(टोळभैरवी)

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
7 Oct 2009 - 1:20 pm

क्रांतीताईंची सुंदर 'भैरवी' वाचुन आणी चतुरंगांची (भैरवी) पाहुन म्हणलं आपण पण भैरवी ऐकवावी ;) ह. घे.

एक एक शब्द जोड, भावनांचा मेळ नाही
शब्दबंबाळ फार्स हा, यमकाचा खेळ नाही

विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी,
कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही

तुझे ढापलेले सारे, लेख इथे सिध्द झाले
वेड घेउन पेडगावला जाण्याचे काम नाही

सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले
अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही

मार खाणार आता, सावरुन घे स्वतःला
तिखटावाचून काही, मिसळीची चव नाही

भयानकहास्यविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

7 Oct 2009 - 1:54 pm | श्रावण मोडक

सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले
अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही

लय भारी...
पण बहुदा खातंय आता दणके...

गणपा's picture

7 Oct 2009 - 3:15 pm | गणपा

मस्त विडंबन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2009 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीहीही

अदिती
(आता मी तिरकं हसणार!)

क्रान्ति's picture

7 Oct 2009 - 8:29 pm | क्रान्ति

विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी,
कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही

भारी!:)
क्रान्ति
अग्निसखा

चेतन's picture

7 Oct 2009 - 11:37 pm | चेतन

धन्यवाद श्रावण गणपा, अदिति आणि क्रांती ताई

चेतन

अवांतरः श्रावण म्हणुनच शेवटची ओळ बदलली :S

नंदू's picture

8 Oct 2009 - 10:34 am | नंदू

आवडलं.