"वेलकम टू एलीट क्लब...." पलिकडून उदगारले गेलेले हे चारच शब्द माझ्या हाता पायाला थरथर सुटण्यासाठी पुरेसे होते.....
रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. मी आणी 'एलिट मेंबर' ?? मी स्वप्नात तर नाही ना ? अनेक मोठे मोठे हॅकर्स ज्या ग्रुपशी कुठे न कुठे खोटे नाव तरी जोडले जावे म्हणुन तडफडत असतात, नाना युक्त्या लढवत असतात, त्या एलिट ग्रुप कडून मला बोलावणे आले आहे ? का ? कशासाठी ?? असा काय पराक्रम गाजवला आहे मी ? ह्या सगळ्यामागे शफीचा तर हात नाही ?? पण एलिट ग्रुपशी शफीचे नाव कधीच जोडले गेले न्हवते, इन्फॅक्ट एलिट ग्रुप मध्ये एशियामधला मेंबर सहसा सामील केला जात नाही अशीच वदंता होती.
हा एलिट ग्रुप म्हणजे नक्की काय प्रकरण तरी काय आहे ? हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ?? एलिट ग्रुप म्हणजे साधारण ९४/९५ साली त्या काळच्या ५ मोठ्या हॅकर्सनी उभी केलेली संघटना. सॉफ्टवेअर क्रॅकिंग, वेबसाईट / सर्वर हॅकींग, इल्लिगल मनी ट्रान्सफर, डाटा थेफ्ट अशी कामे करणारी हि संघटना होती. 'केव्हिन, ब्रुस, वॉल्टर, डायना आणी सॅबी' हे ते पाच संस्थापक मास्टर्स. ह्यातील केव्हिन आणी सॅबी रहस्यमयरीत्या लंडनच्या 'प्रिन्स पॅलॅस' मध्ये मृतावस्थेत सापडले. तर डायना आश्चर्यकारकरीत्या गायब झाली. हे सर्व घडले साधारण २००२ च्या मध्यात. सध्या वॉल्टर आणी ब्रुस हे संघटना चालवतात असे मानले जाते.
ह्या सर्व रहस्यमय घटना घडल्यानंतर 'एफ बी आय' ने दिलेल्या माहिती नुसार 'एलिट ग्रुप' ने 'मार्क-रॉबिन्स ग्रुप' ह्या प्रसिद्ध ऑइल कंपनीच्या खात्यातुन ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस हॅक करुन तब्बल ४ मिलियन डॉलर्स लंपास केले होते. ह्या सगळ्या घडामोडींनंतर ब्रुस आणी वॉल्टरला तपासासाठी ताब्यात देखील घेण्यात आले, पण त्यातुन काहीच निष्पन्न होउ शकले नाही. खरे तर पोलीस 'एलिट ग्रुप' अस्तित्वात आहे हे देखील सिद्ध करु शकले नाहीत. अखेर दोघांनाही सोडून द्यावे लागले. त्यानंतर जवळ जवळ २ वर्षे 'एलिट ग्रुप'चे अस्तित्वच जणु नष्ट झाले होते. पण अचानक २००५ साली 'मार्क-रॉबिन्स'च्या जनरल मॅनेजरने निवृत्तीनंतर लिहिलेल्या पुस्तकात त्या काळच्या ऑनलाईन बॅंकींग व्यवस्थेवर केलेली टिका आणी ४ मिलियन डॉलर रहस्यमयरीत्या खात्यातुन गायब झाल्याची दिलेली कबुली ह्यामुळे 'एलिट ग्रुप' पुन्हा चर्चेत आला. त्याचवेळी ह्या पुस्तकासंदर्भात आपले मत व्यक्त करताना त्या वेळचे तपास अधिकारी असलेले 'थॉमस बार्क' ह्यांनी 'एलिट ग्रुप'नेच हे कृत्य केल्याचा व ह्या चोरी नंतर एलिट ग्रुप मध्ये फुट पडल्याचा संशय पुन्हा एकदा व्यक्त केला.
ह्या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणा अथवा डिचवले गेल्याने म्हणा २००५ संपत असतानाच ३१ डीसेंबरला रात्री १२ वाजता 'एलिट व्हायरसने' संपुर्ण युरोपात आणी थोड्या प्रमाणात एशियात थैमान घातले. पुन्हा एकदा 'एलिट पर्वा'ला सुरुवात झाली होती....
रात्री फोनवर झालेल्या संभाषणानुसार 'रविंद्र सन्याल' असे एखाद्या गवय्याचे अथवा वादकाचे नाव वाटणारा माणूस मला 'एलिट एशिया'चा प्रतिनिधी म्हणुन भेटणार होता. मी सकाळपासून शफीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो पण यश येत न्हवते. शेवटी अगदी आणीबाणी साठी म्हणुन शफीने मला दिलेला मोबाईल नंबर मी डायल केला. हा नंबर पेशावरच्या मध्यवर्ती भागात राहणार्या कोणा 'सज्जाद लक्कडवाला' ह्या गॅरेजवाल्याचा निघाला, त्यानी मला भारतातला एक नंबर देउन तिथे चौकशी करण्यासा सांगीतले. ह्या वेळी मिळालेला नंबर दिल्लीच्या साऊथ पार्क मधला निघाला, स्वत: शफीच्या बहिणीने तो उचलला. हि शफीची बहिण लहानपणीच त्याच्या मामाकडे दत्तक आलेली होती, तीच्याकडूनच मला शफी सध्या कुठल्याश्या चौकशीसाठी 'सि आय ए' च्या ताब्यात असल्याचे कळाले आणी माझ्या पाया खालची जमीनच हादरली.
शफीला अटक ? का ? कोणत्या गुन्ह्याखाली ? कसली चौकशी करतायत त्याच्याकडे ? माझ्या महितीप्रमाणे तरी शफी सध्या एक अत्यंत सभ्य असे नागरी जीवन जगत होता, मग हे असे अचानक घडले तरी काय ? अशा आणीबाणीच्या वेळी मी आता सल्ला कुणाचा घेऊ ? मुख्य म्हणजे शफीच्या अटकेशी माझा संबध तर जोडला जाणार नाही ना ??
प्रश्न प्रश्न प्रश्न... प्रश्नांचे एक मोठे भेंडोळे आणी थोडेसे भितीचे सावट मनावर घेउन मी ठरलेल्या ठिकाणी पोचलो. 'संन्याल बाबु' हार्डली ३५/३६ चा असेल, भेटताच क्षणी त्याच्या व्यक्तीमत्वाने मी भारावुन गेलो. अतिशय गोड आवाजातले हिंदी, अध्ये मध्ये इंग्रजी शब्दांची पेरणी आणी विशिष्ठ शब्दांवर जोर देण्याची पद्धत मला चांगलीच भुरळ पाडत होती. हवा-पाणी, शिक्षण अशी वळणे घेत घेत गाडी एकदाची एलिट ग्रुप पर्यंत पोचली. ह्यापुढचे संभाषण आम्ही भेटत असलेल्या हॉटेलच्या एका राखीव खोलीत करु असे संन्यालने सुचवले. मी लगेच होकार भरला.
२/२ पेग झाल्यानंतर संन्याल थोडासा खुलला, आता मी ही बर्यापैकी रिलॅक्स झालो होतो. संन्यालने एक मोठा घोट घेऊन बोलायला सुरुवात केली....
"एलिट ग्रुप बद्दल अनेक अफवा उठल्या आणी उठत राहतील. पण एलिट नक्की काय करतात हे कुणालाच माहित नाही. एलिटची कार्यपद्धती, एलिटसाठी काम करणारी माणसे हे जगासाठी एक गुढच आहे. कित्येकदा आपण एलिटसाठी काम करतोय, किंवा एलिटसाठी काम करुन चुकलोय हे देखिल कित्येकांना माहित नसते. यु आर लकी मि. पॅपीलॉन, तुम्हाला स्वत: एलिटने आमंत्रण दिले आहे."
मी आता बर्यापैकी सावरलो होतो. "एलिटला माझी का आणी कशासाठी गरज आहे ? आणी मीच का??"
"शफी" संन्यालने एकाच शब्दात हसून उत्तर दिले.
"शफीचा काय संबंध ?? आणी मुख्य म्हणजे तुम्हाला माझ्याकडून करवुन काय घ्यायचे आहे??" मी विचारले.
"वेल, मला सगळेच माहित असण्या येवढ्या मोठ्या पदावर मी नाही. पण नुकतेच एलिटला एक खुप मोठे आणी धाडसी काम मिळाले आहे, आणी त्यासाठी नविन भरतीची आवश्यकता आहे. भवतेक त्याचा आणी तुझा संबंध असु शकतो." संन्याल संथ स्वरात म्हणाला.
"काम रिस्की आहे ??" मी विचारले.
" यु आर गोईंग टू वर्क अगेंस्ट यु एस गव्हर्नमेंट" संन्याल खिदळला. "कदाचीत कामाची पुर्ण माहिती व्हायच्या आधी देखील मारला जाऊ शकशील."
"आणी मी नकार दिला तर??"
"पॅपीलॉन, तु मला आवडलास. तुला बघुन मला राहुन राहुन माझ्या लहान भावाची आठवण येत आहे म्हणुन सांगतोय, नकार द्यायचा मुर्खपणा करु नकोस ! आजवर मी एलिट ग्रुपच्या काही खाजगी कामांसाठी म्हणुन फक्त भारतात आलो आहे. ज्या ज्या वेळी मी भारतात आलो त्या त्या वेळी मी फक्त मिनिस्टर अथवा त्या पातळीवरच्या माणसांच्या भेटी घेणे आणी त्यांना हवे तसे वाकवणे हिच कामे केली आहेत. तुझ्या लक्षात येतय पॅपीलॉन ?? माझ्यासारखा माणूस एलिट जेंव्हा तुझ्याकडे पाठवतात तेंव्हा तुझे महत्व नक्कीच फार मोठे असणार आणी कुठल्याही परिस्थीतीत, आय रिपीट.. कुठल्याही परिस्थीतीत तु एलिट ग्रुपला हवा आहेस."
"पण माझ्यात येवढे काय आहे??" आणी शफीचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे?? मी वैतागुन विचारले.
"हि तुझी परवाची बोस्टनची तिकिटस. कॅथ्रीन नावाची मुलगी तुला एयरपोर्टला जॉइन होईल, पुढच्या सुचना ती देईलच." संन्याल जणु माझा प्रश्न न ऐकल्याच्या थाटात बोलला.
"मला जमणार नाही !!" मी ओरडलो.
"संध्याकाळी ७ ला फ्लाईट आहे, साधारण ६ पर्यंत विमानतळावर पोहोच" संन्याल.
"तुला ऐकायला येत नाही का? मला जमणार नाही !!"
"हरकत नाही, मग संध्याकाळी ८ ला येउन वडलांचे प्रेत नदी किनार्यावरुन घेउन जा मि. पॅपीलॉन"........
"यु बास्टर्ड...." मी चित्कारलो.
"आय टोल्ड यु... तु आम्हाला हवा आहेस ! कोणत्याही परिस्थीतीत."
दोनच दिवसात माझ्या विमानाने बोस्टनच्या दिशेने उड्डाण केले आणी मी एका नव्या आयुष्याच्या दिशेने......
(क्रमश:)
(कथा पुर्णतः काल्पनीक)
प्रतिक्रिया
24 Mar 2010 - 2:35 pm | बिपिन कार्यकर्ते
आयच्चा घ्घो!!!! परा... खूपच भारी रे भौ... वाचताना काटा आला अंगावर...
बिपिन कार्यकर्ते
24 Mar 2010 - 2:38 pm | नील_गंधार
दर्जा लिहिलय.
कथेचा वेग मस्तच.
एकदम ४-५ भाग टाकाना भाऊ.
नील.
24 Mar 2010 - 2:54 pm | मेघवेडा
पराभौ वाट पहायला लावली या भागासाठी पण इट वॉज वर्थ द वेट देन!!
थरारक!! रोमांचकारी!! एकदम दर्जा लिखाण है भै.. वरचा क्लास!!!
सव्यसाचि नावाचा अर्थबोध हो नाहिये अजून .. पण हरकत नाही!! मजा येतेय वाचायला!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
24 Mar 2010 - 5:33 pm | युयुत्सु
सव्यसाची
सव्येन अपि सचते इति - म्हणजे डाव्या हाताने धनुष्याला बाण लावू शकतो
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
24 Mar 2010 - 5:50 pm | मेघवेडा
अरे व्वा!! आता तर समासाची फोडही मिळाली!! धन्यवाद युयुत्सुजी!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
24 Mar 2010 - 2:58 pm | Dhananjay Borgaonkar
परा लेका नाद लावला आहेस या कथेचा.
लवकरात लवकर पुढचा भाग येउदे.
24 Mar 2010 - 3:03 pm | झकासराव
च्यामारी!!!!!!!!
कसली वळणदार कथा आहे ही...
24 Mar 2010 - 3:10 pm | विशाल कुलकर्णी
कुठे कुठे घेवून जाणारेस बाबा? लवकर जरा.....
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
24 Mar 2010 - 4:11 pm | मदनबाण
छान लिहतोयस... :)
सव्यसाचि नावाचा अर्थबोध हो नाहिये अजून ..
दोन्ही हाताचा उपयोग त्याच कुशलतेने करणारा (युद्धात... इ.)
बहुधा अर्जुनाच्या अनेक नावांपैकी हे एक नाव होते.
मदनबाण.....
अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ?
http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/artic...
24 Mar 2010 - 4:46 pm | मेघवेडा
दोन्ही हाताचा उपयोग त्याच कुशलतेने करणारा (युद्धात... इ.)
ज्ञानात भर पडली! :) अर्जुनाचं नाव आहे हे ठाऊक होतं.. पण अर्थ माहिती नव्हता! मला वाटलं असच आपलं एक नाव आहे अर्जुनाचं!!
आणि 'सव्यसाचि' नावाचा कथेच्या अनुषंगाने अर्थबोध होत नाहीये असं म्हटलं होतं मी.. वास्तविक, मला अजूनही कळलेलं नाही!!
अवांतरः 'सव्यसाचि' शब्दाचा इंग्रजी अनुवाद ambidextrous होतो ना.. मग आपल्या सच्च्या ला सव्यसाचि आणि तदनुसार 'आज का अर्जुन' म्हणावे काय?? :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
24 Mar 2010 - 4:25 pm | चतुरंग
एकदम ग्रिपिंग!!
(बाँडेड)चतुरंग
24 Mar 2010 - 6:37 pm | स्वाती दिनेश
एकदम ग्रिपिंग!!
माय नेम इज परा, जेम्स परा...
अगदी अगदी...
परा लवकर टाक रे पुढचा भाग, इथे उत्सुकता आता ताणून तुटायच्या बेतात आली आहे.
स्वाती
24 Mar 2010 - 7:13 pm | रेवती
हा भाग अगदी वेगवान!
पुढचा भाग लवकर टाक रे!
इथं टांगून टांगून आमचा चक्का व्हायची वेळ आलिये!
रेवती
24 Mar 2010 - 7:38 pm | प्राजु
अरे किती उत्सुकता ताणतो आहेस?
लवकर लिहीना पुढचे भाग.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
24 Mar 2010 - 8:01 pm | अनिल हटेला
पर्या लेका॑,
जरा मोठे भाग टाकलेस तर वजन कमी होइल का रे तुझं?
पू भा प्र........:)
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.
24 Mar 2010 - 10:19 pm | शुचि
ओ परा तुमची स्वाक्षरी द्याल का? नाही कागदावर मागतेय =))
कशी घेऊ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
24 Mar 2010 - 10:56 pm | टुकुल
किबोर्ड ची बटणे जोर जोरात बडवुन दाद देत आहे रे भौ :-)
लवकर येवु दे पुढचे भाग.
(स्वगतः कधी काळी सोडलेली सवय परत चालु करायची इच्छा होत आहे)
--टुकुल
24 Mar 2010 - 11:29 pm | विसोबा खेचर
सह्ही लिहीलं आहे बॉस!
26 Mar 2010 - 2:30 am | नेत्रेश
खुप छान लिहीले आहे. पण काही गोष्टी खटकल्या -
"हि तुझी परवाची बोस्टनची तिकिटस. कॅथ्रीन नावाची मुलगी तुला एयरपोर्टला जॉइन होईल, पुढच्या सुचना ती देईलच." संन्याल जणु माझा प्रश्न न ऐकल्याच्या थाटात बोलला.
दोन दिवसांत पासर्पोट, अमेरीकेचा व्हिसा (तो ही बेकायदा संघटनेच्या बोलावण्या वरुन) ... काहीच्या काही
"संध्याकाळी ७ ला फ्लाईट आहे, साधारण ६ पर्यंत विमानतळावर पोहोच" संन्याल.
अमेरीकेची ७ ची फ्लाईट ६ वाजता विमानतळावर पोहोचुन पकडायला काय ती आपली बस/ट्रेन आहे का? १५ मीनीटे आधी गेट बंद होते. कस्ट्म, सिक्युरीटी चेक ला ही मोठी रांग असते.