ती

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
1 Jul 2010 - 10:26 pm

पूर्वी ऑफिसात होत असलेला माझा नित्याचा जनसंपर्क सेवानिवृत्तीनंतर बंद झाला. शेजारी पाजारी, माझ्या घरी मला भेटायला येणारे आणि मी ज्यांना भेटायला जातो असे सगेसोयरे, आप्त वगैरेची वर्दळ किंचितशी वाढली असली तरी त्या सर्वांच्या फाइली आधीपासून उघडलेल्या आहेत. त्यांत क्वचित एकाददुसरी नवी नोंद झाली तर झाली, एरवी त्या नुसत्याच अपडेट होत असतात. लहान मोठ्या कारणाच्या निमित्याने थोडा प्रवास घडला तर दोन चार वेगळी माणसे भेटतात, निदान दृष्टीला तरी पडतात. यामुळे शरीराला आरामशीर वाटत असली आणि खिशाला परवडत असली तरीही स्थानिक प्रवासासाठी सहसा मी टॅक्सी करत नाही. त्यापेक्षा बसमधून धक्के खात जाणेच पसंत करतो. अशाच एका लहानशा प्रवासात मला 'तो' भेटला होता, 'त्या'च्यावर मी लिहिलेला लेख थोडासा जमला असे माझे मलाच वाटले आणि दोन चार लोकांनी तो (लेख) वाचून तसे मला सांगितलेही. पुन्हा एकदा अशाच आणखी कोणा अनामिक व्यक्तीबद्दल लिहावे असा विचार मनात येत होता, तेवढ्यात योगायोगाने बसच्या प्रवासातच मला 'ती' भेटली. म्हंटले, चला आता 'ति'च्याबद्दल लिहून मोकळे व्हावे.

वाशीहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या बसच्या थांब्यावर बस येण्याच्या दिशेकडे पहात मी उभा होतो. सकाळच्या वेळी वाहनांच्या गर्दीनेच तो रस्ता दुथडीने भरून वहात होता. त्या जागी घोळका करून उभे राहण्यासाठी मुळी जागाच नव्हती. बसची वाट पहाणार्‍या लोकांना रस्त्याच्या कडेलाच ओळीत उभे रहावे लागत होते म्हणून त्याला रांग म्हणायचे. पण रांगेत शिस्तीने उभे रहाणे, बस आल्यानंतर क्रमवार बसमध्ये चढणे वगैरे गोष्टी आता सुरूवातीच्या स्थानकावरच दिसल्या तर दिसतात. इतर ठिकाणी त्या इतिहासजमा झाल्या आहेत. पण त्यामुळे बस येण्याच्या आधी कोणी कुठे उभे रहावे यावरून आता भांडणे होत नाहीत.

आपल्या सहप्रवासोत्सुक मंडळींबरोबर मीही बसची वाट पहात उभा होतो. त्यांच्यात वैविध्य होतेच, पण त्या सर्वांपेक्षा खूप वेगळी अशी 'ती' समोरून येतांना दिसली. यौवनाने मुसमुसलेला सुडौल बांधा, विलक्षण लक्षवेधक चेहरा ...... (बाकीच्या वर्णनासाठी एकादी शृंगारिक कादंबरी वाचावी किंवा फर्मास लावणी ऐकली तरी चालेल.) 'लटपट लटपट', 'ठुमक ठुमक' वगैरे सगळी विशेषणे चोळामोळा करून फेकून द्यावीत अशा जीवघेण्या चालीमध्ये हाय हीलच्या शूजने टिकटॉक टिकटॉक करत ती आली आणि चक्क आमच्या रांगेच्या सुरुवातीलाच उभी राहिली. रांगेमधल्या सार्‍या नजरा आता कोणच्या दिशेने वळल्या हे सांगायची गरज नाही. तिच्या बुटांची हील्स किती उंच होती आणि केशसंभारामध्ये खोचलेल्या क्लिपांची लांबी रुंदी किती होती वगैरे तपशीलाकडे बघ्यांमधल्या स्त्रीवर्गाचे लक्ष असले तर असेल. तिच्या अंगाला घट्ट चिकटून तिची कमनीय आकृती इनामदारीने दाखवणारी जीन पँट चढवून त्यावर भडक रंगाचा टीशर्ट (किंवा टॉप?) तिने घातला होता. 'ही दौलत तुझ्याचसाठी रे, माझ्या राया' अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य त्यावर गिचमीड अक्षरांत छापलेले होते. कोणाला निरखून पहायचे असेल तर ते वाक्य वाचण्याचे निमित्य तो करू शकला असता आणि ज्याला वाचनाचीच आवड असली तर अशाला त्या 'शब्दांच्या पलीकडले' दिसल्यावाचून राहिले नसते.

कोणत्याही प्राण्याच्या कोणत्याही वयातल्या नराच्या मनात अशा प्रसंगी कोणत्या प्रकारच्या लहरींचे तरंग उठायला हवेत ते या विश्वाचा निर्माता, निर्माती, निर्माते जे कोणी असतील त्यांनी आधीपासूनच ठरवून ठेवले आहे आणि त्याचा अंतर्भाव त्यांच्या जीन्समधल्या प्रोग्रॅमिंगमध्ये करून ठेवलेला आहे. इतर प्राणी अशा वेळी कान उभे करून, नाक फेंदारून, फुस्कारून किंवा शेपूट हालवून त्या तरंगांना मोकळी वाट करून देतात. मनुष्यप्राणी मात्र सुसंस्कृत वगैरे झाल्यानंतर ही गोष्ट जाहीरपणे मान्य करायला धजत नाही. शिवाय तो लबाड असल्यामुळे ही गोष्ट आपल्या चेहेर्‍यावरही आणू देत नाही. तरीसुध्दा आपण त्या भावनेला एका नजरेत ओळखतो असा दावा केलेला दिसतो. 'ती' आली, 'ति'नेही एक नजर रांगेतल्या लोकांवर टाकली आणि आपला सेलफोन कानाला लावून कोणाशी तरी खिदळत मोत्यांचा सडा घालत राहिली.

त्या दिवशी बसला यायला थोडा उशीर लागला असला तरी कदाचित कोणी फारशी कुरकुर केलीही नसती, पण कांही सेकंदातच ती (बस) येऊन धडकली. बसच्या ड्रायव्हरनेसुद्धा 'ति'ला पाहिले असणार. थांबा येण्याच्या आधीच बसचे मागचे दार बरोबर 'ति'च्या समोर येईल अशा अंदाजाने ती बस उभी राहिली. बसमध्ये गच्च भरलेली उभ्या प्रवाशांची गर्दी नसली तरी बसायलाही जागा नव्हती. 'ती' बसमध्ये चढल्यानंतर चपळाईने पुढे गेली. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या एका जागेवर बसलेल्या मुलाला तिने उठायला लावले आणि ती जागा तिने पकडली. बस आल्यानंतर रांग मोडून सारे लोक धांवले आणि धक्काबुक्की करत आत घुसले. अशा धक्काबुक्कीपासून स्वतःचा जीव आणि खिशातले पाकीट सांभाळण्याच्या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो नाही. सरळ पुढच्या दरवाजाने प्रवेश करून ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवलेली जागा गाठली. बहुतेक वेळी त्या जागेवर 'चुकून' बसलेला एक तरी बकरा सापडतो आणि मला ती जागा मिळते. पण त्या दिवशी त्या जागांवर बसलेले सगळेच माझ्यासारखेच ज्येष्ठ दिसत होते. त्यामुळे मला उभ्याने प्रवास करणे भागच होते.

एका मिनिटाच्या आत ती बस वाशीच्या टोलनाक्यापर्यंत आली. तोंवर माझे तिकीट काढून झाले होते. आता खाडीवरील पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतरच कोणी जागेवरून उठला तर मला बसायला मिळणार होते. पण त्यानंतर लगेच मला उतरायचे होते. एक हात खिशावर ठेवून आणि दुसर्‍या हाताने खांबाला धरून हिंदकळत आणि आपला तोल सांवरत मी उभा राहिलो. अधून मधून आपली शारीरिक क्षमता पाहणेही आवश्यकच असते असे म्हणत मी स्वतःची समजूत घातली. खरोखर मला त्याचा फारसा त्रास वाटतही नव्हता. ही बस सोडली असती तर पुढच्या बससाठी स्टॉपवर पंधरा वीस मिनिटे उभे रहावे लागले असतेच. तेवढा वेळ बसच्या आत उभे राहिलो असे समजायला हरकत नव्हती.

राखीव सीट काबीज करून तिच्यावर आरूढ झालेली 'ती' जवळच बसली होती. अचानक 'ती' उठून उभी राहिली. 'ति'च्या ओळखीचे कोणी तरी मागून येत असेल असे समजून मी मागे वळून पाहिले. तिकडे कोणतीच हालचाल दिसली नाही. मला गोंधळलेला पाहून 'ति'ने मला खुणेनेच त्या जागेवर बसायची सूचना केली. मीही खुणेनेच 'स्त्रियांसाठी राखीव'चा फलक तिला दाखवला. आता मात्र ती बोलली, "मी माझी जागा तुम्हाला देते आहे."
"ते ठीक आहे. पण ..." असे म्हणत मी माझ्या मागेच उभ्या असलेल्या दुसर्‍या मुलीकडे हळूच बोट दाखवले.
"तिची काळजी करू नका, तिला मी सांगेन." त्या मुलीला ऐकू येईल अशा पध्दतीने 'ती' अधिकारवाणीत बोलली. त्यावर कसलेही भाष्य करायची हिंमत त्या दुसर्‍या मुलीला झाली नाही.
आता तिने दिलेल्या सीटचा स्वीकार करणे मला भागच होते. मात्र वर लिहिलेली तिच्याबद्दलची सर्व विशेषणे मी आता पार विसरून गेलो. त्यांऐवजी माया, ममता, करुणा वगैरे एकत्रपणे समूर्त होऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत असा भास ‍मला होत राहिला.

मौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

1 Jul 2010 - 10:34 pm | दशानन

ग्रेट !

शिल्पा ब's picture

1 Jul 2010 - 10:34 pm | शिल्पा ब

खूप छान आणि ओघवत्या भाषेत लिहिलं आहे..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रेवती's picture

1 Jul 2010 - 10:39 pm | रेवती

खूप छान लिहिलं आहे घारेकाका!
नव्या अवतारात जुने संस्कार म्हणायला हवे!;)

रेवती

आनंद घारे's picture

2 Jul 2010 - 11:31 pm | आनंद घारे

मुद्दा पकडलात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

मीनल's picture

1 Jul 2010 - 11:59 pm | मीनल

काय क्लास लिहिले आहे काका.
मस्त.
पण एक सांगू का?
मला तर शेवट जरा निराळाच वाटला होता.
'ती' शेवटी 'तो` असेल असे मला अपेक्षित होते.
आजकाल' तो' ख-याखु-या 'ती' ला लाजवेल इतका नटून सजून दिसतो.

खूप चिमटे घेतले आहे. खुबीन लिहिले आहेत. खूप आवडले.
तरंगांना मोकळी वाट करून देण्याचे प्रकार वाचून खूप हसले.
झक्कास!!!!!

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

आनंद घारे's picture

2 Jul 2010 - 11:33 pm | आनंद घारे

धन्यवाद. माझा या लेखनामागील मुद्दाच वेगळा असल्यामुळे त्याला साजेसा शेवट मी केला
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 10:45 pm | श्रावण मोडक

ओघवती शैली. विचार करायला लावणारे लेखन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2010 - 12:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

का रे भुललासी वरलिया रंगा।

रामपुरी's picture

2 Jul 2010 - 1:40 am | रामपुरी

:) :) :)

प्रभो's picture

1 Jul 2010 - 10:48 pm | प्रभो

मस्त!!!

टारझन's picture

1 Jul 2010 - 10:51 pm | टारझन

ए क णं ब र्स ! ! !

अनिल हटेला's picture

1 Jul 2010 - 10:52 pm | अनिल हटेला

छान लिहीलये !!
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

वाहीदा's picture

1 Jul 2010 - 11:57 pm | वाहीदा

घारे काका,
मुंबईत तर हे नेहमीच घडते, पण तुमच्या सारखे शब्दांकन क्वचितच कुणी करत.
हाय - फाय मॉडर्न वाटणार्या मुलीही समंजस असतात हे आपुलकी ने दाखविणारा लेख .
सुंदर शब्दांकन !
~ वाहीदा

शिल्पा ब's picture

2 Jul 2010 - 2:18 am | शिल्पा ब

तुमची जिम्मा कोणत्या पक्षात?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

निशिगंध's picture

2 Jul 2010 - 2:08 am | निशिगंध

वाह ! मस्तच

____ नि शि गं ध ____

सहज's picture

2 Jul 2010 - 7:13 am | सहज

ओघवती शैली. विचार करायला लावणारे लेखन.

श्रामोंशी सहमत

Nile's picture

2 Jul 2010 - 7:53 am | Nile

'ती' आवडली! ;)

-Nile

स्मिता चावरे's picture

2 Jul 2010 - 11:15 am | स्मिता चावरे

'ती' आवडली. मीनल यांचा प्रतिसादही आवडला...

स्पंदना's picture

2 Jul 2010 - 12:33 pm | स्पंदना

आदितीच्या प्रतिक्रियेस बाडीस.

बाडीस म्हणजे काय? :|

निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका(योगेश२४ यांच्या परवानगीने)

महेश हतोळकर's picture

2 Jul 2010 - 4:50 pm | महेश हतोळकर

लेख आवडला!

भडकमकर मास्तर's picture

2 Jul 2010 - 5:00 pm | भडकमकर मास्तर

लेख मस्त जमलाय..
लै बेस्ट ....
शेवट एकदम यू टर्न मरलाय मस्त....
( तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक झालात , काका असं "ती"च्यासारखीकडून जाणवून घेणं जरा कठीणच असेल ....)...

( २६ वर्षांनंतरचा ज्येष्ठ नागरिक) भडकमकर मास्तर

आनंद घारे's picture

3 Jul 2010 - 8:08 am | आनंद घारे

'अंकल!' अशी हाक मारली होती तेंव्हा मात्र मला धरणीकंप झाल्यासारखा वाटला होता (एका शांपूच्या जाहिरातीत दाखवतात तसा). त्याला आता तीस पस्तीस वर्षे होऊन गेली.
आंतर्जालावर आल्यापासून मी काकाच आहे आणि मीही काकाला शोभेल असाच वागतो.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

भोचक's picture

2 Jul 2010 - 5:22 pm | भोचक

सहीच लिहिलंय, काका. टपल्या नि चिमटे 'योग्य' जागी घेतलेत.

(भोचक)
जाणे अज मी अजर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2010 - 6:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले...!

-दिलीप बिरुटे

शानबा५१२'s picture

2 Jul 2010 - 8:20 pm | शानबा५१२

बर मग काय झाल?

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

शिल्पा ब's picture

2 Jul 2010 - 8:42 pm | शिल्पा ब

आले का तुम्ही?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आनंद घारे's picture

2 Jul 2010 - 11:29 pm | आनंद घारे

संपली :)
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

चतुरंग's picture

2 Jul 2010 - 11:38 pm | चतुरंग

एकदम ताजंतवानं लेखन. अनुभव फारच रंजक सांगितला आहेत.

कोणाला निरखून पहायचे असेल तर ते वाक्य वाचण्याचे निमित्य तो करू शकला असता आणि ज्याला वाचनाचीच आवड असली तर अशाला त्या 'शब्दांच्या पलीकडले' दिसल्यावाचून राहिले नसते.

ह्याप्रकारे सांगणे हे फारच अपील झाले! :)

त्यांऐवजी माया, ममता, करुणा वगैरे एकत्रपणे समूर्त होऊन माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आहेत असा भास ‍मला होत राहिला.

आणि त्यानंतरचा हा अँटीक्लायमॅक्सही जाम आवडला! :)

(शब्दांच्या अलीकडेच थांबणारा)चतुरंग