काल अवलियांनी त्यांचे 'रुळ' हे काव्य मिपावर टाकुन मॅच सुरु झाल्याची शिट्टी वाजवली आणि त्यानंतर एक से एक महारथी मैदानात उतरले आणि त्यांनी धडाधङ गोल मारुन अगदी बाजार उठवला.
पण आम्ही काल जरा 'इंज्युयर्ड' असल्याने बेंचवरुनच हे सामने पाहिले, आज आमच्याअ फिजियोने आम्हाला फिट घोषीत केले अहे व आम्ही मैदानात उतरलो आहोत ... ;)
-----------------------------------------
पायात पाय
घालुन आम्ही 'टॅकल' करायचो
तो एका टीममध्ये स्ट्रायकर असायचा अन
मी दुसर्या टीममध्ये डिफेंडर असायचो
तोल संभाळत
'ड्रिब्लिंग' करताना 'पासिंग' करताना
असंच 'पझेशन' संभाळायचो.
एकमेकांना हलकेच 'ब्लॉक' करायचो.
डिफेंडरच्या भिंतीवरुन
कधीतरी तो 'गोल' करुन 'सुपरस्टार' झाला
मी मात्र मारत आहे त्याच फिल्डवरुन
बॉलसारख्या चकरा... गोलपोस्ट टु गोलपोस्ट.
- ( दुर्लक्षित डिफेंडर ) डॉन टेरी
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 10:06 am | चिरोटा
सही गोल.
P = NP
25 Jun 2010 - 10:08 am | अमोल केळकर
जबरा गोल :)
सामने आज ही रंगणार वाटतं
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
25 Jun 2010 - 10:55 am | टारझन
दॅट वॉझ द बेस्ट ऑफ द सेरिस मॅण !!
लै भारी डॉण्या !
25 Jun 2010 - 11:09 am | दिपक
वाह क्या बात डॉनराव... :-)
(ऑफसाईड) दिपक
25 Jun 2010 - 11:52 am | श्रावण मोडक
जमलं.
25 Jun 2010 - 11:55 am | विसोबा खेचर
मस्त रे! :)
25 Jun 2010 - 11:56 am | सहज
की फिफा २०१०च्या विभागात टाकले तरी चालेल :-)
25 Jun 2010 - 12:35 pm | गणपा
जबरा रे डॉण्या.
25 Jun 2010 - 12:47 pm | प्रमोद देव
डॉन्राव..तुम्हीपण !
25 Jun 2010 - 1:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कसल्या रे टेर्या बडवतो आहेस? ;-)
अवांतरः विडंबन मस्तच जमले आहे.
अदिती
25 Jun 2010 - 1:27 pm | बिपिन कार्यकर्ते
विडंबन छानच... खरंतर हे एखाद्या स्पॅनिश फूटबॉलपटूचं मनोगत आहे असं वाटतंय इतकं वास्तवदर्शी आहे. ;)
अवांतरः
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 1:30 pm | छोटा डॉन
>>... खरंतर हे एखाद्या स्पॅनिश फूटबॉलपटूचं मनोगत आहे असं वाटतंय इतकं वास्तवदर्शी आहे.
हम्म्, आपला प्रतिसाद 'खोडसाळ' वाटला बॉ.
" - ( दुर्लक्षित डिफेंडर ) डॉन टेरी " हे वाचलं नाहीत का, ती इंग्लंडची दास्ताँ आहे ;)
अवांतर : च्यायला तुम्ही एवढे म्हणत आहात तर ह्याचे 'स्पॅनिश व्हर्शन' टाकु काय ? ;)
------
छोटा डॉन
25 Jun 2010 - 1:40 pm | निखिल देशपांडे
स्पेन चे वर्जन टाकाच.. ;)
पण फिफा २०१० सदरात
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
25 Jun 2010 - 1:42 pm | बिपिन कार्यकर्ते
अवांतर : च्यायला तुम्ही एवढे म्हणत आहात तर ह्याचे 'स्पॅनिश व्हर्शन' टाकु काय ?
estimado señor, yo le desafío a hacer eso
Lieber Herr, ich fordern Sie heraus, das zu machen
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 2:06 pm | छोटा डॉन
स्पर्धेमागुन स्पर्धा
मैदानात आम्ही 'खुन्नस'ने भिडायचो
आमचा दणकेबाज स्पॅनिश अॅटॅक असायचा अन
त्यांचा पुळचट जर्मन डिफेन्स असायचा.
गुण संभाळत
ड्रॉ करताना सामना जिंकताना
असचं '(नेक्स्ट राउंड) क्वालिफिकेशन' संभाळायचो.
तर कधी एकमेकांना हलकेच "नॉक आउट" करायचो
प्रतिस्पर्ध्यांना तुडवुन
मागच्या वेळचे आम्ही "युरो चॅम्पियन्स' झालो.
ते* मात्र मारत आहे त्याच शिल्डसाठी
अधाश्यासारख्या चकरा... स्पर्धा टु स्पर्धा.
अजुनही त्यांची जिरली नाही म्हणे,
अजुनही ते दिवास्वप्न पाहतात म्हणे.
काय म्हणता ?
कोण ते ?
ते* म्हणजे आमच्या बिकांचे जर्मन्स हो !
टीप : संबंधितांनी हलके नाही घतेल तरी चालेल, त्याचे काय आहे की सारखे हलके घेऊन घेऊन सत्यपरिस्थितीशी फारकत झाली आहे त्यांची. सत्य अगदीच अनभिज्ञ झाले आहे त्यांना. ;)
------
( स्पॅनिश )छोटा डॉन
25 Jun 2010 - 2:22 pm | सहज
डान्राव, जबरी गोल!
25 Jun 2010 - 2:29 pm | बिपिन कार्यकर्ते
कल्पनेच्या भरार्या हे तर कवि लोकांचं मुख्य भांडवल. ते इथे पुरेपूर वापरलेलं दिसतंय. त्याबद्दल कवीला पूर्ण मार्क. पण ही कविता काहीशी साठोत्तरीच्या आधीची आहे असे वाटते. कारण साठोत्तरी कवितेत दाहक वास्तवाचा भेदक हुंकार दिसतो तो मात्र या कवितेत दिसत नाही. कविता काहीशी पसरट होतहोत टोकदार होऊ पाहते पण पुरेसे टोक न आल्याने स्वतःच्याच जगात अडकून पडते. तरीही कवीमधे खूपच दम असल्याने तो यापुढे तरी लागायच्या ऐवजी दिसेल असे म्हणावेसे वाटते.
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 2:30 pm | मेघवेडा
योग्य त्या ठिकाणी मारण्यात आले आहे! पहिले विडंबन उत्कृष्ट होते. पण दुसर्याची गत 'अतिपरिचयादवज्ञा' म्हणतात तशी झाली! ;)
25 Jun 2010 - 3:14 pm | ऋषिकेश
वा! डान राव वा!
दोन्ही वर्जन विषेशतः स्पेनचं वर्शन आवडलं :)
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
25 Jun 2010 - 3:13 pm | केशवसुमार
डानराव, तुम्ही सुद्धा
अतिशय समयोचीत विडंबने.. आवडली
(रेफरी)केशवसुमार
25 Jun 2010 - 4:24 pm | छोटा डॉन
गुर्जींची पावती आली आणि आम्ही खुष झालो.
बाकी विरोधी प्रतिक्रियांना आणि जळजळीला फाट्यावर मारण्यात आले आहे ... ;)
प्रतिक्रिया देणार्या आणि न देणार्या अशा सर्वांचे आभार ...
------
(आनंदित ) छोटा डॉन
25 Jun 2010 - 3:43 pm | मस्त कलंदर
मस्त गोल!!!!!
बिकांचा प्रतिसाद दवणीय (की दयनीय?) आहे..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 4:39 pm | चतुरंग
डान्राव, एकदम सुसाट गोल झालाय! ;)
गुंगुंगुंगुं.....
(वुवुझेला)चतुरंग
25 Jun 2010 - 5:21 pm | अवलिया
डान्राव.... जबरा हो... ग्रेट
--अवलिया
25 Jun 2010 - 5:39 pm | शुचि
झक्कास!!!फिफा ष्टायल!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 6:43 pm | प्रभो
डॉन्या, लै भारी रे!!!!!!!!!
25 Jun 2010 - 7:23 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं रे..
बाकी फुटबॉलचा संदर्भ सोडला तर व्यक्त होणारा दुसरा अर्थही भारीच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix