चंपी

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
26 May 2009 - 1:45 am

चंपी

आम्लफ़त्तरा निखळ वस्तरा तीव्रदुहेरी दुर्गम झेले

वृष्टीत उसासे तडकून गेले स्तंभ जिव्हारी फ़डकून मेले

सरणतुतारी जाताजाता काय मनाला हरखून गेले

ललाटगोण्या पावनमौळी चित्र दुधाळी झाळून मेले..

स्वर्गनव्हाळ्या द्यूतसख्यांनी पलिते टाळून नक्षी पुसली.

त्या दुर्धर वन बधिरलटांना तीर्थपावना साक्षी फ़सली....

निळ्याजांभळ्या ललाटभृकुटी पिऊन टाका बधीर मापटी

आलो गेलो बिकट भरजरी सटल खुणांची गर्भित चंपी

२६ मे २००९, पुणे

संस्कृती

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

26 May 2009 - 5:04 am | चतुरंग

सपशेल हारलो!
आमचा चंपवलेला प्रतिसाद इथेही वाचता येईल! ;)

चतुरंग

विजुभाऊ's picture

26 May 2009 - 12:28 pm | विजुभाऊ

http://misalpav.com/node/7926 हा आमचा चम्पवलेला प्रतिसाद

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

अवलिया's picture

26 May 2009 - 6:00 am | अवलिया

वा! मस्त चंपी झाली !!

--अवलिया

चन्द्रशेखर गोखले's picture

26 May 2009 - 6:59 am | चन्द्रशेखर गोखले

ही कविता मला समजली की नाही मला माहीत नाही. पण पुनःपुन्हा वाचाविशी मात्र वाटली. या कवितेला जबरदस्त लय आहे, जी
मनाला गुंतवून टाकते. मला तर मर्ढेकरांच्या कवितांची आठवण झाली ! आपण गूढ काहितरी लिहीता, त्या मुळे समजो न समजो आपली कविता वाचाविशी मात्र वाटते.

ऋषिकेश's picture

26 May 2009 - 10:05 am | ऋषिकेश

ही कविता मला समजली की नाही मला माहीत नाही. पण पुनःपुन्हा वाचाविशी मात्र वाटली. या कवितेला जबरदस्त लय आहे, जी
मनाला गुंतवून टाकते

+१.. हेच म्हणतो...
माझे मराठी प्रस्तुत कवियीत्रीइतके चांगले नाहि.. मात्र त्यामुळे उत्सुकता नाहि असे मात्र नाहि. विनंती करतो की कवियीत्रीने या कवितेमागचे तिच्या मनातील भाव (गद्यात) मांडावेत

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

पांथस्थ's picture

28 May 2010 - 4:35 pm | पांथस्थ

विनंती करतो की कवियीत्रीने या कवितेमागचे तिच्या मनातील भाव (गद्यात) मांडावेत

म्हणजे (वाचकांच्या) डोक्यातला भुंगा तरी शांत होईल.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 12:44 pm | विशाल कुलकर्णी

+ १ =))

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

मीनल's picture

26 May 2009 - 8:19 am | मीनल

मला भिती वाटते आहे हा प्रतिसाद लिहिण्याची. एकतर कवयित्रीला कदाचित माझ्या बुध्दीच्या कोतेपणाचा राग येईल आणि दुसर म्हणजे इतर त्याची टिंगल करतील याची. तरीही धीर एकवटून लिहीते आहे. माफी असावी.
अज्ञानी म्हणून सोडून द्यावे ही विनंती.

आता पर्यंत शरदिनी यांच्या कविता वाचून अतिशय कठिण वाटल्या. न माहित असलेले शब्द, त्यांचा कवितेनुरूप वापर बुध्दीला चालना देणारे होते. त्यातून कवितेचा अर्थ शोधण्याची तसदी घेतली नाही. `पास` म्हणून आळस केला. शिवाय मिपावरच्या बुध्दीवान लोकांनीही हार मानलेली दिसली.
अस असल तरी त्या कवितेत काही तरी अर्थ आहे तो शोधावा अस नेहमी वाटल.
त्यांच्या कविता समजायला कठिण म्हणून आकर्षक ही वाटल्या. आवडल्या अस म्हणण्यापेक्षा त्या अभ्यासासाठी योग्य वाटल्या.अर्थ समजल्यावर कदाचित आवडल्या म्हणणे योग्य होईल.
शरदिनी यांचे मराठी कदाचित संस्कृत ही वाचन तुफान असणार यात शंका नाही. वाचन उत्तम असेल तर लेखन ही होत अस ऐकल आहे.

आता ही `चंपी` जरा त्यातल्या त्यात सोपी म्हणावी अशी वाटली. म्हणजे त्यातला थोडासा पार्ट सोपा आहे अस वाटतय.
म्हणून मराठी इन टू ईंग्लिश डिक्शनरी घेऊन बसले. खर सांगते मला अडलेल्या एकही कठिण शब्द तिथे सापडला नाही.
ही कविता पुन्हा पुन्हा वाचली. त्यातून चिमटीभर कळले ते लिहिते आहे.

मला ही कविता एतिहासिक घटनांबद्दल वाटते आहे. चंपी म्हणजे लढायांमधे शत्रूपक्षाची केलेली धूळदाण. नायनाट.
चंपी: म्हणजे नायनाट, नाश. न्हावी ही चंपीच करतो.कशाची हे सांगायची आवश्यकता नसावी.वस्तरा हा शब्द न्हाव्याचा रेफरन्स देतो आहे अस मला वाटतय.

वस्त-यासारख्या तीक्ष्ण धारीसारख्या (निखळ) केवळ तलवारीने (दुर्गम) कठिण असे काम पूर्ण (झेले)केले. त्यात यशस्वी होऊन त्याची आठवण सतत मनात ठेऊन गेले.
स्तंभ कुणाचे बांधतात तर त्या बळी गेलेल्या जवानांचे. कधी त्यावर ध्वज ही लावला जातो. तो फडकतो.फडकणारा ध्वज आभिमानाच प्रतिक.
उसासे :श्वास रोखून अंगावर शहारा आणण्यासारख्या बलिदानाच्या कथा ऐकून श्वास सोडल्यावर टाकतात तो उसासा.

आम्लफ़त्तरा:-आम्लः ऍसिड, फत्तरा- दगड हे काय ते कळले नाही.
उसासे तडकणे म्हणजे काय ते ही कळले नाही.
वृश्टी कसली?

झेल, गेले, मेले या यमकामुळे नादमय झाले आहे.

मराठ्यांची तुतारी केव्हा वाजवली जाते? यश मिळाल्यावर. ती मनाला आनंदून गेली. इथे ही ऐतिहासिक घटनांचा रेफरन्स आहे. म्हणजे मला अस वाटतय.
ललाट - म्हणजे कपाळ, भाल प्रदेश.
गोण्या ???कसल्या :/

चंद्र मौळी. ज्या तून चंद्र दिसतो असे छत. झोपडीचे तुट्के छत.
पावनमौळी: म्हणजे ??????? पवित्र वाटेल असे.
चित्र- -घटना डोळ्यासमोर येणे.
पवित्र असे काम केलेल्या घटना डोळ्यासमोर सहज येतिल असे त्यांनी बलिदान केले.
दुधाळी ???:/

पलिते- पांढरे केस- म्हणजे काळाच्या मागे पडलेला, जुना, ओल्ड.
जुनी होऊन(नक्षी पुसली.) काळा आड गेली. विसरली गेली.

आई ग.... I) थकले अर्थ लावता लावता.आता झोपायची वेळ झाली.
पण आय विल नॉट गिव्ह अप. ट्राय करेन उद्या. बघुया काही अजून अर्थ बोध होतोय का मला.

मीनल.

भडकमकर मास्तर's picture

26 May 2009 - 11:26 pm | भडकमकर मास्तर

ही कविता समजून घ्यायचा इतका भयंकर प्रामाणिक प्रयत्न पाहून मी हतबुद्ध झालोय...
मीनलताईंना दंडवत....
#:S #:S #:S #:S #:S #:S #:S #:S #:S #:S

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

भडकमकर मास्तर's picture

28 May 2010 - 1:40 am | भडकमकर मास्तर

=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))

सहज's picture

26 May 2009 - 8:30 am | सहज

____/\____

तुम्ही मराठी शब्दांसाठी कुठला शब्दकोश सुचवाल हे कृपया सांगा त्वरित मागवतो. आपले शब्दवैभव अतुलनीय आहे. दसर्‍याला आपल्याकडील ग्रंथसंपदापूजन असल्यास कळवा एकदा येउन मनोभावे हात जोडून जायला आवडेल.

शब्दकुत्तरा निखळ वाचरा अर्थदुहेरी वाचून गेले
कोशात उसासे तडपून गेले अर्थ जिव्हारी धडकून मेले

मसणपायरी जाताजाता काव्य मिपाला शरदून गेले

विसोबा खेचर's picture

26 May 2009 - 9:35 am | विसोबा खेचर

च्यामारी, जोरदारच कविता..!

शरदिनी मॅडम, आपण साला यापुढे तुमचे फ्यॅन बर्र का! :)

अजूनही अश्याच कविता येऊ द्यात प्लीज..!

लयीच्या बाबतीत गोखल्यांशी सहमत..

आपला,
(सांगितिक) तात्या.

अनंता's picture

26 May 2009 - 1:08 pm | अनंता

कविता वाचून श्रावणमासी हर्ष मानसीची आठवण झाली!

अवांतर आणि कळकळीची विनंती : माझ्यासारख्या सुमार बुद्धीमत्तेच्या लोकांसाठीही थोडं लिहा हो!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

कपिल काळे's picture

26 May 2009 - 10:50 am | कपिल काळे

मी आजअपासून शरदिनी ताईंचा फॅन.
आपले शब्द भांडार अतुलनिय आहे.
मर्ढेकरी लयबद्ध कविता वाटते. टंगट्विस्टर ( जिव्हाव्यायामकर्ती शब्द रचना)

मराठमोळा's picture

26 May 2009 - 11:23 am | मराठमोळा

शरदीनी ताई,

माझे कवितेबद्दल मत -->
मागल्या वेळी तुम्ही "ब्युटीपर्लर" कविता लिहिली होती, तिथे आजकालच्या स्त्रियांना आवडणारा यौवनफुफाटा निदर्शनास आणला होता. यावेळी तुम्ही पुन्हा एकदा हा प्रयत्न स्री व पुरुष दोघांच्या बाबतीत केला आहे असे भासते. यातुन आपली संस्कृती कशी लोप पावत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. (कसा ते मला समजले नाही).
असो, तुमच्या कवितेचे रसग्रहण करणे मला पामराला अशक्य आहे. तरी तुमच्या शब्दभांडाराला आमचा सलाम.
कृपा करुन तुम्हीच तुमच्या कवितेचे रसग्रहण केलेत तर मला समजायला सोपे होईल.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

उदय सप्रे's picture

26 May 2009 - 11:30 am | उदय सप्रे

वरील सर्व मतांशी सहमत !
कृपया थोडा वेळ काढून या कवितेचा अर्थ पण सांगावा , कठीण शब्दांच्या अर्थासकट !
म्हणजे आमचे पण मराठी जरा सुधारेल की , तेव्हढीच तुमच्याकडून प्रौढ साक्षरता अभियानास मदत .....
सप्रे

मनीषा's picture

26 May 2009 - 11:31 am | मनीषा

... पण अर्थ कळला नाही .
इथे' सटल' हा शब्द इंग्रजीच आहे ना ? कारण असा मराठी शब्द मला माहित नाही
(या कवितेत विनाशाचे ..(मग ते सृष्टीचे किंवा जिवनाचे असेल) वर्णन केले आहे असे वाटते आहे)

{अक्षररंग बदलत का नाहीये ?}

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2009 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार

पुन्हा एकदा चाबुक कविता !

शरदिनीबै आपल्या शब्दखजीन्याला त्रिवार सलाम.

कविता आवडली पण काही ठिकाणी उगाच ट ला ट जोडायचा सामान्य कवींप्रमाणे केलेला प्रयत्न खटकतो. निदान आपल्या सारख्या कवयत्रीकडुन ही अपेक्षा नाही.

अवांतर :- आपल्या कविता हळुहळु लोकांना कळायला लागल्या आहेत हे यश म्हणावे का अपयश ?

प रा तांबे
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शरदिनी ताई,

कविता आहे तशी कळली नाही, पण तुम्ही बहुतेक काही तरी महत्वाची घटना, फक्त गुढ रचना करून, सांगायचा प्रयत्न करता आहात असं वाटलं...

म्हणून मी तुमचेच शब्द वापरून, फक्त त्यांचा क्रम बदलून, काही अर्थ लागतोय का ते पाहिलं, आणि -खाली लिहिल्याप्रमाणे- मला असं वाटलं की ही (बिहारातल्या वगैरे) एखाद्या हत्याकांडाच्या संबंधित कविता असावी, म्हणजे एका व्यक्तीची हत्या होते आणि त्याची पत्नी विधवा होते (पहिलं कडवं) आणि मग तो स्वर्गात जाऊन त्याला कशी मुक्ती मिळते त्याचं वर्णन (दुसरं कडवं), असं काही तरी:

तीव्र आम्ल पिऊन तडकून मेले
दुहेरी चंपी, वस्तरा जिव्हारी झेले
जाताजाता फ़डकून गेले
बधिर मनाला झाळून गेले
सरण टाळून मेले, ललाट पुसली
सख्यांनी टाका उसासे, दुर्धर फ़सली

दुर्गम पावन स्वर्ग भरजरी
हरखून गेलो काय तुतारी
निखळ दुधाळी गर्भित नक्षी
स्तंभ फ़त्तरा पलिते साक्षी
चित्र खुणांची निळ्या जांभळ्या
आलो तीर्थ वृष्टीत त्या नव्हाळ्या

असा काही अर्थ अभिप्रेत होता का हो?
कृपया मी चेष्टा करीत नाही हे लक्षात घ्या, पण इतक्या सगळ्या लोकांना ही कविता लयबद्द, बुद्धीवादी वाटते, पण अर्थ कळत नाही असं होऊ नाही म्हणून हा क्षीण प्रयत्न!

पक्या's picture

26 May 2009 - 12:14 pm | पक्या

बहुतेकांनी चंपीचा अर्थ डोक्याचे सर्व केस भादरणे (त्याला 'चकोट' म्हणतात)असा घेतला आहे. माझ्या मते चंपी म्हणजे तेलाने डोक्याची मालीश करतात त्याला चंपी म्हणतात.

बाकी कविता कळली नाही पण वाचायला छान वाटली. शरदिनी ताईंनी रसग्रहण करावे ही विनंती.

जयवी's picture

26 May 2009 - 1:03 pm | जयवी

गोखल्यांना अनुमोदन :)
वाचाविशी वाटते नक्कीच. पण अर्थ अजिबातच कळत नाही :(

श्रावण मोडक's picture

26 May 2009 - 2:03 pm | श्रावण मोडक

शब्दभांडारालाच सलाम आमचा. लय वगैरेही भारीच. शरदिनी लिहितात, टिच्चून लिहितात. त्यांचे हे सारे लेखन गूढ स्वरूपाचे आहे. वाचताना काही तरी कळतेय असे वाटते आणि क्षणात ते हरवून जाते असे यांच्या प्रत्येक कवितेवेळी होत आले आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2009 - 3:14 pm | बिपिन कार्यकर्ते

श्रामोशी पूर्णतः सहमत. काहीतरी कळतंय कळतंय कळतंय... अरेच्चा काहिच कळत नाहीये.......... अशी अवस्था. ही कविता वाचताना लय खूप छान लागत होती. साधारणतः एखाद्या कवीला / लेखकाला त्याच्या साहित्यकृती उकलून दाखावायला सांगणे बरोबर समजत नाहीत (असं मागच्या वेळी शरदिनीबैंच्या कवितेवरील धाग्यावर आलेल्या प्रतिसादांवरूनतरी वाटलं). पण शरदिनी बाईंना कळकळीची विनंति... त्याम्च्या कविता नुसत्या इथे प्रकाशित करून भागणार नाही, त्यावर त्यांनी काही भाष्य करावे. वाचायची उत्सुकता आहेच.

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

26 May 2009 - 10:48 pm | धनंजय

असेच म्हणतो.

आम्लफ़त्तरा निखळ वस्तरा तीव्रदुहेरी दुर्गम झेले
वृष्टीत उसासे तडकून गेले स्तंभ जिव्हारी फ़डकून मेले

हे सुरवातीला वाचल्यावर

घनकंप मयुरा. .
तुला इशारा..
होई पिसारा.
प्राण आडवा पडे
तू वळशील माझ्याकडे

ह्या ग्रेसच्या कवितेची आठवण आली
( ऐका, लताजींचा " मैत्र जीवांचे " - संगीतकार पं ह्रदयनाथ मंगेशकर )

पण शरदिनीताईंची एकूण कविता नीटशी कळली नाही.

देशपांडे१'s picture

26 May 2009 - 2:56 pm | देशपांडे१

भेदक शब्दरचना उत्तम पैलूदार काव्य,कविता आवडली. चौकटी पलीकडे विचार करणारी कवियात्री

काही शब्दप्रयोग खटकले कदाचित मला योग्य अर्थबोध झाला नसावा परंतू असे वाटते जसे हि-याला फक्त सोन्यातच मढवले जाते, (कठीन पदार्थाला सौम्य धातूची घट्टपकड) असे सूत्र शब्दप्रयोगात ही वापरता येईल.

सन्मय देशपांडे

लिखाळ's picture

26 May 2009 - 9:12 pm | लिखाळ

वा ..
सुंदर शब्दविचित्र कविता.. लयबद्ध !
पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटते आहे.
सरणतुतारी फार छान !

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

प्रमोद देव's picture

26 May 2009 - 9:25 pm | प्रमोद देव

शरदिनी ह्या विप्रंची बहीण शोभतात. ;)
ओ विप्रसाहेब, तुम्ही तरी आता उलगडा करा ह्याचा.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

घाटावरचे भट's picture

27 May 2009 - 12:40 am | घाटावरचे भट

कविता कळली नाही. मला 'तारे जमीं पर' मधल्या 'बम बम भोले' गाण्याची आठवण झाली. त्यातही आमीर खान सुरुवातीला असेच काही विचित्र बडबडतो, पण ते त्या गाण्याला अत्यंत छान शोभून दिसतं. इथे तसा काही प्रयत्न होता काय? उगाच लयीत येतंय म्हणून काहीही लिहिलं तर त्याला कविता म्हणावं काय? त्यापेक्षा सरळ त्रितालातला एखादा कायदा शोधून तोच का लिहू नये?

शैलेन्द्र's picture

28 May 2010 - 10:16 am | शैलेन्द्र

देर आये, फीरभी दुरुस्त नही आये...

मीपा म्हणजे रटाळ सिरीयल नाहे कि कधीही बघायला लागा, सगळं सहज समजावं... इथला भडकमकरकृत शरदीनी अध्याय तुम्ही चुकवलात आणी वरुन ही कविता वाचायचं व अर्थ लावायच धाडस करताय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 4:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

देर आये? गेल्या वर्षी लिहीलेला प्रतिसाद आहे तो!

अदिती

शैलेन्द्र's picture

28 May 2010 - 5:47 pm | शैलेन्द्र

आयला, खरच की, वाइट गंडलो मी... चुकिच्या प्रतीसादावर क्लिक केली बहुदा.