याची कानी ... याची डोळा ...

सावळागोंधळ's picture
सावळागोंधळ in जनातलं, मनातलं
21 Jul 2010 - 1:28 am

नमस्कार मंडळी
मिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन.

आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ...
जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात ..
त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख ....

याची कानी ... याची डोळा ...

प्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ... ( एक्स-रे क्लिनीक )
मी दारात पाऊल टाकले त्या क्षणापासून आत्तापर्यंत समोरच्या 'रिसेप्सनिष्ट' ने तो बाबा आदमच्या काळातला दिसणारा संगणकाचा डब्बा सुरु करण्याचे आठ 'अयशस्वी प्रयत्न' पुरे केले आहेत ..
संगणक सुरु करण्याची तिची पद्धत दर खेपेला बदलतेय...

पहिल्या दोन प्रयत्नांत महाराष्ट्राचे भुषण म्हणून ओळखल्या गेलेल्या एम.एस.ई.बी.ने
( एम.एस.ई.बी. = मनडे-टू सनडे ईलेक्ट्रीसिटी बन्द ) दिलेल्या विजेचे बटण सुरु करणे, संगणकाचे बटण दाबणे व 'मॉनीटर' वर बघणे ह्या साधारण क्रिया ...
पुढच्या दोन प्रयत्नांत सी.पी.यु. गदा-गदा हलविणे या क्रियेचा समावेश ...
पुढील तीन प्रयत्नांत 'की-बोर्ड' वर घणाचे घाव घालणे या क्रियेचा समावेश ..
मला "घणाचे घाव" काय असतात याचे प्रात्यक्षीक दाखविण्याचा तिचा प्रयत्न स्तुत्य!
शेवटच्या आठव्या प्रयत्नात ती मॉनीटर च्या डोक्यावर टपली मारते... अख्खे टेबल हादरते ...
पण तरिही संगणक सुरु झालेला दिसत नाही ...
कारण ती पुन्हा नवव्या प्रयत्ना साठी कंबर कसून तयार! ( चिकाटी आहे हो पोरीत! नाव काढेल ...)

नववा प्रयत्न सुरु ...
तेवढ्यात तिची दुसरी मैत्रीण तिथे येते ...
बहुदा हिच्याहून जास्त अनुभवी दिसतेय ...
या वेळी संगणकाच्या डोक्यावर टपली, की-बोर्ड ला शाबासकी, सी.पी.यु.चे कौतूक ...
सर्व प्रकार करुन होतात ...
आणि तेव्हाच हे सगळे प्रकार पाहुन नाक मुरडत ती अनुभवी मुलगी स्वत: बिल गेट्स असल्याच्या थाटात सल्ला देते ...

"अग घाई नको करुस ... पहिले गरम तर होवु दे कॉंप्युटर ला ..."
( हा सल्ला ऐकुन आम्ही गार .. सांगणे न लगे! ;-) )

समाजजीवनमानतंत्रमौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

Nile's picture

21 Jul 2010 - 4:19 am | Nile

पहिले गरम तर होवु दे कॉंप्युटर ला

हा हा हा.

आमचा जास्त गरम होउन... जाउदे आमच्या कंप्युटरबद्दल काय बोला? ;)

थोडा अजुन फुलवता आला असता... लेख. ;)

-Nile

jaypal's picture

21 Jul 2010 - 12:16 pm | jaypal

डिझेलवर चालत असावा. हिटर द्यायला सांगायच ना =)) =)) =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

स्मिता_१३'s picture

21 Jul 2010 - 8:35 am | स्मिता_१३

माझ्या एका सहकार्‍याचा जुना किस्सा या निमित्ताने आठवला.

त्याच्या संगणकाचा मॉनिटर बिघडला होता. हेल्प-डेस्कच्या व्यक्तिने त्याला सांगितले कि हा मॉनिटर दुरुस्तीला नेउन तुला दुसरा मॉनिटर आणुन देतो.

आम्हा काही जणांना सहकार्‍याची गंमत करायची हुक्की आली. आम्ही त्याला अगदी गंभीर चेहेर्‍याने सांगितले की अरे मॉनिटर बदलला तर तुझ्या डेस्कटॉप वरच्या फाईल्स जातील म्हणून.

सहकारी बिचारा ते खरे मानून हेल्प-डेस्कच्या व्यक्तिचे डोके खाउ लागला आणि आम्ही पोट धरुन हसत सुटलो. :))

स्मिता

विजुभाऊ's picture

21 Jul 2010 - 11:37 am | विजुभाऊ

एकदा हापिसात एक इसम त्याच्या घरच्या कॉम्प्युटर मधे व्हायरस जाऊ नयेत म्हणून आत डांबराच्या ( नॅप्थालीन बॉल) गोळ्या ठेवायचा.

अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार

सावळागोंधळ शेठ मिपावर स्वागत आहे :) आता तुमच्या मित्राला देखील जरा लिहिते व्हायचा सल्ला द्या ;)

छोटेखानी लेखन आवडले. 'निळा-कोल्हा' म्हणतो तसे लेखन अजुन फुलवता आले असते, मात्र थोडक्यात जे लिहिले आहेत ते देखील आवडून गेले. ह्यावरुन आमच्या कॅफेत घडलेल्या धमाल किश्शांची पुन्हा एकदा आठवण झाली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चतुरंग's picture

22 Jul 2010 - 12:58 am | चतुरंग

:? चतुरंग

आगाऊ कार्टा's picture

21 Jul 2010 - 12:31 pm | आगाऊ कार्टा

हा किस्सा मी ऐकलेला आहे. खरा की खोटा ते माहित नाही.
एकदा मुंबई मध्ये सायबर क्राईमच्या लोकांनी एका सायबर कॅफेवर धाड टाकली होती. त्यांना काहितरी टीप मिळाली होती.
तर त्यांनी तिथे धाड टाकली आणि सगळे 'मॉनीटर' जप्त करुन घेऊन गेले. =)) =))
आगाऊ कार्टा
http://www.ameyphadke.com

दिपक's picture

21 Jul 2010 - 12:33 pm | दिपक

छोटेखानी किस्सा आवडला सागो. अजुन येऊद्यात :-)

पुर्वी ड्राय सोल्डरचे चे प्रॉब्लेम चेक करण्यासाठी मॉनीटरला दणके द्यायचो ते आठवले. :-)

मराठमोळा's picture

21 Jul 2010 - 12:43 pm | मराठमोळा

टेक्नीकल गमती जमती तर अफाट होत असतात या दुनियेत. अगदी उच्च शिक्षण घेतलेले लोकं सुद्धा अशी काही वाक्य बोलुन जातात किंवा प्रकार करतात की ह. ह.पु.वा होते.

असाच एक गमतीदार प्रकार.

किस्सा -१ मी एकाला ब्ल्यु-टुथने एक गाण पाठवत होतो, तर मला म्हणाला की थांब इथे मोबाईलला नेटवर्क नाहीये. =))

किस्सा -२ बेंगलोरातली माझी एक मैत्रीण, वीजेच्या तारेवर कावळा बरोबर अशा ठिकाणी बसतो की त्याला करंत बसत नाही असे म्हणाली. मी विचारलं कसं तर म्हणाली की करंट हा साईन वेव मधे फ्लो होतो ~~~ असा. कावळा बरोबर अशा ठिकाणी बसतो जिथे करंट U असा असतो. -- माझ्या पोटात शंभर लोळणार्‍या स्माईली उठल्या.
आणी कळस म्हणजे मी हा किस्सा एका ग्रुपमधे सांगितला, सर्व पोट धरुन हसले तर एक गुजराती कन्या शेवटी म्हणाली, की कावळ्याला कसं काय कळत पण?

किस्सा ३ -सर्वांकडे नविन फोन आले होते, लँडलाईन हो.
माझ्या मित्राचे वडील जे टेलीकॉम ऑफिसर आहेत, त्यांच्या फोनवर कुणीतरी मिस कॉल द्यायचं आणी मग हे फोनवरचं रिडायल बटन दाबुन का मिस कॉल दिला म्हणुन समोरच्याला शिव्या घालायचे. =))

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 6:56 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या मावसभावाने सांगीतलेला एक किस्सा आठवला.

त्याच्या सासुरवाडीला नविनच फोन (लँडलाईन) आला होता. एक दिवशी सासुरवाडीला तो थोडासा उशीराच पोचला, घरी फोन करुन कळवावे म्हणुन सासुला "जरा एक फोन करुन घेउ का?" म्हणुन विचारायला गेला. ह्याच्या सासुबाई म्हणाल्या थोडावेळ थांबा लाईट गेलीये, आली कि मग येईल करता फोन. (हा फोन कॉर्डलेस वगैरे न्हवता बर का!)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 3:45 am | आमोद शिंदे

लाईट गेले म्हणून आम्ही मित्र मंडळी कट्ट्यावर जमून गप्पा मारत होतो. तितक्यात एक म्हणाला, 'छे बुवा कंटाळा आला त्यापेक्षा घरी जाऊन टीवी बघतो' =))

किस्सा -२ बेंगलोरातली माझी एक मैत्रीण, वीजेच्या तारेवर कावळा बरोबर अशा ठिकाणी बसतो की त्याला करंत बसत नाही असे म्हणाली.

अगागागा. ममो फुटलो. खुर्चीतुन पडायलाच झालो.

बरोबर आहे तीचे. बरोबर ज्या ठिकाणी निगेटिव्ह हाफ वेव्ह येइल तसा तसा तो उड्या मारत र्हातो. =)) =)) =))

माझा एक सहकारी मित्र अनेकदा आमच्या नाना पेठेतील एका ग्राहकाकडे कॉम्प्युटर दुरुस्तीला जात असे.
त्यांच्याकडील पी.सी. खूप जुना आणि त्यांचं ऑफीस पण खूप जुन्या वाड्यात होतं. पी.सी . भिंतीतील एका कोनाड्यात ठेवलेला असे. अनेकदा तो बंद पडे आणि मग ऑपरेटरच जरा धक्के मारून तो परत चालू करत असे. अगदीच नाईलाज झाला तर आम्हाला फोन करत असे आणि मग माझा मित्र तिथे जात असे.
एकदा तो असाच दुरुस्तीसाठी गेला, बरेच उपद्व्याप केले पण तो पी.सी. काही केल्या चालूच होईना. शेवटी तो ऑपरेटर म्हणाला कि आता काही करू नको, आपण चक्क शांत बसू या, जरा वेळातच त्या पी.सी. वर माती पडेल वरून आणि मग तो चालू होईल कि नाही बघ. माझ्या मित्राला हे ऐकून धक्काच बसला, पण सर्वच उपाय करून थकल्यामुळे शेवटी तो खरंच जरा वेळ शांत बसला. ...
आणि काय योगायोग पहा, जरा वेळाने वरच्या मजल्यावर काहीतरी 'हालचाल' झाली असावी, थोडी माती त्या पी.सी. वर पडली, आणि तो खरोखरच पहिल्या फटक्यात चालू झाला ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 1:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपावर स्वागत हो सावळागोंधळ! किस्सा आवडला.

आमच्या इथे समर ट्रेनी आली एक दिवस, कंप्यूटर इंजिनियरिंगला आहे ती! काही इमेजेस तिने स्वतःच्या लॅपटॉपवर, आम्ही नेहेमी वापरतो त्या सॉफ्टवअरमधे लोड केल्या. हे सॉफ्टवअर त्याच्या स्वतःच्या विशिष्ट फॉरमॅटमधे डेटा ठेवतं. तर हे सगळं केलं आणि नंतर दोन दिवसांनी पुन्हा शोधायला लागली तर तो विशिष्ट फॉरमॅटवाला डेटा गायब! दोघा तिघांनी यावर विचार सुरू केला. कंप्यूटर रिस्टार्ट करण्याची कल्पना हिच्या डोक्यात आली तर लक्षात आलं मागच्या वेळेस लिनक्सचा वेगळा फ्लेवर होता. ही बाई म्हणे, "हो, मला काय ते मागचं लिनक्स आवडलं नाही, मी आख्खी हार्डडिस्क फॉरमॅट करून रिकामी केली आणि दुसरं लिनक्स टाकलं!".

पुढच्या वर्षी बी.ई. कंप्यूटर्स करून ही मुलगी कॉलेजातून बाहेर पडेल.

अदिती

जागु's picture

21 Jul 2010 - 2:41 pm | जागु

लहान असताना मी टीव्ही वर पट्ट्या आल्या की असे फटके मारायचे. मग तो ऐकायचा.

स्पंदना's picture

21 Jul 2010 - 6:49 pm | स्पंदना

धन्य!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

मस्त कलंदर's picture

21 Jul 2010 - 10:12 pm | मस्त कलंदर

एक परदेशात राहणारा तरूण मुलगा. आईवडिल भारतात. त्याची इच्छा की आईबाबांनी येऊन त्याच्याकडे राहावे, आणि ते याला तयार होत नाहीत, उलट इकडे ये, मुली पाहू असे म्हणतात.. प्रत्येकवेळी फोनवर बोलताना यावर वाद होतो म्हणून तो बोलणंच कमी करतो. एकदा आता यावेळी त्यांना काहीही कऊन सोबत घेऊन जायचेच याविचाराने तो भारतात येतो आणि इकडे आईबाबांनी चार-पाच चांगली स्थळे हेरून ठेवलेली असतात.
हा येतो, घराची व्यवस्था लावायची असते, बरीच कामे असतात, पण पटापट होत नाहीत. सगळीकडे लोकांची अळंटळं, भ्रष्टाचार, आईवडील ऐकत नाहीत.. हा जाम त्रासतो. असेच एकदा तो गावातल्या बँकेत जातो. गांव तसे छोटे, त्यात हा गावतल्या मोजक्या परदेशस्थ मुलांपैकी एक त्यामुळॅ सगळे त्याला ओळखत असतात. बँकेतला संगणक हँग होतो.. ती ऑपरेटर हरप्रकारे तो चालू करण्याचा प्रयत्न करत असते. हा मात्र वैतागलेला असतो.. "साधे कम्प्युटर चालवता येत नाहीत.. हवेत कशाला यांना?" आणि शेवटी कंटाळून नक्की काय झाले होते ते पाहायला पुढे होतो. तेव्हा ती ऑपरेटर हसून , "अहो ***, हे नेहमीचेच आहे.. हा पहा पंखा फिरवते, थोड्या वेळात तो थंड होईल आणि नीट चालायला लागेल.. सगळ्याच गोष्टी अतिघाईने होत नाहीत... थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो.." असे म्हणते आणि म्हटल्याप्रमाणे पंखा सीपीयु कडे फिरवते आणि थोद्यावेळाने तो संगणक चालूही होतो.. यालाही आपली चूक उमगते.. हा असलेलेच घर दुरूस्त करतो.. आईबाबांनी पाहिलेल्या मुली पाहतो.. एकीशी लग्न करतो.. आईबाबा कधी त्याच्याकडे तर कधी भारतात राहायचे ठरवतात..

काही गोष्टी विनाकारण लक्षात राहतात.. ही त्यातलीच एक!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघवेडा's picture

21 Jul 2010 - 11:14 pm | मेघवेडा

हा हा हा!

अजून एक

गन्या : अरे विक्या, तुज्याकडे स्क्यानर हाय काय रे. स्क्यानिंग करायचं होतं रे जरा..

विक्या : नाय रे, बाबूच्या सायबरला जा ना. त्याच्याकडे आहे.

गन्या : ए विक्या, बघ ना बघ ना नीट.. असेल ना कुठेतरी विंडोज मध्ये.. डिलीट नाय ना झाला चुकून तुझ्याकडून?

=)) =)) =))

किस्सा घडलेला आहे. पात्रांची नावे बदललेली आहेत! मात्र संवाद शब्दश: सारखे आहेत!

आनंदयात्री's picture

21 Jul 2010 - 11:39 pm | आनंदयात्री

बेष्ट रे सावळ्या !!

Nile's picture

22 Jul 2010 - 12:08 am | Nile

=))

लै भारी किस्से! एक से बढकर एक आहेत लोक.

-Nile

वाटाड्या...'s picture

22 Jul 2010 - 12:51 am | वाटाड्या...

माझा किस्साही असाच...

कोथरुड प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, स्वप्नशिल्प च्या शेजारी...

अस्मादिक गेले तिथे एका दुपारी...माझ्या मुलीचं जन्म नोंदणी पुस्तक आणायला. दुपारची वेळ जरा अंमळ कार्यालयात डोळ्यावर जास्त दिसत होती.

मी: (खिडकीपाशी) : जरा जन्म नोंदणी सर्टीफिकेट हवे आहे.
ती: (खिडकीपलीकडुन) : हा फॉर्म भरा..(मी तिथेच भरतो...एक्टाच होतो लाईनमधे चक्क..)
मी: घ्या..
ती: १० कॉप्या कशाला हव्यात?
मी: पैसे किती लागतील?
ती: १५ रुपये प्रती ..म्हणजे १५० रु. द्या..(मी पैसे देतो)..थोडं थांबावं लागेल..
मी: किती वेळ?
ती: ५-१० मिनटं...
आतापर्यंत लाईनमधे ८ एक मंडळी जमा झालेली..माझ्यामागे....सगळीच चुळबुळ करत होती...
अर्धा तास झाला तरी ही बया काय सर्टीफिकेट देईना...मग विचारलं तर म्हणाली प्रिंटर चालत नाहीये...थांबा..
त्यांचा साहेब येतो..ते सगळे उभे वगैरे राहतात..आम्ही मख्खासारखे (त्यांच्यासारखे) चेहेरे करुन त्यांच्याकडे पहातो.
साहेबः काय झालं? इतकी गर्दी का आहे?
ती: प्रिंटर चालत नाये?
साहेबः (आम्हाला) : थांबा ..सिश्टीमला प्रॉब्लेम आहे...
माझ्याबराच मागचा (आता लाईन जवळ जवळ ४० झालेली आहे) : काय झालय हो?
मी (जोरात बोंबलुन): काँप्युटर आणि प्रिंटर तापायला ठेवले आहेत. वाईच थांबा...क्षणभर शांतता आणि सायबासकट आख्खं सरकारी पण कधी नव्हे ते धो धो हसलं...

-वा

कोण म्हणतं सरकारी नाय हसणार?
मी पुरता बदला घेणार...
सरकारी हसणार निश्चीत...
इती वा वाक्यम...

हा हा हा सगळ्यांचे किस्से एकसे बढकर एक आहेत.