खळ्ळ खटॅक

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
16 Aug 2010 - 8:49 pm

बाबा मोबाईलवर कोणाचे तरी डॅमेजिंग एक्झरसाईज घेताहेत. आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते आहे. सोनु वर्तमानपत्र वाचायचा प्रयत्न करतो आहे.

सोनु : बाबा बाबा, खळ्ळ खटॅक म्हणजे काय ?

बाबा : अरे, व्हिडिओमधे चेहेरा दाखवू नका म्हणजे झालं तर. बाकी साहेब सांभाळून घेतील.

सोनु : आई, खळ्ळ खटॅक मंजे काय ?

आई : ते तुझ्या बाबांना विचार रे! अगं, तर मी काय म्हणत होते ? .......

सोनु : बाबा सांगाना ! (तेवढ्यात बाबांचा फोन संपतो)

बाबा : हं, सोन्या, मी सांगतो हं! कांच फुटली की आवाज कसा येतो माहिती आहे ना ? तोच तो आवाज.

सोनु : बाबा, पण मॉलमधे कशी काच फुटेल ? तिथे तर कितीतरी पहारा असतो.

बाबा : हो, पण हॉकी स्टिक मारली ना की मस्तपैकी काच फुटते.

सोनु : पण काच का फोडायची ?

बाबा : अरे काच ही फोडण्यासाठीच असते.अरे काय छान वाटतं तो आवाज ऐकला की !

सोनु : पण बाबा, परवा ताईनी ग्लास फोडला तर तुम्ही कित्ती रागावलात !

बाबा : अरे ग्लास आपला घरातला होता. घरातल्या काचा फोडल्या तर आपलं नुकसान होतं. म्हणून बाहेरच्या फोडायच्या.

सोनु : मग मी पण उद्या शाळेतल्या फोडतो. कित्ती कित्ती मज्जा येईल.

बाबा : अरे वेड्या, शाळेतल्या फोडल्यास तर प्रिंन्सिपॉल तुला शिक्षा करतील. हे बघ, मोठं झाल्याशिवाय काचा फोडायच्या नाही बरं का ! तू उद्या मोठा झालास ना माझ्यासारखा, की वाट्टेल तेवढ्या काचा फोड हं !

सोनु : पण मोठ्या लोकांना का नाही शिक्षा करत ?

बाबा : असं नाही काही, मोठ्या लोकांना पण शिक्षा होते पण फार मोठ्ठ्या लोकांना नाही करता येत. कारण हे शिक्षा करणारे काचेच्याच घरात रहातात आणि त्यांना या मोठ्ठ्या लोकांचीच भीति वाटते.

सोनु : पण का वाटते ?

बाबा : ते तू मोठठ्ठा झालास की कळेल .
बाबा काचवाल्याला फोन करतात. त्याला मोठ्ठे काम मिळालेले असते, त्यातल्या कमिशनची आठवण करायला.

संस्कृतीसमाजराजकारणशिक्षणप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

16 Aug 2010 - 8:55 pm | अप्पा जोगळेकर

हे लिखाण सरकॅस्टिक आहे पण अजिबात हसू आलं नाही. तुम्हाला फार त्रास झाला का हो तोडफोड झाली म्हणून?

सूर्यपुत्र's picture

16 Aug 2010 - 9:14 pm | सूर्यपुत्र

तर अपेक्षाभंगाचा कसा असतो?? (ह्.घ्या.)

सुनील's picture

16 Aug 2010 - 10:01 pm | सुनील

राज ठाकरे हा आपल्या चुलत्यापेक्षा वेगळे काही करून दाखवेल, हे अपेक्षा फोल ठरत चालली आहे.

ज्या दुकानांच्या काचा फुटल्या त्यांनी विमे काढले असतील तर, विमा कंपन्यांचे नुकसान नाहीतर दुकानदारांचे नुकसान. परंतु, दोन्हीपैकी काहीही असले तरी, फुटलेल्या काचा पुन्हा बसवण्याचे कंत्राट मिळणार बव्हंशी अमराठी कंत्राटदारांना आणि रोजगार मिळणार बव्हंशी अमराठी कारागिरांना!

आणि मराठींना मिळणार एक प्रचंड आणि पोकळ अभिमान!!

शिल्पा ब's picture

17 Aug 2010 - 1:21 am | शिल्पा ब

छान लिहिलंय...आधी काही फारसं समजलं नाही पण हा प्रतिसाद वाचल्यावर लिंक लागली..
खाली पारूबाई म्हणताहेत तेच माझंही मत..

सुहास..'s picture

18 Aug 2010 - 10:36 am | सुहास..

राज ठाकरे हा आपल्या चुलत्यापेक्षा वेगळे काही करून दाखवेल, हे अपेक्षा फोल ठरत चालली आहे. >>.

जरा अपेक्षा सांगाल काय ??

आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते आहे

आई बद्दल असे लिहित नाहीत.

वात्रट's picture

17 Aug 2010 - 4:57 am | वात्रट

माझ्या मते एक दोन काचा फुटून मराठी सिनेमाला बरे दिवस येणार असतील तर
आपण कशाला उगाच अमराठी कामगारांचा धंदा वाढणार का / Insurance मिळणार कि नाही याची चर्चा करावी?

जाता जाता एका मिपा कराची सही आठवली
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे ?

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Aug 2010 - 9:07 am | llपुण्याचे पेशवेll

असो काही लोकांना ठळ्ळं आणि फटाक हीच भाषा कळते याच्याशी सहमत आहे.

नाक दबल्याशिवाय तोंड उघडत नाही हेच खर....

निवेदिता's picture

17 Aug 2010 - 12:41 pm | निवेदिता

काचा फोडण्यापेक्षा राज ठाकरेने मराठी चित्रपट दाखवण्यासाठी एक multiplex का काढत नाही.
ते तर व्यवसायाने बिल्डर आहेत ना वर कोहिनूर मिल ची जागा विकत घेतलीच आहे.

अर्धवट's picture

17 Aug 2010 - 12:48 pm | अर्धवट

हा चांगला न्याय आहे, पदरचे पैसे खर्च करून मल्टीप्लेक्स बांधायचं..आणि ज्यांनी सरकारकडुन सवलती घेतल्यात त्यांना काही बोलायचं नाही..

आणि चाल्लय ते सगळ्या महाराष्ट्राचं चाल्लय, आम्हाला तरी मुंबै ला जाउन मराठी चित्रपट बघायला नाही परवडणार ब्वॉ

इन्द्र्राज पवार's picture

17 Aug 2010 - 1:08 pm | इन्द्र्राज पवार

"डॉ.राज" यांनी आपली ट्रीटमेंट देता देता त्यातून मराठी चित्रपट निर्मात्यांनीदेखील चार कानपिचक्या दिल्या ते बरे झाले. 'मल्टीप्लेक्सची महागडी तिकिटे काढून मराठी प्रेक्षक यायचा असेल तर तुमची चित्रपट निर्मितीपण त्याच दर्जाची होईल असे पाहा.'

सर्वात शेवटी म्हणजे, "चित्रपट काढताना टीव्हीवरील मराठी मालिकांसारखे कथानक नकोत." हे इंजेक्शन एक नंबर !