दर्जेदार लेखन म्हणजे काय?
हा अत्यंत गहन प्रश्न आहे. चांगल्या लेखनाची व्याख्या करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कारण काहीही व्याख्या केली, तरी उत्कृष्ट लेखन ती व्याख्या छेदून दशांगुळे वर उरतंच. मग ते सामावून घेण्यासाठी पुन्हा व्याख्या बदलायची आणि पुन्हा पुढची दहा अंगुळं पसरणारं काहीतरी सापडलं की ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. पण कधी कधी चांगलं लेखन म्हणजे काय, याचं उत्तर अश्लील म्हणजे काय याला एकाने दिलेल्या उत्तराप्रमाणे होतं "चांगलं लेखन म्हणजे काय हे मला सांगता येणार नाही, but I will know it when I see it". आपल्यापैकी बहुतेकांना हा आतला आवाज असतो - जो चांगल्या लेखनाला दाद देतो. मग भले त्याचं विश्लेषण करून सांगता का येईना. पुरणपोळी तोंडात ठेवल्यावर विरघळली म्हणजे ती मस्त जमली - ती कशी करायची, ती कशामुळे विरघळते हे प्रत्येकाला सांगता येईलच असं नाही.
मला विशेष आवडणाऱ्या लेखनाची वैशिष्ट्य अशी - सरळसाधं, अनुभूतीतून आलेलं, मनाला भिडणारं, वाचकाला नव्या विश्वात अलगदपणे घेऊन जाणारं.... मला माहीत आहे, ही उत्तरं नाहीत. कारण यात पुन्हा मनाला भिडणारं म्हणजे काय असा प्रश्न विचारता येईल. त्याचं उत्तर द्यायचं मी अर्थातच टाळलेलं आहे. मला कविता आवडतात, त्याही अवडंबर न माजवणाऱ्या, सहजसुंदर, ओघवत्या. विनोदी लिखाण आवडतं - तेसुद्धा ओढाताण न करता सहजी फुललेल्या विनोदांचं. कधीकधी अतिशय क्लिष्ट, तांत्रिक, सुरचित लेखनही आवडतं. प्रचंड सोफिस्टिकेटेड विनोदही आवडतात. मला काय आवडतं हे लिहायला लागल्यावर माझ्याच लक्षात यायला लागलंय की चांगलं म्हणजे काय हे जाऊचदेत, मला चांगलं काय वाटतं याचं वर्णन करणंही अवघड आहे.
त्यामुळेच या लेखात मांडलेल्या 'दर्जेदार लेखन म्हणजे काय?' या प्रश्नाच्या रटाळ, तांत्रिक उत्तरापेक्षा वाचकांनी मिपावरची उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं द्यावीत असं मी आवाहन करतो आहे. यामागे अनेक उद्देश आहेत. एक म्हणजे गेले काही आठवडे मिपावर जे लेखन येतं आहे त्यात दुर्दैवाने फुटकळ कौल, चारोळींचे काथ्याकूट, भंपक व भडक लेखन यांची उदाहरणं मला नेहेमीपेक्षा जास्त दिसली आहेत. त्यात गेल्या काही महिन्यात मिपाची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. इतक्या मोठ्या (नवीन) वाचकवर्गाला मिपावर केवळ फालतू लेखन व टाईमपास होतो अशी कल्पना होणं व्यक्तिश: मला पसंत नाही. मिपावर मी अनेक चांगले लेख, कविता, चर्चा, विडंबनं वाचलेली आहेत. गेल्या काही दिवसांतलं लेखन हे नियम नसून अपवाद आहे हे दाखवण्यासाठी आधीचं चांगलं लेखन नवीन वाचकांना बघायला मिळालं तर बरं होईल असं मला वाटतं. दुसरा उद्देश असा की मी नवीन व जुना यांच्या कुठे तरी मध्ये आहे. त्यामुळे मी सदस्य व्हायच्या आधी मिपावर झालेल्या उत्तमोत्तम लेखनापैकी बरंच मीदेखील वाचलेलं नाही. जर जुन्या व जाणत्या सदस्यांनी आपल्या वाचनखुणा उघडून त्यातलं आवडतं लेखन सादर केलं तर मलाही अनेक चांगलं लिखाण वाचायला मिळेल. तिसरा हेतू असा की या चर्चेला मिळालेल्या प्रतिसादांतून मिपावरच्या उत्तम लेखनाची एक लायब्ररी तयार व्हावी. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल.
मी अशी विनंती करतो की प्रतिसाद देताना प्रथम आपल्याला आवडलेल्या लेखनाचे, कवितांचे, चर्चांचे (तीन ते चार) दुवे द्यावेत. जर कोणी एखाद्या लिखाणाचा दुवा दिला असेल तर तो परत देऊ नये - जितके अधिक दुवे मिळतील तितकं चांगलं. शक्यतो कविता, विडंबनं, लेख, कथा, चर्चा, पाककृती, कलादालन अशा वेगवेगळ्या विभागांमधला एक एक दुवा द्यावा. (दुवा ठळक व अधोरेखित करावा) मग त्याखाली अगदी मोजक्या वाक्यांत ते का आवडलं हे नोंदवावं.
सुरूवात मी करतो
कथा : शिंपिणीचे घरटे - रामदास
कविता : समर्थ - क्रान्ति
लेख/चर्चा : कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे - धनंजय
शिंपिणीचे घरटे या कथेत शिंपीण पक्षी धागा धागा जुळवून घरटं उभं करते त्याप्रमाणे जिद्दीने घर आपल्या पायांवर - शिवणयंत्राची पायपट्टी चालवत अक्षरश: - उभं करणाऱ्या आईची कहाणी आहे. ती पूर्ण वाचल्याशिवाय तिची धार जाणवत नाही.
समर्थ कवितेत अतिशय सहजपणे कवयित्रीने आपल्या कवितेचं मागणं, गाऱ्हाणं सांगितलं आहे. अशा फार थोड्या कवितांपैकी आहे की ज्या पहिल्या वाचनातच पाठ होतात, ओठावर रेंगाळतात.
कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हा लेख म्हणून आलेला आहे. पण तो आत्मानुभव आहे. खूप खोलवर काही साठलेलं एकदम मोकळं केल्याचा प्रत्यय येतो. तो लेख असला तरी त्यावरची चर्चासुद्धा वाचण्याजोगी आहे.
प्रतिक्रिया
31 Aug 2010 - 3:24 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या धाग्यावरुन देवबाप्पांनी लिहिलेल्या सिद्धहस्त लेखकवाल्या धाग्याची आठवण झाली :)
31 Aug 2010 - 3:32 pm | भडकमकर मास्तर
मला कविता आवडतात, त्याही अवडंबर न माजवणाऱ्या, सहजसुंदर, ओघवत्या.
डोळे पाणावले..
जियो
माझी आवडती कविता
डंकर्कचे विद्धविवेचन
कवयित्री : शरदिनी
31 Aug 2010 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार
डुडल गावचा गोलंदाज
जखमी चित्रबलाकाचा अलारिपु ">
विसरलात वाटत
काय छळल होत दोन्ही कवितांनी
पैजारबुवा,
31 Aug 2010 - 3:37 pm | ज्ञानोबाचे पैजार
फारच छान कल्पना,
या निमीत्ताने चांगले जुने लेख परत एकदा वाचता येतील
पैजारबुवा,
31 Aug 2010 - 3:41 pm | सहज
चांगला धागा याकरता की मिपावरच्या उत्तमोत्तम लेखनाची येथे पुन्हा उजळणी होणार. कितीवेळा सांगूनही वाचनखुण साठवा ही सोय का उपलब्ध करुन दिली जात नाही आहे हे कळत नाही.
स्मृतीगंध ही वामनसुत यांची लेखनमाला
31 Aug 2010 - 3:45 pm | यशवंतकुलकर्णी
अरे वा! चांगल्या-वाईटाचा विचार करणारी माणसं आहेत म्हणायची (म्हणजे काय?? एक आवाज)
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला "चांगलं" कशाला म्हणावे ते कळत नाही आणि "लेखन" म्हणजे काय ते पण कळत नाही..
फक्त डोक्यात काहीतरी चमकू लागते आणि बोटं किबोर्डवर पडून अक्षरे उमटू लागतात आणि त्यांचे शब्द होतात आणि शब्दांना आधीच अर्थ चिकटलेले असतात एवढंच मला माहित आहे...
तुमचा आक्षेप नव्या लोकांनी लिहिण्यावर आहे का? असेल तर त्यात मी आहे का?? कारण मी चार-पाच दिवसच झाले इथे आलोय.
सगळं क्लियर झालेलं बरं.
31 Aug 2010 - 3:53 pm | राजेश घासकडवी
नवीन लोकांनी लिहिण्याबद्दल, थोडं चाचपडण्याबद्दलही आक्षेप नाही. माझा मिपावर आत्तापर्यंत आलेल्या चांगल्या लेखनावर फोकस करण्याचा हेतू आहे. नवीन सदस्यांचा उल्लेख वाचक म्हणून त्यांच्यावर होणारा परिणाम या दृष्टिकोनातून केला होता. जुनं, चांगलं वर यावं आणि त्यातून मिपावरच्या दर्जेदार लेखनाचा प्रत्यय नव्यांनाही व्हावा हा मुख्य हेतू.
31 Aug 2010 - 3:59 pm | यशवंतकुलकर्णी
वॉव्व!! अशी कल्पना आहे तर!
याबद्दल शतश: धन्यवाद!
31 Aug 2010 - 3:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझे काही आवडते लेखः
चवीने खाणार त्याला... - सुबक ठेंगणी
खाण्यापिण्याचं, वेगवेगळ्या संस्कृतींचं एवढं सुबक वर्णन सुबकच करू जाणे.
माझं खोबार ही संपूर्ण मालिका - बिपिन कार्यकर्ते
एका वेगळ्याच संस्कृतीत राहून, तिथले अनुभव लिहीताना, पुन्हा माणूस इथून तिथून सारखाच हे बिपिनच्या शैलीत वाचायला आवडलं.
कोणार्कच्या मंदीरातील शिल्पे, रामदास काकांचे बहुतेक सर्वच धागे आणि वामनसुत यांची स्मृतीचित्रे हे सुद्धा आवडतात. एकदा उल्लेख आल्यामुळे पुन्हा लिंक्स दिलेल्या नाहीत.
31 Aug 2010 - 3:47 pm | मेघवेडा
कथा - एक होती वैदेही - नीधप
आणि अर्थातच जेपी मॉर्गन यांची हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा ही लेखमाला!
31 Aug 2010 - 6:13 pm | प्रशान्त पुरकर
+१
जेपी मॉर्गन यांची एका खेळियाने सुद्धा अप्रतिम आहे...... (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत)
31 Aug 2010 - 3:48 pm | येडबंबू
चांगली idea :)
मला आवडलेले काही :
धिस टाईम फॉर आफ्रिका (पूर्ण लेखमाला).
हॅकर्स अंडरग्राऊंड (कथा अजून वेग पकड्तेय, पण मस्त मजा येतेय).
संपूर्ण फुट्बॉल विश्वचषक लेखमाला (अप्रतीम)
अजून बरेच काही आहे, पण अत्ता एवढेच लगेच आठवले.
(लिंक कशा देतात ते अजून माहीत नाही).
----
31 Aug 2010 - 5:07 pm | ऋषिकेश
चांगली कल्पना. वाचनखुणांमधे बरेच चांगले धागे होते.. आता आठवून शोधावे लागतील
आठवतील व मिळतील तसे देत जाईन
लगेच आठवणारे:
चतुरंग यांचे बुद्धीबळ विश्वकपाच्या सामन्याची वर्णने
ले गई दिल दुनिया जापान की - स्वाती तै
प्रियाली तैच्या बर्याच भयकथा
नंदनचे जवळजवळ सगळे लिखाण
रामदास काकांच्या अनेक कथा/लेख/कविता
कवितांमधे क्रान्ति, प्राजु, बेसनलाडू, अनिरुद्ध अभ्यंकर यांच्या अनेक कविता/गझला व चतुरंग व केसुंची विडंबने आहेतच
याशिवाय मिसळपाववर एकेकाळी चाललेल्या [ संपादकीय ] ह्या सदरातही एकापेक्षा एक सुरेख लेखन झाले आहे
31 Aug 2010 - 6:28 pm | प्रकाश घाटपांडे
मला आवडलेल श्रावण मोडक यांचे बरेच लेख आहेत. त्यातल्या त्यात अधिक राजे
बाकी रामदास यांचे लेखन आवडते. तसेच वर उल्लेखलेले सर्व बाकी जसे आठवतील तसे मांडु
31 Aug 2010 - 6:32 pm | मीनल
हे खरे की ` चांगले लेखन ` याच्या व्याख्या एकसमान नाही.
पण` फुटकळ लेख `याची व्याख्या ब-याच प्रमाणात एकसमान होऊ शकेल.
बरेच ` चांगले ` म्हणजे मला आवडलेले लेख वाचन खुणेमधे साठवून ठेवले होते. त्यात ब-याच कविता, लेख, कथा होत्या. ते आता शोधणे शक्य नाही होत आहे.
मला आठवले /मिळाले ते ---
मूख दूर्बळ माझी हॉस्पीटल भरती http://misalpav.com/node/11480
अवलिया -मौन- http://mimarathi.net/node/1328
प्रा. बिरूटे -निगरगट्ट आठवांचा चिखल..http://misalpav.com/node/13244
दत्ता काळे हा स्पंद फुलण्याचा http://misalpav.com/node/4469
आनंद घारे यांचे बरेचसे लेख मला आवडतात.
एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली http://misalpav.com/node/5747
ती -http://misalpav.com/node/12997
प्राजु- फुलोरा -http://misalpav.com/node/7095
क्रांती- चैत्रगौर -http://misalpav.com/node/7151
टारझनच्या प्रेमाचे तीन्ही पोपट -http://misalpav.com/node/10383
अरूंधती -प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव http://misalpav.com/node/11457
31 Aug 2010 - 6:02 pm | प्रियाली
सर्वात आधी
उरलेले सर्व आणि सर्वांचे लेखन वाचनीय असेल असा माझा दावा आहे. ;)
31 Aug 2010 - 6:49 pm | असुर
>>>सटासट शिंका दिल्यासारखे येणारे कौल थांबवा <<<
+१०
>>>मनात आलेले वाट्टेल ते लिहून टाकणारे लेख थांबवा <<<
+१. इथे संपादक्स महत्वाचे ठरतात!
>>>चौकशी खेरीज इतर एकोळी धागे थांबवा <<<
+२
>>>ढापलेले, चोरलेले, मारलेले इतरांचे साहित्य इथे लावणे थांबवा <<<
+५०
>>>लेखन करताना माफक विचार करून (हे बरेच कठिण काम असावे) लेख टाकावा आणि विरामचिन्हांचा सुकाळ असणारे लेखन थांबवा <<<
+१. गुर्जींच्या सुचनेवरुन मी स्वतःत बदल घडवतो आहे.
>>>उरलेले सर्व आणि सर्वांचे लेखन वाचनीय असेल असा माझा दावा आहे. <<<
+१०००
अशा रितीने प्रत्येक मुद्याशी एक वा अनेक वेळा सहमत!
--असुर
31 Aug 2010 - 6:49 pm | सहज
>उरलेले सर्व आणि सर्वांचे लेखन वाचनीय असेल असा माझा दावा आहे.
हे एकदम पटेश!
31 Aug 2010 - 6:05 pm | भाऊ पाटील
सदस्यत्व मिळाल्यानंतर बरेच जुने-नवे लेख वाचले आणि काही आवडले, काही विनोदी वाटले म्हणून तर काही उपयुक्त वाटले म्हणून लिंका साठवून ठेवल्या. त्या खाली देत आहे-
http://www.misalpav.com/node/6241
http://www.misalpav.com/node/6332
http://www.misalpav.com/node/7176
http://www.misalpav.com/node/3302
http://www.misalpav.com/tracker/707/707
http://www.misalpav.com/node/10279
http://www.misalpav.com/node/10229
http://www.misalpav.com/node/10101
http://www.misalpav.com/node/8686
http://www.misalpav.com/tracker/185/185
http://misalpav.com/node/9179
http://www.misalpav.com/node/11254
http://www.misalpav.com/node/12076
http://www.misalpav.com/node/11998
http://www.misalpav.com/tracker/4691/4691
http://www.misalpav.com/node/7176
http://www.misalpav.com/node/12853
http://www.misalpav.com/node/12858
http://www.misalpav.com/node/13593
http://www.misalpav.com/node/13485
आता कुठल्या लिंक मधे काय आहे आणि कशासाठी त्या साठवल्या ते मलाही सांगणे अवघड आहे. :)
31 Aug 2010 - 6:19 pm | गणेशा
नविनच पुन्हा आलो आहे.
जुने लेख वाचायला मिळत आहेत या धाग्यामुळे .
छान वाटले.
२-३ दिवस झाले active झालो आहे.
सध्या आफ्रिकेतील प्रवास वर्णन वाचत आहे. मस्त आहे
31 Aug 2010 - 6:42 pm | पुष्करिणी
काही आवडतं लिखाण
....उर्फ़ सुगरणीचा सल्ला : मेघना भुस्कुटे
भयाण विनोदी कविता
अरूंधती, रामदास, अवलिया यांच बहुतेक सगळंच लिखाण आवडत.
31 Aug 2010 - 6:45 pm | चित्रा
मिपावरील लेखन वैविध्यपूर्ण आहे, आणि त्यातून काही थोड्याच लेख/कविता निवडायच्या तर दुसर्यांवर अन्याय होणार. तरी काही पटकन आठवले ते देते आहे.
प्रकाश घाटपांडे यांचे फलज्योतिष, नाडीपट्टी इ. वरील लेखन प्रसिद्धच आहे. तरी यंदा कर्तव्य आहे, या लेखन मालिकेत आलेले त्यांचे लेख मी ओळखीतील एका विवाहेच्छु मुलीला दाखवले.
यंदा कर्तव्य आहे ?
धनंजय आणि रामदास यांचे बरेचसे लेखन आवडते. रामदास यांची शिंपीणीची गोष्ट विशेष आवडते (पण त्याचा दुवा घासकडवी यांनी दिलाच आहे)
वानगीदाखल - बेसामे मुचो
नंदनने हल्ली जास्त लिहीलेले नाही, पण हे आठवले -बरेच काही उगवून आलेले
बाकी कलादालनाकडे दुर्लक्ष होते, पण कलादालनात अनेक सुंदर भ्रमंत्या वाचायला मिळतील.
विमुक्त यांचे हे उदाहरणादाखल - कोकणातली भटकंती
पण खरे तर असे आहे, की हे अलिकडे सतत चालले आहे तसे अतिशय फुटकळ लेखन प्रियाली म्हणते तसे थांबवले तर मिसळपावावर वाचायला खूप काही आहे. वेगवेगळ्या वेळी आवडतील अशा कथा/कविता/लेख सगळे भरपूर आहे.
31 Aug 2010 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अलिकडे सतत चालले आहे तसे अतिशय फुटकळ लेखन प्रियाली म्हणते तसे थांबवले तर मिसळपावावर वाचायला खूप काही आहे. वेगवेगळ्या वेळी आवडतील अशा कथा/कविता/लेख सगळे भरपूर आहे.
सहमत आहे....!
-दिलीप बिरुटे
31 Aug 2010 - 6:59 pm | अविनाशकुलकर्णी
राजहंसाची चाल डौलदार व लयबद्ध असते..
म्हणुन ईतरांनी चालुच नये का?
अशी माउलिची एक उपमा आठवली
31 Aug 2010 - 7:16 pm | शुचि
+१
काय बोललात कुलकर्णी साहेब !!!
31 Aug 2010 - 7:55 pm | प्रियाली
इतरांनी अवश्य चालावे पण आपण राजहंसासारखेच चालतो हा तोरा ठेवू नये, चालता येत नसेल तर चप्पल वाकडी म्हणू नये आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे.. राजहंसाप्रमाणे चालण्याचा थोडा सराव करा की. बिघडते कुठे?
1 Sep 2010 - 2:47 am | मधुशाला
करेक्ट...
(थोडक्यात, माझे सोडून इतर सर्वांचे लिखाण थांबवा.. ;) )
31 Aug 2010 - 11:28 pm | शुचि
मला आवडणारं लेखन इथे सापडेल सन्जोप राव यांचं सर्वच लेखन मला अतोनात म्हणजे अतिशय आवडतं-
http://www.misalpav.com/newtracker/26/26
http://www.misalpav.com/node/11707 ....... नाचरी गाय केवळ अ-प्र-ति-म बालगीत - चित्रा यांनी भाषांतरीत केलेलं!!!!
http://www.misalpav.com/node/206 ..... प्रा डॉ दिलीप बिरुटे यांचा अतिशय तरल, हळवा लेख. सुरेख!!!
http://www.misalpav.com/node/6238 .... पिवळा डांबिस यांचा हा विनोदी लेख वाचून हसून मरायची वेळ आली होती.
http://www.misalpav.com/node/462 ...... मुक्तसुनीत यांचं छोटेखानी पण बावनकशी लिखाण!!!
http://www.misalpav.com/node/12242, http://www.misalpav.com/node/12321, http://www.misalpav.com/node/13267 ........ मेघवेडा यांचं काव्यशास्त्रविनोद.
http://www.misalpav.com/node/12162 ..... अरुंधती विशेषतः विनोदी लेखन खूपच फुलवते असं माझं मत आहे.
http://www.misalpav.com/node/13028, http://www.misalpav.com/node/12605 ...... पुष्करिणी चे इतिहासावरचे "डंकर्क" आणि "पर्ल हार्बर" लेख क्या केहेने!!! मास्टरपीस!
http://www.misalpav.com/node/11239 .... अर्धवटराव यांचा हा पुलंवरचा लेख माझा आवडता
http://www.misalpav.com/node/12400 .... ३_१४ विक्षिप्त्_आदिती यांच्या स्त्रीची आजची प्रतिमा मधील हा लेख
आता बास करते. :)
पण लेखनाइतकीच हुषारी, चातुर्य, भाषेवरील प्रभुत्व, आणी मुख्य म्हणजे " RIGHT ATTITUDE" प्रतिक्रिया द्यायला लागते. माझे आवडते प्रतिसादकर्ते - मिभो (नंबर १), चिंतातूर जंतू, मुसु, सन्जोप राव, अरुंधती, घासकडवी, चतुरंग आणि पिडा
31 Aug 2010 - 8:00 pm | llपुण्याचे पेशवेll
मला आवडलेले लेखन चांगले.. त्यात साहीत्यमूल्य असल्या फुटकळ गोष्टी मी शोधत नाही.
31 Aug 2010 - 8:17 pm | राजेश घासकडवी
लेखात आवाहन केलं आहे त्याप्रमाणे चांगल्या लेखनाची उदाहरणं द्यावीत ही कळकळीची विनंती.
'मिपावरचं वाईट लेखन म्हणजे काय, ते कसं टाळावं' यावर चर्चा नाही झाली तर बरं. या लेखाचा उद्देश चांगल्याचं कौतुक व्हावं, व सर्वच नव्या जुन्या लेखकांसमोर आदर्श राहावेत इतकाच मर्यादित आहे.
धन्यवाद.
31 Aug 2010 - 8:39 pm | पाषाणभेद
चांगलं लेखन (म्हणजेच चांगल वाचनीय का?) हे व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. व्यक्ती तितक्या प्रकृती. अन आता एखादा लेख मुड असेल तर वाचला की चांगला वाटेल. तो मनुष्य आजारी असेल अन वाचला तर त्याची प्रतिक्रीया कदाचित भिन्न असू शकते. दोन वाचकांची परिस्थीती भिन्न असू शकते. अर्थात यात लोकशाहीचा निकष लावायचा झाल्यास जास्त मते तो लेख (लेखक) विजयी असे होवू शकते.
माझी आवडः
येथील सर्व लेखन
या लेखाचे शिर्षकः 'वाचकांच्या नजरेतून मिपावरची उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं ' असे हवे होते काय?
31 Aug 2010 - 8:58 pm | राजेश घासकडवी
होय. किंवा 'मिपावरची दर्जेदार लेखनाची उदाहरणं' हेही चालेल. संपादक कृपया बदल करतील काय?
31 Aug 2010 - 9:49 pm | हेम
नाटकांत जसे '......आणि काशिनाथ घाणेकर' ,
तसे इथे '......आणि विसोबा खेचर'
31 Aug 2010 - 10:05 pm | पिवळा डांबिस
तात्याचं लिखाण तर इथे प्रथम घेऊन आलं!!!
तात्याच्या लिखाणाचा फॅन!
-पिवळा डांबिस
31 Aug 2010 - 10:52 pm | बिपिन कार्यकर्ते
माझे आवडते (आणि म्हणूनच त्यांनी लिहित रहावं आणि उत्तमोत्तम लिहावं असा आग्रह आहे) जालिय लेखक
रामदास, तात्या, अवलिया, मुक्तसुनित, पिडां, श्रावण मोडक, संजोप राव, चिंतातुर जंतु, आळश्यांचा राजा, टार्या, केशवसुमार, मेघना भुस्कुटे, धनंजय, मिष्टर घासकडवी .... लिस्ट अजून आहेच पण पटकन डोळ्यापुढे येणारी ही नावं... अर्थात सगळंच लेखन आवडलेलं आहे असं नाही पण या लोकांचे लेखन बहुतांशी आवडलेलं आहेच. या लोकांचे नाव मेन बोर्डावर दिसले की धागा लगेच उघडला जातोच जातो.
31 Aug 2010 - 11:05 pm | मृत्युन्जय
रामदासांचे काटेकोरांटीची फुले. मि पा वर अजुन एक भिक्कार लेखन करणार्या हौशी लेखकाची भर काटेकोरांटीची फुले मुळेच पडली. त्यांचे बाकीचे लेखनही अप्रतिम.
राघागुर्जींचे लेखनही आवडते. विलासराव आणि अर्धवटांची (आयडी बदला राव हा) प्रवासवर्णनेही आवडली.
बाकी धागाप्रवर्तकाशी आणि प्रियालीशी १०१% सहमत.
31 Aug 2010 - 11:07 pm | शिल्पा ब
मला अरुंधती , भडकमकर मास्तरांचे वर्ग, अर्धवट यांची आफ्रिकन सफारी, विलासरावांची ब्रज़िलिअन सफारी असे बरेच लेख आहेत जे आवडले...
आणि आता संपादकांनी वायफळ कौल, एकोळी धागे काढून टाकावेत..
31 Aug 2010 - 11:30 pm | इन्द्र्राज पवार
शब्दात आणि त्यामुळे पर्यायाने भाषेत किती विलक्षण अशी ताकद आहे हे या सुंदर लेखावरून समजते. श्री.घासकडवी यांना केवळ मिसळपाववरीलच लेखन यासाठी अभिप्रेत नसून एकूणच हा लेखनाचा प्रपंच अन्य क्षेत्रातही किती परिणामकारक होऊ शकतो हेही त्यांनी छानपणे अधोरेखित केले आहे. (पुरणपोळीचा दाखला तर नोंदनीय असाच आहे.)
मी ज्यावेळी मिपाचा सदस्य झालो त्याला कारणही नेमका भाषेचा डौल हेच होते. त्यावेळी श्री.छोटा डॉन यांचा त्यांच्या एका अफाट प्रतिसाद लाभलेल्या लेखाचा उल्लेख वर्तमानपत्रातून वाचला आणि त्यातून त्यांच्या लेखनाची जादू मोहित करून गेली. आयपीएलने "पुणे" केन्द्र मंजूर केले आणि डॉनरावांच्या भन्नाट कल्पनेने पंख पसरले आणि त्यातून त्यांच्या ब्लॉगवर अवतरले होते "आयपीएल पुणे आणि पुणेरी पाट्या". वाचनाचा निखळ, अकृत्रीम आविष्कार, जिथे रागलोभद्वेषचीडरुसवाफुगवाआदेशआक्रोशअगतिकता या वा तत्सम विकारांना अजिबात स्थान नव्हते; होती ती निव्वळ धमाल आणि कल्पनाविष्काराचा अमर्यादित अनुभव. सदस्यत्वाचा माझा पहिला आठवडा त्या वाचनातच गेला होता. (मला वाटते त्याच काळात "स्टार माझा" ने काही मिपाकारांना ब्लॉग लिखाणाबाबत पारितोषिकेही जाहीर केली होती, त्याचा उल्लेख येथील लेखनात धाग्यास्वरूपात केला गेला होता.) तिथून मग मी थेट "मिसळपाव" वर आलो अन् लेखनाच्या अन्य कुठल्याही उपविभागापेक्षा 'जनातलं मनातलं' या सदरात त्यातील वैविध्यामुळे गुंतून गेलो.
प्रसिद्धी तारखा आता लक्षात नाहीत त्यामुळे मनात (त्यातील लेखनशैलीमुळे, तसेच चांगल्या प्रतिसादांमुळे) राहिलेले लेख जसे आठवतील तसे देण्याचा प्रयत्न केल्यास, प्रकर्षाने आठवतात ते म्हणजे 'तीळ व त्यांचे अर्थ' ~ श्री.सोनार (प्रथम नाव विसरलो), 'चेतन भगतला अनावृत्त पत्र' ~ श्री.विनायक पाचलग, 'व्यभिचार : पाप आणि पुण्य?' ~ डॉ.श्रीराम दिवटे आणि खुद्द डॉनराव यांची "मिपा फूटबॉल टीम'.
(थोडेसे अवांतर : टिकावूसोबत टाकाऊ लेखनाचाही ~ वा प्रकाराचा ~ काही सदस्य (नाव न घेता) उल्लेख करतात. पण मला वाटले ही बाब आपण काळावर सोडून द्यावी. सकस कोणते आणि निकस लिखाण कुठले हे कोणतेही निकष न लावतादेखील नजरेत येत असतेच. भाषा जशी समाजसापेक्ष वस्तू आहे तद्वतच लेखनदेखील मिपाकारांनी स्वीकृत केल्याशिवाय इथे अर्थपूर्ण होतच नाही. एखाद्या लेखाने १००+ प्रतिसाद खेचले म्हणजे तो 'अकादमी' पुरस्कार प्राप्तीचा झाला असे नाही; त्याच सूरात भाषेच्या महत्वाबाबतच्या लेखास दहापेक्षा कमी प्रतिसाद मिळाले म्हणजे त्याचे मूल्य नाही असेही मानू नये.)
1 Sep 2010 - 2:16 am | धनंजय
ब्रिटीश यांचे आगरी लेखन मजेदार असते. आवर्जून वाचतो.
1 Sep 2010 - 3:46 am | यशवंतकुलकर्णी
http://www.misalpav.com/node/8554
1 Sep 2010 - 7:44 pm | पैसा
हा! हा! हा!हा! हा! हा!हा! हा! हा!
1 Sep 2010 - 2:52 am | सुनील
काही हुच्च कविता! (अद्याप अर्थ शोधतोय!)
http://misalpav.com/node/7919
http://misalpav.com/node/9976
http://misalpav.com/node/9944
http://misalpav.com/node/12353
http://misalpav.com/node/9621
http://misalpav.com/node/10234
http://misalpav.com/node/8849
http://misalpav.com/node/7049
http://misalpav.com/node/8753
1 Sep 2010 - 10:40 am | सुहास..
जवळपास सर्वांनीच यादी दिली आहे ..
मला जे आवडत ते ह्या लेखकांच सर्वकाही आणी कारणे
१ ) ब्रिटीश (आगरी बोली आणी अतिशय वेगळे कधी विनोद तर कधी संवेदनशील लिखाण, ह्या दादुसच्या एका कविनेने मिपाकरांच्या अक्षरश डोळ्यातुन पाणी काढले होते.).
२) मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला 'आपला अभीजीत' म्हणजे आपला अभिदा (शब्द-पाल्हाळ न लावता कमीत कमी शब्द योजनेत वाचकापर्यंत आपला निरोप वाचका पर्यंत कसा पोहोचवायचा हे अभिदा कडुन शिकावं, ह्या लेखकाचा एक लेख 'शेण कसे खावे' मला आवडतो.)
३)जागु (साध्या शब्दातल्या कविता लिहीण्यात हिचा हातखंडा आहे, पण जागुने दिलेली श्रावण-भाज्यांची मेजवानी केवळ मिपा नव्हे तर समस्त आंतरजालावर अप्रतिम.अश्या प्रकारच्या पाकृ पहिल्यांदाच आतंरजालावर पाहिल्या गेल्या.)
४) निखिल देशपांडे (हे सध्या संपादक झाले म्हणुन की काय लिखाण कमी झाले आहे बहुतेक, दोन घडीच्या प्रॅक्टीकल आणी ईमोशनल लाईफची सांगड घालत लिहीणारा लेखक)
५) श्रावण मोडक (का आवडते हे सांगायची बहुधा गरज नसावी.)
६) सगळ्यात महत्त्वाच नाव म्हणजे परिकथेतील राजकुमार (हा लेखक जितका टवाळ लिहु शकतो तितकच ताकदीच,सवेंदनशील आणी वेग-वेगळ्या विषयावर,जे जगाला माहीतही नसेल अस लिखाण करतो,करु शकतो.)
७) पुणेरी (वास्तवाशी परिचय करून देणारा लेखक.)
अनिरुध्द अभ्यंकराच्या गजला,केसुगुर्जींची विडंबन,आमचे परममित्र पुण्याचे पेशवेंची विडबंनात्मक कविता,प्राजुच्या कविता,शिवाय क्लिंटन, नितीन थत्तें,ईन्दजदा.मराठमोळा,नुकतेच टिममध्ये शिरलेले 'पंडित गागाभट्ट' म्हजेच पंगाशेठ ह्याचे अभ्यासपुर्ण प्रतिसाद देखील आपल्याला आवडतात आणी तसच प्रतिसादाला पर्सनल टच देणारे, थोडेसे खोडी काढणारे धमाल मुलगा,छोटा डॉन ह्यांचे प्रतिसाद देखील मस्त असतात.
1 Sep 2010 - 5:39 pm | जागु
यादीत नाव पाहून आनंद झाला. धन्यवाद.
1 Sep 2010 - 11:09 am | विसोबा खेचर
मलाही येथील ब-याच लोकांचे लेखन आवडते..
रामदास, पिडा, संजोप, बिपिन, रंगा, नाना, धनंजय, ब्रिटिश, क्रान्ती, प्राजू, .....
नावं अनेक आहेत. अनवधानाने काही राहिली असल्यास क्षमस्व..
माझे लेखन आवडते असे ज्यांनी वर म्हटले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो..
तात्या.
1 Sep 2010 - 12:06 pm | दशानन
छ्या.. !
ज्या मित्रांच्या सांगण्यावरुन मी जवळ जवळ ३००+ लेख / कथा / कविता लिहल्या त्यांनाच माझे लेखन आवडत नाही की काय बॉ ???
काय रे मला असाच सगळ्यांनी प्रतिसाद देऊन चढवुन ठेवला होता की काय .. ऑ !
**
असो,
येथे माझ्या सर्व लेखनाचे दुवे कसे द्यावेत हे माहित नाही म्हणून हा माझा दुवा.
1 Sep 2010 - 1:05 pm | शिल्पा ब
३०० + ? काय हो तुम्हाला काही काम बीम नसतं का? म्हणजे पोटापाण्याचा उद्योग वगैरे?
1 Sep 2010 - 1:04 pm | मनीषा
मिपावर रोज काही ना काही अवडेल असे सापडतेच.
मिपा ची तुलना दिवसांच्या सर्व प्रहरांशी केली तर ..
कधी पहाटे सारख शांत, पवित्र, कधी सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं अवखळ, थोडं हट्वादी, कधी मध्यान्ही सारखं प्रखर, तापलेलं, तर कधी संध्ये सारखं जाणतं, मग कधी पौर्णिमेच्या रात्री सारखं प्रेमात, स्वप्नात तर कधी अमावस्ये सारखं दु:खात , विरहात तळमळणारं ... मला मिपाची ही सर्वं रुपं आवडतात.
क्रांतीच्या जवळ जवळ सगळ्या कविता आवडतात, प्राजु आणि जयवी च्याही कविता छान असतात.
स्वाती दिनेश यांच्या पाककृती ही आवडतात (वाचायला) . आणि
श्री रामदास, तात्या अभ्यंकर आणि जयंत कुलकर्णि यांचे लेखन
1 Sep 2010 - 6:53 pm | जयंत कुलकर्णी
चला ! कोणाला तरी आवडते माझे लेखन. :-) Not Bad !
1 Sep 2010 - 1:51 pm | नंदन
वरील प्रतिसादांत उल्लेख केलेल्या नावांव्यतिरिक्त क्लिंटन, प्रदीप, यशोधरा, विमुक्त आणि चिंतातुरजंतू यांचे लेखन आणि पांथस्थ व गणपाभौंच्या पाककृती/लेखन आवर्जून वाचावे असे. संगीतविषयक लेखनात तात्या आणि प्रदीप यांच्याबरोबरच बहुगुणी आणि डॉ. दाढे यांच्या प्रतिक्रिया/लेख दर्दी असतात. बाकी रामदास, गणपा आणि स्वातीताई यांच्या लेखन/पाकृवर प्रतिक्रिया द्यायला दर वेळी नवीन विशेषणं कुठून आणावी असा प्रश्न पडतो :)
1 Sep 2010 - 5:04 pm | प्रसन्न केसकर
दर्जा म्हणजे नक्की काय? तो ठरवण्याचे निकष काय? सर्वाना सर्वकाळ पटतील असे दर्जाबाबत निकष ठरवता येतील काय? भिन्न आय क्यु असलेल्या लोकांसाठी वेगवेगळे निकष बनवावे लागतील काय? निकषांना कोणते लिखाण उतरते हे कसे ठरवायचे? निकषांना न उतरणार्या लिखाणाचे काय करायचे? निकषांना न उतरणार्या लिखाणाच्या लेखकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल की नसेल???????????
माझ्या मते हे दर्जा वगैरे प्रकरण प्रातिनिधीक असु शकत नाही. त्यामुळे जो जे वांछिल तो ते लिहो आणि वाचो! उगीचच आवडी-निवडी, मते कश्याला लादायची कुणावर? कश्याला हवा असला हुच्चभ्रुपणा?
1 Sep 2010 - 5:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मूळ लेखातली वाक्य:
जुन्या व जाणत्या सदस्यांनी आपल्या वाचनखुणा उघडून त्यातलं आवडतं लेखन सादर केलं तर मलाही अनेक चांगलं लिखाण वाचायला मिळेल. तिसरा हेतू असा की या चर्चेला मिळालेल्या प्रतिसादांतून मिपावरच्या उत्तम लेखनाची एक लायब्ररी तयार व्हावी. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल.
ब्रिटीश दादूसचा धागा आज वर आलेला दिसलाच होता.
1 Sep 2010 - 5:34 pm | प्रसन्न केसकर
शेवटच्या वाक्यात ध्वनित होणार्या गोष्टीला आहे. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल. या वाक्याला मी हुच्चभ्रुपणा म्हणतो. गाळ कोणता हे कसे अन कोण ठरवणार? एखादा नवा धागा नको म्हणुन सदस्य त्यांना आवडतो तो धागा हट्टाने वर आणत बसले तर तो त्या नविन धाग्यावर अन्यायच आहे की. त्यापेक्षा न आवडलेल्या धाग्यावर प्रतिसाद देऊ नका किंवा सरळ आपले मत मांडा. उगीच ही मखलाशी कश्याला? अन लायब्ररी तर आहेच की इथे. लिखाण जतन करुन ठेवलेलेच आहे परत परत वाचायला.
1 Sep 2010 - 7:44 pm | llपुण्याचे पेशवेll
प्रसन्नजींशी सहमत आहे. तसाच प्रतिसादही वर मी दिला आहे.
1 Sep 2010 - 7:53 pm | राजेश घासकडवी
प्रसनदा,
सदस्यांना हा 'अधिकार' आत्ता आहेच. थोड्या फार प्रमाणात तुम्ही म्हणता तसं होतंच की - चांगलं लेखन, समर्थ असा लौकिक असलेल्या लेखणीतून आलेलं लेखन लोक अधिक वाचतात (यात प्रतिसादसंख्येवरून दर्जा ठरतो असं म्हणत नाहीये). लोक उगाच कोणाला पिडण्यासाठी तसं करत नाहीत - करणारही नाहीत, याची खात्री आहे. फक्त गेले काही दिवस खूप जण 'इतका कचरा येतोय, संपादक काही करत का नाहीत' वगैरे तक्रार होते आहे. त्यात चांगलं गाडलं जाऊ नये, उत्तम लिखाण करणाऱ्यांची नावं लोकांना माहीत व्हावीत जेणेकरून संपादकांनी काही कृती करण्याऐवजी वाचकांच्या कृतीतून आपोआप योग्य गोष्ट व्हावी ही इच्छा आहे.
या धाग्याचा मुख्य उद्देश मी लिहिलेलाच आहे, तो म्हणजे नवीन लोकांना मिपावर किती चांगल्या दर्जाचं लेखन येतं, आलेलं आहे ते दिसेल व तो आदर्श ठेवता येईल. जर वाईट लेखन आलं तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दुर्लक्ष करता येतंच. या धाग्यामुळे चांगलं वाचावंसं वाटलं तर काय वाचायचं हा प्रश्न सुटेल.
3 Sep 2010 - 8:33 am | पाषाणभेद
प्रसन्नदांशी सहमत. केवळ या धाग्यात आलेले लेखच चांगले म्हणणे म्हणजे एखाद्या सुग्रणीने निगूतीने केलेल्या जेवणाच्या पदार्थांपैकी केवळ चटणीच चांगली आहे असे म्हणणे होईल. (चटणी म्हणजे पुर्ण जेवण नाही अन येथे जाणीवपुर्वक चटचीच म्हटलेले आहे हे लक्षात घ्या.)
3 Sep 2010 - 10:09 pm | राजेश घासकडवी
जर दहा वेळा एखाद्याच्या घरी जेवायला गेलेल्या शंभर लोकांना विचारलं, की बाबांनो, तुम्हाला कुठले कुठले पदार्थ आवडले ते सांगा. तर ते चटणीच सांगतील असं का वाटतं?
मिपावर हजारो गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यातल्या लक्षात राहाणाऱ्या, आवर्जून पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्यांचं उदाहरण द्या असं अनेकांना म्हटलेलं आहे - त्यामुळे कुणाच्या तरी एकाच्या आवडीचं हे चित्र नाही. यातूनही काही चांगलं लेखन गाळलं जाणार, हे खरंच आहे. पण त्याला नाईलाज आहे.
1 Sep 2010 - 5:25 pm | प्रकाश घाटपांडे
मला राजेश चे बरेचसे लेखन आवडते वानगी दाखल काही
नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता!
ओक साहेबांची पण दिलखुलास दाद आहे
मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!
पूजेची पथ्ये
1 Sep 2010 - 5:29 pm | जागु
माझी लिस्ट तयार करुन देतेच.
मी लिहीलेले कोणालाच आवडत नाही का :दुखी बाहुली: (बाहुली कशी टाकायची?) :quest:
1 Sep 2010 - 5:31 pm | पुष्करिणी
तुमचं नाव वर ऑलरेडी लिहिलय म्हणून मी लिहिलेलं नाही जागुतै :) (ही हसरी बाहुली आहे असं समजा )
1 Sep 2010 - 5:37 pm | जागु
तुमच्या प्रतिसादानंतर परत सगळ वाचुन पाहील . तेंव्हा माझ नाव सापडल. धन्यवाद. पण वरची पोस्ट मी मजेत लिहिली होती. दुखी वगैरे काही नाही. उलट माझ नाव पाहून मला आता खुप आनंद झाला आहे.
1 Sep 2010 - 7:22 pm | चिंतामणी
राजेश घासकडवी
चांगले साहीत्य सर्वांसमोर आणुन एक चांगले काम केले आहेत. कविता आधी वाचलेली होती. पण विस्मृतीत गेली होती. पण बाकी दोन्ही लेख वाचून निःशब्द झालो.
तुमच्यामुळे इतरांनी सुध्दा जोडण्या देउन हातभार लावला या उपक्रमाला.
पुनःश्च आभार.
1 Sep 2010 - 7:24 pm | दत्ता काळे
आवर्जून वाचावे असे,
लेखनामध्ये :
श्रावण मोडक, धनंजय, रामदास, नंदन, विसोबा खेचर, राजेश घासकडवी, संजोपराव, हृषिकेश इ. ह्यांचे लेखन ( अजूनही बरीच नावे आहेत).
पाककृतीमध्ये : गणपा
काव्यप्रकारामध्ये : रामदास, प्राजु, क्रांती
1 Sep 2010 - 9:24 pm | मस्त कलंदर
सध्या तरी एक दोनच देते: मोकलाया दाही दिशा!!!
आणि श्रामोंच्या 'काही नोंदी अशा तशा' --> http://www.misalpav.com/newtracker/640
बाकी वरती माझी आवडती कोरांटीची फुले, शिंपीणीचं घरटं , खोबार मालिका आणि गणपाच्या पाकृंची नोंद झालीच आहे..
आता धम्याची शिकार, पर्याचे वेदनांचे हुंकार आवडले असे म्हटले असते, पण लोकांचे अर्धवट लेखनाची शिफारस केल्याबद्दल शिव्याशाप खाण्याची तयारी नाही!!! ;)
1 Sep 2010 - 9:29 pm | प्रभो
समजलं....(संपवलं बाबा हिचं सारखं प्रतिसाद अद्ययावत करणं) ;)
1 Sep 2010 - 10:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या शिवाय मला अरुंधती आणि भानस या दोघींचं लिखाणही आवडतं. आळशांच्या राजांचे प्रांतही बोर्डावर दिसण्याची वाट पहाते.
1 Sep 2010 - 9:29 pm | जानकी
बहुगुणी यांची एअरपोर्ट ही लघुकथा मला आवडली होती, त्यांनी आणखी काही चांगलं साहित्य/कथा लिहिल्या असतील तर वाचायला आवडेल.
1 Sep 2010 - 9:56 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
बहुगुणींचे लेखन : http://www.misalpav.com/newtracker/1074
4 Sep 2010 - 12:06 am | कापूसकोन्ड्या
मी प्रथम मिसळपाव हे साधे सोपे नाव धरण करणारे लिंक पाहीले ते डॉन यांच्या पुणेरी पाट्या मुळे. सभासदांची नावे पण आकर्षक आणि विक्षिप्त तर कुणाच्या नावातच विक्षिप्त पणा.
काही आठवडे साधरण मार्च मध्ये फक्त वाचनाचे काम होते.नंतर काही काळ आद्याक्षरे शोधण्यात वेळ गेला. उदाहरणार्थ प्र. का. टा. आ, .ह.घ्या., हे.वे. सां. न. ल. , पू.ले.शु. धन्यू वगैरे.
सर्वांनी आता इथे दिलेले आहेत.पण मला आवडलेला प्रतिसादक म्हणजे टारझन उर्फ कुबड्या खविस.क्षणभरच टिकणारी पण टारगट सही त्यानेच करावी.
जसे उकडलो ... शिजलो ... उतू गेलो ... तळलो ...वाफाळलो ... करपलो ... शिळा झालो
मुळ लेखकाने काही आगाउ वक्तव्य केले असेल तर त्याचा समाचार घेतला जायचा. सुरूवातीला तर टारझन च्या प्रतिसादासाठी काही धागे काढले आहेत असे वाटावे इतपत त्याचे कॉन्ट्रीब्युशन असायचे.अफ्रीकेतील नोटांच्या फोटो ही आयडीया पण भन्नाट होती.
बाकी काळ्यांची 'फसवेगिरी' आणि कार्यकर्त्यांची ''खोबारगिरी " याचा उल्लेख अनेकांनी केला आहेच.
परदेशी असल्यावर आपल्या आइच्या भाषेत इतके वैविध्य पूर्ण साहीत्य वाचायला मिळणे ही एक पर्वणीच असते.
आणखी एक तात्यांने दिलेले पाक फटू पण उत्तमच. ह्या हॉटेलात असल्याचा मला आनंद आहे.
सर्वांना पु.ले,शु.
11 Oct 2010 - 2:01 am | इंटरनेटस्नेही
मला मिपाचा सदस्य झालो, तेव्हापासुन आजवर वाचलेला आणि सो फार सर्वात आवडलेला लेख:
http://www.misalpav.com/node/14847 "बंडू आणि..." लेखक: नगरीनिरंजन
11 Oct 2010 - 10:11 am | गुंडोपंत
आम्हाला दिलीप बिरुटे सर यांचे लेखन आवडते. साधे आणि सोपे असते.
त्यांनी उपक्रमावर मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल सुरेख लेख लिहिला होता. त्यातून खूप नवीन माहिती मिळाली होती.
येथे त्यांनी कुणा रावाची खिल्ली उडवणारा भन्नाट लेख लिहिला होता तो अनेकांच्या लक्षात असेल.
या शिवाय आपले 'सहज' अवघड विषयांना हात घालण्यात वाकबगार आहेत. त्यांच्या लेखनाचेही आम्ही चाहते आहोत. पण हल्ली यांचे लेखन दिसत नाही.
मिभो भारी लिहायचे आणि चर्चा करायचे पण हल्ली एकोळी व्रतामुळे पार पेन्शनीत निघाल्या सारखेच लिहित असतात!
विकास, चित्रा, राजेश घासकडवी, धनंजय, मुक्तसुनित, स्वाती दिनेश, नंदन, प्रियाली, इन्द्र्राज पवार, मितान, केशवसुमार, छोटा डॉन आणि कोलबेर या सोबत इतरांचेही लेखन आवडते.
नगरीनिरंजन यांचा हल्लीच आलेला लेख हे खुसखुशीत लेखन कसे करावे याचा नमुनाच आहे.
धनंजय हल्ली का लिहित नाही हे कळले नाही. बहुदा कार्यबाहुल्य असावे.
प्रतिसाद या बाबतीत कापूसकोन्ड्या यांची सहमत.
आवडलेला प्रतिसादक म्हणजे टारझन उर्फ कुबड्या खविस.क्षणभरच टिकणारी पण टारगट सही त्यानेच करावी.
लेखन करतांना, आपण काय लिहित आहोत, हे किमान एकदा वाचून तरी पाहिले पाहिजे ही माफक अपेक्षा नव्या लेखकांकडून आहे.
11 Oct 2010 - 10:55 am | इन्द्र्राज पवार
"लेखन आवडते" या गटात माझ्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. हा विश्वास अनाठायी असणार नाही याची काळजी मी निश्चितच घेत राहीन.
"....आपण काय लिहित आहोत, हे किमान एकदा वाचून तरी पाहिले पाहिजे..."
हे मी कटाक्षाने पाळतो....निव्वळ लेखनातील भावासाठीच नव्हे तर, शुद्धलेखनासाठीही. एखाद्याच्या लेखनातील मुद्दा कितीही भावला तरी जर लिखाण अशुद्ध असेल तर मी पुनश्च त्या पृष्ठाकडे जात नाही.
"ऊस डोंगा परी रस नाही डोंगा..." हे जरी खरं असलं तरी इथे असणारे सदस्य शिक्षणाच्याबाबतीत 'डोंगा' नसल्याने लिखाणातील अशुद्धता माफ करता येण्यासारखी गोष्ट नाही....(अर्थात हे वैयक्तिक मत आहे.)
इन्द्रा
11 Oct 2010 - 2:28 pm | नावातकायआहे
विसोबा खेचर, श्रावण मोडक, रामदास, राजेश घासकडवी, संजोपराव, परा, टारझन, केसु, पिडा, बिपिन कार्यकर्ते, अडगळ, विलासराव, काळे काका, प्राजु, इन्द्र्राज पवार... यादी लै मोठी हाय
हे आनी ह्यांच्यासारखे झकास लिहिनारे मिपा सोडुन मराठी आंतरजाळाव एकत्र कुठच न्हायत!
ह्यो सर्वांना आमचा दंडवत!
अवांतरः ते टारोबा कुठशिक आसत्यात सध्या?
24 Feb 2016 - 10:12 pm | सही रे सई
हा धागा वरती काढून मधल्या काळातील दर्जेदार लिखाणे या निमित्ताने सगळ्यांनी सांगावीत म्हणून हा प्रतिसाद देते आहे.
11 Oct 2024 - 1:14 am | diggi12
जुने मिपा
11 Oct 2024 - 8:56 am | गणेशा
धागा वरती काढल्या बद्दल आभार!
साधारणता, २०१० च्या शेवटी मिपा वर आल्याने ह्या धाग्या मुळे दिलेले सर्व लिखाण तेंव्हाच वाचल्याने मिपा बरोबर नाते घट्ट झाले होते..
त्या पुढील(२०१० नंतर चे )आवडलेले लिखाण आणि त्यांच्या लिंक्स लवकरच देतो...
11 Oct 2024 - 5:36 pm | कर्नलतपस्वी
गेल्या पाच वर्षांत वाचल्या गेल्या साहित्यिकांपैकी हमखास वाचनीय....
प्रचेतस,किल्लेदार, चक्कर बंडा,गारगोवलेकर,प्राची अश्विनी,समर्पक,नागनिका ,पाकपद्म भक्ती,टर्मिनेटर, भागो आणी इतर अनेक.
वरिष्ठ म्हणू की जुन्या जाणत्या म्हणू,
"रोशनी",तात्या,मी दिपाली,धन्या,केशवसुमार,,संजोपराव,बिपीन कार्यकर्ते आणी इतर काही.
ज्यांचे लेखन आवडले,प्रतिसादले पण वयापरत्वे लक्षात न राहीले त्या सर्वांचेच मनापासून आभार.
एकंदरीत, माझा पिंड वाचनाचा ,लेखकाचा नाही पण मिपा करांनी सांभाळून घेतल्यामुळे थोडीफार वटवट केली.