आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया
मित्रहो,
चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्यावर त्या देशी रवाना झाले आहेत. राजधानी प्राग येथे त्यांचा सुमारे एक महिना मुक्काम असेल. ह्या काळात भरगच्च कार्यक्रमाची आखणी असून योरोपातील अनेक ठिकाणांहून आलेल्या जनांकरिता प्रश्नोत्तरेदेखील होणार आहेत.
आपण सारे मिळून श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन करून ह्या परिषदेस शुभेच्छा देवू या.
धन्यवाद.
हैयो हैयैयो.
प्रतिक्रिया
11 Jun 2010 - 8:05 am | सहज
हा हे उत्तम!
अभिनंदन.
जाताजाता: आंतरराष्ट्रीय पब्लीकच्या नाड्या कोणत्या मुनिंनी लिहल्या?
आणी हो, चेकोस्लोव्हाकिया देश आता नाही. आता आहेत ते चेक रिपब्लीक व स्लोव्हाकिया असे दोन स्वतंत्र देश.
-------------------------------------------
युरो कमवा, डॉलर कमवा, दिनार कमवा, अजुन कुठले परकीय ते ते कमवा पण रुपये, पैसे वापरणार्यांना गंडा घालू नका, कसे?
11 Jun 2010 - 8:14 am | II विकास II
अभिनंदन आणि शुभेच्छा
हाच लेखाचे मटामध्ये कसे आले असते?
१. अस्सल भारतीय नाडीची परदेशावरील स्वारी
२. नाडीची उपयुक्तता परकीयांनाही मान्य
३. नाडी हेच सत्य, आता परदेशाकडुन ही स्वीकारले गेले.
11 Jun 2010 - 8:28 am | प्रकाश घाटपांडे
आल्यावर वृत्तांत कळेलच.
अवांतर- अशा दौर्याचा खर्च कसा काय केला जातो?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
11 Jun 2010 - 8:59 am | Nile
कायच्याकाय पन इचारता का हो काका? नाड्या कशा करता असतात मग?
-Nile
11 Jun 2010 - 9:11 am | महेश हतोळकर
परीषदेचा दुवा मिळेल का कुठे?
11 Jun 2010 - 12:00 pm | जिन्क्स
दुवा काय मागता...परीषदेचा नाडी मिळेल का कुठे? अस विचारा..
11 Jun 2010 - 12:05 pm | अवलिया
श्री. शशिकांत ओक यांचे अभिनंदन. :)
--अवलिया
11 Jun 2010 - 12:06 pm | बिपिन कार्यकर्ते
छान. एक उत्सुकता म्हणून दौरा / प्रवास वगैरेंचा वृत्तांत वाचायला आवडेल.
बिपिन कार्यकर्ते
11 Jun 2010 - 12:34 pm | वेताळ
जर ती तामिळी कुटलिपी ओक साहेबांना समजत होती तर त्यानी इथे त्याचा कधी वापर केला नाही.कित्येक मिपाकर आपल्या नाड्या बघण्यास उत्सुक असताना त्याची ओक साहेबानी योग्य ती दखल घेतली नाही असे खेदाने नमुद करावेसे वाटते.
बाकी ओक साहेबाचे हार्दिक अभिनंदन.
वेताळ
11 Jun 2010 - 4:11 pm | गणपा
वेताळाशी १००% सहमत.
अनेक मिपाकरांनी वारंवार सागुनही ओक साहेबांनी त्यांना केवळ वाटाण्याच्या अक्षताच लावल्या.
असो त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा आणि परदेश वारी बद्दल हार्दिक अभिनंदन .
11 Jun 2010 - 4:18 pm | II विकास II
ओककाका ऑनसाईट गेलेत.
रुपयेवाला भारतीय ग्राहक आणि डॉलरवाला/युरोवाला ग्राहक ह्यात फरक असणारच ना !!! ;)
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
11 Jun 2010 - 6:11 pm | हैयो हैयैयो
तमिळ कूटलिपी.
नैयो, श्री. ओक सरांनी तमिळ कूटलिपी आपणास कळते असे कधी कोठे म्हटल्याचे मला आठवत नाही. आपण आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ पूरक माहिती द्याल काय? :D
हैयो हैयैयो!
11 Jun 2010 - 6:37 pm | वेताळ
छ्या...
चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्यावर त्या देशी रवाना झाले आहेत.
चेकोस्लोव्हाकिया ला मग कशा करिता ते गेले आहेत? त्याना तामिळग्रंथ जर वाचता येत नसतील तर ते तेथे काय कुटणार आहेत?
नेमका त्याचा उद्देश काय आहे? चेकोस्लोव्हाकियातील लोकाना नाडीग्रंथ असतात हे कोणी सांगितले?अहो अजुन भारतातच नाडीग्रंथाबद्दल लोकाना माहिती कमी आहे.तुम्ही एकदम अपुरी माहिती दिली आहे.
एकादा ग्रंथ वाचता येत नसेल,त्याची भाषा कळत नसेल तर नुसत्या एकिव माहितीवर त्यावर किर्तन देण्यात काय अर्थ आहे.
वेताळ
11 Jun 2010 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार
ते आधी माणसाची पात्रता बघुन मग नाडी बघत असावेत.
ओक साहेब तुमचे कार्य खरच कौतुकास्पद आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Jun 2010 - 6:46 pm | गणपा
हाण्ण त्येजायला..
आम्हाला आमची पात्रता दाखवुन दिल्या बदाल पराकुमाराचे मानावे तेवढे आभार कमीच. ;)
11 Jun 2010 - 6:55 pm | परिकथेतील राजकुमार
आभार मानण्यापेक्षा आपल्या पुरातन संस्कृतीवर, ऋषी-मुनींवर विश्वास ठेवा, मला आभार आपोआप पोचतील गणपाजी :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Jun 2010 - 7:07 pm | गणपा
>>आभार मानण्यापेक्षा आपल्या पुरातन संस्कृतीवर, ऋषी-मुनींवर विश्वास ठेवा.
अव तेच तर म्हनल ना आम्ही, की आम्हा अनाड्यांच्या नाड्या दावा उकलुन.
आमी बी ठिवला अस्ता की इस्वास, पर त्ये बोललं इत जावा तिथ जावा.
आता त्ये या ईशयातल इतक जान्कार हाईत तर आम्ची काहुन नाडी नाय धुंडाळी व त्यांनी.
तुंमचं बी काय बाय शिक्षान झालाय का या इशयात्ल?
असन तर मदर कारा कि राव.
11 Jun 2010 - 7:10 pm | अवलिया
असन तर मदर कारा कि राव.
तुला कसं काय मदर करनार बाला... तु तर बाप्या.. !
--अवलिया
11 Jun 2010 - 7:25 pm | टारझन
शि षि शि ... एखाद्या धाग्यावर असे घाणेरडे अवांतर प्रतिसाद आले .. धाग्याचे(प्रतिसादांचे नव्हे ;) ) आयुष्य धोक्यात दिसते ;)
11 Jun 2010 - 10:14 pm | शिल्पा ब
=)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
11 Jun 2010 - 10:54 pm | II विकास II
नाना, काही संबधित माहीती मिळाली
http://www.malepregnancy.com/
http://www.malepregnancy.com/CNN/
http://en.wikipedia.org/wiki/Male_pregnancy
पुरुष गर्भ धारण करण्याबाबतीची माहीती फारशी उत्साहवर्धक नाही. अजुन काही काळ वाट पहायला लागेल. असो.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
11 Jun 2010 - 7:15 pm | परिकथेतील राजकुमार
नान्या तेच लिहिणार होतो मी आत्ता =)) =))
नाही ह्या विषयात शिक्षण झालेले नाही पण ह्या विषयावर ते जे काही सांगतात त्यावर श्रद्धा आहे.
तुमची टिंगल टवाळी चालु द्या....
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Jun 2010 - 7:24 pm | गणपा
>>तुमची टिंगल टवाळी चालु द्या....
अत्ता वो, आमी कुनाची टिंगल केली?
असो आता संपादकांनी दांडुका उगारायच्या आत पळतो.
11 Jun 2010 - 3:07 pm | llपुण्याचे पेशवेll
मोकळ्या मनाने ओकसाहेबांचे अभिनंदन.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
11 Jun 2010 - 3:41 pm | शिल्पा ब
(आमचंही मन सध्या मोकळ्च असल्याने) ओकसाहेबांचे अभिनंदन.
बिकांची सहमत...एक उत्सुकता म्हणून वृतांत वाचायला आवडेल.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
11 Jun 2010 - 5:39 pm | jaypal
योग्य तीच नाडी सापडण्यास आणि सोडण्यास माझ्या हार्दीक शुभेच्छा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
11 Jun 2010 - 7:35 pm | पाषाणभेद
अरे कोणीतरी या जयपालची नाडी बघा रे. काय बरोबर चित्रे लावतो तो.
आधी वास्तूशास्त्र, नंतर योगा आता ही नाडी. छे. पाश्चात्य देशांचे भारतीयकरण लवकरच होणार.
बाकी ओकसरांचे अभिनंदन.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
11 Jun 2010 - 6:16 pm | दत्ता काळे
ओकसरांचे अभिनंदन. :)
11 Jun 2010 - 6:26 pm | मदनबाण
श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन...
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
11 Jun 2010 - 11:24 pm | मिसळभोक्ता
ओकसाहेबांचे अभिनंदन !
आता इंटरनॅशनल स्टार झालात, तेव्हा ओळख ठेवा, साहेब !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Jun 2010 - 12:44 am | शानबा५१२
हे खरे आहे का???
मग आता भारताचे चांगले दीवस आले म्हणायच की विदेशातल्यांचे खराब देवस आले???
-नाडी हातात घेउन बसणारा
12 Jun 2010 - 5:57 am | शुचि
अभिनंदन!!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
14 Jun 2010 - 7:49 pm | अरुंधती
ह्या परिषदेच्या निमित्ताने एके काळी तंजावरच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या, ब्रिटिशांनी भारतात राज्य करत असताना ज्या ग्रंथप्रकारात रुची दर्शविली त्या नाडीग्रंथांवर संशोधक वृत्तीतून अधिक प्रकाश पडावा व त्यासंदर्भातील विज्ञानाधिष्ठित आणि साहित्यिक संशोधनाला पुष्टी मिळावी हीच शुभेच्छा! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/