आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले.
सूरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो. १ तास झाला तरी अनिमेशन काही संपतच नव्हते. म्हटले काहीतरी गोंधळ झाला असेल. त्याआधी मध्येच येऊन IMDB वर वाचले की कमल हासनच्या सिनेमाचे हिंदी नाव 'दशावतार'च आहे.
पण असो, मी तर हा अॅनिमेशन सिनेमा पाहत होतो की पुढे काहीतरी असेल. पण २ तासांनी सिनेमा संपला तेव्हा कळले की हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. :D
सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रावर दोन तारखा असतात: जारी करने की तारीख (Issue Date), समाप्ती की तारीख (Expiry Date)
ह्यात १० वर्षांचा फरक असतो. म्हणजेच ते प्रमाणपत्र १० वर्षांपर्यव वैध असते. ह्याच बाबतीत असेही ऐकले होते की त्या १० वर्षांत त्या सिनेमाचे नाव पुन्हा कोणी वापरू शकत नाही.
तर मग दशावतार नावाचेच २ सिनेमे तेही एकाच वर्षात, एकाच दिवशी आलेत, म्हणजे हा नियम आता बहुधा नसेलही.
आणि वाचनात आल्याप्रमाणेच विष्णूने जवळपास २० अवतार घेतले होते. त्यातील १०च वापरून ’दशावतार’ बनविला आहे. ते ही दोनही सिनेमांत. त्याचीही मला गंमत वाटली.
असो, मी पाहिलेला हा सिनेमा तसा चांगला वाटला पहायला. पुराणकथेतील माहिती पुन्हा पहायला मिळाली.
इतर कोणी दोन्हीपैकी एखादा सिनेमा पाहिला आहे का? त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
प्रतिक्रिया
28 Sep 2009 - 8:48 am | JAGOMOHANPYARE
कमल हसनचा दशावतार वेगळा आहे.. त्यात त्याचे स्वतःचे दशावतार आहेत... विष्णूच्या दशावताराशी संबंन्ध नाही.. कमल हसनच्या फिल्मचे नाव दशावतारम असे आहे.. ( साउथ इन्डियन) .. दोन्ही फिल्म एकाच दिवशी आलेल्या नाहीत...
28 Sep 2009 - 1:10 pm | देवदत्त
माहितीबद्दल धन्यवाद.
मी तेलुगू दशावथारम बद्दल नीट वाचले नव्हते. पण ह्या दुव्यावरून वाटले की तोच चित्रपट 'दशावतार' नावाने हिंदीमध्ये आला आहे. पण नक्की आला होता का?
बाकी दशावथारम बद्दल इथे तर दशावतार बद्दल इथे आणि इथे दिल्याप्रमाणे दोन्ही चित्रपट १३ जून २००८ ला प्रदर्शित झाले आहेत.
28 Sep 2009 - 1:55 pm | JAGOMOHANPYARE
... १३ जुन २००८ ला हिन्दी दशावतार - कमल हसनचा- असणे शक्य नाही... कारण माझे लग्न ( अरेन्ज मॅरेज : ) ) १६ जुन २००८ ला झाले आणि मी हा चित्रपट माझ्या बायकोसोबत लग्नानंतर टॉकीजमध्ये- डोम्बिवलीला- पाहिलेला आहे.... :)
१३ जुन २००८ ला बहुतेक कार्टून दशावतार आला असणार..
कमल हसनच्या फिल्म ची सी डी मिळते की... त्यातला पहिला अर्धा तास चाम्गला वाटतो... इतिहास काळातील कथेचा भाग... नंतर नुसती पळापळ आहे.. आणि पळापळीत भाग घेणारे सगळे कमल हसनच आहेत... विलन पण तोच, दोन चार हिरो आणि दोन चार साईड हिरो.... एका साइड हिरॉईनचा भाऊ, मुख्य हीरॉइनची आज्जी....... सगळे कमल हसनच आहे........ त्यातला एक कमल हसन मरतोदेखील........
1 Oct 2009 - 2:42 pm | मृत्युन्जय
अर्रे बाबा विष्णूने आत्तापर्यन्त केवळ ९ अवतार घेतले आहेत रे. १० वा अवतार अजुन घ्यायचा आहे. तु २० कुठुन शोधुन काढलेस?
1 Oct 2009 - 10:56 pm | देवदत्त
भक्तीवेदांत बुक ट्रस्टच्या श्रीमद् भागवत पुस्तकात दिल्याप्रमाणे खालील अवतार आहेत.
2 Oct 2009 - 11:53 am | मृत्युन्जय
विष्णू अवतार आणि विष्णूचि रुपे यात गल्लत करु नकोस रे. विष्णू ने खालील १० अवतार घेतले आणी इतर सर्व त्यचि रुपे आहेत.
मत्स्यावतार
कूर्मावतार
वराह अवतार
नृसिंह अवतार
वामन अवतार
भृगुपती (परशुराम) अवतार
रामावतार
कृष्णावतार
बुद्धावतार
कल्की अवतार
काहि सुत्रानुसार बलराम शेषनागाचा अवतार होता.
कल्की अवतार कलीयुगाच्या शेवटी होइल
2 Oct 2009 - 12:10 pm | देवदत्त
ही ही.. मी गल्लत केलीच नाही. जी केली असेल ती ISKCON च्या स्वामी प्रभुपाद ह्यांनी केली असेल किंवा मग त्यांच्या पुस्तकांचे भाषांतर करणार्यांनी केली असेल. ;)
अर्थात ह्या सर्व पुराणातील कथांबद्दल म्हणायचे तर ते खरेच आहे का ? कोण नक्की खरे आहे ? कोणती कथा कोणी ,कधी घुसडली आहे का ह्यांबाबत वेगळी चर्चा नेहमी घडत असतेच. :)
असो, तरीही कमल हासनचा 'दशावतारम्' हा माझ्या यादीत आहे.