मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(टोळभैरवी)

चेतन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
क्रांतीताईंची सुंदर 'भैरवी' वाचुन आणी चतुरंगांची (भैरवी) पाहुन म्हणलं आपण पण भैरवी ऐकवावी ;) ह. घे. एक एक शब्द जोड, भावनांचा मेळ नाही शब्दबंबाळ फार्स हा, यमकाचा खेळ नाही विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी, कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही तुझे ढापलेले सारे, लेख इथे सिध्द झाले वेड घेउन पेडगावला जाण्याचे काम नाही सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही मार खाणार आता, सावरुन घे स्वतःला तिखटावाचून काही, मिसळीची चव नाही

वाचन 2632 प्रतिक्रिया 0