चंपी
श्वान कुत्तरा निखळ जात ही भुंके सदानकदा
भुकेचे उसासे केकाटून गेले हाडूक जिव्हारी लागून मेले
रस्त्यातूनी जाताजाता काय मनाला हरखून गेले
लडबडत्या पुच्छा मागे मित्र करिती भाद्रपद चाळे..
भुंकून भुंकून दातपिसून गुरगुराटी स्वरनक्षी केली
हिंस्त्र ठसे चाव्यांचे युद्धाचे क्षण वागवती झाली
कुत्री म्हणॉनी हिणवी कोणी दगड मारी पेकाटी
जीणे जगणे लाजीरवाणे ; संसार मांडते रस्तोरस्ती
निळ्याजांभळ्या जिभा काढते हातभर पाहून पाव बिस्कुटी
रस्त्यातच फिरेन रस्त्यातच मिटेन एका चाकाखाली
क्षणी एका होत्याची नव्हती होईन ; शांत आकांत होईल
हडुत हुडूत मधुनी सुटेन मी धाकटी चंपी
प्रतिक्रिया
26 May 2009 - 1:43 pm | अभिज्ञ
विजुभाउ,
विडंबन उच्च झालेले असले तरी तुमच्या विडंबनाचा चक्क अर्थ लागतोय.
मुळ कवितेसारखे काहिच्या काहि लिहून विडंबन करता आले पाहिजे.
;)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
10 Sep 2010 - 11:47 am | अवलिया
विजुभाउ हल्ली लिहित नाहीत