ब्यूटी पार्लर अर्थात यौवनफुफाटा

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
3 Apr 2009 - 3:13 pm

सांग दर्पणा
कशी मी दिसते...
.....
जामानिमा साग्रसंगीत
कौशल्याचे कुवलयापीड
....
मन जळे जीव उरे
काजळावर कृष्ण पुटे
....
हल्लीच फुटलीय कोंडी
अन् परतवलेत आरंभशूर हल्ले
...
फसव्या क्रांतीला झालीय बाधा
यच्चयावतांची विचक्षण त्रेधा
...
पीटिकांना मसाज अन् मलम
पण मनावर कोणते कलम?
...

कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार
दिव्या दिव्या दीपत्कार...

संस्कृतीगझलप्रकटन

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

3 Apr 2009 - 3:31 pm | मराठमोळा

तुमचे वय किती खरे सांगा शरदीनी बाई (स्त्रियाना वय विचारणे योग्य नव्हे पण..) त्यानंतर प्रतिसाद देईन. बाकी माझं डोकं काम करत नाहिये ही कविता वाचल्यानंतर.

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

शरदिनी's picture

3 Apr 2009 - 3:36 pm | शरदिनी

कवितेचा वयाशी काय संबंध ?
प्रतिक्रिया वाचून माझेच डोके काम करेनासे झाले आहे.
( ताप आणि कर्करोग तेही काही कळले नाही)

मराठमोळा's picture

3 Apr 2009 - 3:47 pm | मराठमोळा

असे असेल तर मग सुंदर अतिशय सुंदर कविता!!!!!
खुपच छान.

कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार
दिव्या दिव्या दीपत्कार...

हे खासच...

>>ताप आणि कर्करोग तेही काही कळले नाही
याचा अर्थ असा कि एखादी गोष्ट आवडत असेल तर नक्की करावी पण तिच्या पुर्णपणे आहारी जाऊ नये, त्याने माणुस भरकटत जातो.
यासाठीच मी आपले वय विचारले होते.. कृपया रागावु नका.. :)

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

सँडी's picture

3 Apr 2009 - 3:42 pm | सँडी

काही काही शब्द ओळखीचे वाटतात...

अवांतरः ताप आल्यासारखं झालयं. ;)
ह.घ्या.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Apr 2009 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार

जबरदस्त काव्य प्रतीभा.
छंद,मात्रा इ. ची बंधने तडतडा तोडुन देउन, कवितेच्या चौकटी कडकडा मोडुन ह्या मुर्ख कवी शिरोमणींची नियमांची पुस्तके टरटरा फाडून मनातल्या भावनांचा आपण जो उन्मुक्त अविष्कार दर्शवला आहेत तो पाहुन मी सदगदीत झालो आहे.
ह्या कवियत्रीची पहिली कवीता मी मीपावर वाचली तेंव्हाच मी प्राजुतै, जागु, क्रांतीबै ह्या सगळ्यांना सांगितले होते की आता तुमची सद्दी संपली. नव कवीतेच्या क्षीतीजावर एक नवा तारा उगवला आहे.
आ हा हा शरदिनीबै तुमच्या कवितांनी एक वाचक म्हणुन आम्हाला फार समृद्ध केले आहे. मग ती 'पेपिनचे पाचकपात्र' असो अथवा 'तगमग' 'घोरपड' किंवा 'पुल'.
तुमच्या कवीता वाचल्या की अंगात एक प्रकारचे वारेच संचारते. काही नालायक लोक त्या वेळी हि सगळी 'रेबीजची लक्षणे' आहेत वगैरे सांगुन माझा तेजोभंग करायचा प्रयत्न करतात, पण तुमच्या कवीता वाचुन उन्मक्त झालेला मी ह्या लोकांच्यात डोमकावळ्यांना बघायला शिकलेलो आहे.
अरे बघा ... बघा... ह्याला म्हणतात प्रतिभा !

हल्लीच फुटलीय कोंडी
अन् परतवलेत आरंभशूर हल्ले
शब्दा शब्दात नुसता विखार माजलाय.

फसव्या क्रांतीला झालीय बाधा
यच्चयावतांची विचक्षण त्रेधा

अरे कशाला पाहिजे तो मार्क्स आणी फर्नांडीस ... नुसत्या २ ओळीत क्रांतीची लक्तरे काढली आहेत आणी ह्या धनदांडग्यांची नेमकी अवस्था वर्णन केली आहे.

जियो जियो !!

पीटिकांना मसाज अन् मलम
पण मनावर कोणते कलम?

सांगा सांगा .... मनाला कोणते मलम ?
"नाही मन निर्मळ .. काय करील साबण ??" आमचे तुकोबा तरी काय वेगळे सांगुन गेलेत ?
आपल्या लेखनात तुकोबा दिसले शरदिनी माउली __/\__

भक्त पराडुंग
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन's picture

3 Apr 2009 - 4:16 pm | दशानन

तुझा प्रतिसाद पाहून डोळे भरुन आले रे परा... मला माहीत होतं तुच.. फक्त तुच एकटाच आहेस नवकविंचा पाठीराखा !

तुम आगे बढो परा... हम साथ है |

मराठमोळा's picture

3 Apr 2009 - 4:40 pm | मराठमोळा

>>तुमच्या कवीता वाचल्या की अंगात एक प्रकारचे वारेच संचारते. काही नालायक लोक त्या वेळी हि सगळी 'रेबीजची लक्षणे' आहेत वगैरे सांगुन माझा तेजोभंग करायचा प्रयत्न करतात,

=)) =)) =))

आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Apr 2009 - 4:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पीटिकांना मसाज अन् मलम
पण मनावर कोणते कलम?

सांगा सांगा .... मनाला कोणते मलम ?
"नाही मन निर्मळ .. काय करील साबण ??" आमचे तुकोबा तरी काय वेगळे सांगुन गेलेत ?

साने गुरूजींनी, खरंतर त्यांच्या मातुश्रींनी उत्तर दिलं आहेच, "पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस शाम, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो."

असो. नेहेमीप्रमाणे कविता कळली नाही.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

विसुनाना's picture

3 Apr 2009 - 4:13 pm | विसुनाना

कौशल्याचे कुवलयापीड,काजळावर कृष्ण पुटे,यच्चयावतांची विचक्षण त्रेधा या कल्पना नवीन वाटल्या.
मी इतरत्र उल्लेखलेला 'दिव्या दिव्या दीपत्कार' आपण इतक्या लवकर कवितेत वापरलेला पाहून तर गहिवरून आले.
हल्ली तो कुणाच्या लक्षातच येत नाही. :(
कविता योग्य ठिकाणी (पक्षी - या पातळीवर - दहापैकी दहा) पोचते आहे.
अभिनंदन!

पहाटवारा's picture

3 Apr 2009 - 4:24 pm | पहाटवारा

कवयित्रीने येथे अंतर्बाह्य सौंदर्याची काळजी वाहणार्‍या एका परिस्थीतिवश क्रूर स्री ची मनमनोल द्वीधीतांका ऊलगडण्याचा प्रयत्न करित असतानाच एकिकडे वाचकाना एक टिबांव्हान दिले आहे.
पीटिकांना मसाज अन् मलम
पण मनावर कोणते कलम?

वरिल ओळी अंतर्बाह्य शब्दाचा काव्यनमुनाच नव्हेत काय??

मन जळे जीव उरे
काजळावर कृष्ण पुटे

ज्या व्यक्तीचे मन जळल्ल्यावर काजळवरही काळी पुटे चढ्वु शकते, ती स्री क्रूरच नव्हे काय??

हल्लीच फुटलीय कोंडी
अन् परतवलेत आरंभशूर हल्ले

या ओळी क्रूर पणाच्या परिस्थीतिवशतेवर झणत्कार करित नाहित काय?

कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार
दिव्या दिव्या दीपत्कार...

या ओळी जेव्हा एका पाठोपाठ येतात तेव्हा त्या मनाच्या द्वीधा स्थीतिचा ऊद्घोष करित नाहित काय?

दर कड्व्याखालील टिंबे ही वाचकांना (कोण म्हणाले रे विडंबकांना??) आव्हानच नव्हे काय?

अवांतरः रसग्रहणाचार्य लिखाळ यांना डाव्या पायाची करंगळी अर्पून केलेल्या साधनेचा हा रसाविष्कार सादर समर्पीत

संजा's picture

3 Apr 2009 - 6:43 pm | संजा

यौवनफुफाटा

आज आपन फुट गया टूट गया लुट गया मीट गया

आजसे आपन शरदीनी बै का फ्यान होगया. रोज सुबा उनका कवीता वाचेगा. वाच वाच के पारायण करेगा.

बाल्या फ्राम बानकोट

पाषाणभेद's picture

9 Apr 2009 - 11:02 am | पाषाणभेद

कवियत्रीने काव्य लिहून आपल्या प्रतीभेचा दाखला दिला आहे. त्याउप्पर प्रतिक्रीयां वाचुन मनास मोहित केले. या आंतरजाळावर याच्यवत सारे प्रतीभावान मुर्छीत होतील यास्तव त्यांनी काळजी ल्हाहावी.
भगवंत आपणास असे वारंवार लिहीण्याची सद्बूध्धी देवो.
- पाषाणभेद

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Apr 2009 - 1:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दिव्या दिव्या दीपत्कार...

ही दिव्या कोण?

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

सुवर्णमयी's picture

29 May 2009 - 6:11 pm | सुवर्णमयी

अप्रतिम

एस's picture

16 May 2015 - 12:42 am | एस

यांनी फक्त आणि फक्त कविताच लिहिल्या असतील तर मनापासून अरेरे!!! आख्खा महाराष्ट्र (बेळगाव, निपाणी, कारवार, हुबळी, मुंबई, डांग, झालंच तर मिनेसोटा आणि विस्कॉन्सिन-क्यालिफॉर्निया... सकट) शरदिनीतैंच्या महान साहित्याच्या विचक्षण वाचनाहुतीला (अनुभूती नाही, आहुतीच!) पिंपळ(ल)पारखा झाला आहे असे दुगाण्या झाडून म्हणावे लागेल.

तूर्तास हे काव्य वाचून आमची झोप उडाल्यामुळे (पक्षी: जोराचा ठसका लागून जुना दमा उफाळून आल्यामुळे) आम्ही उर्वरीत रात्र खरडफळ्याच्या फांदीला लटकून काढायचे ठरवलेले आहे. (या रे कंपनी द्यायला..)

प्राची अश्विनी's picture

16 May 2015 - 8:23 am | प्राची अश्विनी

:):):)
@स्वॅप्स, तुम्हाला कसे काय आठवले बुवा आज?

एस's picture

16 May 2015 - 1:15 pm | एस

'अलखपैंजणी परखडमोती' ह्या अजरामर कवितेची परत आठवण आली तेव्हा हे रत्नही वर आले! ;-)

किसन शिंदे's picture

16 May 2015 - 8:38 am | किसन शिंदे

मास्तरांनी शरदिनी आयडी नवीन घेतल्यानंतरच्या दिवसात ही कविता टाकली असावी.

चतुरंग's picture

16 May 2015 - 4:59 pm | चतुरंग

शरदिनी तैंचा फुफाटा वाचला आणि आमच्या या विडंबनाची आठवण झाली...

(शरदिनीतैंचा फ्यान) रंगा

विवेकपटाईत's picture

16 May 2015 - 5:25 pm | विवेकपटाईत

शरीदिनी ताई, कविता मला कळेल असे वाटत नाही. आता पहा कौशल्याचे कुवलयापीड.
ताई, कुवलयापीड हे हत्तीचे नाव आहे. मथुरेत रंगभूमीच्या दरवाज्यावर कंसाने कृष्णावर सोडला होता. कृष्णाने त्याचा वध केला होता. असो

सदस्यनाम's picture

16 May 2015 - 5:50 pm | सदस्यनाम

विवेकराव ते रामाच्या आईचे कुवलयापीड नाही ओ. ते कौसल्येचा कुवलयापीड झाले असते.
हे म्हणजे कौशल्याने आवाक्यात न येणार्‍या, धुंद, अवजड अवजड वस्तू सोडणे याला म्हणलेय भौतेक. शरदिनीतैंचे कौशल्य आहे ते.

चुकलामाकला's picture

16 May 2015 - 5:57 pm | चुकलामाकला

कोण या शरदिनी ताई? मास्तर कोण? आजकाल या लिहित नाहित का?

या खूप मोठ्या कवयित्री आहेत. आपलं नशीब थोर म्हणून मिपावर लिहीत असत.

त्यांची डुडुळगावचा गोलंदाज ही माझी ऑल टैम फेवरेट कविता आहे.

भीडस्त's picture

14 Apr 2018 - 10:57 pm | भीडस्त

रात्री दोन वाजेपर्यंत बरोबर होत्या.
अजूनही भेट लांबली असती

पण जाऊदे

पैसा's picture

15 Apr 2018 - 9:24 am | पैसा

मग अर्धवट झोपेत तुम्हाला असला एखादा काव्य फुफाटा नाही झाला का?

भीडस्त's picture

15 Apr 2018 - 10:21 am | भीडस्त

एवढ्यात नाही. 'ती'ने अजून एवढा अनुग्रह नाही दिला. अजून अशा बऱ्याच 'अनुष्ठानांची' आवर्तने पूर्ण झाली की सिद्धी साधेल असं मला ती सांगत होती.
मग येऊच की आम्हीही 'उत्तरात्रीचा यौवनफुफाटा' घेऊन

पैसा's picture

15 Apr 2018 - 10:46 am | पैसा

आयडी फुफाट्यात पडू देऊ नका म्हंजे झालं! =))

भीडस्त's picture

15 Apr 2018 - 2:05 pm | भीडस्त

'यौवनफुफाटा' ह्या शब्दातल्याच पोटेन्शिअलकडे प्रतिसाद टंकताना महत्प्रयासाने दुर्लक्ष केलेले आहे.
कसलं भारी शीर्षक झालं असतं कवितेचं