व्वा ! खूपच माहिती देणारा लेख. इथेही फोटो टाकले असते तर अजून आनंद झाला असता !
>>एकूण आपल्या पंढरपूरच्या वारीची ही यात्रा म्हणजे बहीण आहे असे म्हणायला हरकत नाही. तशीच भक्ती, तसाच मेळावा, तसाच भक्तवत्सल भगवंत, तसलेच बडवे, तसलेच पण्डे, आणि वाळवंटात अगदी तशीच असह्य दुर्गंधी आणि घाण!
मस्त ! :)
आषाढ शुक्ल द्वितीयेच्या दिवशी श्रीरामाचा रथोत्सव करावा असे म्हटलेले आहे, त्याचा काही संदर्भ आहे का या जगन्नाथाच्या यात्रेला ?
>>रथयात्रेची थोडक्यात गोष्ट अशी – आषाढाच्या शुक्ल द्वादशी दिवशी जगन्नाथ, बळभद्र आणि सुभद्रा ही तीन भावंडे आपली मावशी गुंदेचा देवीच्या घरी सुट्टीला म्हणून जातात.
आम्ही या कथेच्या निमित्ताने वाचलेले आहे की, कृष्ण व बलराम कंसास मारण्यासाठी गोकुळाहून मथुरेस गेल्याबद्दलचा हा उत्सव आहे !
अर्थात कथेत अनेक बदल होतात त्यामुळे काही अशा तपशिलांचे काही मनावर घेऊ नये. ( पुढे सुभद्राही रथात आली )
असो, लेख आवडलाच हे वेगळे सांगणे न लगे !
-दिलीप बिरुटे
आता मलाच शंका येतेय की द्वादशी की द्वितिया? तपासले पाहिजे. श्रीरामाच्या रथोत्सवाविषयी मला काही ठाऊक नाही.
आपण म्हणता त्याप्रमाणे देखील कथा (कंसवध) असू शकेल. इथे तसे कोणी बोलताना ऐकले नाही, एवढेच. कथेत बदल होतात हे तर खरेच. नक्की कशासाठी हा उत्सव सुरू झाला, कुणी केला इ. वर अजून तरी मला माहिती नाही.
मूर्ती लाकडी आहेत म्हणजेच आदिवासी मूळ असलेली देवता आचार्यांनी स्वीकारली असा तर्क केला जातो. कुणी म्हणते, श्री मंदीर शंकराचार्यांनंतर बरेच उशीरा बांधले गेले, त्यामुळे सध्याचीच देवता आचार्य पूजत होते किंवा नाही हे सांगता येणार नाही. शिवाय, मंदिराच्या बाह्य भागावर कुठेही मूर्तीसदृश शिल्प नाही.
जात-पात यात असलेल्या सहिष्णुतेमुळे आणि दारुब्रह्म (स्तूपांमध्ये बुद्धाचे अथवा बौद्ध आचार्यांचे अवशेष/ अस्थि ठेवल्या जात) या संकल्पनेमुळे बौद्ध प्रभाव दिसून येतो असेही काही जणांचे मत आहे.
आपल्याला या संदर्भात अजून माहिती मिळाल्यास अवश्य कळवावे.
आळश्यांचा राजा
माहिती खूप सुरेख दिली आहे.
नुसते ऐकून होत जगन्नाथपुरीच्या यात्रेबद्दल. आपल्या लेखाने माझ्या ज्ञानात खूपच भर टाकली.
धन्यवाद. चित्रेही सुंदर!!
आपल्याकडून ओरिसातल्या बाकी अनुभवांबद्दल वाचायला आवडेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
क्रान्ति, प्राजु, स्वाती,
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. चित्रे टाकण्याचा प्रयत्न करीन. मंदिराद्वारे यात्रेत प्रवेश केल्यामुळे कॅमेरा सोबत नव्हता. तरी जालावरील चित्रे गोड मानून घ्यावीत!
आळश्यांचा राजा
हा आणि तुमच्या जालनिशीवरचा ओडिया भाषेवरचा लेख दोन्ही आवडले.
>>> जोजना (योजना), अविजान (अभियान). पण जबाबदारीला दायित्व म्हणतात. दाजित्वपेक्षा सोपे पडते. शाब्बास. याला म्हणतात खरी आळशी भाषा!
बंगालीतही हाच गोंधळ आहे. पण हा उच्चारातला गोंधळ निस्तरण्याकरता त्यांना लिखाणात दोन य आणून ठेवले आहेत.
ओडियामध्येही असेच आहे का हो ?
>>>सोबतच अर्वाच्य शिव्याही देत असतात - देवाला. त्याचे कारण मला न पटल्यामुळे माहित असूनही मी येथे सांगणार नाही.
अहो; असे काय ताकाला जाऊन भांडे लपवता? :W सांगून टाका.
ओडियामध्ये दोन य नाहीत. पण दोन ज आहेत. जिथे य ला बदलून ज वापरतात तिथे एक ज असतो. बाकी ठिकाणी आपला नेहमीचा ज असतो. असे का करतात देव जाणे. यम ला जम म्हणतात, पण नियम ला नियम च. तिथे निजम नाही. मग यमाला पण यम च म्हणा ना. गोंधळ आहे.
शिव्यांचं म्हणाल तर कारण भलतंच आहे आणि तर्कसंगत नाही. एखाद्या पौराणिक कथेचा आधारही ऐकिवात नाही.
प्रतिसादासाठी आभार!
आळश्यांचा राजा
प्रतिक्रिया
लेख छान
धन्यवाद! आळ
व्वा !
आता मलाच
दुरुस्ती
उत्तम लेख
बापरे!!
छान..
क्रान्ति,
झकास
ओडियामध्य