जाम्भूलाख्यान ची द्रौपदी हरपली....

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
27 Nov 2010 - 1:19 pm

'माझी मैना गावाकडं राहिली'पासून तर "मी बाबूराव बोलतोय'पर्यंत लोकप्रिय लोकगीतांची रचना करीत आपल्या खड्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आज दीक्षाभूमीवर शेकडो लोकांच्या साक्षीने "जय भीम' आणि "जय बुद्धा' अशी गगनभेदी गर्जना करीत अखेरचा श्‍वास घेतला.

पोवाडे, भारुडं, लोकगीते, भीमगीते तसेच 500 हून अधिक नाटकांच्या जोरावर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातली होती. "चला हो नमू गौतमा' हे त्यांचे भीमगीत बौद्धबांधवांच्या सदैव ओठावर असते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबईत आयोजित केलेल्या "महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात राजकीय पुढाऱ्यांना लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पोवाड्यांची खास मेजवानी मिळाली होती. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच नागपुरात यशवंत स्टेडियमवरदेखील त्यांच्या लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. "टिंग्या' आणि "विहीर' या गाजलेल्या अलीकडच्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या प्रमुख भूमिकादेखील होत्या.

लोकशाहीर विठ्ठल उमप यांना गुरुवारी 104 पेक्षा जास्त ताप होता. त्यामुळे त्यांना अनेकांनी नागपूरला न जाण्याचा सल्ला दिला होता. पण, दीक्षाभूमीवर येण्याच्या त्यांच्या जिद्दीपुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. "मला नागपूरला जाऊ द्या, कदाचित हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल,' असेही त्यांनी कुटुंबीयांजवळ बोलून दाखविले होते.

विठ्ठल उमप यांना..... " मिपाकरांकडून" भावपूर्वक श्रद्धांजली ......... !!!!

कलानृत्यसंगीतमांडणीसंस्कृतीनाट्य

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

27 Nov 2010 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

विठ्ठल उमप यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

अवांतर :- स्पा लेका सकाळ मधुन ह्या लेखातला बराचसा भाग तु जसाच्या तसा उचलला आहेस. निदान लेखात 'सकाळच्या सौजन्याने' असे तरी लिहायचे होतेस.

जोशी 'ले''s picture

27 Nov 2010 - 1:29 pm | जोशी 'ले'

खरच विठ्ठल उमप यांच्या जाण्याने मराठी रसिकांचे फार मोठे नुकसान झालेय...
त्यांच्या मध्ये एक खट्याळ , अवखळ मुल लपलेलं होत आणि तीच त्यांची शक्ती होती , वयाच्या ८० व्या वर्षी पण ते जितके कार्यरत होते तेवढे खचितच कोणी राहू शकेल ...
पण एक खंत राहिली जो पुरस्कार सैफ आली खान ला मिळू शकतो तो पद्म पुरस्कार महाराष्ट्राच्या या लोकशाहिराला मिळायचा राहिला .
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना

मृत्युन्जय's picture

27 Nov 2010 - 1:36 pm | मृत्युन्जय

बरेच झाले. ज्या पुरस्काराचा दर्जा इतका खालावला आहे की तो सैफ अली खान ला मिळतो तो शाहीरांना नाही मिळाला तरी काही बिघडत नाही. कलेच्या राज्यात त्यांचा मान मोठा आहे. पद्म पुरस्कार त्यांचा आब हरवुन बसले आहेत.

स्पा's picture

27 Nov 2010 - 1:37 pm | स्पा

असेच म्हणतो

स्पा's picture

27 Nov 2010 - 1:29 pm | स्पा

हो रे ..........

संपादक मंडळाला विनंती आहे कि त्यांनी. यात " सकाळ च्या सौजन्याने" नमूद करावे

लोकशाहीर विठ्ठल उमप यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

sneharani's picture

27 Nov 2010 - 4:37 pm | sneharani

लोकशाहीर विठ्ठल उमप यांना भावपुर्ण आदरांजली!!

यकु's picture

27 Nov 2010 - 4:46 pm | यकु

लोकशाहिरांना विनम्र श्रध्दांजली!

यकु's picture

27 Nov 2010 - 4:46 pm | यकु

लोकशाहिरांना विनम्र श्रध्दांजली!

मागच्याच आठवड्यात सा रे ग मप च्या दोन भागात त्यांचे दर्शन झाले होते. तोंड भरून कौतुक केले मुलांचे त्यांनी.

वयाची सत्तरी ओलांड्ल्यावर सुध्दा ज्या तडफेने आणि उत्साहाने "जांभुळ आख्यान" सादर करायचे त्याला तोड नव्हती.

तरुणांनाही लाजवेल असा उत्साह सदैव त्यांच्या अंगी असायचा...
विठ्ठल उमप यांना भावपुर्ण श्रद्धांजली...

नगरीनिरंजन's picture

27 Nov 2010 - 10:18 pm | नगरीनिरंजन

शाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र आदरांजली. महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासात ते नेहमीच अमर राहतील.

शिल्पा ब's picture

28 Nov 2010 - 12:10 am | शिल्पा ब

लोकशाहीराला भावपूर्ण श्रद्धांजली

डावखुरा's picture

28 Nov 2010 - 10:02 am | डावखुरा

एक तारा निखळला....
पण रसिकांच्या मनात अढळपद मिळवुन गेला....