श्री राम गणेश गडकरी ह्यांनी कठीण कठीण कठीण किती लिहून पुरुषजातीवर अन्याय करून ठेवला. पण पुरुषांनी त्याला उत्तर देऊन बायकांवर सूड उगवल्याचे (निदान माझ्या तरी) वाचण्यात नाही.
म्हणून आज मीच धाडस करायचे ठरवले.
ईश्वर मला ह्यातून निर्माण होणारी वादळे सहन करण्याची शक्ती देवो.
जटील जटील जटील किती
महिला ह्रदय राही
जटील जटील जटील किती
महिला ह्रदय राही
पुरुषांच्या प्रति ह्यांचे, पुरुषांच्या प्रति ह्यांचे
डाव कळत नाही
जटील जटील जटील किती
लपवुनीया मूळ विषय
क्रोध दाविती,
रडत रडत फ़सवुनी
विजय मिळविती
जटील जटील जटील किती
पडुनियाही नाक वरती
सतत ठेवती
चुकी ह्यांची, परी नवरे
माफ़ी मागती
जटील जटील जटील किती
गप्पांचा गोलगोल
गुंता गुंफ़ती
कुठे सुरू कुठे जाती
कुटत कुटत गोष्टी
जटील जटील जटील किती
माहेरचे सर्व गुणी
तोरा मिरविती
सासरची उणीदुणी
ह्र्दभेद दाविती
कुटील कुटील कुटील किती
सॉरी, जटील जटील जटील किती
महिला ह्रदय राही
जटील जटील जटील किती
महिला ह्रदय राही
पुरुषांच्या प्रति ह्यांचे, पुरुषांच्या प्रति ह्यांचे
डाव कळत नाही
जटील जटील जटील किती
प्रतिक्रिया
8 May 2010 - 8:23 pm | टारझन
श्री अरुण मनोहर ह्यांनी जटील जटील जटील किती लिहून भाभड्या स्त्री-पुरुषजातीवर अन्याय करून ठेवला. पण भल्या स्त्री-पुरुषांनी त्याला कटकारस्थानानेच उत्तर देऊन बायकांवर सूड उगवल्याचे (निदान माझ्या तरी) कोणत्याही सांस-बहु सिरीयल मधे पाहाण्यात नाही. ते येड** आपला मुकाट्याने सहन करत बसतात.
म्हणून आज मीच धाडस करायचे ठरवले.
ईश्वर मला ह्यातून निर्माण होणारी 'हिमवादळे' सहण करण्याची शक्ती देवो.
कुटील कुटील कुटील किती
महिला ह्रदय राही
कुटील कुटील कुटील किती
महिला ह्रदय राही
पुरुषांच्या प्रति ह्यांचे, स्त्रीयांच्या प्रति ह्यांचे
डाव कळत नाही
कुटील कुटील कुटील किती
लपवुनीया मूळ विषय
क्रोध दाविती,
रडत रडत फ़सवुनी
विजय मिळविती
कुटील कुटील कुटील किती
पडुनियाही नाक वरती
सतत ठेवती
चुकी ह्यांची, परी दुसरे
माफ़ी मागती
कुटील कुटील कुटील किती
किट्टी पार्ट्यांचा
डाव मांती
कुठे सुरू कुठे जाती
कुटत कुटत गोष्टी
जटील जटील जटील किती
माहेरचे सर्व गुणी
तोरा मिरविती
सासरची उणीदुणी
ह्र्दभेद दाविती
कुटील कुटील कुटील किती
हो हो बरोबर, कुटील कुटील कुटील किती
महिला ह्रदय राही
कुटील कुटील कुटील किती
महिला ह्रदय राही
पुरुषांच्या प्रति ह्यांचे, स्त्रीयांच्या प्रति ह्यांचे
डाव कळत नाही
कुटील कुटील कुटील किती
णाँद : सांस-बहु सिरीयल मधल्या वँप्स ला समर्पीत ;)
- काव्यात चेंजसुचवी
9 May 2010 - 8:06 am | स्पंदना
प्रत्यक्षात ऐकायला किती मजा येइल हे अरुण जिन्च काव्य!
शब्द अगदी चपखल बसलेत जणु ओरिजिनल!!
8}
टा. भाउ तुमच विडम्बनाच विडम्बन एक स्वतन्त्र काव्य होउ शकल असत बा!
नाहि काय होत वरच वाचुन आम्हा स्त्रियाना हसु कि रडु हे सुचायच्या आधीच हे समोर बघुन गोन्धळायला होइल ना?
:''(
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.