या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
कोठे निघालो होतो हे माहीत नव्हते. कुठे जायचे ते मी ठरवु शकत नव्हतो. त्यामुळे वेळेवर पोहोचु / ऊशीर होईल असली फ़ालतू टेन्शने/चिंता नव्हती.अदभूतामधुन जाणे की काय म्हणतात तसा मस्त् प्रवास चालला होता.
इतक्यात काय झाले........
(क्रमश:)
-------------------आमचा पुंज असा चालला होता. समोर एक भिंत दिसू लागली. ही भली मोठी.....लांबच लांब् उंचच उंच. नजर जाईल तिथवर भिंतच दिसत् होती. त्या भिंतीचे नाव फ़ायर वॊल असे होते. जगातल्या प्रत्येक पुंजाला ही फ़ायर वॊल पार करावी लागतेच अन्यथा आत/बाहेर जायलाही मिळत नाही. फ़ायर वॊल पार करणे ही अग्नीपरिक्षा म्हणुयात ना. प्रत्येकाला ती द्यावी लागतेच.मला वाटले की या फ़ायर वॊल मधे ज्वाळा वगैरे असतील. मनाची तशी तयारी केली.इथे ज्वाळा वगैरे तसे काही नव्हते पण तुमची कसुन तपासणी केली जात होती. तपासणी करणारे आमच्या सारखे एलेक्ट्रॊन पुंजच् होते . पण त्यांचे वागणे वेगळे होते. प्रथम ते आमच्या जवळ आले. मग आमच्यातल्या प्रत्येकाला नाव गाव सर्टीफ़िकेट् असे सर्व काही विचारले.
सर्टीफ़िकेट् म्हणजे काय ते मला माहीत नव्हते माझी वेळ आल्यावर सर्टीफ़िकेट कोणते या प्रश्नावर मी सरळ "ईक्श्वाकु" असे ठोकुन दिले. कोणालाही शंका आली नाही. आमच्या पुंजातल्या काहीजणाना ते "लिनक्स" वरचे काहीतरी असेल असे वाटले.
माझ्या खेरीज इतर सर्व कणांची कसून तपासणी झाली. माझी तपासणी करण्यास येणार तेवढ्यात इतरत्र कोठेतरी काहीतरी शंकास्पद सापडले म्हणुन् ते पुंज् तेथे गेले आणि मी सुटलो.
आमच्या पैकी प्रत्येक पुंजा चा जाण्याचा रस्ता आता येथुन वेगळा झाला. आम्ही मेल सर्व्हर मधे गेलो. माझ्या बरोबर अनेक ईमेल पुंज तेथे आले होते.
मी सहज एका ईमेल् पुंजा कडे पाहीले. डोळे थोडे किलकिले केले तर मला त्यात काय लिहीले होते ते वाचता येत होते.मग मी सगळ्याच ईमेल पुंजावर काय लिहिले होते ते वाचु लागलो.
काय काय भलभलते लिहितात लोक तरी.....
साई बाबा मिरॆकल. हे ढकल पत्र अजुन दहा जणाना पाठवा तुमचा भाग्योदय होईल्.......कृपया योग्य ते करा......... मला तुझी खूप् खूप् खूप् खूप् खूप् खूप् आठवण येत्तेय........मी आज शिकरण करुन खाल्ले........इकडे सगळे मजेत आहोत.......तुम्ही या ना इकडे...............कळविण्यास आनंद होत्तो की तुम्हाला..................... मुलगे की मुली एक सर्व्हे........कॊम्प्युटर आणि बायको एक साम्य.......सांग ना केंव्हा येणार........... नीट जेवता येत नाही? भडकमकर क्लासेस ची नवी बॆच. जेवावे कसे प्रात्यक्शिकासह ............................... हे करुन पहा ....................त्रास होतो? अजून अर्धा इंचाने वाढ होऊ शकते..............आयुष्याची मजा उपभोगा..........मी झुरतोय ग तुझ्या साठी........आणि म्हणुनच सांगते शेखर. हा माझा शेवटचा इमेल समज. मला विसरुन जा..........स्वस्तात अगदी पाव किमतीत व्हायग्रा..................मरणासन्न बालीकेला मदत करा.........तुम्हाला दहा कोटींचे बक्षीस लागलेय. ते सोडवुन घेण्यासाठी रुपये दहा हजार फक्त पाठवा............एक ना अनेक.
मला मजा वाटली या सगळ्या इमेल मधे बरेचसे मजकूर ढकल पत्रे किंवा उगाच टाईम पास या प्रकारचेच होते. कार्यलयीन कामाचे असे फ़ारच थोडे इमेल्स् त्यात होते.
ही सगळी इमेल् मग एक डिश् ऍन्टेना मार्फ़त् अवकाशात सोडण्यात आली. मी देखील त्यात होतो. आम्ही सारे अवकाशात मुक्त् फ़िरत होतो...हळु हळु पृथ्वी छोटी छोटी होत होती.चंद्र मोठा होत होता. आम्ही सगळे चंद्राजवळुन् जाणार होतो. शास्त्रद्न्याना चंद्रावर पाणी सापडले तेंव्हापासुन त्यानी चंद्रावर नवी वसाहत स्थापन केली होती. आम्ही तेथुन जाणार होतो.तेथुन जात असता मला दोन बायका काहीतरी बोलताना दिसल्या. आंतरळावीरांच्या शिरस्त्राणा आडुन त्यांचा जोरदार संवाद चालु होता. चंद्रावर वातारण खूपच विरळ असल्याने त्याना फ़ार जोरात ओरडुन बोलावे लागत होते
अगे तुमको काय् सांगु हमको यहां बहुत् प्रॊब्लेम है. यहा चंद्रपर रहेनेके बाद मेरा चतूर्थी के उपास का वांदा हो गया है. यहांसे चंद्र दिखता नै तो चंद्रोदय के बगैर् उपास कैसे सोडनेका.
अगे मेरी बी वैसीच पंचाईत है. रमजान के रोजे किये थे. अबी ईद का चांद देखे बगैर् रोजे का उपास कैसे छोडु मै?
हे ऐकुन मला बरे वाटले या बाबतीत का होईना हिन्दु-मुस्लिम एकी झाली होती.
मी तसाच पुढे गेलो. आता एक वेगळाच प्रदेश् दिसु लागला. सर्वत्र सोनेरी घरे होती. सोनेरी ढग हवेत होते. दाढी वाढलेले इघडे बंब लोक कमंडलूतला सोनेरी द्रवपदार्थ पीत बसले होते. कोणीतरी मला म्हणाले की इलेक्ट्रॊन म्हणुन फ़िरताना आपण विश्वाच्या सर्व भागात फ़िरत फ़िरत् एकदम स्वर्गात आलो.
मोठे मोठे विहार पाहुन तर मला पवई हिरानन्दानी किंवा बान्द्रा कुर्ला कॊम्प्लेक्स् भागात आल्या सारखे वाटत होते. फ़क्त् वाहनांची वर्दळ् माणसांची गर्दी दिसत नव्हती.
एका ठिकाणी मला एकदम् आठ दहा माणसांचा जमाव दिसला. थोडे जवळ जाउन पाहतो तो काय....रावण एकटाच तिथे चिंतेत बसला होता. त्याच्या दहा डोक्यांमुळे एकदम् गर्दी दिसत होती.
मी रावणाला म्हणालो...विचार कसला करतोस रावण्णा........ एवढा चिंतेत का दिसतोस? रावण म्हणाला "अरे काय करु बाबा माझे डोके दुखतंय" मी म्हाणालो " कोणते डोके दुखतयं?"
रावण म्हणाला " अरे सकाळपासुन तोच विचार करतोय. कोणते डोके दुखते आहे हेच कळत नाही. तुला सापडले तर बघ्."
रावणापुढे मी अजून् थोडा वेळ थांबलो असतो तर त्याने मला त्याची सगळी डोकी चेपुन द्यायला लावली असती.. मी हळुउच तेथुन सटकलो.
समोरुन एक इलेक्ट्रॊनस् ची एक झुंड आली. ते सगळे दिसायला एकसारखेच होते. त्यापैकी काही आमच्यात सामील झाले सामील होताना आमच्यातल्या काहीजणांचे आकारमान अचानक वाढले. तर काही जण.एकदम गायब झाले. ते पाहुन मला हुडहुडी भरली.कसेबसे मी वार्म अप केले आणि हुडहुडी घालवली. समोरुन आलेले ते सगळे ईलेक्ट्रोन्स् पुंज व्हायरस होते. मी स्कॆन केलेला सजीव म्हणुन त्याना आपल्यातला वाटलो होतो. त्यातल्या एका पुंजा ने मला सांगितले देखिल की "हम व्हायरसों के भी कुछ उसूल होते है...एक व्हायरस दुसरे व्हायरस पर कभी भी हमला नही करता है. अपनी बिरादरी पर ही हमला बोलना ये हमारी आन के खिलाफ़ है. तुम अपनेसे लगते हो इसलिये छोड दिया."
मला तर वाटले की ते सगळे व्हायरस सलीम- जावेद च्या कॊम्प्युटर मधुन आलेले असावेत.
मला आता तुझ्या स्वप्नात पोहोचायचे होते. मी आता एका नव्या इमेल सर्व्हर मधे आलो. त्याला तुझा इमेल पत्ता माहीत होता.
त्याने मला तुझ्या इन बॊक्स् मधे टाकले. तत्पूर्वी त्याने पुन्हा एकदा नखशिखान्त् अर्रर्र इथे माझे नख नव्हते आणि शिखा तर नव्हतीच आरपार म्हणुया फ़ारतर पन जलजळीत नजरेने तपासले. मला कोणत्या रोगाची लागण लागली नाहीना हे तपासले. सुदैवाने मला कोणत्याही व्हायरस ची लागण झाली नव्हती. ज्या कणांना व्हायरस ची लागण झाली होती त्याना वेगळे केले आणि त्यांना लसी चा डोस पाजला.
माझ्या आणि तुझ्यात् आता एका क्लिक चे अंतर होते. तुला स्वप्नात भेटायला मी आता फ़ार उतावळा झालो. ..
तू इमेल् बॊक्स् उघडणार माझा इमेल पहाणार त्यावर क्लिक करणार आणि मी थेट स्वप्नात तुझ्यासमोर अवतीर्ण होणार......आणि आपली थेट भेट् होणार.
मनात एक शंका आली. हे सगळे करताना जर लोड शेडिंग मुळे त्याच वेळेस लाईट गेली तर..............मला दरदरुन घाम फ़ुटला.......
मी खाडकन टक्क जागा झालो.......लाईट गेल्यामुळे पंखा बंद पडला होता. मला घाम फ़ुटला होता. सगळा बनियन ओला झाला होता.
छे: हे फ़ारच झाले.......तुझ्या स्वप्नात यायला आता सर्व काळजी घेउन काही तरी नवा मार्ग शोधायला हवा.....
बघुया. हा तुझ्या स्वप्नात जाण्यासाठीचा प्रवास आज कसा पूर्ण करता येतोय ते.
तुझा मित्र विजुभाऊ व्हिक्टर...... ..........
(क्रमश:)
प्रतिक्रिया
16 May 2008 - 10:33 am | मदनबाण
भडकमकर क्लासेस ची नवी बॆच.
यु टु ?
वाजवा रे वाजवा.....
माझ्या आणि तुझ्यात् आता एका क्लिक चे अंतर होते.
हे सर्वात जास्त आवडले....
(मिपा वर घुटमळणारा धांदरट पुंज)
मदनबाण.....
16 May 2008 - 11:07 am | आनंदयात्री
हहपुवा =))
16 May 2008 - 12:26 pm | धमाल मुलगा
फायरवॉल? काय च्यामारी डोकं है का गंमत?
आयला, उभ्या आयुष्यात असं कोणी विचारही करु शकलं नसेल की एका किचकट फायरवॉल कॉन्सेप्टवर कोणी हे असलं भारी लिहेल म्हणून :) मस्तच!
:)) लय भारी...बाकीचे काय बाळ फाटकाचे चेले व्हते काय?
आयला, स्वप्नात सुध्दा सेक्युलॅरिझम? छ्या: विजुभाऊ, काय साबरमतीमध्दे बसुन स्वप्न पाहिलं की काय?
:)) रावण्णा !!! जबराट मला पुणे आकाशवाणीवरची जाहिरात आठवली.."कस्सला विचार करतोय रामण्णा?..घराला आणि गोठ्याला कोणते पत्रे बसवावेत हेच कळत नाही....."
आयला, ऐकावं ते नवलच एकेक...काय व्हायरस हैत का गॅन्गस्टर्स?
हॅत्तिच्याआयला, ही ऍन काय महाराष्ट्रातच राहते काय? ते पण "म.रा.वि.म.,ग्रामिण" च्या अखत्यारीतल्या प्रदेशात?
16 May 2008 - 12:57 pm | आंबोळी
विजुभौ,
स्वप्नाची अवंतिका होते आहे. रावणाचे पिजे, स्वर्ग ,चंद्रावरचा (कै च्या कै) संवाद वगैरे पाणी जास्त होउन मेसमधल्या आमटीची कळा येउ लागली आहे.
तुमच्यासारख्या दर्जेदार लेखकाकडून वेठबिगारी TV मालिकांच्या लेखकासारख्या क्रमशः च्या पाट्या टाकल्याजाव्यात हे मनाला पटत नाही म्हणून स्पष्ट बोललो..... चु.भु.दे.घे.
(मेस मधे लै दिवस जेवलेला) आंबोळी
16 May 2008 - 1:18 pm | विसोबा खेचर
वाचतो आहे..!
विजूभाऊ, टेक युवर ओन टाईम...:)
तात्या.
16 May 2008 - 2:41 pm | मनस्वी
:) हे आवडले.
विजुभाऊ हा भाग इतका नाही भावला.. राग नसावा..
16 May 2008 - 6:48 pm | शितल
वीजुभाऊ हा ही भाग छान जमलाय,
आता आम्हाला पडणारी स्वप्न ही अगदी फालतु वाटत आहेत ,आम्ही १९ व्या शतकातच आहोत, आणि स्वप्नही त्याच युगातील पहात आहोत , छे आम्ही अजुन ई-स्वप्नात नाही बॉ जाऊ शकलो,
तुमच्या स्वप्नातुन तरी तुम्ही आम्हाला ई-स्वप्नाचा प्रवास घडवलात.
16 May 2008 - 7:03 pm | स्वाती राजेश
विजुभाऊ, मला असे वाटते कि तुम्ही X MAN पेक्षा भारी सिनेमा चे डायरेक्शन करू शकाल...:)
साई बाबा मिरॆकल. हे ढकल पत्र अजुन दहा जणाना पाठवा तुमचा भाग्योदय होईल्.......कृपया योग्य ते करा......... मला तुझी खूप् खूप् खूप् खूप् खूप् खूप् आठवण येत्तेय........मी आज शिकरण करुन खाल्ले........इकडे सगळे मजेत आहोत.......तुम्ही या ना इकडे...............कळविण्यास आनंद होत्तो की तुम्हाला..................... मुलगे की मुली एक सर्व्हे........कॊम्प्युटर आणि बायको एक साम्य.......सांग ना केंव्हा येणार........... नीट जेवता येत नाही? भडकमकर क्लासेस ची नवी बॆच. जेवावे कसे प्रात्यक्शिकासह ............................... हे करुन पहा ....................त्रास होतो? अजून अर्धा इंचाने वाढ होऊ शकते..............आयुष्याची मजा उपभोगा..........मी झुरतोय ग तुझ्या साठी........आणि म्हणुनच सांगते शेखर. हा माझा शेवटचा इमेल समज. मला विसरुन जा..........स्वस्तात अगदी पाव किमतीत व्हायग्रा..................मरणासन्न बालीकेला मदत करा.........तुम्हाला दहा कोटींचे बक्षीस लागलेय. ते सोडवुन घेण्यासाठी रुपये दहा हजार फक्त पाठवा............एक ना अनेक.
वाचताना इतके हसायला येत होते कि पोट दुखायला लागले....=)) =))
त्यात तो रावण डोके धरून बसलेला...:) तोच सारखा डोळ्यासमोर येत होता.)
बिचार्याला कोणी मदत करत नव्हते, आणि त्याचे त्यालाच कळत नव्हते...:) सही...
16 May 2008 - 7:10 pm | राजे (not verified)
जबरदस्त !!!!
काय प्रवास आहे !
=)) :T :))
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
24 Jul 2009 - 3:43 pm | सुधीर कांदळकर
फायरवॉल, इक्श्वाकु, रावण, व्हायरस, मस्त धमाल उडवली आहे. झकास.
सुधीर कांदळकर.