हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता.
हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती. नाट्यसंगीत हा प्रकारच असा आहे की इथे मुळच्या रागदारीचे सुर, आलाप वगॆरे त्या थोड्याश्या शब्दांना जिवंत करतात की, मुळच्या सारेगमला हे शब्दांचं आवरण एवढं सुंदर बनवतं,की माझ्यासारख्या शास्त्रीय संगीताबद्दलच्या अगाढ अज्ञानी माणसाला सुद्धा हे संगीत नितांत सुंदर आणि जवळचं वाटतं.
तिचं झालं आहे भांडण जिवलगाबरोवर आणि तो निघुन गेला आहे. प्रेम हे असंच असतं प्रेमाच्या एका विशिष्ट काळांत कमालीची ऒढ,आपलेपणा ह्या गोष्टी स्वामित्वांत कधी बदलतांत कळत देखिल नाही,आणि त्यात ती गायिका,जेंव्हा त्याच्या प्रेमांत धुंद नसेल तेंव्हा सप्तसुरांच्या बर्षावात चिंब भिजणारी आणि भिजवणारी. खरंतर तो तिच्या आयुष्यांत येण्यापुर्वी हे सुरच तिचे जिवलग होते, पण आता तो ही आहे.
आज झाले काय की त्याला भेटायची वेळ टळुन गेली आणि तिला झाला उशिर तिचा रियाझ लवकर न संपल्यामुळं. गुरुजी म्हणाले देखिल कि आज तुझा आवाज जास्तच छान लागला होता, आणि त्या कॊतुकांत थोडा उशिर झाला खरा. पण त्याच्यातल्या पुरुषाला एवढं कारण पुरेसं होतं आणि तो चिड्ला निघुन गेला. मग आता अचानक एक पोकळी जाणवते आहे. मग हि पोकळी भरायला तिच्या मदतीला तिचे मित्र सुरच उभे नाही राहिले तर नवलच. कालिदासांच्या जवळ जसा मेघ होता तसा हिच्याकडं सुर होते, हक्काचे अगदी हुकुमत होती त्यांच्यावर. पण आता तर तो खुप दुर गेला असेल ते सुर पोहोचतील त्या पेक्षा खुप लांब.
तिला वाटलं की त्याच्या चिडण्याचं कारण पण हेच सुर होते, म्हणुन त्यांच्यावर पण चिडावं त्यांना रागवावं. तसं यावेळी राग काढायला जवळचं कुणीतरी हवंच होतं. तुमच्यामुळं तो गेला ना आता मी तुमच्यावर कशि रागावते ते पहाच. तिच्या रागाची कल्पना येउन सुर तिला म्हणाले बघ बाई आम्ही तुझे मित्र आता या क्षणी तुझ्या रागानं आम्हालाही दु:ख होतं आहे, आमची काही मदत होत असेल तर सांग करु आम्ही जेवढं जमेल तेवढं. अशा क्षणी तिला केवढा आधार वाटला या शब्दांचा. कोरड्या पडलेल्या विहिरीत एका कोप-यातुन अलगद एखादा झरा फुटावा आणि खालच्या तापलेल्या खडकाला त्यानं क्षणार्धात थंड करावं अगदी स्वताची वाफ झाली तरी त्याची पर्वा न करता तसं वाटलं तिला.
या जुन्या, न रागावणा-या मित्रांना तिनं मनापासुन धन्यवाद दिले आणि सांगितलं
हे सुरांनो चंद्र व्हा
तो गेला आहे लांब कुठेतरी काही ठावठिकाणा नाही, म्हणुन तुम्हीच आता चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्यांचे कोष बनवुन त्यांना माझ्या प्रियकराकडे पाठवा.सुर अगदी आनंदानं तयार झाले हे करायला पण, पण चंद्र होणं त्यांना समजलं, तो कुठं आहे ते पाहणं पण समजलं ठिक, मग हे चांदण्यांचे कोष कशासाठी गं? सुर असलं ते सुद्दा तिचे मित्रच होते त्याच्या ही आधिपासुनचे, थोडा त्याच्या बद्दल राग त्यांनाही होताच.
वाट एकाकी तमाची, हरवलेल्या माणसाची,
ती म्हणाली , अरे सुरांनो तुम्ही दॆवी आहांत,स्वयंभु आहांत पण तो तसा नाही. तो साधा माणुस आहे आणि आता तर चिड्लेला, रागावलेला. एकदा का राग आला ना की मग ओळखीच्या वाटा पण अनोळखी वाटायला लागतात, जवळची माणसं दुरची वाटतात, सगळा अंधार होतो,काही म्हणजे काही कळत नाही, अशावेळी आपलंच कोणितरी लागतं रे वाट दाखवायला. आज कितीतरी दिवसांनी त्याला भेटायचं होतं आणि त्यामुळं तर आज विरहिणि गातांना मी तुमच्या जवळ आले होते. मग तो चिडला गेला निघुन कुठेतरी एकटाच रागाच्या अंधारात, आणि या रागाच्या अंधारात तो नेहमीच्या वाटा देखिल चुकत असेल, कारण वाटा कधिच चुकत नसतांत, चुकतांत ती आपलीच माणसं, मग त्यांना परत नको का आणायला, सांगा बरं.
बरसुनि आकाश सारे अम्रुताने नाहवा
तेंव्हा आता तुम्हि चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्या या सा-या आकाशांत विखरुन टाका, जसा आषाढातला मेघ बरसतो ना तसंच आज तुमचं हे चांदणं बरसुद्या. तुमच्या या बरसणा-या चांदण्यांच्या अम्रुतधारांनी त्याला नाहवुन टाका, मग त्याचा राग शांत होइल आणि त्याला त्याची परतीची वाट ओळखु येउ लागेल.
हर्षद
पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com/
प्रतिक्रिया
2 Nov 2010 - 8:18 am | प्राजु
सुरेख!!! लिहित रहा...!
2 Nov 2010 - 9:47 am | ५० फक्त
शिर्षक - सुरांनो हवे आहे की सुरानो या बद्दल भाषापंडितांनी क्रुपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती. काही चुक असेल तर ती मा. संपादक मंड्ळाने दुरुस्त करावी अथवा त्याबद्दल मार्गदर्शन करावे.
हर्षद
2 Nov 2010 - 6:31 pm | स्वानन्द
'सुरांनो' बरोबर आहे.
2 Nov 2010 - 9:56 am | मोहन
मनाला एकदम भावले. लिहीत राहा.
मोहन
2 Nov 2010 - 10:10 am | चिंतामणी
छान लिहीलेत.
दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही
पण एक सांगु इच्छितो. वर जे वर्णन केले आहेत त्या गाईकेच नाव मंजुषा पाटील आहे.
2 Nov 2010 - 11:23 am | ५० फक्त
अतिशय धन्यवाद, उभट चेहरा, धारदार नाक, मोठी जिवणी, ताठ बॅठ्क आणि वर म्हणल्याप्रमाणे डोळ्यांतील अधिकार. आज लिहितांना देखिल तो चेहरा तश्याचा तशा डोळ्यांसमोर येत होता.
हर्षद
25 Nov 2012 - 6:42 am | तुषार काळभोर
या का?
25 Nov 2012 - 11:01 pm | माम्लेदारचा पन्खा
त्यांच्या उदयाच्या काळात त्या आमच्या घरी राहिल्या होत्या....
अत्यंत सुरेल आवाज..........वाहवा !!
2 Nov 2010 - 10:19 am | योगप्रभू
हे सुरांनो चंद्र व्हा, हे गीत वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचे. त्यातील शब्दांचे सौन्दर्य उलगडताना कविवर्यांचा उल्लेख झाला असता तर बरे झाले असते.
'दिल है छोटासा, छोटीसी आशा'
3 Nov 2010 - 12:06 am | चिंतामणी
कुसुमाग्रजांचा उल्लेख हवा होता...
त्याच बरोबर अभिषेकीबुवांचासुध्दा उल्लेख हवा होता.
2 Nov 2010 - 5:21 pm | स्वाती२
आवडले!
2 Nov 2010 - 5:30 pm | चित्रा
छान लिहीले आहे. या गाण्याचा प्रभाव अनेकांवर पडला आहे असे दिसते आहे.
http://www.misalpav.com/node/11625 इथे ॐकार यांचाही लेख मिळाला.
2 Nov 2010 - 5:42 pm | पारा
एका सुंदर गीताची आठवण करून दिलीत. :)
ह्या गीताची माझी ओळख, तशी फारच नवी, नक्षत्रांचे देणे मध्ये देवकी पंडित ने गायलेलं होतं हे. तेंव्हा पासून फारच आवडतं झालं आहे...
सुंदर लिहिले आहे, लिहित राहावे. आम्ही वाचत राहूच :)
2 Nov 2010 - 6:29 pm | स्वानन्द
खूप सुंदर रसग्रहण!
येऊ द्या अजून.
3 Nov 2010 - 12:26 am | चिंतामणी
http://www.youtube.com/watch?v=ReDW0UOgip0
(आवाज थोडा घुमतो. पण छान आहे ऐकायला.)
3 Nov 2010 - 1:07 am | भडकमकर मास्तर
"मला वाटलं होतं की ईश्वरप्राप्तीसाठी तळमळणार्या एका भक्ताने भवसागर पार करून मला मोक्षाला ने अशी केलेली ही प्रार्थना आहे... " असा अर्थ कोणत्याही कवितेला ठोकून देता येतो... :)
3 Nov 2010 - 6:25 am | ५० फक्त
आपणां सर्वांचे अतिशय आभार
या नंतरचे गाणे - आज अचानक गाठ पडे --
हर्षद
24 Nov 2012 - 7:19 pm | कौस्तुभ आपटे
मस्तच!
24 Nov 2012 - 7:36 pm | प्रास
५० फक्त राव, कसले मस्त लिहिलेय हो, कसं काय वाचायचं राहिलेलं, कोण जाणे....
उकरून काढणार्याचे आभार!
बाकी, मला वाटतं की हे गाणं, "हे सूरांनो, चंद्र व्हा" असं आहे.
व्यक्तिशः शौनक अभिषेकींनी गायलेलं हे गाणं फार आवडलेलं.....
24 Nov 2012 - 8:12 pm | पैसा
धागा वर आणणार्याचे आभार्स! काय छान लिहिलंय!
24 Nov 2012 - 8:30 pm | इष्टुर फाकडा
पन्नास राव, खूप सुंदर रसग्रहण. अभिषेकींनी गायलेलं जास्त आवडून गेलं आहे.
25 Nov 2012 - 12:01 am | मालोजीराव
गायिका ,गाणं आणि रसग्रहण ....उकरणाऱ्याचे आभार !
25 Nov 2012 - 8:05 am | चौकटराजा
या दिवाळी पहात मधे चिचवड मुक्कामी हे गीत केतकी माटेगावकर ने अल्टीमेट गायले. अनेक नवीन जागा तिने घेऊन
देवकी ताई ( तिची गुरू) हिचे नाव राखले.
माझ्या माहिती प्रमाणे हे गीत चारूकेशी या रागावर आधारित आहे चारूकेशीतले हिंदी गीत म्हणजे "कई सदियोंसे कई जन्मोसे तेरे प्यार को तरसे अपना मन- गायक मुकेश, सं ब्रिजभूषण .
25 Nov 2012 - 9:15 pm | चैतन्य दीक्षित
अभिषेकी बुवांची जी खास आवडीतली गाणी आहेत त्यात 'हे सुरांनो' ही आहेच.
सवाई गंधर्व महोत्सवात शौनक अभिषेकींनी गायलेलं हे गाणं प्रत्यक्ष ऐकलंय मी.
फार सुरेख गायलं होतं.
५० फक्त, एक सुंदर लेख वाचायला दिलात त्याबद्दल धन्यवाद.