणजे नक्की काय काम? अन
वाटलेच होते हा मूद्दा येणार
<<<आणी जे महामूर्ख अज्ञानी
अंधश्रद्धा ह्या नेहमी मूर्ख अनूयायी अथवा वीरोधक
शंका समाधानावर शंका
माझा या प्रतिसादावर आक्षेप
अनावश्यक तक्रार आहे
मला मुलांचा संदर्भ खटकला.
मुलांचे संदर्भ
सहमत. तरी सूध्दा
पंचतंत्र आणि या गोष्टी मध्ये फरक आहे.
खर आहे पण तूम्हाला तर सफरचंद आणी टॉमेटोचा फरक कळतो की नाही
मला मुलांचा संदर्भ खटकला.
मी कोणात्याही व्यक्तीचे समर्थन करत नाही.
तात्पर्य काही का असेना लहान
:)
श्री. आत्मशून्य, तुम्हाला
आत्मशून्यजी, Your
होय आपण वैयक्तीक टीका केली नाहीतच
ठीक. गैरसमज मिटला. धन्यवाद..
त्याचे काय हाय भारतीय अध्यात्म लैय महान हाय
वा वा वा
तुम्ही अक्कल शून्यतेचा टोमणा
नाय हो आम्हास्नी आधीपसूनच नीद्राशून्य, अक्कलशून्यते आणी इतर अनेक
चला मला बघायचे होते की
१०००००००००% सहमत
श्री गुरुदेव दत्त...
चिलया बाळाची गोष्ट खुप
http://shimagaphag.com/genera
धन्यवाद. हम्म....विचित्र कथा
+१
तुम्ही मिपाला वैयक्तिक ब्लॉग
माझी आधीची प्रतिक्रिया
हा धागा आणि त्यावरील तुमचे
+१ पेन यांच्याशी सहमत आहे. पण