नमस्कार,
मिसळपावचा वाढता व्याप लक्षात घेता या लेखाद्वारे मिसळपाववर तीन नवीन संपादकांच्या नावाची घोषणा करतो आहे.
१) रामदास
२) छोटा डॉन
३)निखील देशपांडे
या आधीच्या संपादकांप्रमाणेच हे सुध्दा मिसळपाव.कॉम वरील संपादनाच्या कामात असतील. त्यांनी सक्रिय काम करावे ही अपेक्षा आहे.
लवकरच मिसळपाव मध्ये काही बदल घडणे अपेक्षीत आहे. त्या योगे सध्याचे संपादक मंडळ सक्रिय सहभाग देत आहेतच. आता या नवीन सहकार्यांमुळे कामाला गती येईल.
या तिन्ही नवीन संपादकांचे अभिनंदन !
- सरपंच
प्रतिक्रिया
23 May 2010 - 11:24 pm | बिपिन कार्यकर्ते
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन.
बिपिन कार्यकर्ते
27 May 2010 - 12:00 am | चतुरंग
(खुद के साथ बातां : बाकी ह्या रामदासांना उगीच केलं संपादक, आधीच ते लिहितील लिहितील म्हणून डोळे लावून बसायचं आता तर संपादक पदाची जबाबदारी म्हणजे उंबराचं फूलच की त्यांचं लेखन! :()
चतुरंग
23 May 2010 - 11:29 pm | Nile
नविन संपादकांचे अभिनंदन.
(च्यायला ह्ये बी गेले का!)
-Nile
23 May 2010 - 11:30 pm | नि३
+१
अवांतर: च्याय ला ( चहा घेऊन ये) रामदास आतापर्यंत संपादक नव्ह्ते??
असो चांगला निर्णय. छोटा डॉन चे नाव पाहुण अंमळ आनंद जाहला
---(NOT विनापगारी संपादक) नि३.
23 May 2010 - 11:31 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =))
डाण्या आणि निख्याची तोंडं बघायची लै इच्छा झालीये ..
बाकी रामदास, निख्या आणि डाण्या ... आम्हाला तुमचे सहकार्य इथुन पुढेही राहिल , अशी अपेक्षा करतो ;)
23 May 2010 - 11:57 pm | मी-सौरभ
मिर्या वाटायला..................
-----
सौरभ :)
23 May 2010 - 11:47 pm | दशानन
संपादित..
24 May 2010 - 11:06 am | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. लगेच ट्राय करून बघितलं का? ;)
संपादित..
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
23 May 2010 - 11:36 pm | प्रमोद देव
बाकी रामदास, निख्या आणि डाण्या ... आम्हाला तुमचे सहकार्य इथुन पुढेही राहिल , अशी अपेक्षा करतो Wink
गहिवरून आले. ;)
23 May 2010 - 11:43 pm | विकास
तिन्ही नवीन संपादकांचे अभिनंदन! (आणि शुभेच्छा! ) :-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
24 May 2010 - 5:35 am | नंदन
असेच म्हणतो :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 May 2010 - 5:37 am | सहज
अभिनंदन व शुभेच्छा! :-)
24 May 2010 - 11:08 am | llपुण्याचे पेशवेll
तसेच म्हणतो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
24 May 2010 - 1:12 pm | गणपा
वा वा वा त्रिमुर्तीचे अभिनंदन.
24 May 2010 - 7:24 pm | ऋषिकेश
अभिनंदन, शुभेच्छा आणि सहकार्याची हमी देतो
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
24 May 2010 - 12:03 am | फटू
नविन संपादकांचे अभिनंदन !!!
- फटू
24 May 2010 - 3:32 am | प्रभो
नवसंपादकांचे अभिनंदन!!!
24 May 2010 - 5:15 am | राजेश घासकडवी
नवीन संपादकांचं अभिनंदन.
राजेश
24 May 2010 - 5:47 am | धनंजय
नवीन संपादकांचे अभिनंदन.
24 May 2010 - 6:53 am | Pain
इतर संपादक कोण आहेत ?
इतर forums प्रमाणे संपादकांच्या नावाला वेगळा फोन्ट किंवा शीर्षक का वापरत नाहीत ?
शंका यांना विचारायच्या का ?
24 May 2010 - 8:43 am | सरपंच
नमस्कार,
इतर संपादकांची नावे देत आहे.
मुक्तसुनीत
चतुरंग
रेवती
विकास
चित्रा
नंदन
प्रियाली
बिपिन कार्यकर्ते
केशवसुमार
प्राजु
मृदुला
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांत
यापैकी काही संपादक सध्या सक्रिय नाहीत. त्या सर्वांना विनंती आहे की कृपया मिसळपाव वर सक्रिय संपादनात भाग घ्यावा.
- सरपंच
24 May 2010 - 9:05 am | jaypal
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
टारुभाय तुमचे वाक्य कालजास भिडले =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 May 2010 - 9:06 am | नीलकांत
नवीन संपादकांचे अभिनंदन.
:) :) :)
- नीलकांत
24 May 2010 - 9:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नवीन संपादकांचे अभिनंदन आणि त्यांना व्यनी आणि खरडींचा भडीमार सहन करण्यासाठी शुभेच्छा!
(डान्रावांची राको) अदितीताई अ.पा.
24 May 2010 - 9:36 am | वेताळ
तसेच त्याचे अभिनंदन <:P
वेताळ
24 May 2010 - 9:39 am | आंबोळी
सर्व नविन जुन्या संपादकांचे अभिनंदन व शुभेच्छा!
बाय द वे सध्या सरपंच कोण आहे?
आंबोळी
24 May 2010 - 10:39 am | दिपक
डॉन्राव , रामदास आणि निखिल ह्यांचे अभिनंदन ! सहकार्य करुच.
24 May 2010 - 10:52 am | आनंदयात्री
हाबिणंदन !!
निदे आणी डॉनराव ...
१. योग्य न्याय करा ..
२. स्वतः कोणत्या वादात असतांना संबधित धाग्यावर संपादन करु नका.
३. तुमच्यावर चिखलफेक करणार्या गोष्टींवर निर्णय घ्यायला इतर संपादकांना सांगा.
अर्थात ही विनंती.
24 May 2010 - 11:12 am | इनोबा म्हणे
स्वतः कोणत्या वादात असतांना संबधित धाग्यावर संपादन करु नका.
+१
अभिनंदन आणि शुभेच्छा!
24 May 2010 - 10:54 am | समंजस
नविन संपादकांचे अभिनंदन!!!!
24 May 2010 - 10:56 am | प्रकाश घाटपांडे
अभिनंदन ! आमच सहकार्य असच 'चालु' राहिल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
24 May 2010 - 11:09 am | छोटा डॉन
आम्हाला दिलेल्या नव्या जबाबदारीबद्दल आम्ही मिपा व्यवस्थापनाचे आभार !
जबाबदारी निश्चितच वाढली आहे, सर्वांच्याच अपेक्षा शक्य तितक्या प्रामाणिकपणे पुर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे म्हणतो.
मिपाच्या इतर दिग्गज संपादकांच्या रांगेत जाऊन बसण्याचा आनंद नक्कीच आहे पण त्याहुन मोठ्ठी गोष्ट अशी की मिळालेल्या अधिकारांच्या उपयोगातुन काही चांगले विधायक करता येईल असे वाटते आहे, आपल्या सदिच्छा आहेतच.
१. गंभीर आणि विधायक चर्चांचा तोल ढासळु न देणे.
२. शक्यतो प्रत्येकच ठिकाणी 'वैयक्तिक हल्ले' रोखणे.
३. शक्य तितक्या लवकर गोंधळाच्या स्थितीतुन संकेतस्थळावरील सामान्य वाचकाला मुक्त करणे
४. नवनवीन साहित्यास आणि लेखकांना प्रोत्साहन देणे.
५. फालतु आणि निव्वळ उपयोगशुन्य धाग्यांना आणि त्यावरील प्रतिसादांना चाप लावणे
आदी गोष्टींना माझे प्राधान्य असेल.
वेळोवेळी इतर जेष्ठ संपादकांचे व वरिष्ठ मिपाकरांचे मार्गदर्शन असेलच अशी खात्री आहे.
बाकी आनंदयात्रींच्या सुचनांशी सहमत आहे, त्यांचे १००% पालन करेन अशी ग्वाही देतो.
अवांतर :
आंतरजालावर 'संपादन न करण्याची' परिस्थिती जेव्हा येईल तो सुदिन असेल असे आम्हाला वैयक्तिकरित्या वाटते.
------
(आभारी)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
24 May 2010 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त !!
तिन्ही नवीन संपादकांचे अभिनंदन!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 May 2010 - 1:12 pm | मेघवेडा
अरे वावावा!! शुभवार्ता! अभिनंदन रे डान्या, निख्या आणि रामदासजी! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
24 May 2010 - 12:17 pm | श्रीयुत संतोष जोशी
मुक्तसुनीत
चतुरंग
रेवती
विकास
चित्रा
नंदन
प्रियाली
बिपिन कार्यकर्ते
केशवसुमार
प्राजु
मृदुला
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीलकांत
आणि + ३
१) रामदास
२) छोटा डॉन
३)निखील देशपांडे
अरे व्वा. एव्हढे संपादक . मजा आहे मिपाकरांची.
संपादकांचे अभिनन्दन
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
24 May 2010 - 1:02 pm | वेताळ
व उत्कृष्ट लेखक रा. रा. मा. टारझन ह्याची संपादक मंडळात वर्णी लागेल अशी आम्हास खात्री होती.त्यानी देखिल वेळोवेळी आपली इच्छा जाहिर केली होती.पण तुर्तास आमचा हिरमोड झाला आहे
वेताळ
25 May 2010 - 9:26 am | सोम्यागोम्या
+१
24 May 2010 - 1:54 pm | दत्ता काळे
सर्व नविन संपादकांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा :)
24 May 2010 - 1:54 pm | झकासराव
नवीन संपादकाना शुभेच्छा आणि अभिनंदन :)
24 May 2010 - 5:24 pm | अवलिया
छान ! रामदास, डान्राव आणि निखोबा आमचे दोस्त आहेत.
"संपादक" झाल्यावरही ते दोस्त राहतीलच अशी आशा आहे :)
तिघांचेही अभिनंदन.
बाकी संपादक मंडळी आनंदात असतील अशी आशा आहे. ;)
--अवलिया
24 May 2010 - 5:40 pm | चित्रा
सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
24 May 2010 - 7:31 pm | प्राजु
सर्व नविन संपादकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
24 May 2010 - 9:38 pm | मिसळभोक्ता
अशा रीतीने संपादकांची संख्या वाढत राहिली, तर लवकरच मिपा हे स्वसंपादित स्थळ होईल यात शंकाच नाही.
तरीही, अभिनंदन. आता डॉन्या झाडावर चढण्यापेक्षा झाडाच्या मुळावरच कुर्हाड चालवेल.
उतरा रे सगळे, दुसरी जागा शोधू.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
27 May 2010 - 8:02 am | II विकास II
अशा रीतीने संपादकांची संख्या वाढत राहिली, तर लवकरच मिपा हे स्वसंपादित स्थळ होईल यात शंकाच नाही.
अगदी हाच विचार मनात आला होता.
काही आखाती देशात सगळेच राजे.
कृपया, हा प्रतिसाद कोणी व्यक्तीगत घेउ नये.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
24 May 2010 - 9:39 pm | रामदास
म्हणून ही जबाबदारी स्विकारतो आहे.
संपादकांनी काय आणि कसे काम करावे या बाबत अजून काही माहीती नाही.
परंतू मी ज्या अपेक्षांनी आतापर्यंतच्या संपादकांकडे बघत होतो त्या अपेक्षा स्वतःकडून पूर्ण करण्याची तयारी करतो आहे.
एक महत्वाची बाब म्हणजे आपल्या कार्याचे मूल्यमापन .माझ्या सक्रीय आणि सकारात्मक संपादनाचा लेखाजोखा मी निश्चीतच ठेवीन . निष्क्रीय संपादक झाल्यास सदस्यांनी वारंवार मला टोचणी द्यावी.
माझी दुबळी बाजू म्हणजे काथ्याकूट. या सदरात फारसे संपादन मी करू शकेन असा भरवसा तूर्तास वाटत नाही.
माझी बळकट बाजू म्हणजे नवनवीन साहित्यास आणि लेखकांना प्रोत्साहन देणे.(हे काम मी संपादक नसताना पण करत होतो)
उदा :गेल्या महीन्याभरातील खटाऊची नोकरी कर्ते हेमंत बर्वे आणि म्युच्युअल फंड कर्ते शेखर जोग .
बरेच नवे लेखक मिपावर येतील .या लेखकांना जुन्या सदस्यांनी प्रोत्साहन द्यावे ही अपेक्षा.
प्रतिसाद उसवणे आणि उडवणे मला आवडत नाही.
(गुरु ग्रहावरचा पट्टा आपल्याच एका संपादकांनी प्रतिसाद उडवण्याची तहान भागवण्यासाठी उडवला होता अशी पण अफवा मध्यंतरी मी ऐकली होती)
वैयक्तीक वर्मावर /व्यंगावर /लकबीवर टीका करू नये असे वाटते.
कंपूबाजीचे स्वागत आहे पण मग एकाच वेळी दहा बारा कंपू अस्तित्वात यावेत ही जबाबदारी सदस्यांची आहे.
कुस्ती कंपू वि.कंपू अशी व्हावी .
नव्या जबाबदारीबद्दल मिपा व्यवस्थापनाचे आभार !
24 May 2010 - 9:47 pm | टारझन
काही लोकांचा एकट्याचाच कंपु असतो , त्यानुसार इथे १०-१२ नव्हे तर १०-१२ च्या पटींत कंपु आहेत ;)
बाकी रामदास सर , तुम्ही फार क्वचित प्रतिसाद देतांना दिसतां हं ... तुम्ही ज्ञाणेश्वरांच्या अगाध प्रतिभे इतके छाण लिहीत नाहीत , नाही तर नुसत्या स्वतःच्या लेखांवर प्रतिक्रीया घेण्याबद्दल तुम्हाला "ठादा" ची पदवी दिली असती :)
~ नमुंदा
24 May 2010 - 9:56 pm | ज्ञानेश...
हे 'धोरण' आहे की व्यक्तिगत मत? /:)
असो.
नव्या ३ आणि जुन्या १३ संपादकांना शुभेच्छा.
24 May 2010 - 10:00 pm | नितिन थत्ते
सर्व नव्या जुन्या संपादकांना सहकार्याची हमी आणि चांगल्या कामासाठी सदिच्छा.
नितिन थत्ते
24 May 2010 - 10:26 pm | इन्द्र्राज पवार
"....१. गंभीर आणि विधायक चर्चांचा तोल ढासळु न देणे....
तिघातील एक संपादक श्री. छोटा डॉन यांचे हे आश्वासीत कलम.
हे होणे फार फार गरजेचे आहे.
सर्वच सदस्यांनी निव्वळ "गंभीर वा विधायक"च चर्चा केल्या पाहिजेत असे नाही, कारण मी पाहीले आहे, वाचले आहे की, बरेच सभासद "स्ट्रेस बस्टर मीन" म्हणूनही विविध धाग्यात सामील होतात....अन् ते पाहणे/वाचने मनोरंजकही असते हे मान्य.... पण म्हणून जे गंभीर विधायक चर्चा करतात त्या ठिकाणी आपल्या "मनोरंजनात्मक" चिंचा पाडाव्यात असे व्हायला नको.... त्यामुळे होते असे की, चर्चेचा नूर निव्वळ पालटतो असे नाही तर तो भरकटतोदेखील. देवाच्या आळंदीला निघालेली पालखी चोराच्या आळंदीकडे वळते.
आता संपादकाच्या नजरेसमोर "तोल ढासळू न देणे..." याची काय केमिस्ट्री आहे हे पाहणे आनंदाचे ठरेल.
असो. सर्वच संपादकांना मिपावरील त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा कायम राहतीलच.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
25 May 2010 - 9:41 am | बेसनलाडू
जे गंभीर विधायक चर्चा करतात त्या ठिकाणी आपल्या "मनोरंजनात्मक" चिंचा पाडाव्यात असे व्हायला नको.... त्यामुळे होते असे की, चर्चेचा नूर निव्वळ पालटतो असे नाही तर तो भरकटतोदेखील. देवाच्या आळंदीला निघालेली पालखी चोराच्या आळंदीकडे वळते. गंभीर आणि विधायक चर्चांचा तोल ढासळु न देणे.... तिघातील एक संपादक श्री. छोटा डॉन यांचे हे आश्वासीत कलम.हे होणे फार फार गरजेचे आहे.
(सहमत)बेसनलाडू
25 May 2010 - 10:37 am | निखिल देशपांडे
हा प्रतिसाद तसा उशीरानेच देत आहे त्याबद्दल क्षमस्व.
मिपा प्रशासनाने दिलेल्या नवीन जवाबदारी बद्दल सर्व प्रथम त्यांचे आभार मानतो. याही पुढे जाउन संपादक म्हणुन केलेल्या कार्यात पारदर्षकता ठेवण्याची ग्वाही देतो.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
25 May 2010 - 11:09 am | विसोबा खेचर
सर्वांचं मनापासून अभिनंदन..
मिपाला सांभाळा प्लीज..
तात्या.
25 May 2010 - 4:50 pm | आशिष सुर्वे
तिघा प्रभुतींचे अभिनंदन..
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
27 May 2010 - 6:55 am | रेवती
नविन संपादकांचे अभिनंदन!
रेवती
28 May 2010 - 2:06 am | डावखुरा
नवीन त्रिमुर्तीचे अभिनंदन व शुभेच्छा..!!!
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
28 May 2010 - 2:17 am | वेदनयन
नव-संपादकांचे अभिनंदन!
ह्या संपादकांचे नक्की काय काम असते? चिरीमिरी मिळत असेल तर आमचा नंबर लागेल काय? उगीच लष्कराच्या भाकरी भाजण्यात काही मजा नाय.