विकांत - मालवण (तारकर्ली).....

नाम्या झंगाट's picture
नाम्या झंगाट in जनातलं, मनातलं
5 Nov 2009 - 3:30 pm

मिपाकरहो,

येणा-या विकांतासाठी हापिसच्या गँग सोबत मालवण (तारकर्ली) येथे जाण्याचे प्रयोजन केले आहे. फिरस्त्यांना मालवण (तारकर्ली) बाबतचे (मार्ग, रहण्याची व जेवणाची सोय, कुठे-कुठे आणी कोणते ठिकाणी भेट दिली पाहिजे इत्यादि... )आपले अनूभव, सुचना, शिफारस "शेअर" करण्याची नम्र विनंती.....

कळावे,
लोभ असावा
नाम्या झंगाट

संस्कृतीमतप्रतिसादशिफारसअनुभवप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

प्रशु's picture

5 Nov 2009 - 4:04 pm | प्रशु

मी गेल्याच विकांतला जाऊन आलो. तुम्हि प्रथम मालवण ला जा आणी तेथुन तारकर्ली अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तारकर्लीत रहाण्याची/जेवणाचई चांगली सोय आहे. पण बोटींग मला महाग वाट्ले. माणसी रुपये ९००/- फक्त ते पण २ तास.....

मालवण/भराडी देवी/ धामापुर तलाव पण बघुन घ्या वेळ असेल तर....

मॅन्ड्रेक's picture

5 Nov 2009 - 4:05 pm | मॅन्ड्रेक

भर् पुर माशे खावा.
at and post : Xanadu.

JAGOMOHANPYARE's picture

5 Nov 2009 - 5:25 pm | JAGOMOHANPYARE

.. कसे जाणार आहात? कोल्हापूरवरून जाणार असाल, तर एक रात्र दाजीपूरला घालवू शकता.आधी बुकिंग केले तर टेंट मिळतात चांगले.. एम टी डी सी चे... त्याचे बुकिंग मुंबईत पण होते बहुतेक..... .. तिथे चिकन चांगले असते म्हणे, ( मी १ वर्श फोंडाघाटला राहिलो, पण कधी नाही खाल्ले..... ) तारकर्लीला पण एम टी डी सी आहे बहुतेक , पण प्रायवेट घरातून चांगली सोय होते.. हॉटेलप्रमाणे, पण ते फार पॉश नसतात.. नुसती (हनीमूनपुरती) प्रायवसी मिळते आणि जेवण मिळते... नाही तर मग हॉटेल आहेत.. ( कोल्हापूर- राधानगरी-दाजीपूर- फोंडा- कणकवली- मालवण मार्ग)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

मितालि's picture

5 Nov 2009 - 5:42 pm | मितालि

येवा मालवण आपलाच आसा... खुप मासे , काजु खा तिकडे..
हे दोन वेबसाईट बघा.
http://www.malvancity.com/

http://santoshpednekar.wordpress.com/category/deobag-malvan/

स्मिता श्रीपाद's picture

5 Nov 2009 - 6:13 pm | स्मिता श्रीपाद

मालवण-तारकर्ली सुरेख आहे..
तारकर्ली मालवणपासुन १५-२० मिनिटाच्या अंतरावार आहे...
मालवण मद्धे राहु नका..त्यापेक्षा तारकर्ली मद्धे "एम्.टी.डी.सी." मद्धे सोय होते का पहा...सुंदर समुद्रकिनार्‍यावर आहे रहाण्याची सोय..
प्रत्येक रुम म्हणजे स्वतंत्र छोटा टेंटच आहे...प्रत्येकाला स्वतंत्र ओसरी आहे पुढे...तिथे निवांत खुर्चित बसुन समुद्र न्याहळता येतो...

पण "एम्.टी.डी.सी." मद्धे चुकुनही जेवु नका..
त्यपेक्शा मालवण मद्धे मुख्य बाजारपेठेत छान खानावळी आहेत..

तारकर्ली मद्धे "घर मिटबावकरांचं" नावाचं एक घरगुती हॉटेल आहे.
तिथे पण राहाण्याची सोय ठाकठीक वाटली...
तिथे वडे-सागुते आणि मोदक झक्कास होते :-)

सुनिल पाटकर's picture

6 Nov 2009 - 9:50 pm | सुनिल पाटकर

तारकरली मालवण पासुन ७ कि,मि... सिंधुदुर्ग हा जलदुर्ग पा्हण्यासाठी होडीतुन जावे लागते..मिठबावबिच .देवगड जवळ १० व्या शतकातील कुणकेश्वर मंदीर, विजयदुर्ग हा जलदुर्ग ,हिलस्टेशन अंबोली, रेडीचा गणपती,कुणकेश्वर गुहा,,
धामापुर तलाव ,सावंतवाडी,हि ठिकाणे पहावी.

सुप्रिया प्रसाद's picture

7 Nov 2009 - 9:30 pm | सुप्रिया प्रसाद

मालवन ल मी अत्ताच जाउन आले मी. सिन्धुदुर्ग बघाय्ल जतान जर पअन्यातले प्रवाल बघाय्चे असतिल तर २५० रुपयात ते लोक दाखव्तात. जरूर बघावे. किल्ला देखिल उत्तम आहे.

सुप्रिया

हर्षद आनंदी's picture

9 Nov 2009 - 7:27 am | हर्षद आनंदी

कुडाळ-धामापुर-मालवण-तारकर्ली-कुणकेश्वर-देवगड-विजयदुर्ग
अप्रतिम पट्टा आहे.
तारकर्ली इतर ठीकाणांपेक्षा थोडे महागडे आहे.
तारकर्ली पेक्षा सुंदर बीच माल्वण पासुन १७-१८ किमीवर असलेल्या गावात आहे,
धामापुरचा तलाव मस्त आहे, बोटिंगची सोय आहे.

आगाऊ सल्ला : एस. टी महामंडळाची उत्तम सेवा या भागात आहे, त्यामूळे ५०० रु. ४ दिवस प्रवास ही सुविधा प्रवास सुंदर बनवते.

तुम्हाला त्या भागाची माहीती हवी असल्यास, माझ्या ई-मेल वर संपर्क करा.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..