कातरवेळ

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in जनातलं, मनातलं
16 Nov 2009 - 5:04 pm

शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!! म्हणून मी पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचे ठरवले. सगळ्यात आधी सुचलेले काम म्हणजे माझे आवडीचे..... खायचे काम.
आवरुन सरळ आण्णाच्या हॉटेलात पोहचलो. एक इडली सांबारात बुडवून असे काहीसे बोलल्यावर वेटर माझ्या कडे विचित्र नजरेने बघत होता. त्याचा पुढचा प्रश्न
"साहब, ईडली सांबार मे डुबाके लाऊं क्या?"
आपलीच चूक म्हणायचे झालं आणि परत एकदा चालू द्यायचं....
" हाँ मैने पहले भी आपको वही बताया था|"

इडलीचा 'समाचार' घेता घेता मनात पुढे काय करायचे ह्याचे विचार चालूच होते,तेव्हाच असे जाणवले की आपले केस कानावर खूप आलेले आहेत.... थोडक्यात वाढले आहेत, आणि कापवायची गरज आहे... अण्णाच्या हॉटेलाच्या बाजूलाच एक केशकर्तनालय आहे खरे!!! पण मागच्या चार वर्षात फक्त दोनच वेळा मुंबईत केस कापवले आहेत. ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत..... त्यांना फक्त एकच स्टाईल येते.... स्पेशल भैया कट!!!!!
(विचारवंतांनो आम्हाला कबूल आहे, हा पण आमचा एक पुर्वग्रह!!!! ;)) असो, तरीही कसे बसे ठरवले काहीतरी लै भारी नाव असलेल्या सलून मधे जाऊन केस कापवायचे.

सलूनचे नाव तर जबरदस्त आहे बरे का मंडळी!!!! "सिझर्स ट्रिक". आमच्या त्या संकुलात हे दुकान जरासं आतल्या बाजूला आहे. तिकडे पोहचलो तर एक माणुस आधीच वाट बघत बसला होता. त्यामुळे मलाही वाट पहाणे क्रमप्राप्त होते... बाहेरच्या बाकड्यावर बसलो...टाइमपास म्हणून दुकानात इकडे तिकडे नजर टाकताना लक्षात आले, केशकर्तनालयाच्या काचेच्या तावदानावर वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे होती... जरा जवळ जाउन पाहिले तर कात्रणे मराठी वृत्तपत्रातली होती. उगाचच बरे वाटले. वाचायला सुरूवात केली आणि आत मधे काही तरी त्रास व्हायला लागला. पहिले कात्रण "मनसेच्या चार आमदारांचे निलंबन" आणि दुसरे कात्रण "मराठी लोकांना मराठीत न बोलण्यासाठी मराठीतून गांधीगिरीच्या मार्गाने शिकवणार" आणि बाकीची मग अशीच काही तरी. बरे या दोन बातम्यांच्या छायांकित प्रती संपुर्ण दुकानभर लावलेल्या होत्या.
माझी पहिली प्रतिक्रिया दगड उचलुन ते दुकान फोडण्याचीच होती, पण मिपा वरचे विचारवंताचे लेख वाचुन जरा संयमाने वागावे असे उगाचच वाटले. त्यात अजून एक विचारवंती किडा डोक्यात आला " त्या माणसाची ह्या मागची भुमिका तरी समजावुन घ्यावी".
मग सहजच त्या दुकानाच्या मालकाकडे गेलो. त्याला जमेल तेवढ्या शुद्ध हिंदित विचारले....
"ह्या बातम्या ईकडे लावण्याचे प्रयोजन काय?"
त्यावर साहेबांचे उत्तर: " आप मराठी लोग, हिंदीमें बात करने को शरमाते क्यों हो??? हिंदी तो आपकी राष्ट्रभाषा है| आप बंबई मै हिंदी मे बात न करके देश को तोड रहे हो|"
कसा बसा राग आवरत त्याला उत्तर द्यायला सुरवात केली " पहिली बात हिंदी यह राष्ट्रभाषा नहीं है वह अपने संघ की दो में से इक राजभाषा है| अगर पढाई लिखाई जानते हो तो अपने संविधान के अनुच्छेद ३४३ पढ लेना| उसके आगे अगर आप मानते हो की मुंबई महाराष्ट्रमें है| तो संविधान के अनुच्छेद ३४५ कै तहत महाराष्ट्र की राजभाषा मराठी है|"

ह्यावर त्याचे उत्तर "आप संविधान हमे ना सिखाये, हम सातवी कक्षा तक पढा हूँ| और हमारे स्कुलमें हिंदी राष्ट्रभाषा है यह सिखाया है| और रही बात बंबई महाराष्ट्र की है या नही"
माझ्या समोर त्या दिवशीचा पेपर टाकत " 'आपके' सचिन तेंडुलकरने ही आज कहा है मुंबई सबकी है| आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये|"

तेवढ्या वेळात त्या माणसाचे चार कर्मचारी माझ्या बाजूला गोळा झाले. चार खुर्च्यांवर बसलेले जे गिर्‍हाईक होते त्या पैकी दोन लोक फोन वर बोलत होते. आणि ते चक्क मराठीत फोन वर बोलत होते. सगळ्यांनी मला घेरले. कोणीही माझ्या बाजुने बोलायला तयार नव्हते. बाकी दुकानातले सगळे कर्मचारी लोक तर मला मारायच्या तयारीत होतेच. पण राडा करायचा नाही ही शिकवण अशातच मिपावर शिकलो होतो ना!!! त्याला उत्तर द्यायला सुरवात केली
"मुझे एक बात बताओ आप लोग यहापर धंदा करने आये हो आपको मराठी सिखनी चाहिये ना, और रही बात सचिन की ,मुंबई सबकी है ऐसा भी समझ लो पर भारत वर्ष मै सब लोग क्या हिंदी जानते है?? मुझे लगता है आप लोगो को यहा धंदा करनाही नही है| मै अपने बाल आपके यहा कभी नही कटवाउंगा" और सबसे पहिले यह सब यहा से निकाल डालो|"
असे म्हणुन मी ते लावलेले कात्रण फाडुन टाकले. तिथे बसलेले बघे माझ्या कडे काय मुर्ख राडेबाज आहे याच्या मुळे मला घरी जायला उशीर होतोय अशा नजरेने माझ्या कडे बघत होते. दुकानातुन बाहेर पडलो इच्छा झाली मनसेच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगावे ह्या लोकांना सरळ करायला. पण परत तोच प्रश्न!!!! राडेबाजी योग्य आहे का??? आजच सचिनला राजकारणावर बोलायची गरज आहे का?? आमच्या देवानेच असे करावे का??? रोज येणारे असे छोटे मोठे अनुभव असेच सहन करत जगायचे काय??? मराठीचा वापर खरेच पूर्ण बंद होईल का??? आमचे विचारवंत म्हणतात भाषा टिकवण्यासाठी सामाजिक चळवळ करावी पण कोणी सांगेल का मला कशी करायची चळवळ??? छे उगाचच विचारवंत झालो आज शरमेने मान तर खाली घालावी लागली नसती..... त्या चार पाच जणांना फोडून आलो असतो तर माझ्या मनाला तरी समाधान मिळाले असते. पण आत मधे बसलेल्या त्या दोघा मराठींचे काय??? त्यांना ह्याबद्दल काही बोलावसे वाटत नाही का??? त्या मूढांना घरी जायला उशीर नको म्हणुन मी तिकडे राडा केला नाही पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का??? लोक सरळ मुंबईत हिंदी बोला सांगतात आणि मी काहीच करायचे नाही कारण माझ्या बाकी मराठीत बांधंवांना त्रास होईल. पण ते बांधव खरच हा मुद्दा समजावुन घ्यायला तयार आहेत का??? शेवटी ह्याच ओळी आठवतात हो
" पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरात हाल सोसते मराठी".
खरे तर आज त्या दुकाना मधले कर्मचारी आणि ते दोन माझे लाडके मराठी बांधव हे सगळे बरोबर आहेत चुकलो ते मीच. आता आम्ही हिंदी शिकायचे मनावर घेतले आहे तुम्ही ही शिका.

टीप१: हा मला आलेला पहिला अनुभव नाही.... ह्या आधी आणि नंतरही आहेतच. आणि हा अनुभव सत्य आहे.

टीप२:- यातून आम्ही एका घटनेचा दुसर्या घटनेची बादारायण संबध लावला आहे. असो!!!! विचारवंतच ना आम्ही. पण आम्हाला तुम्ही तसे म्हणू शकत नाहीत. कारण काय आम्ही विचारवंत आम्ही परदेशातल्या कुठल्याशा स्मारकाचा आणि इतिहासाचा संबध लावल्यास तो एक उत्कृष्ट लेख ठरतो. एक तरी विचारवंत यावर तोडगा सांगू शकतो का??? मग आमचा दुकान फोडायचा मार्ग चुकीचा एवढेच सांगताय काय??? चैतन्याने भरलेली तरुणाई वाहवत जाउ नये वाटते तर त्यांना काय करावे ह्याचे मार्गदर्शन करा. रोजचे असे अनुभव घेऊन जगण्याचा कंटाळा येतोय आणि मग चुकीच्या का मार्गाने होईना पण कोणी तरी आमुचा (मॅक्स विचारवंत सध्या परदेशस्थीत आहेत, उगाचच निवासि अनिवासि वाद नका घालु) हा प्रश्न सोडवत असेल तर त्याचा मागे का उभे नाही राहायचे????

टीप३:- सर्व विचारवंतांची माफी मागून. धनंजय आणि विकास यांची स्पेशल माफी मागतो. कारण तुमचे विचार पटायला सुरवात झाली होती पण त्याने माझ्या रोजच्या जीवना मधला प्रश्न सुटणार नाहीत. परत एकदा मी या एकाच अनुभवाच्या जोरावर बोलत नाहीए. मुक्तसुनीत ह्यांनी सामाजिक चळवळीने हा प्रश्न कसा सोडवता येईल हे सांगितले होते त्याबद्दल जास्तीत जास्त मार्गदर्शन करावे. आता माझ्यासमोर दगड उचलण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही... चुकीचे असेलही पण सध्यातरी तोच मार्ग दिसत आहे.... इतर काही मर्ग असल्यास सुचवावे.... योग्य मार्गांसाठी तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे... इथं कोण चूक नि कोण बरोबर ही चर्चा अपेक्षित नाही.. तर कोणत्या मार्गानी हे प्रश्न सोडवता येतील यावर विचार व्हावा असे वाटते.. अर्थात त्यासाठी हा प्रश्न आहे हेच पटणं आधी आवश्यक आहे.. नाहीतर आम्हांला हिंदी शिकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही!!!! इतर मुंबईतील विचारवंतांनो तुम्हाला असा अनुभव येत नाही का??? परत एकदा विचारवंत हा शब्द वापरल्याबद्दल माफी. जरा जास्तच भावुक होऊन लेख लिहिला...

शेवटानंतर :-अजून आमचे केस कापवून घ्यायचे बाकीच आहे. चला हजार रुपये खर्च करुन घरी जाऊनच कापवेन.

धोरणसंस्कृतीभाषासमाजजीवनमानप्रकटनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

16 Nov 2009 - 5:08 pm | पर्नल नेने मराठे

ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत

हे मुळिच पटले नाहि
चुचु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2009 - 5:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निख्या, ऐक! मी ठाण्यात गाडी चालवायला शिकत होते. 'गुरु'जी होता भय्या! त्याला विचारलं "बाबा रे, तुला मराठी किंवा इंग्लिश येतं का? माझं हिंदी तुला झेपणार नाही."
तर त्याचं उत्तर, "तुम्ही एवढ्या शिकलेल्या दिसता, तुम्हाला हिंदी नाही येत? राष्ट्रभाषा नाही येत?"
घटनेचं कलम मला माहित नव्हतं तेव्हा! पण मी त्याला म्हटलं, "हे बघ, तुला पैसे मी देणार! मी उद्या म्हटलं मला हा गुरू नको, आमच्यात कम्युनिकेशन होणं अशक्य आहे, चालणार आहे का तुला? तुझाच एक विद्यार्थी/गिर्‍हाईक जाणार. वर मी माझ्या भावाला आणि मित्र-मैत्रिणींनाही तेच सांगणार."
त्यावरही उत्तर तयार होतं, "पण तुम्ही हिंदी पिक्चर पहात असाल ना?"
मी काही कच्ची नाही आहे, "पिक्चर मी आठवड्यातून एखादाही पहात नाही. तू २४ तास, ७ दिवस महाराष्ट्रात रहातोस, मराठी नाही शिकता आली."

त्यानंतर त्याने पुन्हा मी मराठी बोलण्यावर आक्षेप घेतला नाही. तो हिंदीत सांगायचा, मी मराठीत प्रश्न विचारायचे. अर्थात लायसन्स मिळाल्यानंतर मी गाडी चालवली नाही आहे; त्यामुळे त्याने मला काय शिकवलं हे आत्तापर्यंत इव्हॅल्यूएट झालंच नाही आहे. लायसन्सच्या परीक्षेसाठी अस्सल रांगड्या मराठी माणसाकडून एकच प्रश्न होता, "तुझं नाव काय?"

अदिती

नंदन's picture

16 Nov 2009 - 5:52 pm | नंदन

धडकून मराठी बोलावे, जवळजवळ सगळ्यांना समजतं. आमच्याशी हिंदीशिवाय चकार शब्द न बोलणारा भ. भाजीवाला आजीशी मात्र स्खलित मराठीत बोलतो. (याचं दुसरे टोक म्हणजे शिवाजी मंदिरला मराठी नाटकाच्या मध्यंतरात एका मराठी माणसाने मला 'कितने बजे घडीमें' असं विचारलं होतं.) मातृभाषेचा आग्रह धरणं इतपत तरी आपण करू शकतो. व्यापारासाठी जे लोक बाहेरून येतात त्यांना जुजबी का होईना स्थानिक भाषा यायला हवी याचा आग्रह आपणच धरायला हवा.
केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. मागे भोचक यांनी याच मुद्द्याबद्दल मुंबई आणि कोलकत्त्यातील फरकाचं उदाहरण दिलं होतं त्याची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अवलिया's picture

16 Nov 2009 - 7:34 pm | अवलिया

केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं

ते दोघे बहुधा कर भरणारे आणि हापिसात काम करणारे विचारवंत असावेत.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

धमाल मुलगा's picture

16 Nov 2009 - 5:24 pm | धमाल मुलगा

उ का है ना बबुआ,
गलती तो तोहार हय! एक मराठी होते हुए भी तुम काहें हिंदी नाही बोलत हो?
हमरे उधरके मिनिश्टरवा सही कहत है, तुम मराठीयोंकी अकलवा समंदर किनारे रहके नमकीन पानीसे खराब हुई गवा है!

असो,
विचारवंत झालात त्याबद्दल अभिनंदन! परंतु बाटणं पुरतं झालेलं नाही त्यामुळे असं होतंय! निवांत डोळे मिटुन घ्या, 'माझं पोट भरलं ना, मग बाकी गेले तिकडं...( कुठं ते सगळ्यांना ठाऊक आहे!) 'असा विचार दृढ करा, लंब्याचवड्या गफ्फा हाणा....उंटावरुन शेळ्या हाका,..सरकारी असाल तर संप करा सरकार फुक्काट पोसेलच पण दुसर्‍यांच्या पोटतिडकीला 'हापिसात कामाचा आभास निर्माण करुन प्रतिसादांच्या लडी लावतात' वगैरे मुक्ताफळं उधळा...
सगळं काही सुरळीत होईल....
अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच.

पुन्हा एकदा अभिनंदन!

-(पक्का राडेबाज) ध.

----------------------------------------------------------------------
हल्ली दगडधोंड्यांवर डोकं आपटुन फार टेंगळं आली आहेत. तुर्त दगडांना पाझर फोडाण्याच्या प्रयत्नाचे काम प्रलंबीत आहे!
धन्यवाद.

अवलिया's picture

16 Nov 2009 - 7:47 pm | अवलिया

अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सहज's picture

16 Nov 2009 - 5:33 pm | सहज

>पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का???

आजपासुन महाराष्ट्रात आपण मराठीमधे बोलणारा विक्रेता असेल तरच रिक्षा, केशकर्तन, भाजी (निखील यादी वाढव)इ इ सेवा, माल विकत घेउन मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणार्‍यांकडून नाही.

मिपाकर सहा हजार आहेत ना? करायचे का? चला हेही करुन पाहूया. सनदशीर मार्गाने?

कबूल?????????

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2009 - 5:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दूध टाकणारे, इस्त्रीवाले, किरकोळ सामानाचे वाणी, होलसेलवाले कसे मिळवणार हो सहजकाका? शक्य असेल तिथे मराठी माणसाला मदत करा, मराठी व्यापार्‍याकडूनच माल घ्या हे मान्य आहे.

आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत.

अदिती

सहज's picture

16 Nov 2009 - 5:42 pm | सहज

हळुहळू कळेल. बाय द वे पुण्यात आमचा गवळी, वर्तमानपत्रवाला, केबलवाला,फुलवाला, भाजीवाला/ली, भांडीवाली मराठी मंडळी.

कोपर्‍यावर औषधदुकानवाला मराठी, हॉटेलवाला शेट्टी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), भेळवाला मराठी, मिठाई-वडे-सामोसे वाला गुजराथी का मारवाडी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), किराणावाला देखील मारवाडी (पण त्याला मराठीत बोलले तर चालते), पण आता बिगबझार कोणाचे आहे?

इस्त्रीवाला मराठी होता सध्या भैय्या आहे. त्याच्याशी मराठीतच बोलले पाहीजे.

निखिल देशपांडे's picture

16 Nov 2009 - 5:50 pm | निखिल देशपांडे

अशी परीस्थीती माझ्या आजुबाजुला मिळणे कठीण दिसते. मुंबई ठाणे दोन्ही कडचा अनुभव तसेच आहेत. माझ्या भागातले शिधा वाटपाचे दुकान (ज्याचा कडे रेशनचे काहिच नसते आणी बाकी माल असतो) सुद्धा अमराठी माणसाचेच आहे. पण एक उलटी बाजु घराच्या जवळच्या रिलायन्स फ्रेश/ डी मार्ट/ बिग बाजार मधे बरेच मराठी कर्मचारी आहेत. तिथे मराठी बोललेले चालते.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

शाहरुख's picture

17 Nov 2009 - 7:18 am | शाहरुख

जेंव्हा "अरे, ही तुझी अस्मिता" असले सांगणारे कोणी नव्हते तेंव्हापासून आम्ही आमचे सगळे व्यवहार मराठी व्यापार्‍यांबरोबर करत आलेलो आहोत.

सूहास's picture

17 Nov 2009 - 5:22 pm | सूहास (not verified)

अरे ओ लल्लनवा . हमार मतलब पच्याक निखिलवा ..ई तो बडी माथा-पच्चीसी पच्याक करवा रहे हो भाई....उ का हे के आप जाकर देखियेगा उहाँ ..कहाँ....ईजवाडा जो हे हैद्राबाद पच्याक के तनिक आगे..हां अरे ऊं ही वो जो मिरचीवाला गाँव है पच्याक देखियेगा का गुंटुर कहत रहै उंका पच्याक हा उही ..तनिक चुना देना भाई ..फुथ..फुथ..ससुरा पान बनावत हो की का...ससुरा ईत्ता कत्ता का पुरा बिहार को खिलाना है का ..हां तो निखिलवा.... तो ऊ गुंटुर मां पच्याक जाकर पुछ लो के ईंहा कोई हिन्दी बोलत रहीं हे नाही...और हिन्दी पच्याक जो है हमार राष्टभाषा है की नाही...

सू हा स...

पर्नल नेने मराठे's picture

18 Nov 2009 - 2:12 pm | पर्नल नेने मराठे

पण आता बिगबझार कोणाचे आहे?
सिन्धी आहे

चुचु

निखिल देशपांडे's picture

16 Nov 2009 - 5:44 pm | निखिल देशपांडे

हा प्रयत्न माझ्या लेव्हल ला चालुच आहे... आम्ही मित्रांनी हे ठरवुन खुप दिवस झालेत पण जरा ह्यात त्रास आहे. रिक्षा वाल्यांचा बाबतीत कठीण आहे.... खुप वेळ जातो रोजचा.
पण सार्वजनिक स्थळी मराठीचा वापर थोडासा का होईना गेल्या वर्ष भरात वाढलाय असे वाटते.
दोन मराठी माणसांनी तरी एकमेकांशी मराठीत बोलले पाहिजे ना

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

पर्नल नेने मराठे's picture

16 Nov 2009 - 5:46 pm | पर्नल नेने मराठे

आणी पाणिपुरिवाला मराठी कसा मिळवणार?
चुचु

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Nov 2009 - 9:44 am | llपुण्याचे पेशवेll

पुण्याला या पुष्कळ मराठी भेळवाले आणि पाणीपुरीवाले मिळतील.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

बोका's picture

16 Nov 2009 - 9:33 pm | बोका

...आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत...
आम्ही रेल्वेच्या मराठी क्लार्क कडून तीकीटे काढली पण तारीख चुकली वाटतं. मला वाटलं १५ ला ग्रहण आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2009 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

येस येस, यू इज म्हणींग ऑफ करेक्ट. चुकीची मिश्टेक झाली म्हनायची.

अदिती

दशानन's picture

16 Nov 2009 - 5:40 pm | दशानन

तु सटकला आहेस काय रे :?

उच्चवंत... विचारवंत झालास की रे तु ;)

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

परिकथेतील राजकुमार's picture

16 Nov 2009 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार

आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला. ह्या वर्षीचे 'सुधीर पाचलग' स्वांतसुखाय परिवर्तीत पारितोषीक आपणास देण्यात यावे अशी मी विनंती करत आहे.

आपण दगड अथवा बटाट्यांचा वापर न करता, जगातील सर्वात धारधार असे जे शस्त्र , 'लेखणी'.. त्याचा वापर केलेला बघुन हृदय भरुन आले.

नव विचारवंतात परिवर्तन झाल्याने आता पुढे काही दिवस 'विचार जंतांचा' त्रास होतच राहिल, तो कसा दुर करावा ह्याचे मार्गदर्शन विचारवंताकडुन होईलच, काळजी नसावी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
पेशव्यांनी सहीत वाक्य लिहिणे बंद केले आहे.
आमचे राज्य

टारझन's picture

16 Nov 2009 - 5:42 pm | टारझन

निख्या .. फोडलंस .. तोडलंस मित्रा !!
आपल्याला कोणी असं बोलायचं अजुन तरी डेरिंग केलं नाय राव ... पण बोलला की सगळे विचार गधडीच्या *डीत घालून .. त्यावेळी मला जे योग्य वाटेल ते मी करीन .. ते समाजाला/कायद्याला पोटो न पटो !! भांचोद बाझवला .. आहे काय न नाही काय !!
कुठाय ते दुकान दाखव मला .. ह्या शनिवारी भादरून येऊ साल्यांची !!

प्रसन्न केसकर's picture

18 Nov 2009 - 1:53 pm | प्रसन्न केसकर

ए अविनाश! ए पोकळे - पुनममधल्या हाका आठवताहेत? कसे हे अविनाश अन पोकळे आले तिथं माहिती आहे? काही वर्षांपुर्वी मी तिथं गेलो अन मराठीत ऑर्डर दिली तर लाईन मॅनेजर/ वेटर म्हणाले मराठी येत नाही. झाली भांडणं, आला अण्णा. तो पण मुंबईतुन नुकताच पुण्याला शिफ्ट झालेला अन त्याची पण मराठीची बोंब. म्हणाला मराठीत ऑर्डर दिली तर घेणारच नाही. दुसरीकडं जा! मग म्हणालो कि मी जातो पण तु हॉटेल आज रात्री बार बंद होईपर्यंत चालवणार असशील तर इमारतीचा, फर्निचर कटलरीचा अन तुझ्यासकट सगळ्या स्टाफचा विमा आत्ताच काढ. नंतर फार उशीर झालेला असेल अन तुमच्या सगळ्यांचे कुटुंबिय रस्त्यांवर येतील. बरीच भांडणं झाली. पुलाच्या वाडीवरची पोरंपण आवज ऐकुन आली. दोन महिन्यांनी परत तिथं गेलो तर सगळे लाईन मॅनेजर बदललेले. अन आता तर अण्णा पण अस्खलीत मराठी बोलतो. अगदी त्याच्या घरचे पण. तेव्हा पुनम ओस पडलेलं असायचं आता खचाखच भरतंय रोज. आता तो मला म्हणतो साहेब तेव्हा तुम्ही भांडला नसतात तर मी मराठीकडं लक्ष दिलं नसतं अन धंदा पण एव्हढा चालला नसता.

तात्पर्य वेगळं सांगायला हवं?

मदनबाण's picture

16 Nov 2009 - 6:03 pm | मदनबाण

छान लिहले आहेस... मुंबईत हिंदीला पर्याय नाही पण मराठीला आहे हे उघड सत्य आहे.
मुंबईत मोबाईल सेवा देणार्‍या किती कंपन्या त्यांच्या कॉलसेंटर मधुन मराठीतुन माहिती देतात ? हिंदी आणि इंग्रजी हे २ पर्यांय आहेत्,मराठी नाही.
तसा जर पर्यांय निर्माण झाला तर त्याचा फायदा मराठी तरुणांनाच रोजगार मिळण्यात नक्कीच होईल.
पण या बद्धल विशेष काही होईल असे वाटत नाही कारण मराठी माणुस मराठीतुन बोलतोच कुठे ?

जाता जाता :--- हल्ली जितके क्रेडिट कार्ड,पॉलिसीवाले इं. फोन करतात तेव्हा मला मराठीतुन सांगा माहिती असे त्यांना सांगितल्यावर समोरचा फोन लगेच बंद करतो.इतके वर्ष इथे राहुन व्यापार करतात पण राज्यभाषेत व्यवहार यांना करता येत नाही !!!

(११ कोटी मराठी भाषिकां मधलाच एक)
मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

दशदिशांना गर्जू द्या मराठी बाणा :---
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=221...

स्वाती२'s picture

16 Nov 2009 - 8:32 pm | स्वाती२

हिंदी आणि इंग्रजी पैकी एक पर्याय घ्यायचा. जिवंत माणसाने कॉल घेतला की मराठीत बोलायचे. त्यांना आपला धंदा हवा असेल तर ते नीट सेवा देतील. वाईट सेवा मिळाली तर त्याबद्दल तक्रार करायची. प्रत्येक मराठी माणसाने असे केले तर दखल घ्यावीच लागेल.
ठाण्यात माझ्या आईच्या बाईला बँकेत खात उघडायचे होते तेव्हा हाच प्रकार. बाबा शुद्ध मराठीत बोलतायत हे पाहून आधी तुच्छ कटाक्ष. मग सरळ दुर्लक्ष. मग बाबांनी त्या बाईला इंग्रजीत झापलं. तक्रार करून बिझनेस दुसरीकडे नेइन म्हटल्यावर सपशेल शरणागती.
परवा असाच एक टेलिमार्केटरचा फोन होता. आधी खोटा अमेरिकन अ‍ॅक्सेंट मग मुंबईला कॉल करतो म्हणाले तस म्हणाला मग हिंदीतच बोलतो चालेल ना. त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.

सुबक ठेंगणी's picture

17 Nov 2009 - 8:26 am | सुबक ठेंगणी

त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.

जपानी लोकांकडून मी एक गोष्ट शिकले. मी काही चुकीचं जपानी वापरलं की लगेच समोरचा/ची मला "अगं म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का?" असं लगेच दुरुस्त जपानीत सांगतो/ते. आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल. पण घरी गेल्यावर नक्की करून पहाणार आहे. :)

निखिल, अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर छान लिहिलं आहेस. लेखाचं शीर्षकही एकदम चपखल!

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Nov 2009 - 9:46 am | llपुण्याचे पेशवेll

हरकत नाही पण जे मुद्दमहून चुकीचे बोलतात त्यांचे काय?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सुबक ठेंगणी's picture

17 Nov 2009 - 9:58 am | सुबक ठेंगणी

त्यांना निर्विकार चेह-याने "तुम्ही नीट मराठीत सांगा मगच मी समजून घेईन" असं सांगीन.

अर्थात, तिथेही असंच नेटाने बरोबर मराठीत सांगत रहाता येईल. शेवटी भाषा आपली आहे नां. :)

सुमीत भातखंडे's picture

16 Nov 2009 - 6:25 pm | सुमीत भातखंडे

संतापजनक प्रकार.
डोंबिवलीत तरी अजून अशी परिस्थिती आलेली नाही.
सध्या तरी सगळे दुकानदार (मराठी वा अमराठी) मराठी बोलतात.

वर म्हटल्या प्रमाणे आपण मराठीचा आग्रह सोडायचा नाही हे खरच पण -

आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये

हे असं वाक्य समोर आल्यावर शांत बसण अशक्यच.

बाकी लेख जबरदस्त आणि वरील सगळ्यांशी सहमत.

अवलिया's picture

16 Nov 2009 - 6:32 pm | अवलिया

काय रे डोक्यात पाणी झाले का रे ?
हे काय खुळ काढलेस! अरे विचारवंतांच्या नाड्या सोडायला लागलास तु ? ऑ! काही लाज शरम आहे की नाही ?

बाकी एकदम विनोदी लिखाण.
बादरायण संबंध जोडण्यात हिंदी सिनिमाला स्पर्धा निर्माण झाल्याची प्रचिती देणारे.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

भोचक's picture

16 Nov 2009 - 7:52 pm | भोचक

इकडे इंदौरमध्ये आमच्या लोकमान्य नगरात भाजीवाले सुद्धा मराठीत बोलण्याचा यत्न करतात. काय करणार सगळेच लोक मराठी ना. धंदा करायचा तर त्यांच्या 'ह्रदया' जवळ जायला पाहिजे . कॉलनीसमोरचे दोन्ही अमराठी दुकानदार यादी मराठीत लिहिली तरी वस्तू बरोबर घरी पोहचवतात. त्यातल्या एखाद्या पदार्थाचे नाव मराठीत लिहिले तरी काहीही बिघडत नाही. (राईच्या ऐवजी मोहरी लिहिलं तरी चालतं.) मराठी असे सगळे पदार्थ ठेवतात. चितळ्यांच्या बाकरवडीपासून आंजर्ल्याच्या आंबावडीपर्यंत सगळं काही आवर्जून ठेवतात. एवढंच काय पटेलच्या दुकानात तर यच्चयावत मराठी पदार्थ असतात. 'संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने मिळतात', पासून टिपीकल मराठी सणांविषयी असलेल्या सामानांची माहिती देणारे बोर्ड चक्क मराठीत लिहिलेले असतात. केशकर्तनवालाही अमराठी आहे, पण कॉलनीतलाच एकजण मी गेलो त्यादिवशी त्याच्याशी मराठीत बोलत होता, नि तोही जमेल त्या मराठीत त्याच्याशी बोलत होता. कॉलनीशी निगडीत बहुतांश लोक मराठी आहेत नि नसलेले मराठी जाणणारे आहेत. किंबहूना असावेत अशी अपेक्षा असते. आश्चर्य म्हणजे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथे उभ्या असलेल्या अमराठी उमेदवाराने या कॉलनीत चक्क मराठीत प्रचारपत्रके वाटली होती. आता बोला.

(भोचक)
इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं!
हा आहे आमचा स्वभाव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2009 - 7:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केस कर्तनालयाचं नाव लक्षात ठेवलं ना. पुढच्या वेळेस ठाण्याला येईन तेव्हा आपून पाहून घेऊ त्याला. त्याचं डो़कं विचाराने बदलू. :)
बाय द वे, अशोक टॉकीज पासून रिक्षात बसून मी लै वेळेस एरोलीत उतरलो. पण मला एकबी हिंदी भाषेत बोलणारा नै भेटला. बहूतेक माझ्या अवताराकडे पाहून ते मराठीत बोलत असतील. :D

बाकी चालू द्या...!

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

16 Nov 2009 - 8:10 pm | रेवती

आपण मराठी बोलले पाहिजे आणि अमराठी लोकांना निदान ग्राहकांशी संवाद साधण्यापुरते तरी मराठी आलेच पाहिजे असा आग्रह धरल्यास काहीही चूक नाही. आपले अभिनंदन! आता प्रश्न असा आहे की आपले लोक्स जे राज्याबाहेर राहता ते स्थानिक भाषा थोडीतरी शिकतात का? आता आपण बाहेरच्यांना जो नियम लावतो तो आपल्यालाही लागू नाही का? मी हैद्राबादला असताना पहिल्या महिनाभरात १ ते १० आकडे, भाज्यांची, वाणसामानाची नावे तेलुगुमधून बोलून व्यवहार करायला शिकले होते. छोटी छोटी वाक्ये तरी त्यांच्या भाषेतून बोलता येणे महत्वाचे. याचा अतिरेक करत मी एकदा फळवाल्याशी मोठ्या कष्टाने संवाद साधला. तेवढ्यात दुसरी बाई आली व तिने मराठीतून बोलणे चालू केले व फळविक्रेत्यानेही मराठीतून उत्तरे दिली. मीएकदम चकित! हाच अनुभव आणखी एका दुकानात आला होता.

रेवती

विकास's picture

16 Nov 2009 - 8:24 pm | विकास

वर प.रा. ने निखिलला म्हणले आहे की, "आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला."

वास्तवीक माझ्या लेखी निखिलराव जास्तच हिंसक झाले आहेत. का म्हणून विचार करा? कारण इंग्रजीत वाक्य आहे की, "pen is mighter than sword" म्हणून! ;) थोडक्यात विचारवंत हे केवळ लेखणीच्या फटकार्‍याने जास्त हिंसा करू शकतात असे माझे स्पष्ट मत आहे. (म्हणून मी केवळ कळफळक वापरतो आणि स्वतःला विचारवंत समजत नाही :) ).

असो, यातील मूळ मुद्याविषयी:

भारतीयची आणि एकंदरीत शांततेचा अतिरेक करणार्‍यांची जगात कोठेही एक वृत्ती असते त्यात अल्पसंख्यांकांना नुसते संरक्षण देणेच नाही तर त्यांच्याशी मिळवून घेण्यासाठी जरूरीपेक्षा जास्तच तडजोड करणे हा प्रमुख भाग असतो. परीणामी हक्कांच्या तंबूतून अरबाची हकालपट्टी होते पण ते उशीरा समजते इतकेच. मग त्यावर अरब म्हणतो उंटाला कापून काढा. पण नंतर लक्षात येते की वाळवंटात अडकून बसू शकू :-) मला माहीत आहे की हे उदाहरण बादरायण संबंधाचे ठरू शकते म्हणून ;) पण त्यातील मूळ मुद्दा हाच माझ्या "वैचारीक" लेखनाचा पण मूळ मुद्दा होता: असे होऊ नये म्हणून सुरवातीपासून प्रयत्न करणे हे महत्वाचे असते. तसे होत नाही तेंव्हा होते ती फक्त राडेबाजी.... हे फक्त भाषेलाच लागू नाही तर जेंव्हा कुठल्याही धार्मिक घटकांचे लांगूलचालन होऊ लागते तेंव्हा त्याच्या क्रिया-प्रतिक्रीया या सर्व समाजाला भोगाव्या लागतात. ह्याला जबाबदार फक्त राजकारणी, विचारवंतच नसतात तर तर सर्व समाजच असतो.

कुठलेही शस्त्र जर जास्त वापरले तर त्याची धार जाते. मग ती तलवार असोत अथवा अहींसा, स्वभाषेचे प्रेम अथवा परकीयांना विरोध. जेंव्हा राजकारणी अशी कुठलीही टोकाची भुमीका बाळगून आंदोलन करतो तेंव्हा नकळत स्वतःसाठी एक सभोवताली एक खंदक खोदून ठेवतो ज्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड होऊ शकते. आणि पडायचेच झाले तर स्वतःच्या स्वतःच तयार केलेल्या प्रतिमेला फोडण्याशिवाय पर्यायही रहात नाही. हा अगदी नजिकच्या काळातील ही इतिहास आहे. तरी देखील आत्ताच्या घडीस काही अपेक्षा असेल तर मनसेकडून (अर्थात राज ठाकरेंकडून) काहीतरी भरीव आणि "कन्स्ट्रक्टीव्ह" कार्यक्रम जनतेला दिसण्याची. अगदी मुंबईत मराठी कशी रहावी यावरूनही. ती केवळ बोलण्याने उरणार नाही तर नोकरीधंद्याने पण उरणार आहे. बदलणार्‍या जगात स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी सामान्यांना प्रबोधन आणि प्रॅक्टीकल शिक्षण देण्याची गरज आहे. अर्थात एक नेता म्हणून दिशा देण्याचे काम आणि तसे विचार दाखवणे इतकी किमान अपेक्षा राज कडून बाळगायलाच हवी असे वाटते. कारण, तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गिरणगावे भकास होतात आणि अरूण गवळी अथवा तत्सम तयार होतात.

इथे येणार्‍या सभासदास मराठीबद्दल उपदेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी देखील व्यक्तीगत जीवनात काय करू शकतो यावर चर्चा होणे महत्वाचे आणि त्यात देखील आपण संपूर्ण समाजास (मराठी-अमराठी) कसे यात जाणीवेने एकत्र ठेवू शकू याचा पण विचार अपरीहार्य आहे असे वाटते.

या धाग्यात त्या दष्टीने बरेच प्रतिसादा दिसले ज्यात आपण काय करावे यावर भर आहे आणि चर्चा अशीच सकारात्मक मार्गावर चालोत ही शुभेच्छा!

निमीत्त मात्र's picture

17 Nov 2009 - 12:23 am | निमीत्त मात्र

(|: I)

हा प्रतिसाद संपूर्ण वाचणार्‍यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या पेश्शल शुभेच्छा!

प्रभो's picture

16 Nov 2009 - 9:18 pm | प्रभो

निख्या मस्त रे...
बाटाटे ठेवत जा जवळ.... :)

आणी हो विचारवंत झालायस तर कर भरतोस का नाही आता??

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हर्षद आनंदी's picture

17 Nov 2009 - 7:09 am | हर्षद आनंदी

सकाळी सकाळी ईडली खाल्लीत, त्याचा परीणाम..
पोहे खाल्ले असतेत तर नक्की फोडला असतात.

माणसाला मानेच्या वर डोके असते आणि त्याचा वापर फोडण्यासाठीच करतात असे एवढे दिवस समजत होतो.. हे विचार करण्याचे खूळ कुठुन शिरले राव तुमच्या डोक्यात? एखाद्या विकांताला कुठेतरी बसुन ह्यावर ईलाज करु, म्हणजे परत माणसात याल.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

समंजस's picture

17 Nov 2009 - 11:36 am | समंजस

मन परिवर्तन झाल्या बद्दल अभिनंदन =D>
या पुढे चांगल्या मार्गानी विधायक कार्ये कशा प्रकारे करावी ह्याबद्दल विचारवंत (काय चुकलं, काय चुकीचं, ई. ई. सांगणारे) लोक नक्कीच मार्गदर्शन करतील. काळजी नसावी.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Nov 2009 - 12:21 pm | llपुण्याचे पेशवेll

निख्या,
तुझ्या लेखाला छान म्हणता येणार नाही कारण ती व्यथा आहे. कदाचित 'कातरवेळ' या नावाने अंमळ हळवे लेखन करुन तू दुसरी व्यथा मांडली असशील म्हणून निवांत वाचून प्रतिक्रिया द्यावी असा विचार करत होतो. पण आता वाचल्यावर लक्षात आले विषय जिव्हाळ्याचा आहे. असो. पण या विषयावर बोलणे बंद केले आहे वेळ आली की करु राडा.
(राडेबाज अविचारवंत)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

sneharani's picture

17 Nov 2009 - 2:17 pm | sneharani

परवाच आईस्क्रिम खाताना त्या दुकानातले काका म्हणाले, काय आजच्या कॉलेजच्या पोरी आल्यावर हिंदीमध्ये बोलायलाच सुरु करतात
एक वेळ ते परलोक (परप्रांतीय) एखादा मराठी शब्द बोलतील. पण आजकाल मराठी माणसं हिंदी बोलतात, आता तुमच्या कॉलेजच्या पोरीच बघा.
त्या काकांना मी सांगितल एकच लक्षात ठेवा काका, तुमच्या दुकानात कोणतीही गिर्‍हाईक येवोत, ते हिंदी बोलले तर तुम्ही मुद्दाम मराठीतुन बोला, समोरची व्यक्ती मराठी असेल ना तर नक्कीच मराठीत बोलेल.

मस्त कलंदर's picture

17 Nov 2009 - 3:41 pm | मस्त कलंदर

पुण्यात राहणारे आमचे सख्खे बंधुराज... त्याचं सततचं हिंदी नि माझं मराठी हा वाद नेहेमी घरात चालू असतो.... त्याला मराठीत चॅट करणं पकाऊ वाटतं.... नि हिंदीतून बोलायला माझं टाळकं सणकतं..... तसं मी त्याला ऐकायला लावतेच हा तर प्रश्नच नाही!!!!! :D

बाकी सुबक म्हणते तसं "आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल." हे मी करतेच.. रिक्षावाल्याशी बोलायला सुरूवातच मी मुळात मराठीतून करते.... बर्‍यापैकी त्यालाही येत असते.... आणि नसेल... तरी मी ते मग मुद्दाम दामटवते.. सुदैवाने मी राहते त्या भागात मराठी-अमराठी सगळेच मराठी अगदी छान बोलतात.... :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2009 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निखिल, आपले औरंगाबाद तसे परप्रांतीयापासून सुरक्षित म्हणावे लागेल. कारण अजून तितका प्रभाव नाही असे वाटते. [पाणीपुरी-फरशीवाले सोडले तर] औरंगाबाद आणि परिसरात निजामाची राजवट आणि ऐतिहासिक कारणांमुळे मराठी भाषेवर उर्दूचा प्रभाव आहेच.

पण एक गोष्ट खरी की, शहरातील मुस्लीमांची संख्या आणि त्यामुळे बोलली जाणारी हिंदी, उर्दू यांचा प्रभाव काही भागात नक्कीच आहे. आणि तिथे मराठी बोलणारा हिंदीच बोलतो. तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

निखिल देशपांडे's picture

18 Nov 2009 - 9:18 am | निखिल देशपांडे

तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते.

असे खरच खुप दिवस झाले वाटते... माझ्या संपर्कात येणार्‍या औरंगाबादकरांना मी नेहमीच ह्या मुद्दाचे महत्व समजावुन सांगायचा प्रयत्न करतो.
ह्यातुन एक विचार मनात येतो औरंगाबद सारखी शहरे जिथे अजुन तेवढेसे परप्रांतिय नाहिएत तिथल्या लोकांना मराठीतच बोलण्याचे महत्व समजावुन सांगण्यासाठी काय करीता येईल

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

अभिरत भिरभि-या's picture

17 Nov 2009 - 7:09 pm | अभिरत भिरभि-या

मराठीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे जाणवून दिले की बरेच जण मराठी शिकतात असा माझा अनुभव आहे. मात्र ते पटवून देण्यात आपण कमी पडतो एवढे खरे.

इंजिनिरिंगला असताना हॉस्टेलवर पीसीवर नाटक/सिनेमे चालू असायचे; यात नाटके मराठी आणि सिनेमे इंग्रजी/हिंदी असत; नाटके पाहून धोधो हसणारे इतर पब्लिक पाहून माझ्या बंगाली मित्राने मराठी शिकली. आज तो (लिंग-वचनांचा) घोळ करूनही अर्धाअर्धा तास कुठल्याही विषयावार सलग मराठीत बोलू शकतो.
तेलगू सिनेमे पाहून पाहून आज अर्धा कर्नाटक तेलगू बोलू / समजू शकतो. कुठल्याही सरकारी अनुदानावर चालणार्‍या "राष्ट्रभाषा " समित्यांपेक्षाही मोठी कामगिरी बॉलिऊड्ने हिंदीच्या प्रसारासाठी केली आहे.
आज आपण मराठीतले चांगले नाटक/सिनेमे आपण पाहून इतरांना उत्तेजित करू शकतो. (शिवाजीराजे बोलतोय मला प्रत्य्क्षात फार ग्रेट वाटला नाही पण हा पिच्चर बघायला अमराठी लोक आल्याचे ऐकून मात्र बराच आनंद वाटला होता.)
थोडक्यात भाषाप्रसारात "मनोरंजन" फार मोठा घटक ठरू शकतो.

पुण्यात हिंदी बोलली तर मामा लोक जास्तीला कापतात हे समजून एका अमराठी सहपाठ्याने मराठीचे धडे गिरवले होते. :)
माझा तेलगू मॅनेजर पुण्यात असतानाची गंमत त्याने सांगितली होती. शॉपफ्लोरवर स्थानिक भाषा आली तर कामगारांना हॅण्डल करणे सोपे जाईल म्हणून त्याने मराठी शिकली होती. आणि हाताखाली जी लोक आहेत त्यांना तेलगू येते हे जेव्हा नोकरी सोडायच्या वेळेस समजले तेव्हा त्याने कपाळावर हात मारला होता.
:D

अवांतर:
आज आलेल्या ढकलपत्रातून..
... मराठीच बोला....
Get this widget | Track details | eSnips Social DNA

jaypal's picture

17 Nov 2009 - 7:27 pm | jaypal

हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं.
व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स
(पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे?
आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

jaypal's picture

17 Nov 2009 - 7:30 pm | jaypal

हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं.
व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स
(पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे?
आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Nov 2009 - 11:45 pm | बिपिन कार्यकर्ते

भेट एकदा.

बिपिन कार्यकर्ते

राधा१'s picture

18 Nov 2009 - 9:31 am | राधा१

मी मराठीची सुरवात माझ्या घरापासुन केली आहे घरी कोणीही येवो....मराठीच वापरायचे अगदी कचरावाल्यापासुन अयंगार बेकरी च्या काका पर्यंत..हा बहुदा त्या काकांना सुद्धा ते आवडत काका म्हटलेल आणि मराठी बोललेल. पण माझ आता ध्येय आहे आमचा पॅन्ट्री बॉय नरेश आणि आमचा पंजु कंपनी सेक्रटरी रवि.......(दोघे एका गावतले आहेत, आणि जाम मराठी कळत नाही अस सांगत फिरतात) जेव्हा मराठी बोलायला लाविन तेव्हा बर वाटेल...हा... :-)

बाकी निखिल तुझा लेख मात्र झक्कासच आहे..परत परत विचार करायला लावला..आणि खरच असे अनुभव येतात सुद्धा..:-)