या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
ढग मिळवण्यासाठे करावे लागणारे हे सगळे उपद्व्याप पाहुन मी वैतागलो.
आणि वैतागुन म्हणालो सुद्धा "जाउदे सालं तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात"
एवढे बोलतो न बोलतो तोच मला जाणीव झाली....मी खरंच ढगात गेलो होतो.
(क्रमश:)............................................
मी ढगात गेलो....सर्वत्र धुके धुके होते..मला खरंच वाटत नव्हते.मग मी जोरात हाताला चिमटा काढला.कोणीतरी जोरात ओरडले. मी बहुतेक माझ्या शेजारी बसलेल्याच्या हाताला चिमटा काढला होता.
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस".लांब कोठेतरी अनाउन्समेंट झाली.आवज कोठुन येत होता याचा अंदाज येत नव्हता.काहीतरी मोकळे विस्तीर्ण दालन असावे आणि आणि त्यात एका टोकावरुन बोलावे तसा काहीसा तो आवाज होता.ढगात गेलेल्या सगळ्या यात्रेकरुंचे स्वागत असो.आपला प्रवास सुखद होइल् अशी आम्ही आशा करतो.थोड्या वेळाने हवाई यक्षीण आपल्यापाशी येऊन प्रवासासाठी योग्य त्या सूचना देईल्. कृपया त्यांचे पालन करावे.आपला प्रवास उत्तम व्हावा म्हणुन ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस कटीबद्ध आहे.
मी कशावर बसलो होतो ते कळत नव्हते.बसलो होतो की उभा होतो तेच कळत नव्हते. पण काहीतरी मऊ मुलायम असे होते.समोरचे काही दिसत नव्हते इतका धूर होता. इतक धूर असूनही डोळे मात्र चुरचुरत नव्हते. पण आसपासचे काहीही दिसत नसल्यामुळे हालचाल करणे अवघड होते. आपण चालायला लागायचो आणि कशाला तरी अडखळून् धडपडायचो.मी जैसे थे म्हणजे उभ्याने बसून् किंवा बसुन उभ्यानेच अवस्थेत रहायचे ठरवले. थोड्यावेळाने माझ्या खांद्यावर एक नाजूक स्पर्ष झाला. मी इकडे तिकडे पाहीले धुक्यामुळे आसपासचे काहीच दिसत नव्हते.मला उगाचच झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
आणि हुडहुडी भरली. जाम टरकलो. इकडे तिकडे काहीच दिसत नव्हते.आणि खांद्याला स्पर्ष तर झाला होता. मला वाटले की आता काही खरे नाही. भूताटकी वगैरे सारखे काहीतरी नक्कीच होते. थोडेसे बरेही वाटले कारण भूत दाखवून "अं. नी. स." ने ठेवलेले १० कोटींचे बक्षीस मिळवता येणार होते. "भूते नसतात भूते नसतात भूते नसतात भूते नसतात" मी मनातल्या मनात मोठ्याने म्हणु लागलो. ...........पण समजा असले तर ?.......भूत् असले तर ते स्त्री भूत असावे........पटकन माझ्या मनाने उत्तर दिले. हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात ( त्याना सूगरणही दाखवले असते तर.......).मधुबाला , साधना ,वहीदा रेहमान,हेमा मालीनी,डिम्पल सगळ्यानी एकेकदा तरी भूत साकारलय. पुन्हा एकदा खांद्यावर नाजूक स्पर्ष... माझ्या सर्वांगावर काटा फ़ुलला पण तो भितीने होता की कशामुळे ते कळेना. अचानक मझ्यासमोर एक केशरी रंगाचा ट्रे आला. ट्रे अधांतरी दिसत होता.आता माझे पाय लटलट कापु लागले हुडहुडी मुळे दात एकमेकांवर आपटुन त्रिताल आडाचौताल आणि दादरा हे सगळे ताल द्रुत् लयीत वाजू लागले.
गाण्यात एखाद्या चांगल्या हरकतीला "दाद" देतात तसा मी इथे "दात" देत होतो अशी एक क्षुद्र कोटी त्याही अवस्थेत मनात येउन गेली.
कोठुन तरी आवाज आला " तुमच्या समोरच्या ट्रे मधे पिवळे गॊगल आणि इतर वस्तु आहेत. सर्वप्रथम पिवळा गॊगल लावा त्यामुळे तुम्हाला धुक्यात दिसु शकेल.आणि इतर वस्तु ओळखता येतील."
मला कुठुन या भानगडीत पडलो असे एक क्षण वाटुन गेले पण नंतर दरयावर्दी सिंदबाद ; हतीम बिन ताई या सर्वाना कोणकोणत्या परिस्थितीतुन जावे लागले होते याची आठवण झाली.बघुया तर पुढे कायकाय होतेय् ते असे म्हणुन मी त्या केशरी ट्रे मधुन पिवळा गॊगल उचलुन डोळ्याला लावला.त्यासरशी मला सगळे कसे लख्ख दिसायला लागले.मी एका विस्तीर्ण दालनात बसलो होतो. सर्वत्र सोनेरी धुके पसरले होते लोक सोनेरी रंगाच्या खुर्चीत बसले होते. समोरुन एक सोनेरी केसांची. सुवर्णकांतीची सोनेरी वस्त्रे परिधान केलेली यक्षीण आली तिने मला हसुन तिचे सोनेरी दात दाखवले.....एका सोनेरी रंगाच्या ग्लास मधुन तिने मला नजाकतीने कसलासा सोनेरी द्रवपदार्थ देउ केला. मी हरखून गेलो. हे म्हणजे एखाद्या शेख सुलतानाची ठेवावी तशी बडदास्त झाली.ग्लास ऐवजी तीने तो सोनेरी द्रवपदार्थ जर सुरई मधुन माझ्या चषकात ओतला असता तर......मला मी खरोखरचा सुलतानअसेच वाटले असते. कसा आहे ते पहावे म्हणुन मी तो स्वर्गीय सोनेरी द्रवपदार्थ ओठाला लावला......ह्या...पार फ़सलो. ते शुद्ध पाणी होते.मला कळेना पाणी सोनेरी कसे झाले. हां.आत्ता लक्षात आले. सोनेरी केसांची.. सोनेरी वस्त्रे परिधान केलेली सुवर्णकांतीची यक्षीण तिचे सोनेरी दात. सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ ...ही सोनेरी करामत मी घातलेल्या त्या पिवळ्या गॊगलची होती. गॊगल डोळ्यावरुन् काढला तर काय पुन्हा सगळे एकदम गायब झाले. घॊगल डोळ्यावर चढवला त्यासरशी मला पुन्हा सगळे कसे लख्ख दिसायला लागले. हे म्हणजे मिश्टर इंडिया पिक्चर मधल्यासारखे झाले होते. एकंदरीत अशी गम्मत होती तर. धुक्यात फ़क्त् पिवळा प्रकाश असेल तरच नीट दिसु शकते. हां तर काय सांगत होतो ती यक्षीण खरे तर हडळ फ़ार झाले तर सुंदर देखणी हडळ हेच योग्य वर्णन होईल तीचे आता तीच्या फ़सव्या सोनेरी केसांमुळे आता; तर ती सुंदर देखणी हडळ माझ्या समोर एक ट्रे घेउन आली त्यात एक कसले तरी पाकीट ठेवले होते. तेने ते मला देऊ केले आणि म्हणाली ढगातल्या प्रवासात उपयोगी वस्तुं आहेत् त्यात. मी उघडुन पाहीले तर त्यात एक विंडचीटर जर्कीन. आणि एक लहान मुलांची असते तशी डायपर असलेली चड्डी होती. विंडचीटर जर्कीन मी आंगावर चढवला पण त्या डायपर वाल्या चड्डीचे काय करायचे ते मला कळेना. मी इकडे तिकडे पाहीले तर माझ्या शेजारचा एक पारशी म्हातारा पेस्तनजी ती चड्डी पॆन्ट्च्या वरुन घालत बसल होता. माझी त्याची नजरानजर होताच तो मला म्हणाला "केम डिकरा पेल्ही वार जाय छे के आ डघ सर्व्हीसथी." ह्या पारशांना देवाने "ढ" चा उच्चार करायला जिभीमधे काही एक्स्ट्रा स्नायु दिले असावेत अशी मला नेहमी शन्का येते. ते जसा "ढ्" चा उच्चार करतात तसा उच्चार इतर कोणत्याच जमातीच्या इसमाना जमत नाही. " हा बघ हा हाय नी हा डायपर एकदम नल्हा बच्चाना माफ़िक पॆन्ट् के उपरसे पहेननेका. वो क्या है के इधर कायकाय ढगमंदी सगळा पानी असतो तवा काय होते आपली पॆन्ट् भीजून ज्याते. म्हनुन् हाय नी तो विमान कम्पनी आपल्याला अश्या डायपर देते. आता पॆन्टच्या वरुन असला चड्डी घातला की सगळा की कसा ते फ़िलिम चा माणस दिसते. .....हीरो नाय रे. काय नाव ते मानसचे कवा कवा हवेत उडत असते कवा कवा जमिनपर असते. ते रे हमेशा ब्ल्यु कपड्यात असते."
"हं सुपर मॆन" मी म्हणालो.
.हा तेच् ते.बघ नी समदा लोक कश्या सुपर मॆन दिसते हे ड्रेस मंदी"
मी आजुबाजुला पाहीले तर सगळे जण ढगातील दवाने कपदे ओले हौ नयेत म्हणुन नेहमीच्या प्यान्ट्वर ती डायपर असलेली चड्डी चढवुन बसलेल् होते. सगळे त्यामुळे बॆटमॆन; सुपरमॆन; फ़ॆन्टम सारखे वाटत होते. मुखवटे घातले असते तर स्पायडरमॆन ही दिसले असते
कृपया तुमच्या आसनावर स्थानापन्न व्हा. ढग उड्डाण करणार आहे.एअर टर्ब्युलन्स् मुळे काही काळ तुम्हाला हालचालीचा त्रास जाणवेल तरी आसनावर असलेले पट्टे स्वत:भोवती बांधुन घ्या.मी माझ्या भोवती पट्टा गुंडाळला. कसल्या तरी मऊ आसनावर मी बसलो होतो नक्की कसल्या प्रकारचे आसन होते ते सांगता येणार नाही. पण शेवरीचा कापूस असावा तसे काहेसे वाटत होते.
आमचा ढग आता हवे तरंगु लागला. तो तसाही तरंगत होताच.पण मायक्रोफ़ोनमधील अनाउनन्स्मेंट मुळे ते जास्तच् जाणवु लागले.खीडतुन बाहेर काय दिसते ते पहावे म्हणुन मी आजुबाजुल पाहु लागलो. ढगाला खीडक्याच नव्हत्या.हवा मोकळी होती. मला आत्ता आठवले मगाशी त्या देखण्या सुंदर हडळीला येताना पाहीले. मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
ढग आता बहुतेक बराच वर आला असावा. कारण हवेत गारवा आला होता.मायक्रोफ़ोन वर अनौन्स्मेंट झाली " आता आपण आपले पट्टे सोडु शकता ढगात इकडेतिकडे फ़िरु शकता. तुम्ही ज्या दालनात बसला आहात त्याचा क्रमांक आहे "एम् एच ०२ उत्तर विंग" कृपया ढगात फ़िरताना कोठे चुकलात तर जवळच्या यक्षणीला हा क्रमांक सांगा. ती तुम्हाला या दालनात जाण्यास मदत करेल्. धन्यवाद"
मी ढगात फ़िरण्यासाठी मोकळाहोतो.अचानक लहानपणीची एक इच्छा आठवली. लहानपणी ढग गडगडताना ऐकले की घाबरुन जायचो आणि आजीच्या कुशीत शिरायचो. तेंव्हा आजी म्हणायची की "ढगात म्हातारी पीठ दळतेय" त्याचा हा आवाज येतोय.घाबरु नकोस.
मला त्या ढगात पीठ दळणार्या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
27 May 2008 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll
खरोखर ढगात गेल्यासारखे वाटत आहे.
माताय्, पण ते डायपर प्रकरण जरा डोक्यावरून गेले बघा. सुंदर कल्पना आहे. उडणारा ढग.
(डायपरवाला)
पुण्याचे पेशवे
27 May 2008 - 10:46 am | राजे (not verified)
मस्तच ! सगळेच सोनेरी ... दात पण ? वा ! वा काय कल्पना आहे सोनेरी दात :))
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
27 May 2008 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ढगातला स्वप्न प्रवास मस्त रंगवलाय. ढिलायन्सचे ढग प्रवास ही कल्पना तर अफाटच.
फक्त पेशवे म्हणतात तसे डायपर प्रकरण जरा डोक्यावरुन गेले.
आणि ढगातल्या कल्पनेचा शेवट मात्र तुम्हाला आजीच्या आठवणीकडे घेऊन गेला, तो प्रसंग आम्हालाही 'टच' करुन गेला.
27 May 2008 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर
विजुभाऊ, कल्पनाशक्ती चांगली आहे. दोन पेग जरा जास्त झाले की 'ढगात' गेल्यासारखे वाटते. अनेकदा अनुभव घेताला आहे, त्यामुळेच 'ढगायन' आवडले. पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?
27 May 2008 - 11:25 pm | चतुरंग
विजुभाऊ म्हणायला लागले असतील 'दिल ढग-ढग करने लगा' ;)
चतुरंग
27 May 2008 - 5:34 pm | धमाल मुलगा
फुल्टू विजुभाऊ !!!!
आयला,
धिरुभाई काय आनंदला असेल तिकडं..स्वर्गात / नरकात जिथं कुठं असेल तिथं.
अग्गग्गग्गग्गग्ग !!!
हे लय बेकार राव :)
पिवळा गॉगल काय, डायपर काय...
जोरात आहे गाडी...
आणि पेस्तनजी इथंपण आला का? वा वा वा....
कबुतरखान्यापाशी शिकलेत ते...खुद्द कबुतरांकडून!
एकदम "केम डार्लिंग = गुटुर्गुम्"
सापडली का पीठ दळणारी म्हातारी? केव्हढं होतं हो ते जातं? सांगा बुवा लवकर!
27 May 2008 - 7:18 pm | स्वाती राजेश
लेख छान लिहिला आहे.... ढगाची सफर मस्त वर्णन केले आहे....
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस".
इथे पण आहे का? त्यांची सर्व्हिस...:)
आता माझे पाय लटलट कापु लागले हुडहुडी मुळे दात एकमेकांवर आपटुन त्रिताल आडाचौताल आणि दादरा हे सगळे ताल द्रुत् लयीत वाजू लागले.:)
मस्त कल्पना आहे..मि.इंडिया ची....
बाकी तुमच्या बरोबर आम्हालाही ढगात नेले......
27 May 2008 - 10:30 pm | वरदा
हा भाग पण
ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस
ही ही ही ही......खरच येईल एक दिवस असली सर्व्हीस सांगता येत नाही.....
मला त्या ढगात पीठ दळणार्या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली.
ह्म्म्म मलाही बघायचय्...आता पुढचा भाग कधी?
27 May 2008 - 10:50 pm | पिवळा डांबिस
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो!
आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे....
खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस! (धम्या, ह. घे.:))
पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?
पेठकरकाका, जियो!:))
-डांबिसकाका
28 May 2008 - 7:30 am | छोटा डॉन
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो!
आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे....
खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस!
आयच्या गावात ....
अगदी "अंतु बर्वा" की हो आमच्या कोकणचा ...
विजूभाऊ जाउन या हो ....
बरं, एकटं जाताय की बरोबर कोणी [ कुटुंब किंवा तुमची पी.ए. , कसेही ] आहे ? काही नाही हो, उगाच देवयानीची कथा आठवली आणि डोक्यात किडा आला.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
27 May 2008 - 11:46 pm | मन
येउ द्या पटकन पुढले भागही.
तुर्तास गडबडित आहे.
पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन.
आपलाच,
मनोबा
28 May 2008 - 10:44 am | विजुभाऊ
:O येउ द्या पटकन पुढले भागही.
तुर्तास गडबडित आहे.
पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन.
हे अजब आहे रे. येउ द्या पटकन पुढले भागही असे म्हणायचे आणि त्याच वेळी पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन असेही म्हणायचे.
: रे भाऊ ...तुझ्या प्रतिसादाने बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ :O
28 May 2008 - 12:46 am | शितल
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. (ह.घ्या.)
मजेशीर कल्पना.
28 May 2008 - 2:16 pm | प्रभाकर पेठकर
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता.
मी ह्यावर काहीच बोलत नाही........
28 May 2008 - 7:38 am | छोटा डॉन
विजूभाऊ, कसलं "ढ"बरदस्त [ बहुतेक जबरदस्त हा शब्द चुकीचा आहे] लिहता हो तुम्ही ...
सही है, लगे रहो !!!
झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
हा हा हा .... आयला आपल्या ढोळ्यासमोर ढायरेक्ट चित्र आले त्याचे ...
पण घाबरनेका नही, कुछ नही होता है ...
त्या देखण्या सुंदर हडळीला येताना पाहीले. मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
काय सांगता, तुम्ही पाय बघायचा प्रयत्न केलात !!!
आयला आमची कार्टी असती तर त्यांनी *******, जाऊ दे, नंतर कधीतरी ...
बाकी पेठकरकाका म्हणत्तात तसे ढुमच्या हॄदयात "ढक्-ढक" झाले की नाही ???
पु"ढ"च्या भागाची वाट पाहत आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
28 May 2008 - 7:56 am | मदनबाण
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस
ही सुविधा पण ढिलायन्स ते ढिलायन्स विनामुल्य असेल बहुतेक !!!!!
हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात
एकदम मान्य.....म्हणुनच तर मी असे चलचित्रपट पाहु शकतो....
एवढ माल दिसणार भुत दुसर्या दुनियेत काय कामाच...?
तो स्वर्गीय सोनेरी द्रवपदार्थ ओठाला लावला......ह्या...पार फ़सलो. ते शुद्ध पाणी होते.
सात्विक जल... बरोबर ना ?
(वडाच्या पारावर झोके घेणारा झोटिंग)
मदनबाण.....
28 May 2008 - 10:27 am | मनस्वी
"ढिलायन्स" नाव सह्हीच!
>>हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात <<
असे काही नाही बरंका विजुभाऊ.. हॅल्लो ब्रदर मधला सलमान, पहेली मधला शाहरुख, भूतनाथ मधला बच्चन बरे दाखवलेले की.
आणि पेठकरकाका म्हणतात तसे तुमच्या हॄदयात "ढग-ढग" झाले की नाही ???
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
30 May 2008 - 1:31 am | वरदा
विजुभाऊ पुढच्या भागाची वाट पाहतेय्....आज हाच भाग पुन्हा वाचुन परत हसत बसले होते......