त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे
त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे
शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे,
भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे
भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !
त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे
येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !
कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले,
त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे !
पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !
प्रतिक्रिया
22 Oct 2009 - 7:47 pm | प्राजु
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे
येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !
कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले,
त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे !
हे तीन शेर फार सुंदर आहेत. जियो क्रांती!!
सुरेख आहे गझल.
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
22 Oct 2009 - 7:48 pm | अक्षय पुर्णपात्रे
कविता. विडंबनांच्या वादळात आपली नाव उठून तर दिसतेच पण आपल्या धाडसाचे कौतुकही करावेसे वाटते.
22 Oct 2009 - 7:52 pm | अनिल हटेला
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे
:-)
सुरेख अगदी !!
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
22 Oct 2009 - 7:55 pm | श्रावण मोडक
छान. आवडली.
22 Oct 2009 - 8:03 pm | प्रभो
खूप छान
--प्रभो
22 Oct 2009 - 9:01 pm | मदनबाण
फारच सुंदर...
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
23 Oct 2009 - 1:27 am | बेसनलाडू
आवडली. श्रावण, शब्दांचे गाव खास!
(आस्वादक)बेसनलाडू
23 Oct 2009 - 8:54 am | दशानन
असेच म्हणतो.
आवडली कविता.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
23 Oct 2009 - 2:28 pm | फ्रॅक्चर बंड्या
येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे
फार भारी...
27 Oct 2009 - 5:22 pm | अन्वय
भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !
त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे
मूर्तीमंत प्रतिभाच ही
दुसरे काय म्हणणार
कसं सुचतं तुला हे
27 Oct 2009 - 5:49 pm | घाटावरचे भट
खूपच सुंदर.
27 Oct 2009 - 6:23 pm | विसोबा खेचर
सुरेख..!
तात्या.
27 Oct 2009 - 8:12 pm | मनीषा
भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !
पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे ! .. .. फारच छान
सुंदर गझल !
28 Oct 2009 - 11:45 am | विशाल कुलकर्णी
क्रांतीतै, मस्तच लिवलासा !
उगाच नाही भटसाहेबांनी शाबासकी दिलीय तुला ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
28 Oct 2009 - 12:18 pm | ऋषिकेश
गझल छान
हे दोन म्हट्ले तर विरुद्ध म्हटले तर एकाच छटेचे शेर खूपच आवडले
--ऋषिकेश
28 Oct 2009 - 12:32 pm | sneharani
मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे
सुंदर....
28 Oct 2009 - 3:36 pm | अ-मोल
अलारिपू वगैरे डोक्याची मंडई करणारृया विचित्र कवितांपेक्षा ही कविता कितीतरी सुंदर! जियो!!
28 Oct 2009 - 3:46 pm | दिपक
सुंदर कविता
30 Oct 2009 - 11:42 pm | चन्द्रशेखर गोखले
आवडली !