ब्लॉग माझा - ३ : विजेत्यांचे अभिनंदन

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
22 Nov 2010 - 10:08 am

सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी स्टार माझा आयोजीत 'ब्लॉग माझा' ह्या मराठी आंतरजालावर मुक्तपणाने आणि उत्साहाने भरभरुन लिखाण करुन आपल्या मायबोली मराठीच्या सेवेत असलेल्या मराठी जालनिशीकारांची ( मराठीत ब्लॉगर्सची ) स्पर्धा मोठ्ठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली.

नेहमीसारखाच ह्या ही वर्षी स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असेल ह्याची खात्री आहे.
लोक लिहीतच असतात, प्रतिसाद मिळाले तरी लिहतात आणि नाही मिळाले तरी जास्तच पेटुन लिहतात. मात्र महत्वाची असते ती पाठीवर पडणारी कौतुकाची थाप, तेच काम आज 'स्टार माझा' दरवर्षी अगदी मनापासुन करते आहे ह्याचे आम्हाला कौतुक आहे.
ह्या स्पर्धेतुन मराठी ब्लॉगकारांना मिळनारा अनुभव, काही नव्या टिप्स आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे त्यांना निश्चितच बहुमोल असते असा आमचा दृढ विश्वास आहे. कौतुकाबरोबरच अशा समृद्ध करणार्‍या मार्गदर्शनाने केवळ ब्लॉगकारांचीच नव्हे तर संपुर्ण मराठी आंतरजालाचीच प्रगती होण्यास मदत होते असे आम्हाला वाटते.

ह्या वर्षी 'ब्लॉग माझा' च्या परिक्षक मंडळात लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. साधना) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) या दिग्गज परीक्षकांचा समावेश होता. सळसळता उत्साह, तोलामोलाची सामाजीक जाण आणि प्रदिर्घ अनुभव असणार्‍या असा मान्यवरांकडुन स्पर्धांच्या ब्लॉगचे परिक्षण होणे आणि त्यातील कमी-जास्त कळणे हे निश्चितच आनंददायी आहे.

विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

सर्वच सहभागी स्पर्धकांचे आणि विजेत्यांची मी इथे 'मिसळपाव.कॉम परिवारा'तर्फे मनापासुन अभिनंदन करतो.
तुमच्या प्रयत्नांचा आणि कष्टाचा मराठी आंतरजालाला अभिमान आहे.

ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि बक्षिसे खेचुन आणणार्‍या तमाम मिपाकरांचेही विशेष अभिनंदन !!!

असाच उत्साह आणि जोश कायम ठेवा.
"लिहीत रहा, लिहीत रहा आणि अथक लिहीत रहा" एवढीच मागणी मी ह्या निमित्ताने करतो.

सर्व सहभागी स्पर्धक आणि विजेत्यांचे मी मिपा परिवारातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
अभिनंदन !!!

कलावावरसमाजअभिनंदनबातमीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आणि सर्वच ब्लॉग्कर्त्यांचे मनापासून धन्यवाद....जगभरातील तमाम मराठी साहित्यप्रेमींना सतत नवीन वाचनीय साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल!

रणजित चितळे's picture

22 Nov 2010 - 10:41 am | रणजित चितळे

एकेक करुन ब्लॉग्स वाचीन आता

सर्व स्प र्धक आनि विजेत्यन्चे हार्दिक अभिनन्दन

मितभाषी's picture

22 Nov 2010 - 11:59 am | मितभाषी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. :)

अविनाशकुलकर्णी's picture

22 Nov 2010 - 12:03 pm | अविनाशकुलकर्णी

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

यकु's picture

22 Nov 2010 - 12:22 pm | यकु

ब्लॉग माझा च्या संयोजकांनी पुढच्या स्पर्धेत ब्लॉगचे नीट वाचन करून विजेते घोषित करावेत अशी अपेक्षा.

गंगाधरजी मुटे, हेरंब ओक, नचिकेतजी, विद्याधर नीलकंठ भीसे, परेश प्रभू या ब्लॉगलेखकांना "उत्तेजनार्थ" कॅटॅगिरीत वाचताना कसेसेच वाटते!

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

मीनल's picture

22 Nov 2010 - 1:21 pm | मीनल

माझा ब्लॉग उत्तेजनार्थ ठरला त्याचे श्रेय मी विनायक रानडे, देवकाका व विशेषतः छोट्या डॉनला देते. त्यांनी केलेल्या सूचना,सूचवण्या अंमलात आणल्या म्हणूनचे हे यश मिळाले. त्यांना मनापासून धन्यवाद.

स्टार माझा, मिपा व समस्त वाचक वर्गाचा आभारी आहे.

गवि's picture

22 Nov 2010 - 3:10 pm | गवि

आभारी आहे.

डावखुरा's picture

22 Nov 2010 - 6:17 pm | डावखुरा

सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन...
आम्हाला वाचायला चांगला खजिना गवसला..
डान्रावाचे धन्स...

छोटा डॉन's picture

22 Nov 2010 - 6:57 pm | छोटा डॉन

वरील विजेत्यांच्या यादीमधले काही ब्लॉग्स चालत होतो.
ह्याच यादीत एक 'सातत्याचे जातीय विषयांना वाहिलेला, टिपीकल भडकावु भाषा वापरणारा, बिनबुडाचे आरोप आणि अरेरावीची भाषा वापरणारा व बहुत करुन सामान्य जनांच्या भावना दुखावल्या जातील ' असे लेखन प्रकाशित करणारा किंवा तशा विचारांना थेट पाठिंबा देणारा ब्लॉग दिसला.
सदर ब्लॉगवर आलेल्या काही कमेंट्सना उत्तर देतानाही ब्लॉगचालक तशीच भाषा वापरतो.

मजेशीर आहे हे प्रकरण.
आता माझा 'ब्लॉग माझा' ह्या स्पर्धेच्या संयोजन आणि परिक्षक मंडळाला असा सरळ प्रश्न आहे की 'बाबांनो, तुम्ही निवड करण्याआधी अशा प्रकारचे साहित्य प्रकाशित करणारा हा ब्लॉग पाहिला होता की नव्हता ? '
आपली निवड म्हणजे सदर चालु असलेल्या प्रकाराला 'संमती / सहमती ' समजावी का ?
विजेत्यांची निवड करताना सदर ब्लॉगवर असलेले साहित्य आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या जातात की नाही ? वाचल्या जात असतील तर त्या प्रतिक्रियांना अशी कचर्‍यासारखी किंमत का दिली गेली ?
मराठी आंतरजालावरील सर्वच संकेतस्थळांची व इतर 'अंक' काढणार्‍या गटांची 'जातीयवादी, भडकाऊ, बीनबुडाच्या, माथेफिरु ' लेखनाला मनाई असे तत्व जवळपास ठरले असताना व त्याचे काटेको पालन बहुतांश ठिकाणी होत असताना असा हा महत्वाचा मुद्दा ह्या स्पर्धेत असा विसरला कसा गेला ?

असो, आम्ही ह्या प्रकाराचा निषेध करतो.
जेव्हा आपण एखादी स्पर्धा घेतो तेव्हा त्याचे काही 'नियम' ठरवावे लागतात व ते ठरवताना व त्याचे पालन होताना काही 'सामाजिक अलिखित संकेत' पाळावे लागतात ह्यावर आमचा गाढा विश्वास आहे.
मात्र ह्या स्पर्धेत ह्याच संकेतांना अत्यंत ढिसाळपणे पायदळी तुडवले असल्याने आम्ही इथे ह्या प्रकाराचा स्पष्टपणे निषेध नोंदवत आहोत.

- ( नाराज ) छोटा डॉन

आमोद शिंदे's picture

23 Nov 2010 - 1:01 am | आमोद शिंदे

नक्की कोणता ब्लॉग रे? काही ब्लॉग्स चाळून बघीतले. त्यापैकी कुठलाच जातीय भडक वाटला नाही.
विजेत्यांचे अभिनंदन.

विशाल कुलकर्णी, गंगाधर मुटे, जयुताई आणि मिनलताई मिपासदस्य वरील यादीत आहेत.
अजून कोणी मिपासदस्य आहेत का हे माहित नाही. अर्थात सगळ्यांचेच अभिनंदन!
ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल डॉनचे आभार! जातीयवादी , बिनबुडाचे आरोप करणार्‍या लेखनाबद्दल असलेली नाराजी योग्य आहे.

प्रभो's picture

22 Nov 2010 - 7:36 pm | प्रभो

अभिनंदन..

नगरीनिरंजन's picture

23 Nov 2010 - 6:47 pm | नगरीनिरंजन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त मंडळी भरपूर उत्तेजित झाली असतील ही आशा!

उल्हास's picture

22 Nov 2010 - 9:20 pm | उल्हास

सर्व विजेत्यांचे अभिनन्दन

विसोबा खेचर's picture

22 Nov 2010 - 9:24 pm | विसोबा खेचर

छान रे.. असेच छान छान लिहीत राहा सगळ्यांनी, हीच शुभेच्छा..!

आमचा ब्लॉग विजेता, उपविजेता, उत्तेजनार्थ बक्षिसपात्र वगैरेच्या लायकीचा नाही याचा खेद वाटतो..! :)

नुकताच हा ब्लॉग आमच्या नजरेस पडला. छान वाटला.. :)

तात्या.

माजगावकर's picture

23 Nov 2010 - 1:20 am | माजगावकर

तात्या,

बाबुरावांच्या ब्लॉग-दुव्याबद्द्ल धन्यवाद! :) (आणि तुमच्या पण)

विसोबा खेचर's picture

23 Nov 2010 - 10:43 am | विसोबा खेचर

धन्यवाद.. :)

तात्या.

५० फक्त's picture

23 Nov 2010 - 9:23 am | ५० फक्त

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि बाकी उरलेल्या सगळ्या ब्लॉगवाल्ञांना, अगदी माझ्या सहित पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा.

हर्षद

अमोल केळकर's picture

23 Nov 2010 - 9:28 am | अमोल केळकर

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. :)

अमोल केळकर

देवदत्त's picture

23 Nov 2010 - 9:34 am | देवदत्त

सर्वांचे अभिनंदन :)

गोगोल's picture

23 Nov 2010 - 9:53 am | गोगोल

ब्लॉग थोडे थोडे चाळून बघितले.

ब्लॉग क्रमांक एक उघडल्यावर डोळ्यांना प्रचंड त्रास झाला. सगळीकडे जाहिरातीच जाहिराती आहेत. नंतर ब्लॉग करत्याच्या एका पोस्ट मुळे त्याचा उलगडा झाला. जाहिराती टाकून पैसे कमावण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. ब्लॉग चा कॉंटेंट पण काही विशेष नाही. इकडची तिकडाची थोडी फार माहिती मराठी मध्ये भाषांतरीत करून ब्लॉग वर चिकटवली आहे. याला पहिला क्रमांक दिलेला पाहून आश्चर्या वाटले.

बाकी एका पर्टिक्युलर ब्लॉग बद्दल बर्‍याच लोकांनी आगपाखड केली आहे. मला स्वत:ला तो ब्लॉग - एक दोन पोस्ट्स वगळता - आवडला. त्या काही पोस्ट बद्दला मला असे वाटते की ज्याला त्याला आपापली मते असायचा अधिकार आहे. अशी मते (एका विशिष्ट जातीचा किंवा व्यक्तीचा दुस्वास) बनवण्या मागचे एक कारण असे की प्रत्येकाला जसे अनुभव येतात, तो ज्या परिस्थितीत वाढतो त्याप्रमाणे त्याची मते बनतात. प्रस्तूत लेखकाचे बाकीचे लेख वाचता त्यानी कोणत्या अवघड पार्श्वभूमीवर आणि किती हेटाळनियुक्त नजरांना तोंड देत सध्याचे स्थान मिळवले आहे याची कल्पना येते. सुखवस्तू आणि जिथे शिक्षणाला जात्याच प्रोत्साहन मिळते अशा घरात जन्मून, आरामात इंजिनियर होऊन, बहुराष्ट्रीय कंपनीत पगार मिळवताना "असल्या जातीय" लिखाणाचा निषेध करणे फार सोपे आहे. तुमचे(हे मी कुणाला विशिष्ट व्यक्तीला ही उद्देशून म्हणत नाही) देव किंवा तुमची आदर्श स्थाने ही सगळ्या जगाची आदर्श स्थाने आहेत हे समजणे अत्यंत चुकीचे आहे. हा लेखक ज्या समाजात वाढला तेथे केवळ निसर्ग हीच खरी शाळा होती. त्यांची संस्कृती ही अत्यंत वेगळी (तरीसुद्धा संपन्न) होती हे बाकीच्या लेखंवरून कळते. त्यांचे बाकीचे लेख पहा, केवळ अप्रतिम आहेत.

बाकी गद्रे साहेबांच्या लेखाला उत्तेजनार्थ मध्ये बघून कसेसेच वाटले. मी जर परीक्षक असतो तर त्याला पहिला क्रमांक दिला असता.

गवि's picture

23 Nov 2010 - 10:11 am | गवि

गोगोल साहेब,

आपल्या या भावनेबद्दल आभार.

:-)

चिंतामणी's picture

23 Nov 2010 - 10:24 am | चिंतामणी

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन.

मिसळभोक्ता's picture

23 Nov 2010 - 10:27 am | मिसळभोक्ता

धन्यवाद.

जयवी's picture

24 Nov 2010 - 1:25 pm | जयवी

मनापासून धन्यवाद मित्रांनो :)

sneharani's picture

24 Nov 2010 - 2:14 pm | sneharani

सर्व विजेत्यांचं अभिनंदन!!