नंदीघसा तोरा अटकी गला
बडसंखठारे
किए से भकत एते आपणर
डाकिला चंदनपुरे...
काळीया रे काळीया रे काळीया रे...
अरे काळ्या, तुझा नंदीघोष (रथ) बड शंखाच्या ठिकाणी अडकून थांबला...असा कोण तुझा भक्त आहे की त्यानं चंदनपुरातून तुला हाक मारली आणि तू तुझा रथ थांबवलास?
ओरीसाच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक जीवनातील महत्त्वपूर्ण अशी जगन्नाथाची रथयात्रा आजपासून सुरू होतेय. पुरीतील रथयात्रेचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहू शकता.
जगन्नियंता जगन्नाथाच्या चरणी शतकोटी प्रणाम!
(इथे अधिक माहिती यापूर्वी दिली होती.)
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 2:58 pm | अवलिया
जगन्नियंता जगन्नाथाच्या चरणी शतकोटी प्रणाम!
फटु (जुना असता तरी चालला असता) टाकायचा ना राव !!
--अवलिया
13 Jul 2010 - 9:20 pm | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो.
बिपिन कार्यकर्ते
13 Jul 2010 - 3:00 pm | भाऊ पाटील
म्हणजे उद्या चेंगराचेंगरीची बातमी वाचावी लागणार तर!
13 Jul 2010 - 5:11 pm | महेश हतोळकर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6162747.cms
पण येवढ्या एकाच बातमी कडे बघू नका. वारी दरम्यानचा पंढरपूरातला कॉलरा आता जवळपास हटला आहे. याही गोष्टी सरतील.
@आ.रा. - धन्यवाद.
13 Jul 2010 - 4:31 pm | विटेकर
लिन्क सुरेख आणि माहिती पूर्ण !
14 Jul 2010 - 12:17 am | आळश्यांचा राजा
पुरीतल्या यात्रेत एक बळी गेल्याची दुर्दैवी बातमी आहे.
प्रांतांच्या अखत्यारीतील यात्रा जगन्नाथाच्या कृपेने सुखरूप पार पडली. त्यांना दिवसभर उपास घडला आणि रथाच्या आजूबाजूला माणसे, छोटी मुलं जवळपास फिरकू नयेत म्हणून अनवाणी बरीच धावाधाव करावी लागली; पण जग्याला आणि त्याच्या भावंडांना मावशीच्या घरी सुखरूप धाडल्यावर त्यांनी शांतपणे भोग ग्रहण केला!
संपादकांसाठी - हा लेख उडवला तरी चालेल. रथयात्रेची आठवण करून द्यावी एवढाच उद्देश होता. यात काही लिहिलेलं तर नाहीच. रद्दी ठेवण्यात काही पॉइंट नाही.
आळश्यांचा राजा