नवनिर्माण समिती

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
23 May 2010 - 11:30 pm

नमस्कार,

आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे.

१. नवनिर्माण समिती

या समितीने मिसळपाववर असलेल्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास करावा आणी त्यांतील त्रुटी शोधून काढाव्यात. तसेच मिसळपाववर कोणत्या तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत याचाही आढावा घ्यावा. मिसळपावचे रुपरंग बदलण्यास वाव असेल तर तसेही सुचवावे. काही नविन सुविधा देता येणे शक्य असल्यास त्यांच्या अहवालात तसा उल्लेख करावा. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर
तो लोकाभिमुख होईल, आणी नंतर अहवालातील सुचवण्यांनुसार बदल केले जातील.

उपरोक्त समिती सदस्य:

निखिल देशपांडे आणि विनायक अनिवसे

अभ्यास करावयाचे मुद्दे:

१. मिसळपाववरच्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास
२. तंत्रज्ञान बदलाची निकड
३. नविन सुधारणांची शिफारस
४. रंगरुप बदण्यासाठीची शिफारस
५. विदागाराची डागडुजी
६. संपर्कजाळे विणण्यासंबधी अभ्यास

या समितीच्या कामकाजाबद्दल तसेच या विषयाबद्दल आपल्या काही सुचना असल्यास इथे कळवावे. तसेच या किंवा इतर येणार्‍या कुठल्याही समितीचा सदस्या होण्याची इच्छा असेल तर सदस्यं तसे होऊ शकता. त्याकरीता येथे खाली प्रतिक्रिया द्या किंवा व्य. नि. करावे.

धन्यवाद.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विकास's picture

23 May 2010 - 11:48 pm | विकास

उत्तम योजना! निखिल आणि विनायक यांना शुभेच्छा! काही सुचल्यास अवश्य कळवेन.

आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे. - नवनिर्माण समिती

इतिहासातील एका अध्यायाचे कारण या निमित्ताने, विरोधाभास म्हणून आठवले: इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू करायचे कारण हे "नवनिर्माण" आंदोलन होते. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विसोबा खेचर's picture

27 May 2010 - 11:07 am | विसोबा खेचर

उत्तम योजना!

हेच म्हणतो..

मनपासून शुभेच्छा...

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 May 2010 - 11:52 pm | बिपिन कार्यकर्ते

ही योजनापण आवडली.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

24 May 2010 - 11:55 pm | प्राजु

हेच म्हणते.. योजना आवडली.
निखिल आणि विनायक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मनिष's picture

25 May 2010 - 12:30 am | मनिष

अभिनंदन आणि शुभेच्छा!
बहुमताने नवीन प्रतिसाद आनि ५० ची मर्यादा ह्या गोष्टी बदलाव्या ही विनंती! :)

इनोबा आला म्हणजे साईटचा लुक लई भारी होणारच!!! धतड-तटड, धतड-तटड!!! :)

II विकास II's picture

28 May 2010 - 7:41 am | II विकास II

मीमराठी संकेतस्थळावर ह्याबद्दल पुष्कळ चर्चा झाली आहे.
ती माहीती उपयोगी पडु शकेल.
http://mimarathi.net/node/521

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

टारझन's picture

23 May 2010 - 11:53 pm | टारझन

आयला !! जबरा हो सरपंच ... ;) इणोबा म्हणे आणि णिखिल देषपांडे हे उत्तम कामं करतीलंच !! शिवाय "ड्युप्लिकेट आयडी" चा ओरिजिनल आय.डी. लोकांसमोर आणला जावा (जाण्याचे प्रयत्न व्हावेत) ह्या मागणीचाही विचार व्हावा ;)

- टारपंच

विकास's picture

23 May 2010 - 11:54 pm | विकास

शिवाय "ड्युप्लिकेट आयडी" चा ओरिजिनल आय.डी. लोकांसमोर आणला जावा (जाण्याचे प्रयत्न व्हावेत) ह्या मागणीचाही विचार व्हावा

पूर्ण सहमत!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

Nile's picture

23 May 2010 - 11:59 pm | Nile

डुप्लीकेट(ट्रबल मेकर्स) आयडींना उघडे करावे. जेणेकरुन कोणता आयडी प्रामाणिक आहे आणि नाही हे कळेल. डु. आयडी काढणार्‍यांना संपुर्णपणे दुर्लक्षित करता येईल.

-Nile

मी-सौरभ's picture

24 May 2010 - 12:51 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

llपुण्याचे पेशवेll's picture

24 May 2010 - 11:48 am | llपुण्याचे पेशवेll

आंतर जालावर डुप्लिकेट आयडी नसतील तर काय मजा?

(ओरीजिनल)पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

II विकास II's picture

28 May 2010 - 7:42 am | II विकास II

डुप्लीकेट आयडीवर सर्वसाधारणपणे संकेतस्थळचालक कारवाई करताना दिसत नाहीत, सुचक मौन ठेवण्यातच रस असतो. कदाचित त्यांनाही डु. आयडीच्यामुळे उडणारा धुरळा, होणारी संकेतस्थळाची प्रसिध्दी हे हवे असेल. कदाचित त्यांचे हितसंबध ही असतील त्या मध्ये.
पण नीलकांत थोडा वेगळा वाटतो. त्याने मिपा कारभारात पारदर्शीपणा आणण्याचा मनोद्यय बोलुन दाखवला आहे. श्वेता नावाचा आयडी डुप्लीकेट होता का? असेल तर कोणाचा होता, ह्याची माहीती मिपा प्रशासनाने जाहीर करावी, ही विनंती.

नंतर बाकीच्या डु. आयडी वर कारवाई करावी.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

प्रभो's picture

28 May 2010 - 8:00 am | प्रभो

>>नंतर बाकीच्या डु. आयडी वर कारवाई करावी.

ही सुचना का आदेश??

टारझन's picture

28 May 2010 - 8:02 am | टारझन

अबे ही तर आदेशवजा सुचना ... =))

Pain's picture

24 May 2010 - 6:59 am | Pain

पूर्ण सहमत!

मी-सौरभ's picture

23 May 2010 - 11:54 pm | मी-सौरभ

सरकारी समिती न होता चट्कन अहवाल आणि सुधारणा व्हाव्यात ह्या शुभेच्छा...

-----
सौरभ :)

गुंडोपंत's picture

24 May 2010 - 12:00 am | गुंडोपंत

अरे वा! हे आवडले.

१. रंगसंगती आणि चित्रे दिसू द्यावीत की नाही, याचे कंट्रोल्स सदस्यालाच द्यावेत. (जसे याहू मध्ये रंग संगती निव्डता येते)

२. फक्त टेक्स्ट बेस साईटही उपलबध करून द्यावी.

या दोन विनंत्या आहेत.

आपला
गुंडोपंत

आवशीचो घोव्'s picture

24 May 2010 - 12:24 am | आवशीचो घोव्

मिपाचे search engine शोध व्यवस्थित घेत नाही असे वाटते.
मला "आदाब अर्ज है" हा धागा शोधावयाचा होता. त्यासाठी मी "आदाब" हा शब्द शोधला असता ५९ पाने results आले. ५९ x १० = ५९० results??

२०व्या पानानंतर मी धागा शोधणे सोडून दिले. :(

SQL Full Text Search वापरल्यास कदाचित असे होणार नाही.

धन्यवाद
मालवणी मिपावाचक

संदीप चित्रे's picture

24 May 2010 - 7:00 am | संदीप चित्रे

तेवढं लवकर सुधारा हो !

अस्मी's picture

24 May 2010 - 10:24 am | अस्मी

सहमत आहे....सर्च नीट येत नाही :(

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

मुक्तसुनीत's picture

24 May 2010 - 1:31 am | मुक्तसुनीत

माझी अशी विनंती आहे की , तुम्ही http://www.anothersubcontinent.com/forums/ या साईटवर जा. तुमचा जास्त वेळ फुकट दवडावा अशी माझी इच्छा नाही ; पण इथला लेआउट एकदा पहा. मला स्वतःला हा लेआउट फारच सोयीचा वाटला.

काही "फिचर्स" जी मिपा मधे आता आहेत , जी आपण घालवता कामा नयेत :
ताजा धागा/ताजी प्रतिक्रिया नेहमी टॉप वर असणे. : anothersubcontinent.com नेमके हेच होते. पण वर्गवारी-निहाय ! त्यामुळे मिपावर जी गोंधळसदृष परिस्थिती आहे ती इथे भासत नाही.

anothersubcontinent.com combines 2 great features :

1. The classification of posts.
2. Making sure newly updated posts remains at the top !

The first feature makes it "clean". The second feature makes it attractive. The user ALWAYS feels what he is writing is visible , and thus can be relevent.

याचबरोबर प्रत्येक विभागाचे मॉडरेटर्स निराळे आहेत. त्यामुळे जबाबदार्‍यांचे विभाजनही सहज होते.

धन्यवाद.

आवशीचो घोव्'s picture

24 May 2010 - 10:06 am | आवशीचो घोव्

http://www.anothersubcontinent.com/forums/ या site वर forum साठी वापरले जाणारे अतिशय लोकप्रिय phpBB हे software वापरण्यात आले आहे. खास forum करीता वापरता येण्याजोग्या भरपूर सुविधा या software मधे उपलब्ध आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे Free Software आहे. (Free म्हणजे फुकट नव्हे, Free म्हणजे मुक्त http://www.gnu.org/philosophy/free-sw.html) त्यामुळे phpBB च्या वर दिलेल्या website वरून हे सहज
download करता येऊ शकते आणि कोणतीही license key न वापरता install करता येऊ शकते. त्याचप्रमाणे हे software PHP मधे लिहीले असल्याकारणाने आंतरजालावर त्याबद्दल प्रचंड मदत उपलब्ध आहे आणि customization साठीही भरपूर वाव आहे.

१. कॉमेंट्स फोल्डिंग अनफोल्डिंग ची सोय असावी. म्हणजे एखाद्या कॉमेंट च्या टाइटल वॉर क्लिक केल्यावर, त्याची बॉडी हाइड व्हावी, परत क्लिक केल्यावर ती बॉडी परत दिसावी. यामुळे दोन गोष्टी करता येतील. एक तर नवीन कॉमेन्ट्स आल्यावर, मी धागा उघडल्यास, मला फक्त नवीन कॉमेन्ट्स अनफोल्डेड दिसतील की ज्यामुळे मला सर्व कॉमेन्ट्स वाचून कुठल्या नवीन ते ठरवावे लागणार नाही. दुसरे असे की एखाद्या धग्यावर जास्त कॉमेन्ट्स झाल्या तरी त्यांना दुसर्या पानावर टाकायची गरज नाही.
२. लेख आणि कॉमेन्ट्स या दोघांसाठी वेगवेगळे आर एस एस फीड्स सुरू करावेत.
३. प्रत्येक यूज़र आइडी क्रियेट करायला ईमेल ची गरज असु दयवाई. यामुळे ड्यूप्लिकेट आइडी तयार करणे थोडेसे कठीण होईल आणि भविष्यातील स्पामिंग अटॅक्स ला अटकाव होईल.
४. प्रत्येक कॉमेंट आणि लेखाला, एक अप आणि एक डाउन आरो असावा. यूज़र नि अप आरो दाबल्यास त्या लेखाला किंवा त्या कॉमेंट ला काही ज्यास्त पॉइण्ट्स देता येतील आणि जर का डाउन आरो दाबला, तर त्या लेखातून किंवा त्या कॉमेंट मधून काही पॉइण्ट्स सबट्रॅक्ट करता येतील. किती पॉइण्ट्स वाढवायचे किंवा सबट्रॅक्ट करायचे ते ज्या यूज़र नि तो आरो दाबला त्याचे टोटल पॉइण्ट्स किती आहेत त्यावरून ठरवता येईल. या गोष्टी मुळे बरेच काही साध्य करता येईल. एक म्हणजे एखादी कॉमेंट किंवा लेख एका पर्टिक्युलर थ्रेशोल्ड (जसे की शून्या) च्या खाली गेल्यास तिला वेगळा रांग देऊन हे दाखवता येईल की ती बर्‍याच लोकांना पसंत नाहीए. लेख शून्याच्या खाली गेल्यास ते ऑटोमॅटिकली डेड म्हणून घोषित करता येईल ज्यानी की त्यावर कोणी कॉमेंट्स पोस्ट करू शकणार नाही. कॉमेंट्स वॅल्यू कमी झालयवर तिला धाग्याच्या तळाशी धकाल्ता येईल आणि वॅल्यू वाढल्यास तिला सुरुवातीला आणता येईल. यानी धागा उघडल्या उघडल्य चांगल्या कॉमेंट्स सुरुवातील वाचता येतील. शिवाय कॉमेंट्स सिस्टम मुळे संपादकांचे बरेचसे काम वचेल. अजुन एक म्हणजे कुठले लेख सर्वात पॉप्युलर आहेत तेही कळेल ज्यानी की नवीन येणारे सदसया ते लेख वाचू शकतील. प्रत्येक यूज़र्स ला पॉइण्ट दिलयवर पॉप्युलर सदस्य कोण आहेत तेही कळेल.

Pain's picture

24 May 2010 - 7:43 am | Pain

क्र.४ म्हणजे रटाळ लिहिणार्यांच्या* वर्मी घाव आहे. मला नाही वाटत मान्य होइल!

llपुण्याचे पेशवेll's picture

24 May 2010 - 11:51 am | llपुण्याचे पेशवेll

अन्यत्र एका साईटवर "चुकीचे टाचण द्या" अशी सुविधा दिलेली पाहीली होती. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

प्रभो's picture

24 May 2010 - 3:30 am | प्रभो

समितीला शुभेच्छा!!!

दिपक's picture

24 May 2010 - 10:37 am | दिपक

शुभेच्छा !!

धनंजय's picture

24 May 2010 - 5:52 am | धनंजय

समितीला मनापासून शुभेच्छा.

Pain's picture

24 May 2010 - 6:58 am | Pain

मदत असा धागा सुरु करुन त्यावर लक्ष ठेवणार का ?
सध्या वाविप्रमध्ये विचारलेल्या प्रश्नांना कोणीच वाली नाहीये.

नीलकांत's picture

24 May 2010 - 9:06 am | नीलकांत

या समितीने अहवाल लवकरात लवकर द्यावा ही अपेक्षा आहे. :)

- नीलकांत

म्हणजे नेमका किती महिन्यात?
समितीचे सदस्याचे देखिल अभिनंदन <:P

वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 9:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नवीन बदलाचे स्वागत! नेहेमीप्रमाणे निखिल आणि इनोबा यांना त्रास देईनच.

अदिती

आनंदयात्री's picture

24 May 2010 - 11:00 am | आनंदयात्री

समितीला शुभेच्छा.
इथे या धाग्यावर असणार्‍या सुचवण्या अक्षरशः एक्सलंट आहेत .. समितीने त्याचा नक्की विचार करावा ही विनंती !

विनायक पाचलग's picture

24 May 2010 - 11:15 am | विनायक पाचलग

मनापासुन शुभेच्छा !!
एक सुचवावेसे वाटते
एखाद्याच्या खात्यात गेल्यानंतर त्याने लिहिलेले लेख बघायची सोय असावी..
वाटचाल आहे ,पण त्यात कॉमेंट आणि लेख असे दोन्ही दिसते..त्यामुळे फक्त लेख वाचणे अवघड होऊन जाते..
बाकी वरील सर्व मुद्द्यांशी सहमत..

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

छोटा डॉन's picture

24 May 2010 - 11:18 am | छोटा डॉन

>>एखाद्याच्या खात्यात गेल्यानंतर त्याने लिहिलेले लेख बघायची सोय असावी..
हे असे पाहतात.

उदा :
http://www.misalpav.com/tracker/2815/2815

कळावे.
धन्यवाद !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

विनायक पाचलग's picture

24 May 2010 - 2:41 pm | विनायक पाचलग

ती सिस्टीम माहित आहे
पण खात्यात दिले तर ते जास्त सोपे जाईल म्हणून लिहिले बाकी काही नाही...

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

छोटा डॉन's picture

24 May 2010 - 2:46 pm | छोटा डॉन

ठिक आहे.
बाकी पाचलगांच्या सुचनेची संबंधितांनी नोंद घ्यावी ही विनंती.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

छोटा डॉन's picture

24 May 2010 - 11:16 am | छोटा डॉन

सदर समितीस शुभेच्छा आणि समितीच्या सदस्यांचे व व्यवस्थापनाचेही अभिनंदन !
लवकरात लवकर अहवाल येऊन काही विधायक बदल घडावेत असे वाटते.

जाता जाता :
मिपावर खास "संपादकांचे पान" हे केवळ 'संपादक' हे अधिकार असणार्‍या व्यक्तींना अ‍ॅक्सेस असणारे पान असावे असे वाटते.
अनेक चर्चा किंवा एखाद्या महत्वाच्या बाबींवर घ्यावयाचे महत्वाचे निर्णय ह्यासाठी सदर 'फोरम' चा उपयोग होऊ शकेल असे वाटते.
शिवाय काही नव्या संकल्पना तसेच एखादी नवी सुविधा सादर करण्यापुर्वी संपादकांमध्ये इथे चर्चा होऊ शकते असे वाटते.

कॄपया सदर मुद्द्याचा विचार व्हावा अशी समितीस विनंती !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

इनोबा म्हणे's picture

24 May 2010 - 11:25 am | इनोबा म्हणे

सर्व प्रतिक्रीयांबद्दल आभारी आहे.
या सुचवण्यांवर निखिल आणि मी चर्चा करत आहोत. लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करु.

पुनश्च धन्यवाद!

भारद्वाज's picture

24 May 2010 - 12:46 pm | भारद्वाज

लेखाला आलेल्या नवीन प्रतिसादांवर टिचकवल्यावर, नवीन प्रतिसाद जर दुसर्‍या पानावर गेले असतील तरी पहिलेच पान उघडते. तरी यात योग्य तो बदल करावा असे सुचवावेसे वाटते.
नवनिर्माण समितीला शुभेच्छा.

गणपा's picture

24 May 2010 - 1:13 pm | गणपा

एका पानावर असणार्‍या ५० प्रतिसादांची मर्यादा वाढवुन द्यावी किंवा जर नवीन प्रतिसाद दुसर्‍या पानावर ढकलले गेलेच तर निदान ते नवीन प्रतिसाद ओळखण्याची खुण असावी.
सध्या दुसर्‍या पानावर गेलेल्या प्रतिसादातुन नवीन आणि जुने प्रतिसाद ओळखणे कठीण जाते.

पुर्वपरिक्षणा सोबतच प्रकाशित करण्याच बटण उपलब्ध असाव.
सध्या पुर्वपरिक्षण करावेच लागते. त्यात वेळ जातो.
ज्यांना पुर्वपरिक्षण करायचे त्यांनी ते करावे बाकिच्यांना जबदस्ती नसावी असे वाटते.

बाकी जस आठवेल तस सांगत जाउच.

वेताळ's picture

24 May 2010 - 1:40 pm | वेताळ

गणपा शेठशी सहमत आहे.
वेताळ

आवशीचो घोव्'s picture

24 May 2010 - 2:53 pm | आवशीचो घोव्

पुर्वपरिक्षणा सोबतच प्रकाशित करण्याच बटण उपलब्ध असाव.
सध्या पुर्वपरिक्षण करावेच लागते. त्यात वेळ जातो.
ज्यांना पुर्वपरिक्षण करायचे त्यांनी ते करावे बाकिच्यांना जबदस्ती नसावी असे वाटते.

असेच म्हणतो

मुक्तसुनीत's picture

24 May 2010 - 3:58 pm | मुक्तसुनीत

कृपया ती एका पानाची ५० ची मर्यादा वाढवावी :-)

टुकुल's picture

24 May 2010 - 5:56 pm | टुकुल

>>कृपया ती एका पानाची ५० ची मर्यादा वाढवावी
हेच म्हणतो, त्या व्यतिरिक्त जेव्हां धागा ५० प्रतिसाद च्या वर जातो, तेंव्हा नवीन प्रतिसाद शोधता येत नाही त्या साठी काही करता येत असेल तर चांगल.
कोडींगसाठी काही मदत लागल्यास जरुर कळवा :-)

--टुकुल

दत्ता काळे's picture

24 May 2010 - 2:16 pm | दत्ता काळे

समितीला शुभेच्छा.

चित्रा's picture

24 May 2010 - 5:49 pm | चित्रा

वरचे सगळे प्रतिसाद बघून समितीचा अहवाल किती पानी असणार आहे याची जरा काळजीच वाटली ;)

समितीचे अभिनंदन, आणि शुभेच्छा. याची गरज होतीच.

टारझन's picture

24 May 2010 - 5:55 pm | टारझन

देवा ला का आवाज दिला ? देवा सद्ध्या टँप्लिस घेऊन बसलेत ना ? :)

- (जिद्दी मधला देवा) गण्णी देओल

ऋषिकेश's picture

24 May 2010 - 7:22 pm | ऋषिकेश

इनोबा व निखीलला मनापासून शुभेच्छा!
एकच मागणी की रंगसंगती ऑफीसात मिपा उघडता येईल अशी करा ;) फार डोळ्यात भरतं मिपा आजूबाजूच्यांच्या.. :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

भाग्यश्री's picture

24 May 2010 - 9:16 pm | भाग्यश्री

सहमत!
मी ऑफिसला जात नाही, तरीही रंगसंगती थोडी भडक वाटते. त्याचा जरूर विचार व्हावा.

छोटा डॉन's picture

24 May 2010 - 9:27 pm | छोटा डॉन

रंगसंगती थोडी लाईट केली तर आमची हरकत नाही.
पण मिपाच्या ज्या जमेच्या बाजु आहेत त्या ह्यात हरवुन जाऊ नये असे वाटते, कॄपया तशी काळजी घ्यावी.

उदा :
१. नव्या थीममध्येही ’माऊली आणि तुकोबांचे’ स्थान अबाधित असावे.
२. मिसळीचा फ़ोटो असावाच ही आग्रहाची मागणी.
( आम्ही आत्तापर्यंत हापिसात "काही नाही हो, मराठी रेशिप्यांची साईट आहे" म्हणुन वेळ मारुन न्हेली आहे. उगाच त्याला धक्का लाऊ नका ;) )

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 9:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपापल्या चॉईस किंवा लोकेशनप्रमाणे थीम निवडता आली तर बरं होईल ... ऋ आणि छो.डॉ. दोघांनाही प्रॉब्लेम नाही कसं!

(सरकारी पडीक) अदिती

ऋषिकेश's picture

24 May 2010 - 11:35 pm | ऋषिकेश

असं काहि करता येत असेल तर क्या बात है!
बाकी ग्याबना-तुकारामाचे फोटु मात्र हवेतच या डॉनच्या मताशी सहमत :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

टारझन's picture

24 May 2010 - 11:54 pm | टारझन

ण्याणबा तुकारामांच्या जयघोषात बाकी संत दुर्लक्षित झालेले आहे. बाकीचे संत देखील शफल करुन रिपीट होत रहावेत ;)

- (संत तुकडोजी महाराजांचा भक्त) टारझन
सुचना करायला आमचं काही जात नाही , आम्ही सुचनांची माळ पेटवतो!

भाग्यश्री's picture

25 May 2010 - 12:01 am | भाग्यश्री

अरे डॉन..सॉरी, अहो संपादक रंगसंगतीच बदला म्हणतीय. ते संतांचे व मिसळीचे फोटो तर पाहीजेतच ! :)

टारझन's picture

25 May 2010 - 12:05 am | टारझन

ते संतांचे व मिसळीचे फोटो तर पाहीजेतच !

हा हा हा ... आहो मिसळपाव.कॉम वर मिसळीचा फोटु अषणारंच ना ? पिझ्झा बर्गर किंवा इतर काही लावणे म्हणजे मेलेडी चॉक्लेट रॅपर मधे माला-डी ची गोळी निघण्यासारखे =))

- टाराज ठाकरे
मिसळपाव नवनिर्माण सेना

भाग्यश्री's picture

25 May 2010 - 12:18 am | भाग्यश्री

तू बळंच काय काहीतरी लिहीतोस रे??मी म्हटलंय का पिझ्झा बर्गरचा फोटो लावा.. (त्यामुळे तुझा हा पीजे वाया गेलाय इथे! :) )
छोटा डॉनला वाटले की रंगसंगती बदलताना हे बदल होऊ नयेत, आणि ते मला उपप्रतिसाद असल्याने, मला असे बदल नको आहेत हे सांगणे गरजेचे होते.. कळ्ळं ना?

Pain's picture

25 May 2010 - 12:44 am | Pain

आम्ही आत्तापर्यंत हापिसात "काही नाही हो, मराठी रेशिप्यांची साईट आहे" म्हणुन वेळ मारुन न्हेली आहे.

:)) =))

आवशीचो घोव्'s picture

27 May 2010 - 11:38 pm | आवशीचो घोव्

"लिहिण्याची पद्धत" निवडण्याचा radiobox जर प्रतिक्रीया editor च्या बाजुलाच दिला तर फार बरे होईल.

भारद्वाज's picture

28 May 2010 - 2:57 pm | भारद्वाज

दुसर्‍या पानावर गेलेल्या नवीन प्रतिसादांवर 'नवीन' असल्याची खूण अजूनही येत नाही.
जय महाराष्ट्र