किंचित झरणी बोधित करणी
मेलामेली भर्तृहरी
अमर्त्य सेना वसंतसेना
सेनासमथिंग कलहारी
तूच सहारा...
तूच सहारा रखरखीत या
गूगल संकटनेवारी
संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी
उपग्रहाचा त्वरितध्वनी
शरीरबांधणी भेटीगाठी
रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी
ओहो राहुल
आहा राहुल
ब्रायन लारा दत्ता भट
ब्रायन लारा दत्ता भट
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 9:29 pm | अनिल हटेला
नेहेमीप्रमाणेच भारी......................आणी अनाकलनीय :D
(ताईंच्या कवितेचा पंखा (उल्टा लटकलेला))
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
19 Nov 2009 - 9:48 pm | गणपा
बुरा न मानो पण एकाच साच्यातल्या कविता वाटायला लागल्या आहेत हल्ली..
काहीतरी नवीन येउदे..
-(स्पष्टवक्ता )गण्या.
20 Nov 2009 - 2:35 pm | विजुभाऊ
एकाच साच्यातल्या कविता वाटायला लागल्या आहेत
ऑ ! मला तर वाटले की त्या सगळ्या एकाच कवितेच्या क्रमशः आवृत्त्या आहेत
Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership
20 Nov 2009 - 2:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दुसर्या वाक्यातले पहिल्या तीन शब्दांवर आक्षेप आहे. बाकी चालू द्या.
अदिती
20 Nov 2009 - 2:49 pm | विजुभाऊ
असे होय..... ते शब्द्ज काढून वाचूयात
Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership
19 Nov 2009 - 9:51 pm | टारझन
कविता वाचून केवळ एकच शब्द निघाला !! ऑनेस्ट्ली आणि प्रांजळ पणे लिहीतोय .. :) कोणताही नकारात्मक विचार मनात नाही ..
" आयचा घो "
बास ... शब्द संपला !! मी खल्लास झालो आहे.
-(म्हैशासुर) मरदिनी
19 Nov 2009 - 9:54 pm | निमीत्त मात्र
डेव्हीड बेकम ऐकून आहे हे रिचर्ड बेकम कोण? बाकी कविता नेहमीप्रमाणेच अ प्र ति म!
19 Nov 2009 - 10:28 pm | नीधप
.
19 Nov 2009 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रकाटाआ
19 Nov 2009 - 10:52 pm | मिसळभोक्ता
या आधी शरदिनी म्हणजे नक्की कोण, ह्याविषयावर आम्ही आमचे मत दिले होते. आम्ही ते मत आता मागे घेत आहोत.
आमचे नवीन मत असे: शरदिनी ही एक अॅडव्हान्स्ड संगणक प्रणाली आहे, जी मराठी स्थळे धुंडाळून, त्यातील वेचक शब्द एकापुढे एक ठेवून अति उच्च दर्जाच्या कविता पाडते.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
19 Nov 2009 - 10:55 pm | चतुरंग
म्हणजे क्लाऊड काँप्यूटिंग असतं तसं क्लाऊड पोएटिंग म्हणा की मिभोकाका! ;)
(क्लाऊड)चतुरंग
19 Nov 2009 - 11:22 pm | टारझन
म्हणजे दंगामस्ती अशी चालू आहे तर ....
असो ..ईकडे रंगाकाका सौताच "मिभोकाका" असा उल्लेख करतात म्हणुन आम्ही मिभोआजोबा म्हणणार.
मिभोआजोबा , अचुक तर्क निदान
- सु ग्रा स
20 Nov 2009 - 3:32 pm | सूहास (not verified)
इलिनॉई(पक्षी : illnois) ...आणी रिचर्ड बेकहम ...
जबरा....
शेवटच्या चार ओळी फक्त असंबध्द वाटल्या... कधी तरी कळवा व्य नी तुन....
बाकी ...लिहिताना मराठी शब्दप्रयोग अतिशय "प्रायोगिक" वापरता बॉ...वाचताना वा अर्थबोध करताना माझे डोके काम करते की नाही अशी शंका येते ...
सू हा स...
20 Nov 2009 - 10:05 am | झकासराव
शरदिनी ही एक अॅडव्हान्स्ड संगणक प्रणाली आहे, जी मराठी स्थळे धुंडाळून, त्यातील वेचक शब्द एकापुढे एक ठेवून अति उच्च दर्जाच्या कविता पाडते.>>>>>>>>.
=)) =)) =)) =)) =))
20 Nov 2009 - 1:21 pm | वाहीदा
आमचे नवीन मत असे: शरदिनी ही एक अॅडव्हान्स्ड संगणक प्रणाली आहे, जी मराठी स्थळे धुंडाळून, त्यातील वेचक शब्द एकापुढे एक ठेवून अति उच्च दर्जाच्या कविता पाडते.
ठो !!
=)) =)) =)) =)) =)) =))
~ वाहीदा
19 Nov 2009 - 11:29 pm | निखिलचं शाईपेन
म्हंजे टा-याने केलेल्या तुमच्याच कवितांच्या विडंबनावरून .. तुम्ही (परत) प्रेरणा घेतलीत ..
रिकर्सिव ...आहे हे ...
अहो राहूल आहा राहूल ...
वाचून करंट आफेअर्स वर लिहिली आहे कि काय अशी पण शंका आली होती...
मिसळभोक्ता यांच्या प्रतिक्रियेशी पण सहमत ...
बाकी ..
अर्थ लावायला "गूगल संकटनेवारी" चा हि उपयोग नाही ..
आता काय .. लिहावे ..
ट्राय करतो ..
पत्रकाराचं काम .. सप्तपदी जागेची ..
महेला जयवर्धने .. एकात्मतेचा उतारा ..
ओबामांचा प्रस्ताव .. राज वर आरोपपत्र ..
ऊस उत्पादकांना मिळाला .. टीडीआर घोटाळा ..
महाराष्ट्राची मान झुकली ....अबूचा सत्कार ..
जमतंय .. की नाही ...
अर्थ नका लावू ... ओ ...
सकाळ मधल्या हेडलाईंन्स ..एरेंज केल्यात .. एकामागोमाग .. :)
-निखिल
20 Nov 2009 - 1:27 pm | वाहीदा
कसे जमेल बरे ? ;-)
दही जमेल पण कविता नाही जमणार शरदिनीं च्या सारख्या ! ;-)
जाऊ दे भाऊ - व्हतच न्हवत व्हायचं (हं घे रे)
~ वाहीदा
20 Nov 2009 - 1:28 pm | वाहीदा
कसे जमेल बरे ? ;-)
दही जमेल पण कविता नाही जमणार शरदिनीं च्या सारख्या ! ;-)
जाऊ दे भाऊ - व्हतच न्हवत व्हायचं (हं घे रे)
~ वाहीदा
20 Nov 2009 - 2:26 pm | विजुभाऊ
वाचून करंट आफेअर्स वर लिहिली आहे कि काय अशी पण शंका आली होती...
करंट अफेअर्स नव्हे रे करंटे अफेअर्स म्हण =))
Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership
19 Nov 2009 - 11:30 pm | विसोबा खेचर
हे सर्वात सुंदर गं शरू! पुन्हा मुंबैला केव्हा येणारेस?
तात्या.
20 Nov 2009 - 12:11 am | भडकमकर मास्तर
एफ बी आय ने पकडलेल्या लोकान्बद्दल वाटतंय...
सॅटेलाईट फोन वगैरे...राहुल भट... मस्त...
पण वाळवंटांच्या नावाच्या कोट्या कशाला ते नाय कळलं...
20 Nov 2009 - 2:54 am | उमराणी सरकार
अतिशय विनोदी. तुमची कविता वाचून सकाळचा लाफ्टर क्लब ला जायचा कार्यक्रम रद्द केला.
उमराणी सरकार
20 Nov 2009 - 3:37 am | शाहरुख
कवितेतील दर्द पोचले..
20 Nov 2009 - 5:18 am | दिपाली पाटिल
>>ब्रायन लारा दत्ता भट
ब्रायन लारा आणि लारा दत्ता माहीत आहे पण ब्रायन भट आहे की लारा भट आहे की दत्ता भट आहे??
दिपाली :)
20 Nov 2009 - 5:29 am | शाहरुख
ब्रायन लारा , लारा दत्ता आणि दत्ता भट आहे ते :-)
अजून काही शंका ?
20 Nov 2009 - 12:04 pm | दिपाली पाटिल
>>ब्रायन लारा , लारा दत्ता आणि दत्ता भट आहे ते
अजून काही शंका ?
पण शरदीनीताईंच्या अनुशंगाने पाहता, मला वाटतं ब्रायन लारा नी लारा दत्ता, "भट" आहेत असं म्हणायचं असेल त्यांना...
पण तुम्ही दाखवलेल्या दत्ता भटांचा तिसरा-चौथा जन्म चालू असेल आता बहूतेक...
दिपाली :)
20 Nov 2009 - 2:53 pm | योगी९००
ओहो राहूल
हे राहूल गांधीसाठी
आहा राहूल
हे राहूल द्रवीड साठी
एवढेच कळले मला...
अवांतर :
लारा दत्ताने ब्रायन लाराशी लग्न केले तर तिचे नाव काय होईल..???
लारा लारा (हॅ हॅ हॅ)
खादाडमाऊ
21 Nov 2009 - 12:34 am | शाहरुख
गांधीला 'ओहो' आणि द्रवीडला 'आहा' का बरे ?? सध्या तर दोघेही गाजवतायत..
आणि आपल्या अवांतरात तथ्य आहे..लारा दत्ताने ब्रायन लाराशी लग्न केले आहे अशी कवीकल्पना करुन 'लारा लारा' असा शब्दप्रयोग करुन कवितेची नादमयता वाढवून कविता अजून सशक्त करता आली असती.
(कवितेतील रस शोधून शोधून चाखणारा) शाहरुख
20 Nov 2009 - 7:32 am | सुनील
उगाच धागा उघडला. सकाळ-सकाळी डोक्याचं दही!! :''(
यापुढे सकाळी शरदिनी तैंच्या (?) कविता आणि जेवणापूर्वी कोणतीही पाकृ उघडायची नाही, हा निश्चय!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Nov 2009 - 10:21 am | ज्ञानेश...
:$
20 Nov 2009 - 11:31 am | jaypal
दुगाण्या लै भारी झाड्ल्या. बोलती बंद टक्कुरं काम करीना झालय.
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Nov 2009 - 1:21 pm | श्रावण मोडक
ही कविता नसून गुगली आहे हे कळलं.
सर्वांत शेवटी एकूण किती विकेट पडल्या हे सांगा.
20 Nov 2009 - 3:45 pm | धमाल मुलगा
एल.बी.डब्ल्यु.!
20 Nov 2009 - 3:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हिट विकेट!
अदिती