क्रांती ताईंची सुंदर गझल बहुधा वाचुन लिहण्याचा मोह आवरला नाही
:(
त्यांना त्याचे मोहरणे रुचलेच नसावे
त्यांचे त्याचे बंध कधी जुळलेच नसावे
बंधाचे हे नाव ठाकरे, गोजिरवाणे,
भावा- र्थाचे बीज इथे रुजलेच नसावे
भावांनी तोडली, जपावी, असली नाती,
नेते मन त्यांचे, महाभारतच बघावे !
त्याच्या वाटा नाही ताडल्या बहुधा त्यांनी
वादळाचे आमंत्रण दिसलेच नसावे
मैलाच्या दगडांमधले अंतर मिटलेले,
या लाटेवर पुन्हा कुणी फुललेच असावे
येता जाता 'सावर' त्यांना सांगत होते,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे!
क्रुष्णकुंजातुन काही शर हलकेच सुटले,
शरपंजरी पडले, जणु 'ध्रुतराष्ट्रच' असावे
पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त झाले,
इथे आसवे कधीही टपकलीच नसावी
चेतन
प्रतिक्रिया
23 Oct 2009 - 5:38 pm | दशानन
अरे !
कुणाचाच प्रतिसाद नाही.... असे मोकळा धागा जाऊ देणे आमच्या संस्कृती मध्ये बसत नाही ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....