कुर्ल्याला राहत होते तेव्हाची गोष्ट...आमच्या बाजूला राहत असलेल्या कुटुंबात एका चिटुकलीची भर पडली...आई बाबा दोघेही नोकरी करणारे...मोठा शाळेत ...हे पिल्लू वर्षाच होण्याच्या आतच नेहरूनगरच्या एका आजींकडे जिथे बिल्डिंगमधील अजून दोन शाळेतील मुली असत तिथेच ठेवायचे ठरले...हि चिटुकली इथे राहू लागली...ऑफिसात जाताना आई-बाबा त्या आजीकडे सोडायचे आणि येताना घेऊन यायचे...दिवसभर हि छकुली तिथेच...
जरा वर्षभराची झाल्यावर इकडे तिकडे उठाठेव करणे चालू झाले...करणारच...लहान पिल्लूच ते !! आम्ही तिला आमच्या घरी खेळायला आणायचो...खाऊ द्यायचा, गोष्ट सांगायची, गाणं म्हणायचं, गाणं शिकवायचं असं चालू झालं....मजा यायची...फारशी बोलायची नाही आणि समजा ती घरात असताना दार बंद केलं तर लगेच रडारडी करून बाहेर पळायची नाहीतर दार बंदच करू द्यायची नाही...घरात खेळताना काहीतरी पाडापाडी व्हायची ती होणारच...आणि एवढ्याशा पिल्लाला काय बोलायचे? आम्ही अर्थातच दुर्लक्ष करायचो आणि आम्हीच आवरायचो....कधी कधी शु पण करायची घरातच कुठेही...वर्षाच्या बाळाला काय कळणार? आम्ही आपलं आवरायचो...त्यात काय विशेष?
पण एक गोष्ट मी बघितली कि समजा घरात शु केली तरी ती एकदम आवरायला जायची...काही पडलं तर लगेच उचलून ठेवायची घाई आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा अपराधीपणा ....लहान बाळांना एवढं काही कळत नसतं आणि माझ्या आईला सांगितलं तर ती हिचं कौतुक करणार "किती हुशार आहे, लगेच आवरायला जाते ", हेच तिच्याही आईला वाटत असे...
मला मात्र हे नॉर्मल वाटत नव्हतं, आपल्यापेक्षा या मोठ्यांना अनुभव जास्ती आहे हे समजून मी खूप काही बोलण्याच्या भानगडीत पडले नाही पण असं काही घडलं तर लगेचच मी दाखवून द्यायचे कि एवढ्या छोट्या बाळाला कसं कळतंय कि आवरून घ्यायला हवं? एकदा मी आईला सांगून बघितलं कि "बहुदा तिच्या पाळणाघरात तिला तिच्याकडून काही चूक झाली तर शिक्षा करत असावेत, तू तिच्या आईशी बोलून बघ, मला तिचं वागणं नॉर्मल वाटत नाही "...
"आपल्याला काय करायचंय? आणि त्यांना नाही का त्यांच्या बाळाची काळजी? उगाच अगोचरपणा करायला जाऊ नकोस !!" माझी आई
ती दोन एक वर्षाची होईपर्यंत त्याच आजींकडे होती.... एकदा तिचा मोठा भाऊ शाळेतून तिला घ्यायला गेला...काही दिवसांनी आम्हाला कळले कि आता त्या आजींकडे न ठेवता दुसरीकडे कुठे तिला पाळणाघर शोधताहेत...का म्हणून विचारलं तर त्यांनी अतिशय disturbing घटना सांगितली ....
तिचा मोठा भाऊ घ्यायला गेला तर ती म्हातारी त्या एवढ्याशा जीवाला लाथेने मारत होती...अजून खोलात चौकशी केली तर कळले कि ती म्हातारी या छकुलीला तिचे काही चुकले तर चिमटे घेत असे, लाथेने मारत असे, अंगावर ओरडत असे, खायला देत नसे वगैरे....तिला बोलता येत नव्हते म्हणून ती सांगू शकत नव्हती पण तोपर्यंत तिच्या चिमुकल्या मनावर खोल परिणाम होईल असे हि नालायक म्हातारी वागली होती...तिचा पाळणाघर हा व्यवसायच होता...तिला माहिती नव्हते का लहान बाळे कशी असतात ते? मग झेपत नव्हते तर का घेतले? महिन्याकाठी ७००-८०० रु. मिळणार म्हणून एका चिमुकल्या जीवाचे हाल केले....
मी विचारलं पोलीस complaint केली का तर नाही म्हणे...फक्त ताबडतोब बाळाला तिथून काढून घेतलं...यांना तरी स्वतःच्या बाळाच्या वागण्यात काय फरक पडत आहे हे दिसले नाही का? का वेळ नसल्याने दुर्लक्ष केले ? काहीही असो...त्या जीवाला मात्र भयानक अनुभव घ्यावा लागला...
असेच काही video u tube वर सुद्धा आहेत...माझ्या बाळाला शाळेत घालायच्या वेळेस मी जालावर बरेच लिखाण वाचले...त्यातील लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी अशा: १) अगदी कणभर जरी शंका आली कि आपले बाळ इथे सुरक्षित राहणार नाही तर ते पाळणाघर यादीतून बाद करावे...
२) पाळणाघर आणि तेथील कर्मचारी यांविषयी माहिती गोळा करावी..
३) भेटायला गेल्यावर त्यांचे इतर मुलांशी वागणे बघावे, आपण समोर असताना आपल्या बाळाशी ते छानच वागणार..(यालाही एक गुजराती अपवाद माझ्या पाहण्यात आला होता..त्याविषयी नंतर) आणि आपण गेल्यावर ते इतर मुलांप्रमाणेच आपल्याही छकुल्याला वागवणार..
४) पाळणाघरचालकाकडे परवाना आहे का ते बघावे...परवाना त्या वर्षीचाच असावा.
५) घर childproof आहे का ते पाहावे
६) बाळाचे खाणे जर पाळणाघर पुरवणार असेल तर त्यांच्या स्वैपाकघराची स्वच्छता पहावी..
७) त्यांच्या बाथरूमची स्वच्छता पहावी
अजून तुमचे काही standards असतील तर ते check करावे...यातील एका गोष्टीत जरी खोट वाटली तर आपल्या बाळाला इथे enroll करू नये....आणि एखादं पाळणाघर थोडं महाग असेल,वरील गोष्टींची पूर्तता असेल आणि तेथील वातावरण चांगलं असेल तर पैसा पाहू नये कारण बाळाची सुरक्षा महत्वाची...
***************************************************************************
http://shilpasview.blogspot.com/
प्रतिक्रिया
25 May 2010 - 9:56 am | मनिष
खरच खूप disturbing अनुभव आहे. :(
25 May 2010 - 10:23 am | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 May 2010 - 10:34 am | आंबोळी
शीर्षक चुकून पाळणाघरातील पाजी असे वाचले....
लेख वाचल्यावर तेच योग्य होते अस वाटतय.....
आंबोळी
26 May 2010 - 1:29 am | संदीप चित्रे
असंच म्हणतो.
खरंच डिस्टर्बिंग अनुभव आहे का
25 May 2010 - 11:36 am | ज्ञानेश...
दुर्दैवी अनुभव आहे हा.
स्वतःच्या घरात सर्व काही असतांना नाईलाजाने पाळणाघरात राहणार्या बच्चेकंपनीबद्दल कणव वाटते. मुलांचे पूर्ण निरोगी संगोपन आपल्या घरातच होणे शक्य आहे.
पाळणाघर हा लास्ट ऑप्शन ठेवावा.
25 May 2010 - 11:42 am | मनिष
हे नेहमीच शक्य होईल असे नाही. आई, वडील दोघेही नोकरी करत असतात, घरी बघायला कोणी नसते...सुट्टी घेऊन, घेऊन किती घेणार? शिवाय सगळीच पाळणाघरे अशी नसतात. लहान मुले sharing, socialization आणि कित्येक चांगले खेळ अशा पाळणाघरातच शिकतात. कित्येक चांगली पाळणाघरेही आहेत.
हा अनुभव खूप जुना दिसतोय. आजकाल पुण्यात पाळणाघरात लहान मुलांचे महिन्याचे निदान ३५०० ते ५००० तरी घेतात.
27 May 2010 - 10:09 am | सोम्यागोम्या
एवढे पैसे? लोकसंख्यावाढीवर आपणच आळा घालायचा असा पाळणाघरवाल्यांनी इरदा केलाय की काय?
27 May 2010 - 11:55 am | नितिन थत्ते
नाही हो. आमच्या घरी एक्स्क्लूझिव आमच्या मुलीला सांभाळायला ज्या बाई आहेत त्यांनाही आम्ही एवढे देत नाही. तसेच त्या घरातली इतरही कामे आणि मुलीला क्लास वगैरेला नेणे आणणे वगैरेसुद्धा करतात.
पाळणाघरात १०००-१२०० हून अधिक नसावेत.
(अर्थात पुण्याचे काही सांगता येत नाही. ;) )
नितिन थत्ते
27 May 2010 - 12:00 pm | मनिष
एक आठवड्यापुर्वी चौकशी केली आहे, ४०० ते ५०० तासाचे, त्याप्रमाणे ९ ते १० तासांचे एव्हढे होतात. काही मित्र कोंढव्यात राहत आहे, ते ४५०० ते ५००० देत आहे. औंध, पाषान, बाणेर, कोथरुड भागात हा रेट (३५०० ते ४५००) आहे. त्यात ते मुलांचे खाणेही देतात. जर खाणे नसेल तर ३००० पर्यंत आहे असे ऐकले आहे.
27 May 2010 - 12:10 pm | नितिन थत्ते
पुण्याचे काही सांगता येत नाही हेच खरे.
आमच्या बाईंचे इतकेच नाही तर मी किंवा पत्नी रात्री घरी येईपर्यंत .... कितीही वाजले तरी त्या थांबतात. अगदीच त्यांना प्रॉब्लेम असेल तर मुलीला त्यांच्या घरी घेऊन जातात.
नितिन थत्ते
27 May 2010 - 12:11 pm | मनिष
असेल! मुंबैत डॉग सिटींग चे इतके घेतात म्हणे. माझी एक मैत्रीण ८-१० वर्षापुर्वी डॉग सिटींग करायची तेंव्हा २००० घ्यायची! :)
27 May 2010 - 12:18 pm | नितिन थत्ते
ठाण्यात पाळणाघराचे १०००-१२०० घेतात. तान्ह्या बाळाचे १५००.
तुम्ही सांगताय त्यात जेवणखाण पण देतात का?
आमच्या बाई २५०० मध्ये एक्सक्लूझिव सांभाळतात. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे पोळीभाजी करतात+झाडू पोता+मुलीला क्लासला नेणे आणणे वगैरे.
आमच्या सोसायटीत इतरही काही घरांत ही सिस्टिम आहे. ते लोकही एवढेच देतात.
नितिन थत्ते
27 May 2010 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
संपूर्ण महिन्याची कमाई २५०० कमी वाटते. आमच्या (ठाण्याच्या) घरी दोन वेळा स्वयंपाकाला येणार्या काकूंना आम्ही १२०० (कदाचित थोडे अधिक) आणि केर-लादी, भांडी यांच्यासाठी (दोन वर्षांपूर्वी) ५५० देतो
अदिती
25 May 2010 - 11:53 am | स्वाती दिनेश
अगदी संतापजनक अनुभव..
स्वाती
25 May 2010 - 12:20 pm | वेताळ
पुण्यात घडली होती. एक जोडपे पाळणाघर चालवत होते. त्यानी एका लहान मुलीला चक्क भाजले होते. त्याच्यावर पोलिस कारवाई केली होती.लिंक सापडली तर टाकेन.
वेताळ
25 May 2010 - 12:34 pm | मनिष
http://epaper.esakal.com/eSakal/20091003/4940929239215632328.htm
भीती वाटायला लागली, आमच्या पिलूला पाळणाघरात ठेवायची वेळ जवळ आली आहे! :(
ह्या मुलीची आई धुण्या-भांड्याची कामे करतात!!!
25 May 2010 - 12:23 pm | मदनबाण
भयानक अनुभव !!! :(
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
25 May 2010 - 12:35 pm | डॉ.श्रीराम दिवटे
अशा गोष्टी नित्य घडतांना आढळतात.
आपला अनुभव भयानक आहे.
25 May 2010 - 11:05 pm | शिल्पा ब
आपल्याकडे अशा वेळेस दाखवण्यासारख्या काही शारीरिक जखमा नसतील तर पोलीस लक्ष देत नाहीत...आणि पालक सुद्धा या भानगडीत पडत नाहीत...खरे तर पालकांनी एकजूट ठेवून अशा लोकांना धडा शिकवायला हवा...आणि समजा एकच्या बाबतीत असे काही घडले तर ताबडतोब इतरांना सावध करायला हवे....कामातून थोडासा वेळ काढून हे करता येण्यासारखे आहे नव्हे केलेच पाहिजे...रोगावर उपाय करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला चांगला.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 May 2010 - 11:24 pm | पक्या
+१
छोट्या मुलीला आलेला अनुभव खूपच वाईट होता. वाचून वाईट वाटले.
मुले ३-४ वर्षाची होईपर्यत जोडीदारापैकी एकाने (९९% बायकोच) नोकरी सोडून दिली आहे काही कालावधीसाठी आणि शाळेच्या वयाची झाली की शाळा आणी शाळा सुटल्यावर शाळेच्याच डे केअर मध्ये मुलांना ठेवून परत नोकरीवर रुजू होणारी जोडपी पाहिली आहेत.
एक ओळ्खीतील बाई सकाळी साडेचार पाच ला उठून स्वतःचा डबा करून सहाच्या सुमारास कामावर जातात आणि मुले शाळेतून यायच्या वेळेस (४ च्या आसपास ) घरी येतात. सकाळी मुलांना उठवणे, तयार करणे , शाळेत सोडणे ही कामे नवरा करतो.
ओऴखीतील काही लोक आलटून पालटून घरून काम करतात. (म्हणजे एक आठवडा नवरा तर पुढचा आठवडा बायको घरून ऑफीसचे काम करणार असे) . एका जोडप्यातील बायको घरून काम करते पण तिने मुलाला सांभाळण्यासाठी नॅनी ठेवली आहे. त्यामुळे काम करताना तिला मधे मधे सारखे उठावे लागत नाही.
अर्थात हे सर्व अमेरिका मधे पाहिले आहे. भारतात अशी कामाची संस्कृती (वर्क कल्चर) सगळीकडेच आहे की नाही माहित नाही. (कामाच्या लवचिक वेळा, घरून काम करणे वगैरे)
जय महाराष्ट्र , जय मराठी !
26 May 2010 - 12:14 am | चित्रा
लहान मुलांना काय किंवा कोणालाही काय अशा अनुभवांतून जावे लागणे हे भयंकर आहे...
आपण आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे हे ठरवलेले बरे असते. मुलांना किती वर्षे आपण सांभाळणार आहोत, किती वर्षे आपण आईवडिल किंवा कोणा मित्रांची मदत बाळाचे संगोपन करण्यासाठी घेऊ शकतो असे सर्व विचार करावेत. शक्य झाल्यास स्वत: सांभाळणे उत्तम. पण प्रत्येक जोडप्याला हे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे पाळणाघरात ठेवण्याची वेळ आली तर विश्वास ठेवताना जरा बेताने आणि पारखून ठेवावा. घरात कोण माणसे जातात-येतात, बाईंचे लक्ष मुलांच्या सुरक्षिततेकडे आहे ना हे सर्व तपासावे. अमेरिकेत हे अधिक स्टँडर्डायझेशन असल्याने जरा सोपे असते, पण भारतात जरा विचार केलेलाच बरा.
26 May 2010 - 11:31 pm | भानस
झेपत नाही तर करूच नये नं. बोलताही न येणार्या लहानग्या जीवाचे इतके हाल... संताप संताप झाला वाचून. आजकाल पालकही बरेच सजग झालेत व पाळणाघर वालेही अगदी डोळ्यात येईल इतका बेताल कारभार करत नाहीत. अर्थात अपवाद असतातच. काही अती प्रेमळ तर काही हे असे.
27 May 2010 - 12:08 am | भारद्वाज
लेखाबद्दल धन्यवाद. अनुभव भयानकच आहे.
माझे अजुन लग्न झाले नाहीये. पण समोर काय काय वाढून ठेवलेले असू शकते त्याची या लेखावरून कल्पना आली.
27 May 2010 - 1:47 am | प्राजु
भयानक आहे अनुभव.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
27 May 2010 - 12:16 pm | गुंडोपंत
अनुभव भयानक आहे.
मात्र पालकांचे फक्त आपलेच पाल्य काढून घेणे योग्य वाटले नाही. कारण जी मुले तेथे अजून आहेत त्यांचे काय?
या प्रकाराला मुळापासून घाव घालून बंद केले पाहिजे.
पाळणाघर चालवणारांना प्रशिक्षणाची अट असली पाहिजे.
आणि तसे प्रशिक्षणही मिळू शकले पाहिजे.
आपला
गुंडोपंत