माय मराठीच्या हितसंवर्धनासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पातळींवर काम करतांना दिसत आहेत. कुणी संस्था काढतं, तर कुणी व्यक्तीगत पातळीवर काम करतं.
आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतांना सोबतच हे मराठीचं काम करणारे हे लोक. कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता मौन साधकासारखे यांचे काम आहे.
अश्या लोकांपैकी काही लोकांना एक त्यांच्या कामाची दखल घेतल्याची जाणीव करून देण्यासाठी मराठीसाठी काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते श्री द्वारकानाथ कलंत्री यांनी अश्या लोकांना मानपत्र देण्याचे ठरवले. मानपत्र सोबतच इतरही अश्याच वेगवेगळ्या उपक्रमी लोकांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणे करून अश्या लोकांची माहिती समाजाला व्हावी.
ह्या ठिकाणी ह्या उपक्रमाची माहिती देण्याचा हेतू हाच की सर्वांना मराठीसाठी काम करणार्या लोकांची माहिती व्हावी.
श्री कलंत्री मिसळपावचे सदस्य आहेत. त्यांनी हाच उपक्रम दरवर्षी राबवण्याचे ठरवले आहे.
सोबत एक पीडीएफ फाईल जोडतोय ज्यात या संपुर्ण उपक्रमाची माहिती आहे.
या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा.
पत्र येथून उतरवा.
नीलकांत
प्रतिक्रिया
24 Apr 2008 - 6:45 pm | विसुनाना
तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचे (हे मानपत्र मिळाल्याबद्दल) अभिनंदन.
आपल्या कार्यास उत्तरोत्तर यश लाभो.
द्वारकानाथांनी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार.
24 Apr 2008 - 9:13 pm | कोलबेर
..म्हणतो
24 Apr 2008 - 6:55 pm | मनस्वी
अभिनंदन!
आनंद झाला.
24 Apr 2008 - 7:02 pm | स्वाती राजेश
उपक्रमाची माहिती वाचली. चांगला आहे.
तसेच मि.पा.चे तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचे अभिनंदन.
24 Apr 2008 - 7:31 pm | व्यंकट
म्हणतो.
गमभन ची निर्मिती हा ह्या संप्रदायाचा पाया तर मनोगत, मिसळपावादी संस्थळांची निर्मिती हा कळस.
विशेष म्हणजे एवढा वाचकवर्ग असूनही पैसे मिळवण्याचा प्रयत्न न करता, उलट आपल्या पदरीचे घालून, ह्या सर्व भगिरथांनी आपापल्यावेळात काम करून ही गंगा आंतर्जालावर आणली हे आपले लेखन साभार परत मिळवणार्या नवप्रतिभावंतांवर, दूर देशी रहाणार्या, घरच्या पदार्थांच्या चवी/रेसेपीज ला आसुसलेल्या, मराठीत लिहू बोलू पहाणार्यांवर मोठे उपकार आहेत.
व्यंकट
24 Apr 2008 - 7:03 pm | मदनबाण
फार आनंद वाटला.....
(मि.पा.प्रेमी)
मदनबाण
24 Apr 2008 - 7:07 pm | विकास
द्वारकानाथांचा हा उपक्रम पण छान आहे!
मानपत्र मिळालेल्या सर्वांचेच अभिनंदन!
24 Apr 2008 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी संवर्धनासाठी कलंत्री यांची एक उत्तम चळवळ आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा !!! तसेच आपापली कामे सांभाळून माय मराठीचा जीवनव्यवहारात अधिक सहजपणे उपयोग व्हावा यासाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काम करणा-या सर्वच व ज्यांना या मानपत्राने गौरवण्यात आले आहे ते आणि आपले सर्वांचेच असलेले मित्र तात्या, सर्किट, ॐकार आणि शशांक यांचेही आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो.
-दिलीप बिरुटे
24 Apr 2008 - 7:53 pm | प्रमोद देव
सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
24 Apr 2008 - 8:22 pm | कलंत्री
प्रिय मित्रांनो,
मुख्य म्हणजे हे मानपत्र नसून कृतज्ञता पत्र आहे.
आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी इतके लोक, संस्था, व्यक्ति आपापल्या पध्दतीनी कार्यमग्न आहे ही खरोखर गौरवाची गोष्ट आहे. एक सामान्य माणुस म्हणून मी या सर्वाबद्दल नेहमीच कृतज्ञ राहील.
आपल्याला हा उपक्रम प्रत्येक वर्षी करावयाचा असून आपल्या आजुबाजूला होत असणार्या उपक्रमाची माहितीची नोंद घेणे, संकलन करणे आणि मला कळविणे ही आपणा सर्वांना आग्रहाची विनंती.
पूढील वर्षापासून कृतज्ञता पत्र आणि रोख रक्कम असे स्वरुप ठेवण्याचा विचार आहे. मुख्य म्हणजे असा समारंभ बाल गंधर्व मध्ये व्हावा अशी इच्छा आहे. कृपया आपणही याच्या आयोजनात, निवडसमिती मध्ये भाग घेऊ शकाल. आपल्या प्रत्येक विचाराचे स्वागत आहे. यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
या उपक्रमाचा विचार कसा मनात आला याबद्दल कधीतरी.
या उपक्रमाच्या रुपरेषा आखण्यात सर्वसाक्षी आणि वेदश्री यांचाही सहभाग होता याचीही नोंद घ्यावी. आणि हो, नीलकांत याच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम अशक्यच होता. पत्राचा मसूदा, मराठीसाठी प्रयत्न करीत असलेल्या अनेक लोकांचे संपर्क क्रमांक त्वरीत देणे आणि माझ्या मनातील वावदूक शंकाचे योग्य परिने आणि न थकता निरसन करणे अश्या अनेक बाबी नीलकांत याने सांभाळ्ल्या.
ही केवल सुरवात आहे आणि मायमराठीला आपल्या हक्क मिळावा, लोकभाषा, शिक्षणाची आणि ज्ञानभाषा म्हणून तिचा उल्लेख व्हावा हे आपल्यासर्वांचे स्वप्न आहे.
असो, अगत्य असू द्यावे,
आपला,
द्वारकानाथ आणि सर्व सवगंडी
24 Apr 2008 - 8:57 pm | स्वाती दिनेश
तात्या,सर्किट, ॐकार,शशांक अभिनंदन आणि द्वारकानाथ यांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा!
स्वाती
24 Apr 2008 - 9:28 pm | मैत्र
+१
अतिशय उत्तम उपक्रम... श्री द्वारकानाथ यांचे विशेष आभार...
मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे
नसे आज ऐश्वर्य त्या माउलीला
यशाची पुढे दिव्य आशा दिसे....
24 Apr 2008 - 9:31 pm | प्रभाकर पेठकर
श्री. तात्या आणि त्यांच्या कंपनीचे जोरदार अभिनंदन.
श्री. द्वारकानाथ कलंत्री, आपल्या ह्या स्तुत्य उपक्रमास आमच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा..!
24 Apr 2008 - 10:56 pm | पिवळा डांबिस
ओंकार जोशींचे 'गमभन' निर्माण करून आम्हाला मराठीत लिहायला उद्युक्त केल्याबद्दल आणि तात्या अभ्यंकरांचे लिहायला हक्काचे स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्द्ल विशेष अभिनंदन!!
बाकीचे आमच्या ओळखीचे नाहीत, तरी त्यांनी केलेल्या कार्याबद्द्ल त्यांचेही अभिनंदन!!
-पिवळा डांबिस
25 Apr 2008 - 1:45 am | इनोबा म्हणे
हा स्तूत्य उपक्रम सुरु केल्याबद्दल सर्वप्रथम श्री. द्वारकानाथ कलंत्री यांना एक मराठी माणूस व मिपाकर या नात्याने हे कृतज्ञता पत्र.
द्वारकानाथ आपला हा उपक्रम फारच छान आहे.खरेतर मराठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान देणार्यांना प्रोत्साहन देण्याचा अथवा त्या कार्यासाठी कृइतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रमच सर्वप्रथम कौतूकास पात्र आहे.तेव्हा आमच्या ह्या दोन शब्दांचा 'कृतज्ञता पत्र' म्हणून स्विकार करा. आपल्याकडून अशाच उत्तमोत्तम उपक्रमांची अपेक्षा करतो. आपल्या भावी उपक्रमांस शुभेच्छा!
आपल्या भावी उपक्रमांमध्ये आमची मदत लागल्यास अवश्य कळवा.आमचा भ्रमणध्वनी क्र.: ९३७२-९३७२-१८
नीलकांत यांना कृतज्ञता पत्र
नीलकांता पडद्यामागे राहून तू आम्हा मिपाकरांसाठी जे काही करतोयस त्यासाठी तुझे कौतूक करण्याची आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आयती चालून आली आहे.आम्हा मिपाकरांसाठी तू जितका झटतो आहेस त्याबद्दल तू कौतूकास पात्र आहेस. धन्यवाद!
कृतज्ञता पत्र मिळालेल्या इतर सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे